थंडीच्या आठवणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 January, 2022 - 15:22

गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.

या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून सहपरीवार सहकुटुंब मॉर्निंग वॉकला गेलो. कपडे तेच आपले हलकेफुलके आणि स्टायलिश. कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे मुंबईत कसली डोंबलाची थंडी म्हणत केव्हाच लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गारठलो तेव्हा मॉर्निंग वॉक एका जागीच दाटीवाटीने बसून साजरा होऊ लागला. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत सर्वांनी तो काढला, पण खिश्यात न टाकता कानावर चढवला. आणि त्या जागी हात खिश्यात टाकले. पण तरीही नारियलपाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला खिश्यातले हात बाहेर आले. पोरं सोबत असल्याने घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले...

सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम पोहे मिसळीचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा - कांदाभजी - चहा - समोसे - चहा - बटाटाभजी - चहा थालीपीठ - चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून दिली.

थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असह्य झाले तेव्हा ताडकन ऊठलो आणि पाहतो तर काय... पोराने सवयीने एसी चालू करून ठेवलेला. आता त्याला बिचार्‍यालाही थंडी हा सीजन नवीनच. त्याचा तरी काय दोष. तरीही आलेला राग शांत करायला चार वर्षाच्या पोराला जितके बदडणे अलाऊड असते तितके त्याला बुकलून काढले. त्याने तो गरम झाला. पण माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती. उलट रात्री पुन्हा गारठू लागलो तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, और बंबई की थंडी है भाई.. क्या पता, कल हो ना हो Happy

तर थंडी म्हटले की मला सर्वात पहिले माझगावच्या आमच्या चाळीतील दादरावर पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिला आले, अरे ही तर आमची शेकोटी Happy

म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्‍या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.

याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. पाशवी प्रथाच म्हणा ना. अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा जाळण्याचा कार्यक्रम पार पडायचा. ती सुद्धा एक शेकोटीच म्हणू शकतो. पण जाळण्याआधी ती बुजगावणी ख्रिसमसपासून बिल्डींगच्या कॉमन गॅलर्‍यांना लटकावलेली असायची. थोडीथोडकी नाही तर तब्बल दहाबारा बुजगावणी बनायची. ते बनवायला लागणारे सुके गवत तेव्हा भायखळा भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा शेकोटीत त्यातलेच गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजच्या मुंबईत राहणार्‍या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.

मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्‍यांसोबत एखादी थंडीची लाट मुंबईत अवतरते. तेवढ्या काळात आम्ही मुंबईकर रजनीकांतचा फ्रिज उघडा राहिलाय वगैरे पांचट जोक मारून घेतो. झाल्यास पुण्याच्या गुलाबी थंडीचीही खिल्ली उडवायचा प्रोग्राम पार पडतो. पण बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब.. Happy

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३१ डिसेंबरला पुतळा जाळणे हे आमच्या ठाण्यात अजूनही होते. ऋन्मेषने सांगितल्याप्रमाणे कधी त्या पुतळ्याला सांता (हे फार पूर्वी म्हणजे मी लहान असताना होते नंतर सगळ्यांना सांता चांगला असतो हे माहीत झाल्यामुळे असेल मात्र नंतर त्या पुतळ्याला सांता नाव नाही दिले) तर कधी गब्बर, कधी गजनी आणि गेल्यावर्षी तर कोरोना नाव दिले होते. पुतळ्यात फटाके तर त्याच्या खिशात दारूची बॉटल, सिगरेट पाकीट, गुटखा पाकीट हे ठेवले जाते. मोरल काय तर दुर्गुणाचा पुतळा बनवितात आणि तो रात्री बाराला जाळून टाकतात.
आमच्या इथली आगाऊ मुले तर त्या पुतळ्यावर चाळीतील एका भांडखोर बाईचेही नाव लिहतात नेहमी आणि दरवर्षी तिच्या शिव्या खातात.

तर कधी गब्बर, कधी गजनी आणि गेल्यावर्षी तर कोरोना नाव दिले होते.
>>>>

हे आणि ईतर सारेच वर्णन पर्रफेक्ट!
ठाण्यात जुन्या मुंबईतलीच वा त्यासारखीच मराठमोळी लोकं आहेत म्हणजे अजून. आमच्या माझगावचे कल्चर बदलू लागलेय तसे हे हरवत चाललेय. आणि आता नव्या मुंबईत तर असे काही कधी नसेलच.

अरे फादर अ‍ॅग्नेल वाशीला जाळतात की बुढ्ढ्याला/ सँटाला. त्या बुढ्ढ्याला दारू हवी म्हणून पोरं पैसेही मागत बसतात कॉलेजच्या दारात.

अच्छा.. मी कसे मिसले हे.. फादर ॲग्नेल ईंग्लिश स्कूलच्या शेजारीच राहिलोय चार वर्षे. एके वर्षी मुलीला दाखवायला म्हणून रात्रीचे बारा सव्वाबारा वाजता फिरलेलो आसपास. पण एके ठिकाणीच काय ते एखादा बुढ्ढा जळताना दिसला. ते ही पोहोचेपर्यंत राख होत आलेली.

पण पुढच्या वर्षी घरीच बनवायला हवा. ख्रिसमस ट्री तसेही सजवतात पोरे. दरवर्षी तेच ते त्यापेक्षा एकदा हे बेस्ट. जुने कपडे शिवून त्यात गवत कोंबून बुजगावणा बनवणे. अगदीच गवत नाही सापडले तर कागद पुट्ठे वगैरे.. वर पिशवीचे डोके आणि सपोर्टसाठी एक ऊभी काठी घुसवणे. काहीतरी नवीन शिकतीलही पोरे.. आणि यात क्रिएटीव्हिटीलाही स्कोप आहे.

सरांना एमपीडी आहे. पण इस आयडी कि बात उस आयडी को पता नही होती. अब सर नंबर २ मे है. कल वाला न जाने कब आएगा. अगर आ जाए तो मेरे भी दो चार थ्रेड्स उपर निकाल ने की लिए गुजारिश कीजिएगा.

जिला गुलाबी थंडी समजत होतो तो काळाकुट्ट करोना/ओमिक्रॉन असायची दाट शक्यता निर्माण झाली आहे Happy

तसे निघाल्यास थण्डीच्या गोड आठवणीत तुरट आठवणीही मिसळायची शक्यता आहे..

तुमच्या अश्या चवीच्या आठवणी असतील तर त्या ही शेअर करा..

जिला गुलाबी थंडी समजत होतो तो काळाकुट्ट करोना/ओमिक्रॉन असायची दाट शक्यता निर्माण झाली आहे>>

सर काळजी घ्या
आणि बघा आपली वेव्हलथ किती जुळते ते
मी याच विकांताला तापाने फँफणलो आणि टेस्ट केली तर पॉझिटिव्ह आलो
आता घरातल्या लोकांनी एक खोलीत कोंडून घातले आहे
खाणे पिणे आराम इतकेच उद्योग सुरू आहेत
Happy

आशुचॅंप काळजी घ्या. ओमिक्रॉन असेल तर फक्त पॅरासिटॅमोल ने बरा होतो असे काय काय वाचनात आले आहे. तसे असेल तर उत्तमच. लवकर बरे व्हा. सायकल चालवतानाचा फोटो टाका.

सध्या कोंडून घेतले असेल तर X -man ला बोलवून घ्या. पण तुमच्यामुळे ते पॉझिटिव्ह झाले तर एकदम ७० / ८० आयडीज बंद होतील ही भीती आहे. सरांनी तर आपल्याशी २ आय सी आयडीने अबोला धरलाय. सीओ साहेब येतच नाहीत.
माबोवर यावे की उडावे हा एकच सवाल आहे.

होय मलाही आता कधी एकदा घराबाहेर पडतोय असे झालं आहे
दोन तीन दिवसातच कंटाळून गेलो आहे

7 दिवस झाल्यावरही जास्त मिसळू नका, एकदम व्यायाम करू नका वगैरे म्हणाले डॉ
सध्या तरी सूर्यनमस्कार घालतो आहे जेवढे जमतील तेवढे हळूहळू

एक्स मॅन सर गायब झाले, धूमकेतू सारखे
मला वाटलेलं माझा विजनवास सार्थकी लावतील पण नाहीच

सरांचा अबोला कधी संपणार सर च जाणे

आशूचॅम्प काळजी घ्या !
तरीच मी विचार करत होतो की गेले काही दिवस सर्व जगाच्या चिंता सोडून आपण माझ्या मागे का लागला होता.
पण प्रत्यक्षात आपल्याकडे वेळच वेळ होता हे आता समजले. या कठीण आणि कंटाळ्याच्या काळात आपला वेळ मजेत जाण्यात मी कारणीभूत ठरलो याचा मला आनंदच आहे.
या कोरोनाचा सामना आपल्याला असेच एकजुटीने करायचा आहे Happy

हाय रे कर्मा ! भक्ताला त्याचा ईट्ठलच म्हणतोय की माझ्या मागे लागला होता ?
हे धरणीमाते तू दुभंगून त्याला आत का घेत नाहीस ? इट्ठलाला नाही, भक्ताला !

सरांचा रुसवा गेला आणि चक्क बोलू लागले

:भर रस्त्यात शर्ट वर करून नाचणारा बाहुला:

Happy Happy Happy

सर तुम्ही आताचे काय घेऊन बसला आहात, जेव्हापासून आहात तेव्हापासून हेच तर कार्य करत आला आहात. तुमच्या कार्याची महती आम्ही भक्तांनीच काय वर्णावी. पुराणात कसे विष्णूने वराहरुपाने पृथ्वी तोलून धरली तसे तुम्ही तुमच्या नानाविध रुपांनी मायबोली तोलून धरली आहे.

आपल्या लीला अथांग आहेत.

<<<>मी याच विकांताला तापाने फँफणलो आणि टेस्ट केली तर पॉझिटिव्ह आलो
आता घरातल्या लोकांनी एक खोलीत कोंडून घातले आहे
खाणे पिणे आराम इतकेच उद्योग सुरू आहेत
Happy

Submitted by आशुचँप on 12 January, 2022 - 18:07 >>>>

आशुचँप यांचा तीव्र निषेध... निषेध... निषेध..
नवीन धागा काढण्याचा हा विषय असा एका प्रतिसादात टाकून दिलाय..
किमान 200 प्रतिसादांचे पोटेन्शियल असे वाया कसे घालवू शकता तुम्ही ????????????
सरांचे नुसतेच भक्त झालात पण त्यांचा गुण नाही घेतलात..
अरेरे... व्यर्थ ही भक्ती...

तरीच मी विचार करत होतो की गेले काही दिवस सर्व जगाच्या चिंता सोडून आपण माझ्या मागे का लागला होता.>>बघा सरांच्या मनात भक्तांचाच विचार सुरु असतो.
आशुचॅम्प काळजी घ्या.

हो पण मूळ रूमीन, आईमीन, उप मूळ रूपात बोलले तर चांगले.
उप उप उप उपाप उप रुपात सर शिवीगाळ करतात. Lol
मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याने त्यांना मग या रूपात कळत नाही काही.

हाय रे कर्मा ! भक्ताला त्याचा ईट्ठलच म्हणतोय की माझ्या मागे लागला होता ?
हे धरणीमाते तू दुभंगून त्याला आत का घेत नाहीस ? इट्ठलाला नाही, भक्ताला !
>>>>> Lol
इसी बात पे एक दो अभंग हो जाए

मुंबईत भरपूर ठिकाणी त्याला सॅन्टा च म्हणतात...
Submitted by च्रप्स on 12 January, 2022 - 08:28
>>>>

मायबोलीवर बहुधा जुना मुंबईकर क्राऊड खूप कमी आहे. वा त्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. बालपणीच्या दक्षिण मुंबईतील आठवणींबाबत हे असे मी लिहिलेले काहीतरी वेगळेच वाटणे वा त्यावर अविश्वास दाखवणे या आधीही बरेचदा घडलेय.

असो,
उद्या आमच्या माझगावच्या डोंगरावरच्या थंडीच्या आठवणी सांगतो. त्या ही धमाल आहेत. शेकोटीच्या नादात एकदा डोंगर जाळलेला आम्ही Happy

(माझगावला भाऊचा धक्का आहे, समुद्र आहे म्हणून तिथे कुठला आलाय डोंगर, हा काहीतरी फेकतोय असेही मागे झालेले. चक्क आमच्या डोंगरावरच अविश्वास Happy )

खरंय सर. काही लोक तर पुण्यात चौपाटी आहे या सत्यावर सुद्धा अविश्वास दाखवतात. विचारतात समुद्र कुठे आहे चौपाटी आहे तर ?
समुद्र नंतर बांधतीलच ना ?

माझगावला भाऊचा धक्का आहे, समुद्र आहे म्हणून तिथे कुठला आलाय डोंगर, हा काहीतरी फेकतोय असेही मागे झालेले.>> नाही हो सर! तुम्ही सांगाल ते गोड मानुन घेऊ आम्ही.

सर तुमच्या किश्शावरून आठवलं.
एकदा मी कांजूरमार्गला उतरून पवईच्या डोंगरावर गेलो होतो. तिथून मग मला कळसूबाई शिखर दिसू लागलं. मग काय आम्ही कळसूबाई शिखरावर गेलो. तिथे ही थंडी ! बोललेले शब्द गोठून बाहेर पडत होते. तर एक भैय्या म्हणाला ये तो कुछ नही. म्हणून त्याने आम्हाला १८० डिग्रीत वळवलं.
बघतो तर काय.
एव्हरेस्ट शिखर.
मग काय चढलो. वर तर वेगळीच मज्जा. तिकडे तर लोक लुंगीत शेगडी घेऊन फिरतात ! बोला आता !!

मग भराभर खाली उतरलो तर येताना घसरत गेलो तर तळाला चेन्नई लागलं. तिकडे जो स्नो फॉल चालू होता कि बस्स.
आम्ही समुद्रात उड्या मारल्या आणि पोहत पोहत एका डोंगराखालून आलो. वर जायचं भुयार होतं. शिडी चडून मेन होलचं झाकण सारून बाहेर आलो तर काय !
समोर शनिवारवाडा !!

Pages