Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा 
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
(No subject)
Wordle 265 ३/6
Wordle 265 ३/6
नाही जमला आजचा शब्द सोपा असून
नाही जमला आजचा शब्द सोपा असून पण
I guessed today's word (265)
I guessed today's word (265) in the second attempt.
आजचा शब्द मलाही आला नाही.
आजचा शब्द मलाही आला नाही. एकतर माझ्यात पेtion पण नाहीत आणि 3 संधी अकारण घालवल्या.सोपा शब्द होता.
Wordle 265 4/6
Wordle 265 4/6
मलापण आज ६ प्रयत्न लागले .
मलापण आज ६ प्रयत्न लागले . ५व्या वेळेस clamp वापरला म्हणून काय नाही हे तरी कळाले .
सेम! तिसर्या ट्रायला बरचसं
सेम! तिसर्या ट्रायला बरचसं येऊनही खूपच जास्त पर्याय होते.
absurdle होतंय असं वाटलं की
absurdle होतंय असं वाटलं की थांबायचं.
असा शब्द किती विविध व्यंजनं वापरून बनू शकतो हे बघावं.
त्यातील जास्तीतजास्त व्यंजनं आणि एकच स्वर वापरून बनणारे शब्द द्यावेत. त्यात मग एकही चौकोन हिरवा/पिवळा आला नाही तरी चालेल असे मानावे.
उद्देश नव्या व्यंजनाने किमान पिवळा चौकोन द्यावा आता असतो.
266-3
266-3
(No subject)
मानव, खरं आहे. कळतं पण वळत
मानव, खरं आहे. कळतं पण वळत नाही. दरवेळी असंच ठरवतो पण ...
266.. 0 patience कमी पडले.
266.. 0
patience कमी पडले.
आजच्याइतका सोपा शब्द क्वचित
आजच्याइतका सोपा शब्द क्वचित येतो. आजचा दिवस मस्त आहे.
सोपे शब्दच अवघड जातात मला.
सोपे शब्दच अवघड जातात मला.
(No subject)
patience कमी पडले.
patience कमी पडले.
>>> काल माझे तसच झालं
एकामागून एक options try करत गेलो.. latch hatch catch
६ /६ झालं तरी उत्तर नाही आले
267... 5/6
267... 5/6
(No subject)
267 आलं चौथ्या प्रयत्नात.
267 आलं चौथ्या प्रयत्नात.
रांगोळी द्यायचा कंटाळा. हल्ली सगळ्याचाच कंटाळा येतो
(No subject)
267.. 5/6
२६८.. 5/6
(No subject)
आता नवीन नियम आलाय का?
आता नवीन नियम आलाय का?
त्यातील जास्तीतजास्त व्यंजनं आणि एकच स्वर वापरून बनणारे शब्द द्यावेत. >>> हे करताना मला पिवळ्या चौकोनातील सगळी अक्षरे नव्या शब्दात असायला हवीत हा नियम दाखवत होते.
सेटिंग बघा.
सेटिंग बघा.
Hard Mode
Any revealed hints must be used in subsequent guesses
हे निवडलंय का?
Wordle 268 5/6
Wordle 268 5/6
(No subject)
हे निवडलंय का? >>> तुमचा वरील प्रतिसाद पाहून सेटिंग बदलले
हे निवडलंय का?>>> हो. खरेच की
हे निवडलंय का?>>> हो. खरेच की. धन्यवाद.
२६७ - २ २६ ८ - ३
२६७ - २
२६ ८ - ३
Pages