Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा 
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
आजचा शब्द म्हटला तर सोपा.
आजचा शब्द म्हटला तर सोपा.
285..mm 0. अति घाई.......
285..mm 0. अति घाई.......
Wordle 285 6/6
Wordle 285 6/6
आजचं काही सुटल नाही
आजचं काही सुटल नाही
आजचा शब्द.. शब्द म्हणून आला
आजचा शब्द.. शब्द म्हणून आला नसता बहुतेक. पण एक अक्षर आलं की त्याच्या आजूबाजूला जनरली काय असतं हा गेस करत पटकन सापडत गेली अक्षरं.
286...5/६.
286...5/६.
(No subject)
आजचा शब्द ऐकल्यासारखा
आजचा शब्द ऐकल्यासारखा वाटातोय. अर्थ माहीत नव्हता.
आजचा शब्द ऐकल्यासारखा वाटातोय
आजचा शब्द ऐकल्यासारखा वाटातोय. अर्थ माहीत नव्हता. >>>
हॅरी पॉटरमध्ये आहे.
Wordle 286 5/6
Wordle 286 5/6
भा, हेच लिहिणार होतो. सेड्रिक
भा, हेच लिहिणार होतो. सेड्रिक डिगरीचा पहिला टास्क आठवा भरत.
आज पहिल्याच वेळी तीन अक्षरं बरोबर जागी आल्याने हुरळुन गेलो तर जेमतेम शेवटी जमलं.
(No subject)
हा शब्द माहीत नव्हता.
हा शब्द माहीत नव्हता.
287... 6/6 अंदाजपंचे..
287... 6/6
अंदाजपंचे..
(No subject)
सेम. इतके जास्त शब्द हिरवे
सेम. इतके जास्त शब्द हिरवे झाले की न येण्यावाचुन गत्यंतरच न्हवतं.
इतके जास्त शब्द हिरवे झाले की
इतके जास्त शब्द हिरवे झाले की न येण्यावाचुन गत्यंतरच न्हवतं.
>>>>
(No subject)
288.....4/6
288.....4/6
(No subject)
मधे काही दिवस खेळलो नाही, मग
मधे काही दिवस खेळलो नाही, मग आधल्या दिवसाच्या शब्दापासून सुरुवात करायचं खुळ गेलं.
आज शेवटच्या प्रयत्नाला खूप वेळ लावला. उरलेल्या शब्दांची सगळी कॉम्बिनेशन करून बघितली आणि सोडवलं. शब्द तसा सोपा होता.
मला आजचा शब्दच जरा वेळाने
मला आजचा शब्दच जरा वेळाने आठवत नाही. व्यत्यय, तुझे वाचून मी तसं करणार ठरवलं पण आदल्या दिवशीचा शब्द आठवणे बस की बात नाही समजून ते काही जमलं नाही.
मला आजचा शब्दच जरा वेळाने
मला आजचा शब्दच जरा वेळाने आठवत नाही. ....... ओह, सेम पिंच!!
.
(No subject)
(No subject)
(No subject)
मी रोज ज्यात २ तरी वॉवेल्स
मी रोज ज्यात २ तरी वॉवेल्स असतील अशा नवीन शब्दानं सुरूवात करते. आदल्या दिवशी कुठल्या शब्दानं सुरूवात केली होती हे आठवतच नाही म्हणून नवीन शब्दाची पळवाट
मी पण स्वरभरणा असलेल्या
मी पण स्वरभरणा असलेल्या शब्दांनी सुरुवात करतो, पण मनातल्या मनात प्रार्थना करतो की व्यंजन मिळू दे. सगळे स्वर सापडले की मला कठीण वाटतं. त्या ऐवजी एक जरी व्यंजन मिळालं असेल तर पटपट सुचतं.
मी सर्वाधिक वापरल्या
मी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या तीन व्यंजनांनी बनलेला शब्द वापरतो.
289...3/६
289...3/६
Pages