गहराइयां: चित्रपट परीक्षण

Submitted by अश्विनीमामी on 14 February, 2022 - 20:36

गहराइयां चित्रपट बघितल्यावर जुन्या पहिल्या जॉज चित्रपटातील एक सीन आठवतो. डबडया बोटीतून शार्क ची शिकार करायला टीम निघाली आहे. सागरात कुठेतरी एका पाठला गानंतर टीम सुस्तावली आहे. शेरीफ मागील बाजूस बसून अ‍ॅबसेंट ली एक एक मांसाचा तुकडा आमी ष म्हणून शार्क ला टाकत आहे. एक प्रकारचा साचले पणा येतो आपणही शांततेत गुंगत जातो व अचानक ज्या शार्कची शिकार करायची आहे तो अगदी अगदी जवळ येउन मांसखंड गट्टम करतो व पाण्यात गायब होतो. शेरिफ व आपणही दचकून मागे होतो. हे जीवघेणं संकट जवळच फिरत होतं आणि आपण किती निवां त होतो.

ह्या समुद्रात कोण जाणे काय दडले आहे? किती खोल खोल आहे हे सगळे आणि आपण वर वर चार हात मारून स्वतःला सुरक्षित समजतो.
गहराइयां ( शकुन बत्रा दिग्दर्शित) ह्या चित्रपटाची ही मेन थीम आहे. चित्रपटातील तरूण पात्रे वर वर एक सुखद जीवन जगत आहेत. पण आत काय काय घडा मोडी होत आहेत ते जशी कथा उलगडते तसे दिसत जाते.

दीपिकाची व्यक्तिरेखा : गोंधळलेली व सर्व सावरुन घेण्याचा प्रयत्न करणारी , लहान पणी आई बाबां च्यातला बेबनाव बघितला त्यातून आईने केलेली आत्म हत्या स्वतः बघितल्याने त्याचा दृश्य व खोल मानसिक परिणाम झालेला आहे. त्या अजाण वयात ह्या सा ठी ती वडिलांना जबाबदार ठरवते व त्या द्वेषावर बिल्ड अप करत मोठी होते व आता जगत आहे. फॅमिलि बिझनेस मधून बाहेर पडल्याने घरी तुलनेने गरीबी आली व तिला तिचे क शिक्षण मनासारखे घेता आले नाही. लवकर पैसे कमवायला लागले वडी लांनी असे केल्याने आपले जन्माचे नुकसान झालेआहे अशीच तिची धारणा आहे. ह्याचा उलगडा शेवटास होतो व तिला भावनिक क्लोजर मिळते. हा शेवटचा दीपिका व नासि रुद्दीन शहा ह्यांच्यातील सीन जरूर बघा. उत्तम लेखन व अ‍ॅक्टिन्ग. पूर्ण चित्रपट च दीपिकाने तोलुन धरला आहे.

ती आई सारखे बनायचे नाही म्हणता म्हणता हळू हळू तशीच बनत जाते व ट्रॅप होते. त्यातून बाहेर पडायला काही एक काँप्रमाइज करते. व त्या
गिल्ट बरोबर पुढील जीवन जगायला सुरू करते. योग शिक्षिका असल्याने लवचीक शरीर व अगदी फिट दिसते. स सिनेमाची थीम समुद्र असल्याने तिचा पूर्ण कपडे पट त्याला शोभेसाच आहे. एक दोन दाच तिने फॉर्मल किंवा घरगुती कपडे घातले आहेत अगदी बाबांकडे आल्याव्र टीशर्ट पायजमा. घरी घरातले कपडे. अनाइ दा श्रॉफ अद जानिया ने कपडे पट केला आहे. उत्तम काम. मला तरी ते स्पोर्ट ब्रा लेनिन्ग्ज लुक आवडले ती कोणत्याही फ्रेम मध्ये व अँगलने मस्त दिसते. व अशी बॉडी तयार करण्यात फार मेहनत आहे.

प्रेक्षकांना पिक्चर वेगळा वाटतो आहे कारण त्याची ट्रीट में ट वेगळी आहे. टिपिकल बॉलि वू ड मेक अप, ड्रेसिन्ग ओव्हर अ‍ॅक्टिन्ग असे नाही आहे. त्यामुळे काहींना पिक्चर उथ ळ वाटू शकतो. पण अगदी हळू उकळायला ठे वलेली परिस्थिती जेव्हा फायनल उकळी घेते तेव्हा एकदमच विस्फोट होतो. जीवने विदीर्ण होतात व ती सांधायचा प्रयत्न ह होतो. पुढे जायचे निस्चय होतात.

मिलेनियल म्हणजे आत्ता तिशीत असलेल्या पिढीचे प्रश्न मांडले आहेत त्यामुळे चाळीस व पुढील प्रेक्ष कांना तसेच ज्यांचे जीवन तुलनेने सुरळीत विना त्रास गेले आहे. फारसे धक्के बसलेले नाहीत. त्यांना चित्रपट समजायला अवघड जाईल व हे काय असे कधी होते का असा तु क टाकला जाईल. त्यात आजकाल तर इ तरांचे प्रश्न प्रश्नच नसतात अशीच धारणा आहे.

अनन्याची व्यक्तिरेखा: हिने धाकट्या बहिणीचा रोल चां गला केला आहे. हिला स्वतः चे गिल्ट आहे पण वयामुळे अजून भाबडी आहे व चटकन
विश्वास ठेवते. सर्व ओके असावं असं हिला मनात्नं वाटत असतं पण कुठेतरी पाणी मुरते आहे हा व्हेग संशय येत जातो तिला व शेवटा कडे
दु:ख व फस वले गेल्याची भावना तिला जवळ जव्ळ नश्ट करते. क्रशड. ती झैन ला स्वतः केलेले पॉ टरीची वस्तु गिफ्ट म्हणून देते त्यातला गोडवा वायाच जातो. तो तिचा फायदा घेतो आहे. पण तिला उमजूनही ते समजून घ्यायचे नाही. त्या एका स्वप्नात शक्यतो जमेल तितके जगायचे आहे. झैन तिला गॅसलाइट करतो तो सीन उत्तम केला आहे. एखाद्याच्या विश्वासा चा स्वार्था साठी बिनदिक्कत फायदा घेणा रे लोक अस्तात त्यातला झैन आहे.

झैन : डार्क ग्रे कॅरेक्टर. फिझिकल केमिस्ट्री असलेला व ती वापरायला मागे पुढे न पा हणारा. समो रच्या व्यक्तीला रुचेल असे कथानक बनवून त्यावर विश्वास ठेवायला लावणा रे साय्को पाथिक नार्सिसिस्टिक कॅरेक्टर. हे लोक इतरांना वापरोन नामा निराळे होतात. पण ह्या कथेत त्याला त्याचे कर्म शेव्टी बुडवतेच. काही लोक कांद्या सारखे असतात. आत आत फक्त पापुद्रेच मिळत जातात. कोअर नाहीच एक साल काढले की खाली दुस रे. नवा मुखवटा. आणि सोलुन आतली खरी व्यक्ती शोधायचा प्रयत्न करणा र्‍याला रडव्णार् हे नक्की. गिव्हन.

करणः टिपिकल सेल्फ ऑबसेस्ड न्यु जनरेशन माणूस स्वतः चे लेखन करायला दीपिकाच्या जिवावर वेळ वाया घालवत असतो पण त्याच्या मनात तिच्या बद्दल रिस्पेक्ट आजिबात नाही. तिच्याशी ते लेखन शेअर करत नाही. तिने विचारून सुद्धा. रिलेशन शिप मध्ये त्याने तिलाही दूरच ठेवले आहे. जे का ही देणे आहे ते तिच्या साइडने. कोण तीच जबाबदारी घेत नाही. सर्व तिच्या वर ढकलून तिला गृहित धरून वर अपेक्षा वाढवतो. तिला अजूनच पकडून ठेवायला प्रपोज करतो.

नसिरुद्दीन शाह चीए व्यक्तिरेखा: ही जीवन सागरात वेळ व अनुभव घेउन परिपक्व झालेली आहे व त्यातून तरुन आता एक शांत समजुत दार
जीवन जगत आहे. मागील घटनांचे अर्थ समजून घेउन त्या पुढे कथि त करायच्या का गप्प बसून आपल्या बरोबरच ते कालबाह्य त्रास अ‍ॅगनी संपवाय्ची ह्यतला चॉइस त्याने केला आहे. तो ही जाणीव पूर्वक. ह्याचा व दीपिकाचा सीन ग्रेट आहे. अगदी पदर डोळ्याला टैप.

जिते शः रजत कपूरः टिपिकल रुथलेस मुंबईकर डील मेकर. ह्यांना बाहेरुन मुंबईत येउन स्वतः ची उन्नती करायचा प्रयत्न करणार्‍यांबद्दल काहीही सहानुभूति नसते. फक्त डील महत्वाचे प्रॉ फिट महत्वाचे. त्यासा ठी कोणाचाही बळी द्यायची तयारी. प्रचं ड स्वार्थी पण ़ क्विड प्रो
को ला तयार. कारण ते डील संपवून पुढे जायचे असते.

ह्या झाल्या व्यक्तिरेखा.
चित्रपटाचे टेकिन्ग नेत्रसुखद आहे. प्रत्येक ट्रांझिशन ला समुद्राचा लाटांचा यो ग्य वापर केला आहे व सूर्यास्त एकदम मनमोहक रीत्या घेतले आहेत. ती लक्षरी या ट / की बोट! मला फारच आवडली. ती व समुद्र हे पण एक प्रकारच्या व व्यक्तिरेखाच आहेत. व त्यांचा वापर कथानकात केलेला आहे.

इंटिमसी म्हणा ल तर ती मला तरी फार जाण वली नाही. इट वॉज ऑल अबाउट पॉवर. झैन आपल्या मोहात पाडा यच्या स्किल चा वापर करून
दीपिकाला पटवतो व कार्यभा ग साधला की तिला हटवून टाकायला रे डी आहे. त्यांच्यातील शरीर संबंध सोललेस वाटतात. मानसिक गुंतवणू क दोन्ही बाजूनी नाही. तुलनेने मर्डर सिनेमातील इमरान हशमी व मल्लीकाची केमिस्ट्री बघा. हे जुने प्रेमी आहेत व त्यांना खरंच परत जवळीक
साधायची आहे.

प्रत्येक पात्र अगदी कडेलोटा पाशी येउन अलगद निसटते. व एक आपल्या कर्माने अडकून जातो. कोणाच्या जीवना त काय व कसली सिक्रेट अस्तील ते काय ओव्हरकम करायचा प्रयत्न करत असतील आपल्याला वरून कळत नाही. त्यासाठी त्या माणसात सखोल डुबकी मारायची त्ळा परेन्त जायची आपली दरवेळी तयारी असते का? काय सापडेल ह्याची शाश्वती नाही अश्या वेळी पुढे जायला लाइफ जॅकेत असते का? चित्रपट हा विचार करायला लावतो.

वुडी अ‍ॅलन च्या चित्रपटाची डिरेक्ट कॉपी आता तरी कोणी मारणार नाही. कथानकात साम्य आहे इतके च पण असे म्हणतात जगात केवल सात
कथा आहेत ज्या परत परत वेगळ्या रुपात समोर येतात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून पाहिला नाही. पाहिल्यावर वाचतो निवांत. कंगना राणावतचा निष्पाप आणि सोज्वळ रिव्ह्यूही वाचायचा राहिलाय. कलाकारांचे चेहरे कोविड मास्क ने न झाकल्याने तिचं काहीतरी टोकाचं मत झालेलं दिसतंय.

छान अमा!!
ये कुछ मेरे थॉट्स -
१. रडक्या सीन्समध्ये, क्लोज-अप्स मध्ये दिपिकाचे वय बोलते. लवचिक शरीर, स्कीन शो, आणि लहान हिरो याच्या जोरावर बर्‍यापैकी काँपेन्सेट करते पण.... अद्याप अन्य ३५+ ए-लिस्टर्स प्रमाणे हिचे मेकप लाईन/ क्लोद्ज लाईन / व्हेंचर इंव्हेस्टींग ऐकीवात आलेले नाही. .....
२. धैर्य - त्याचे पात्र तसे कमी फूटेजचे आणि अ‍ॅक्टींगमध्ये दिपिका त्याला खाते. बहुधा इत्तेपैसेमेंइतनाचमिलेंगा धोरण असावे. मिनीमम वेज वाढवा. ह्याच्यापेक्षा लाटा दृष्यात समुद्राला अधिक अ‍ॅक्टींग करावी लागली असा अंदाज आहे.
३. सिध्दांत - शाहरूखचा 'बाजीगर' मधला रोल जसा होता तसा ह्याचा 'चार्मिंग रास्कल' रोल आहे पण हा चार्मिंग कमी नि रास्कल ही कमीच वाटतो.
४. अनन्या- If you drop a coin (annyy!!) in a piggy bank every time she says 'You Okay?' to someone, you will be a millionaire in 2 hours. दिपिकाची बहिण मस्त शोभते.
५. नसिरूद्दीन - इजाजत मध्ये उपरती झालेला नासिर होता तसे वेगळे सुंदर कॅरॅक्टर. अगदी कमी फूटेज पण सीन्स खाऊन टाकतो. "मरणान्तानि वैराणि" हा सामाजिक संकेत लोप पावत चाललेला आहे. व्यक्ती गेली तरी तिच्या आयुष्यातील वादग्रस्त क्षण पुढील पिढीला ग्रासतील इतकी सखोल चर्चा किंवा सटल उल्लेख घडत रहतात. त्यात व्यक्तीशी वैयक्तिक वाद असतील तर अजूनच कठीण... पण आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर उपरती होऊन, गेलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना 'क्लोजर' मिळेल असे त्याचे वडिलकीचे वागणे सुंदर दाखवले आहे. त्याच्याकरता शेवटची ३५ मिनीटे जरूर बघावी. (अनुपमा चोप्रा रेकमेंडेशननुसार मी आधी ही ३५ मिनीटे बघितली आणि नंतर बाकी सिनेमा इतर कामे करत करत पाहिला Happy )

मायबोलीकरांपैकी मामी यांना आवर्जून हा सिनेमा दाखवावा असा आहे. विविसंबासं (विवाह विना संबंध बाह्य संबंध) याबद्दल गोष्ट कधी लिहीणार त्या?

अनुपमा चोप्रा रेकमेंडेशननुसार मी आधी ही ३५ मिनीटे बघितली आणि नंतर बाकी सिनेमा इतर कामे करत करत पाहिला Happy )>> असे केल्याने जे परिस्थिती ला स्लो बॉइल वर ठेवले आहे त्याची मानसिक उलथापालथ मिस होते.

द्याप अन्य ३५+ ए-लिस्टर्स प्रमाणे हिचे मेकप लाईन/ क्लोद्ज लाईन / व्हेंचर इंव्हेस्टींग ऐकीवात आलेले नाही. .>> तिची भारतात एक एपिगामिया ग्रीक योगर्ट ब्रँड आहे त्यात इन्वेस्ट मेंट आहे. हे मला माहिती कारण वाचले व जाहिरातीत ती असते नेहमी. बाकी त्यांच्या सी एला माहीत असावे.

वयस्कर ३०- ३५ वयाच्या स्त्रियांचीच कथा आहे. साडे पन्नाशीतला हिरो व त्याच्या बिन बो भाट प्रेमात पडलेली नवखी २० ची हिर्वी न ही सिस्टिम कितपत बिलिव्हेबल वाट्ते. ते ही चवी ने बघ णारा एक वर्ग आहे.

बाझीगर व त्यातील भयंकर रंजित व ओव्हर अ‍ॅक्टिन्ग आता कालबाह्य झाले आहे बघता बघता सटली सर्व स्व लुबाडणा री झैन ची व्यक्तिरेखा आहे. शरीर, मन, अवेलेबल आर्थिक रिसोर्सेस सर्व लुबाडायची तयारी करून च तो मैदानात उतरला आहे. अशी कसे ही करून स्टेबल होणयची स्वप्ने बघ णारी मुले रोज व्हीटीला उतरत असतात सेकंड क्लास कंपार्ट मेंट मधून.

ते ## कृपया संपादित कराल का? सरांच्या भावना दुखावायला नकोत. व इथे तो उल्लेख नको, धन्यवाद. मुद्दा समजलेला आहे.

सिध्दांत - शाहरूखचा 'बाजीगर' मधला रोल जसा होता तसा ह्याचा 'चार्मिंग रास्कल' रोल आहे
>>>

स्पोर्टस ब्रा आणि हॉट सीन यानंतर हे अजून एक कारण पिक्चर बघायचे Happy

मला अजिबात आवडला नाही. काही डेप्थ च नाही...नावच नुसतं गहराईया!!
वाईल्ड सीन्स, आवेगी रोमांस.......अमा म्हणतात तसा...सोल लेस!

ही दीपिका तरी का आणी कशी त्याला लिफ्ट देते मुळात?
आणी पूर्ण सिनेमा भर स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स....!!! नाही आवडले !

Sports bra ani shorts -- ह्यात काही विशेष नाही वाटले. ती व्यवस्थित carry करतिये की.

पण चित्रपट खास नाही वाटला.

वा अमा काय मस्तं लिहिलेत आणि तुमच्या वयातल्या लोकांना दिपिकाचे संबंध हे चाळे वाटू शकतात तरीही तुम्ही संयत पणे लिहिलेत. हॅट्स ऑफ्फ!

दिपिका मस्त भुमिका वठवते, प्रश्न च नाही. नासिर सोबत च्या प्रसंगात हमखास आपल्या बाबांची आठवण येते आणि डोळे पाणवतात.
झाईन आणि टिया पात्रांचा अभिनय पण आवडला.. टिया फार भोळी वाटते तसंच कॅरॅक्टर आहे आणि तिने केलय पण छान.

दिपिका आणि झाईन मधली केमिस्त्री अजून खुलवायला हवी होती राहून राहून वाटते..खूप वर वर घेतलंय त्यांचं रीलेशन

मी पण बघितला. अनन्या आवडली. दिपिकाचं कॅरॅक्टर छान आहे. रिअलिस्टिक. झेनपण छान वाटला. पण सिनेमा डिप्रेसिंग आहे. Karma plays off.

लेख चांगला आहे.मला स्वतःला तरी अजिबात नाही आवडला मूव्ही.
ब्रा च्या जाहिरातबाजीबद्दल वर सर्वांना ++1
बाकीचे योगा टीचर कधी नॉर्मल कपडे घालतच नाहीत का.
फ वर्ड पण अति आहे. कान किटले ऐकतांना.
स्पॉयलर वॉर्निंग
.
.
.
.
झैनचा मृत्यू चक्क आत्महत्या वाटतो पोलिसांना? त्याच्या मोबाईलवरचे सतत तिच्या नंबरवर येणारे जाणारे कॉल्स, व्हाट्सएप मेसेज, त्याने तिला भेटीला बोलवलं तो शेवटचा कॉल यावरून तिला निदान चौकशीला तरी बोलवायला हवं होतं. भले तो नंबर काहीही नावाने सेव्ह असेल. पोलिसांना मोबाइल कंपनीकडून कॉल लॉग मिळतोच की. ती बोट परत किनाऱ्यापर्यंत कशी आली हे तरी संशयास्पद वाटायला हवे होते.

दीपिकाचे वय दिसते. मोठी बहीण आहे तर धाकट्या बहिणीच्या बॉयफ्रेंडमध्ये का गुंतते ते कळत नाही. तिचे उठसुठ बेसिनवर वाकून विचार करणे वरवर वाटते. तिची निराशा मनाला भिडत नाही.

सिनेमा विस्कळीत वाटला..दीपिकाचं कॅरॅक्टर उथळ वाटलं..२ दिवसाच्या फ्लर्टींग वर ६ वर्षांचं नातं संपवते.
अनन्या निरागस,तिच्या जीवनमानाला अनुसरून प्रिन्सेस वाटते. आई वडिलांनी खूप प्रोटेक्ट केलेली .. आजूबाजूची परिस्थिती रीड करून, विचार करून निर्णय घेणाऱ्यातली वाटत नाही. तिला कळतंय पण वळवून घ्यायचं नाहीये. राजकुमारी- राजकुमार,टस्कनी वेडींग ह्या स्वप्नात अडकलेली.तीच काम बरं वाटलं.
झेन जेवढा चार्मिंग असायला हवा तसा वाटत नाही. त्याच्याकडे बघून च वाटतं की हा नात्यात लॉयल राहू शकत नाही.खरं तर वासू वाटला. (मी प्रोमो न बघता सिनेमा पाहिला.सो नो पूर्वग्रह).
शेवट करताना घाई झालेली वाटली. केवळ सर्व जणं मूव्ह ऑन झाले हे दाखवायची घाई झाली.
एक प्रकारचा कंटाळवाणं वातावरण पूर्ण चित्रपटात आहे.कदाचित दिग्दर्शकाला असंच हवं होतं.

मान्य आहे झेन स्वार्थी दाखवलाय पण दिपिका त्याला मनापासून आवडलेली असते आणि त्यामुळेच टियाकडून मिळालेली मदत तो परत करणार असतो.. पण बिझनेसमधे फ्रॅाड, लॅास आणि पुढे जेलमधे जाण्याच्या भितीने हादरतो.. त्याचा कोणी गॅाड फादर नसतो किंवा त्याला फॅमिली सपोर्टही नसतो त्यामुळे फक्त टियाच त्याला वाचवू शकते हे त्याला कळतं.. पण त्यावेळेस दिपिका टियाला खरं काय ते सांगायची धमकी देते ..आधीच्या रिलेशनमधे तीने दाखवलेला समंजसपणा गंडलेला असतो.. एकंदरीत सगळ्यांचीच वाट लागलेली असते आणि प्रत्येक जण स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात असतो

अमा लेख आवडला . मला चित्रपट - गुन्तलेली प्रेमकहाणी वाटला होता . अजून बघितला नाही .
सगळे स्पॉयलर्स वाचून झाले , आता बघेन विकांताला .
मला प्रोमोमध्ये सिद्धांत खूप आवडला आणि अनन्या पण . दिपिका फारशी आवडत नाही .
अलिबागच्या घरासाठी तरी बघेन , कंटाळा आला तर बंद करेन Happy

अमा,
फार मस्तं लिहिलय, मला आवडला नाही सिनेमा पण तुमच्या चष्म्याने पहावा म्हणते !

स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्स चा टॅबु ? Uhoh
वर्काउट करताना नॉर्मल मुलीही घालतात हे, ती तर इन्स्ट्रक्टर आहे !
उद्या स्विमिंग करताना स्विमसुट घातला म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले तर आश्चर्य वाटणार नाही #न्युइंडिया

कथानकात तिचे योगा ईन्स्ट्रक्टर असणे गरजेचे होते का? की असा बहुचर्चित पोशाख घालता यावा आणि ते समर्थनीय व्हावे म्हणून तिला योगा ईन्स्ट्रक्टर दाखवले आहे. जे काहीही दाखवले असते तरी चालले असते.

संदर्भ झिमा चित्रपट चर्चा - कथानक ईंग्लंडलाच घडताना दाखवणे गरजेचे होते का असा एक मुद्दा तिथे आला होता.

मस्त रिव्ह्यू.. मला आवडला आहे सिनेमा..
दिपिकाने disturbed असल्याचे बेअरिंग पहिल्या पासून मस्त पकडले आहे..
झैनचा मृत्यू -- ज्या प्रकारे जीतेश दीपीका कडे बघून बोलत असतो त्या नुसार एवढी मोठी डिल मिळाल्यानंतर त्या ने ते ,manage केलेलं असावं अस वाटतं..

अमा..लास्ट पँरा...परफेक्ट.
प्रत्येक पात्र अगदी कडेलोटा पाशी येउन अलगद निसटते. व एक आपल्या कर्माने अडकून जातो. कोणाच्या जीवना त काय व कसली सिक्रेट अस्तील ते काय ओव्हरकम करायचा प्रयत्न करत असतील आपल्याला वरून कळत नाही. त्यासाठी त्या माणसात सखोल डुबकी मारायची त्ळा परेन्त जायची आपली दरवेळी तयारी असते का? काय सापडेल ह्याची शाश्वती नाही अश्या वेळी पुढे जायला लाइफ जॅकेत असते का? चित्रपट हा विचार करायला लावतो. ---- + १२३४५६७

त्या लाईफ जॅकेटला 'लॉजिक' म्हणतात.

टीया वकिलांना दाखवल्याशिवाय सही करणार नाही हे कळणे किंवा अलिशाला जरी झेन-टीयाचा ब्रेक-अप झाला तरी केवळ प्रेग्नंट आहे म्हणून तो आपल्यापाशी राहणार नाही हे कळणे किंवा धैर्यला प्रतारणा ही फक्त शारिरीक नसते तर आपण अलिशाशी आर्थिक, भावनिक, वैचारिक प्रतारणा केली हे कळणे, झैन बद्दल तर काय बोलायलाच नको. लॉजिकची अ‍ॅलर्जी असल्यासारखे वागल्यावर कडेलोट होणार नाही तर काय?

लॉजिक वापरायचंच नाही कारण "आपण कधी सिनेमा फक्त सिनेमा म्हणून पाहणार?" आणि मग "उफ ये गहराईयाँ" करत गटांगळ्या खात स्पोर्ट्स ब्रा बद्दल बोलायचं..... Happy

Aalisha could not get fancy education because father didn't have big money like her uncle. Tia could get that. This is one of her peeves . She had to start earning at age 20 . Such people do small courses and try to earn . For example dance trainers gym trainer beautician . People with secure upbringing and proper education use the services of such people but rarely treat them as humans with issues if their own. If you close your eyes and hear the private conversations of hair stylists and beauticians and the way the interact with customers you can see the difference. The customer is thinking of the next party or holiday while the service person thinks of the next meal . The next paycheck or tip.

This resonates with me . I couldn't complete my pg and needed to be financially independent so took to writing ad copy. Freelance writing I have always thought as an intermediate skill.

I loved Deepika s skin tone. Not fair but a healthy n Indian bronze. And almost no make up in the second half.

Bipasha basu is another lady who can carry that sports bra look. Refer Dhoom 2. She looked fabulous compared to Aishwarya who came across as a Barbie.

Happy अमा, नक्की काय म्हणायचं ते कळलं नाही. खूप सोसलं आहेस पण ते सगळं चक्रम सिनेमात आठवून चुकीच्या जागी रेझोनेट्/कनेक्ट तर होत नाही ना. तुझा काळ वेगळा नि सिनेमातल्या दिपिकाचा काळ वेगळा. अनेक लोकं स्टुडंट लोन्स घेऊन आता शिकतात. २० काय अगदी १७-१८ मध्ये कामाला लागतात. अ‍ॅप वगैरे फंडींग मिळवताना स्टुडिओला टाळा लागेल इतकी एक्विटी देत नाहीत. पण इतकं लॉजिक लावायचं नाही तर मग काय गहराईंयाँच मिळणार ना....
Just like Deepika, your smile can light up any room that you walk in -- I hope this resonates with you someday.

The difference between between upper class secure upbringing and struggle at an early age with few resources had existed from ancient history times. Egyptian Judean Roman. Rest assured I carry no illusions.

The entire app funding thing is fraud. From the beginning. It's the typical Mumbai type crime.

मला नाही वाटत दिपिका चा तिच्या लाँग टर्म बीएफ ला सोडायचा निर्णय चूक असतो.
तो आधी (६ वर्षात) कसा ही असो,पण आताशा तिच्या शी तोडून वागत असतो, तिला ग्रांटेड घेत असतो. तुला काय ब्रिद ईन, ब्रिद आउट तर करायचय, असं तिच्या प्रोफेशन ला हिणवत असतो, तिच्या पैशांनी बिलं भागत असून.. तिच्या त्याच्या लेखन बद्दल ओपीनियन ला त्याच्या लेखी शुन्य किंमत असते..वगैरे वगैरे.
एकुण काय तर ही सगळी साईन्स दिसुन ही तिने त्याला फक्त लाँग टर्म सोबत आहे म्हणुन हो म्हणायचं का? पब्लिक हो, डोळे उघडा.
आजकाल तर डायव्होर्स होतात या कारणांनी, ती तर गफ्रे असते.

तिच्या आणि झाईन मधली केमिस्ट्री जरा चमकायला हवी होती असे मात्रं वाटते, कारण अगदीच फक्त आर यु फ्लर्टींग विथ मी, आणि मग सरळ धडाधड कामा ला सुरुवात..फारसं काही नाही!

Just like Deepika, your smile can light up any room that you walk in -- I hope this resonates with you someday.>> हे कोणासा ठी आहे ताई?

Pages