Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा 
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
डायरेक्ट इकडे कसं टाकतात? मी
डायरेक्ट इकडे कसं टाकतात? मी आधी वॉट्सप ला पाठवून मग स्क्रीन शॉट टाकला.
(No subject)
डायरेक्ट इकडे कसं टाकतात? मी
डायरेक्ट इकडे कसं टाकतात? मी आधी वॉट्सप ला पाठवून मग स्क्रीन शॉट टाकला.
>>> मी पण तसच करतो
Good
Good
(No subject)
309...0.
309...0.
चार अक्षरे येऊनही कोडे सुटले नाही.छान होता शब्द,म्हटले तर सोपा होता.
आजचा शब्द मी त्या रूपात ऐकला
आजचा शब्द मी त्या रूपात ऐकला नव्हता. त्यावरून तयार झालेला दुसरा शब्द मात्र परिचयाचा आहे.
(No subject)
310....0. वेगळाच शब्द आहे.
310....0.
वेगळाच शब्द आहे.
आधी मिळालेलं एक अक्षर चौथ्या
आधी मिळालेलं एक अक्षर चौथ्या प्रयत्नात वापरायला विसरलो.
Wordle 309 4/6
Wordle 309 4/6
(No subject)
आजचा शब्द नवीन आहे माझ्यासाठी.
Wordle 310 4/6
Wordle 310 4/6
तीन प्रयत्न झाल्यावर काही
तीन प्रयत्न झाल्यावर काही डोकं चालेना म्हणून काय वाट्टेल ते ट्राय केलं.
हे क्रियापद फॉर्म मध्ये माहित होतं, विशेषण म्हणून असं वापरतात हे नवं समजलं.
आज पहिल्या शब्दात मला दोन
आज पहिल्या शब्दात मला दोन स्वर आणि एक व्यंजन मिळाले. एका स्वराची जागाही कळली. ही तीन अक्षरे घेऊन शब्द शोधणे कठीण होते.
दुसर्या फेरीत एक स्वर वापरायला विसरलो. पण त्या शब्दामुळे दोन व्यंजने मिळाली आणि पाचही अक्षरे कळली.
तरीही शब्द मिळत नव्हता. माझ्याकडच्या वेब्स्टर डिक्शनरीत तो नाही. मग अचानक आठवला. शब्दाचा उच्चार स्पेलिंगशी फटकून आहे. या नावाचा एक चित्रपट / वेब सिरीज आहे आणि त्याबद्दल मायबोलीवर लेख आहे.
(No subject)
311..5/६

(No subject)
आज माझा तिसरा अन् चौथा शब्द पहिल्याच प्रयत्नात फिट झाले, मग काही जास्त वेळ लागला नाही, वेबासिरिज माहीत होतीच
(No subject)
आजचा नाही आला. मग गुगल केला.
आजचा नाही आला. मग गुगल केला.
(No subject)
312..4/६
312..4/६
(No subject)
Wordle 312 3/6
Wordle 312 3/6
आज १०० खेळून झाले
आज १०० खेळून झाले
सरासरी ४ पेक्षा कमी प्रयत्न लागले
(No subject)
हा शब्द माहीत नव्हता
हा शब्द माहीत नव्हता
Wordle 313 5/6
Wordle 313 5/6
आज गुगलबाबा जिंदाबाद!!
आज गुगलबाबा जिंदाबाद!!
आजचा चौथ्यातच आला असता. पण
आजचा चौथ्यातच आला असता. पण पहिल्या शब्दाला बरेच पर्याय असतील वाटू लागलं आणि मग पर्यायांचा शब्द बनवून काही बाद केले.
Pages