Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा 
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
आजचा शब्द तीन स्वर आणि एस टी
आजचा शब्द तीन स्वर आणि एस टी दोन व्यंजनांची भाजी आहे
रोज प्रथम शब्द म्हणून वापरायला हरकत नाही
आज सोडवण्याआधी इथलं वाचल्याने
आज सोडवण्याआधी इथलं वाचल्याने २ प्रयत्नांत आला.
272..6/६
272..6/६
(No subject)
(No subject)
(No subject)
Wordle 273 3/6
Wordle 273 3/6
(No subject)
(No subject)
आजचा शब्द ओळखता आला नाही.
आजचा शब्द ओळखता आला नाही.
(No subject)
(No subject)
मला कोणीतरी मधलं अक्षर सांगा.
मला कोणीतरी मधलं अक्षर सांगा.
अवल यांनी मदत केल्यावर सुटलं
अवल यांनी मदत केल्यावर सुटलं . मी तिसरं अक्षर पाचव्या जागी ठेवून शोधत होतो.
Untitled document_0.pdf (19
Untitled document_0.pdf (19.33 KB)
आजचा शब्द मला आल नाही.3
आजचा शब्द मला आल नाही.3 अक्षरे आली.पण शब्द येईना.मग 6 वेळा वेगवेगळे शब्द टंकले.मग उत्तर मिळाले.
(No subject)
(No subject)
275..3/६
275..3/६
(No subject)
Wordle 275 2/6
Wordle 275 2/6
सोप्या शब्दाला जास्त विचार
सोप्या शब्दाला जास्त विचार करत बसलो !
(No subject)
Screenshot_20220321-225436_
Screenshot_20220321-225436__01.jpg (66.05 KB)
![]()
हुश्श ! जमली एकदाची image
हुश्श ! जमली एकदाची image टाकायला. बादवे wordle पेक्षा हे अवघड गेलं मला !
आजचा शब्द माझ्याकडच्या
आजचा शब्द माझ्याकडच्या वेबस्टर डिक्शनरीत नाही. अमेरिकन इंग्लिशमधला शब्द आहे, असं केंब्रिज डिक्शनरी म्हणते आहे.
आजचा शब्द अगदीच नवीन
आजचा शब्द अगदीच नवीन माझ्यासाठी
Wordle 276 4/6
Wordle 276 4/6
शब्द माहीत नव्हता. शेवटल्या
शब्द माहीत नव्हता. शेवटल्या पायरीला मग हाच एक शब्द असू शकेल असे वाटून दिला आणि टोला बरोबर निघाला.
Pages