
सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.
………………………………………………………………………………….
अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात. साधारणपणे प्रौढांच्या पचनसंस्थेत रोज ७०० मिली. वायू तयार होतो आणि कोणत्याही वेळेस त्यातील सुमारे १०० ते २०० मिलिलिटर वायू तिथे अस्तित्वात असतो. वायूच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो फार साठून न राहता शरीराबाहेर पडतो. त्याचे बाहेर पडण्याचे दोन मार्ग म्हणजे तोंड आणि गुदद्वार. अशाप्रकारे शरीरातून जे वायू उत्सर्जन होते ते मुळातून समजून घेण्यासाठी हा मर्यादित लेख.
पोटातील वायूनिर्मितीची कारणे :
पचनसंस्थेत वायू तयार होण्याचे दोन स्त्रोत असे आहेत:
१. तोंडातून जठरात गिळली गेलेली हवा आणि
२. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नपचनपदार्थांवर सूक्ष्मजंतूंच्या झालेल्या प्रक्रियेतून निर्माण होणारे वायू.
वरील पहिल्या प्रकारे जी हवा जठरात जाते तो बाहेर टाकण्याचा प्रमुख मार्ग म्हणजेच ढेकर देणे. याउलट आतड्यांमध्ये तयार झालेले वायू बाहेर टाकण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे पाद सुटणे.
आता या दोन प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे सविस्तर समजून घेऊ.
ढेकरनिर्मिती
आपण तोंड उघडले की काही प्रमाणात हवा आत शिरतेच. पण ती जर मोठ्या प्रमाणात ‘गिळली’ गेली तर ती जठरात जाऊन बसते. असे होण्यासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात :
१. भरभर खाणे व पिणे
२. च्युईंगम चघळणे
३. धूम्रपान
४. फसफसणाऱ्या शीतपेयांचे सेवन (बिअर, इ.)
यातील १ ते ३ मध्ये ढेकर आली असता त्यातून मुख्यत्वे नायट्रोजन व ऑक्सिजन बाहेर पडतात. पण चौथ्या कारणाचे बाबतीत बाहेर पडणारा मुख्य वायू हा कार्बन-डाय-ऑक्साईड असतो. गिळलेल्या हवेपैकी बरीचशी हवा ढेकरेच्या स्वरूपात बाहेर निघून जाते. परंतु थोड्या प्रमाणात जठरातील ती हवा पुढे आतड्यांमध्ये सरकते.
पादनिर्मिती
जेवणानंतर जठर विस्तारते आणि लहान आतडी उत्तेजित होतात. त्यामुळे जठरात उरलेला वायू पुढे सरकतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन व शोषण होते. परंतु अन्नातील अर्धवट किंवा न पचलेले घटक पुढे मोठ्या आतड्यात शिरतात. इथे अनेक उपयुक्त सूक्ष्मजंतूंचे वास्तव्य असते. या जंतूंच्या एन्झाइम्सची या अन्नघटकांवर रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून काही प्रकारचे वायू तयार होतात. त्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि मिथेन या वायूंचा समावेश होतो. हायड्रोजन सल्फाइड व अन्य काही सल्फरयुक्त पदार्थांमुळे या वायुस दुर्गंधी येते.
इथले काही सूक्ष्मजंतू हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्साईड हे वायू वापरुन टाकतात. त्यामुळे वायूसाठा काहीसा कमी होतो. या सर्व दीर्घ प्रक्रियेनंतर जो काही वायू उरतो तो सगळा गुदद्वारामार्गे पादरूपात बाहेर पडतो. या वायूचे दर 24 तासातले प्रमाण हे जेवणातील अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. निरोगी अवस्थेत ते साधारणपणे 200 ते 700 मिलिलिटर या दरम्यान राहते. इतका वायू बाहेर पडण्यासाठी 24 तासात सुमारे 14 ते 18 वेळेस पाद सोडला जातो.
आतड्यातील वायूनिर्मितीचे प्रमाण अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. असे अन्नघटक आणि त्यातील विशिष्ट रासायनिक पदार्थ यांचा आता विचार करू. समतोल आहारात पोळी/भाकरी, भात, भाज्या, डाळी, उसळी, तेल, दूध, तूप, अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो. या सगळ्यामधून आपल्याला मुख्यत्वे कर्बोदके, मेद आणि प्रथिने ही मूलभूत पोषणद्रव्ये मिळतात. यातील काही ठराविक प्रकारच्या द्रव्यांपासून अधिक वायूनिर्मिती होते. त्याची काही उदाहरणे आता पाहू.
अधिक वायूनिर्मितीस उत्तेजन देणारे विविध अन्नपदार्थ आणि त्यातील संबंधित रसायने अशी आहेत :
१. बटाटा, मका व गहू : यातील कर्बोदके (Starches) ‘जड’ प्रकारची असतात.
२. कडधान्ये (चवळी, वाटाणा इत्यादी) : यात stachyose व raffinose ही जड कर्बोदके असतात. कडधान्यांना भिजवून मोड आणताना त्या भांड्यातील पहिले पाणी फेकून दिले असता ही बऱ्यापैकी निघून जातात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये ही साध्या कडधान्यांपेक्षा कमी वायूनिर्मिती करतात.
३. विविध प्रकारचे बीन्स : यातले काही तंतुमय पदार्थ पचत नाहीत. तसेच त्यांच्यात अन्य एक रसायन (AI) असते जे आपल्या आतड्यातील कर्बोदक पचविणाऱ्या एंझाइमला विरोध करते. बऱ्याच बीन्समध्ये TI नावाचे एक प्रथिन असते. या प्रथिनामुळे आपल्या अन्य एका पाचक एंझाइमला विरोध होतो. या कारणास्तव बीन्सच्या पचनाचे प्रमाण काहीसे कमी राहते.
जर आपण बीन्स व्यवस्थित शिजवून घेतले तर ते विरोधक प्रथिन बर्यापैकी नष्ट पावते.
४. शीतपेयातील गोड पदार्थ : अशा बऱ्याच पेयांत ‘साखरमुक्त’ या नावाखाली अन्य गोड पदार्थ घातलेले असतात उदाहरणार्थ : xylitol, mannitol, sorbitol. ही रसायने आतड्यातील जंतूसाठी मोठे ‘खाद्य’ ठरतात.
५. दूध व दुग्धजन्य पदार्थ : यातील Lactose या शर्करेचे पचन आशियाई वंशात प्रौढपणी बर्यापैकी कमी असते.
पचनसंस्थेमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन ढेकर व पाद यांच्यातर्फे होते हे आपण पाहिले. कधीकधी जेवणानंतर २-३ ढेकरा येणे हे नैसर्गिक आहे. एक प्रकारे ते पोट भरल्याचेही लक्षण असते. तीच गोष्ट ठराविक प्रमाणातील पादालाही लागू होते. मात्र जेव्हा काही कारणांमुळे पचनसंस्थेत बिघाड होतो तेव्हा वायूनिर्मिती आणि त्यांचे उत्सर्जन खूप प्रमाणात होते. अशी काही महत्त्वाची कारणे किंवा आजार आता थोडक्यात पाहू.
अतिरिक्त ढेकर
दिवसाकाठी वारंवार ढेकर येणे हे खालील आजारांचे/बिघाडांचे लक्षण असू शकते :
१. जठरदाह किंवा पेप्टिक अल्सर : यामध्ये ढेकरांच्या जोडीने मळमळ, छातीत जळजळ आणि अपचन ही लक्षणे दिसतात.
२. पित्ताशयाचे आजार
३. काही गोळ्यांचे दुष्परिणाम : यामध्ये मधुमेह उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दिली जाणारी गोळी metformin हिचा समावेश आहे.
पाद उत्सर्जन समस्या
गुदद्वारातून वायु सुटत राहणे हे नैसर्गिक आहे. काही व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत वायूनिर्मिती जास्त होते. नक्की किती मर्यादेच्या पुढे अतिरिक्त वायूनिर्मिती म्हणायची याची ठोस व्याख्या नाही. आतड्यांच्या काही आजारांमध्ये वायू उत्सर्जन नीट न झाल्यामुळे संबंधित रुग्णास वारंवार पोट फुगल्याची भावना होत राहते. अशा आजारांमध्ये बद्धकोष्ठता, आतड्यांच्या हालचालींचे बिघाड(IBS), पचनात बिघाड करणारे काही ऑटोइम्युन आजार, दुग्धशर्करेचे अपचन आणि काही जंतुसंसर्ग यांचा समावेश होतो. वैद्यकात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे (ibuprofen, statins) सुद्धा अशा वायुसमस्या निर्माण होतात. अशा विविध आजारांमध्ये सुटणाऱ्या पादास बर्यापैकी दुर्गंधी असते.
जेव्हा ढेकर अथवा पाद यांचे प्रमाण त्या व्यक्तीस सहन होण्यापलीकडे असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. पचनसंस्थेसंबंधी अन्य जी लक्षणे दिसत असतील त्यानुसार डॉक्टर योग्य त्या तपासण्या सुचवतात. त्यानुसार योग्य ते निदान आणि उपचार करता येतात. संबंधित आजारांवरील विस्तृत विवेचन हे स्वतंत्र विषय असून या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत.
सामाजिक संकेत व मनोरंजन
ढेकर व पाद या दोन्ही क्रियांदरम्यान विविध छटांचे आवाज येतात. त्यामुळे त्या लक्षवेधी ठरतात. एखाद्या समूहात त्यांच्या आवाजा/वासानुसार ज्या काही प्रतिक्षिप्त क्रिया उमटतात त्यातून संबंधितास लाजल्यासारखे व नकोसे वाटते. त्यामुळे समूहात असताना या नैसर्गिक क्रियांची ऊर्मी दाबण्याकडे कल राहतो. वेळप्रसंगी त्यात यशस्वी होण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.
त्यातल्या त्यात ढेकर हे प्रकरण काही संस्कृतींत समूहमान्य असते. पोटभर जेवणानंतर आलेली ढेकर हे तृप्तीचे लक्षण मानले जाते. लहान मुलांच्या जडणघडणीत या क्रियांच्या आवाजांचा चेष्टा आणि मनोरंजनासाठी भरपूर वापर केला जातो. साहित्यक्षेत्रात या क्रियेला विनोद, म्हणी, वाक्प्रचार आणि सुभाषितांमध्ये बर्यापैकी स्थान मिळालेले आहे.
समाजात काही जणांनी या क्रियांची भीड आणि संकोच कमी व्हावा यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले दिसतात. याचे काही मजेशीर किस्से जालावर वाचण्यास उपलब्ध आहेत. अधूनमधून मोठ्यात मोठी ढेकर काढण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात त्या आवाजाची तीव्रता उपकरणाद्वारे मोजली जाते. आतापर्यंत अशा मोठ्या आवाजाच्या तीव्रतेचा जागतिक विक्रम ११० डेसिबल या तीव्रतेचा असून त्याची गिनीज बुकात नोंद झालेली आहे !
हे एक भारीच ....
2019 मध्ये सुरतमध्ये मोठ्याने पादण्याची स्पर्धा आयोजित केली होती (https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/gujarat-fart-competit....) त्यासाठी आधी ६० जणांनी नाव नोंदवले होते. परंतु आयत्या वेळेस अनेकांनी लाजून माघार घेतल्याने शेवटी फक्त तीन स्पर्धक उरले ! एकंदरीत ही स्पर्धा म्हणजे फुसका बार निघाली. तरीदेखील संबंधित संयोजक आशावादी असून भविष्यात त्यांचा अशा स्पर्धा पुन्हा घेण्याचा मानस आहे.
आणि हे तर भलतेच ...
अमेरिकेची टीव्ही अभिनेत्री स्टेफनी हिचा ‘उद्योग’ तर भन्नाट आहे; अगदी आचरटपणाच. ती स्वतःचा पाद बाटल्यांत भरून ऑनलाईन विकते ! त्यावर तिला लाखोंची कमाई झाली ( https://www.loksatta.com/trending/viral-news-tv-star-earn-rs-38-lakh-in-... ). हे ‘उत्पादन’ विकत घेणारेही धन्यच.
पण हाय रे ! हा उद्योग करताना तिच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम झाला आणि तिचा हा उद्योग बंद पडला https://www.loksatta.com/trending/viral-news-stephanie-matto-made-rs-37-...).
असे हे पादपुराण !
आपल्या पचनसंस्थेत दररोज वायूनिर्मिती होते. एका प्रमाणाबाहेर तो वायू साठू लागला की त्याचे ढेकर व पाद अशा दोन्ही प्रकारे उत्सर्जन होते. त्यातून आपल्याला मोकळेपणाची भावना येते. अशा या दोन प्रक्रियांविषयी काही मूलभूत माहिती इथे लिहिली. समाजात या नैसर्गिक क्रियांबद्दल चारचौघात बोलणे हे काहीसे निषिद्ध मानले जाते. परंतु त्याच बरोबर या क्रियांचा उपयोग करमणूक आणि मनोरंजनासाठीही काही क्षेत्रात केलेला आढळतो.
नेहमीप्रमाणेच उत्साही चर्चेचे स्वागत आहे.
……………………………………………………………………………………………………..
रश्मी>>>> गट्टे कि सब्जी
रश्मी>>>> गट्टे कि सब्जी रेसिपी >>>बरोबर
सांडगे नव्हेत.
>>>>अशा बायका नवरा लग्ना नंतर
>>>>अशा बायका नवरा लग्ना नंतर पादला तर काडीमोड घेतील...>>>
निदान सुहाग रात तरी करणार की नाय ?
stealthy पादरे सर्वात भयंकर.
stealthy पादरे सर्वात भयंकर. मग खणखणीत पादरे परवडले.
गट्टे की सब्जी
गट्टे की सब्जी
https://www.maayboli.com/node/55059
फोटो आहेत
या विषयाशी संबंधित माझा
या विषयाशी संबंधित माझा वैद्यकीय शिक्षणा दरम्यानचा एक अविस्मरणीय अनुभव :
एका रुग्णाचे पोट बरेच टम्म फुगले होते. पोटात खूप वायू साठलेला आहे हे निदान डॉक्टरांनी केले. आम्ही विद्यार्थ्यांनी त्याच्या पोटावर विशिष्ट पद्धतीने बोटावर बोट ठेवून टिचकी मारून त्याचा अभ्यास केला.
नंतर आमच्या प्राध्यापकांनी त्या रुग्णावर एक सोपा प्रयोग आमच्या देखत केला. त्याच्या गुदद्वारातून एक रबरी नळी आत घालण्यात आली. तिकडे बाजूला घमेल्याएवढ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेतले होते. जशी ती नळी पाण्यात बुडवली गेली तसा त्याच्या पोटातून बाहेर पडलेला वायू छानपैकी पाण्यात बुडबुड्यांच्या रूपाने भसाभस बाहेर पडला.
जवळजवळ ५ मिनिटे तो बाहेर निघत होता !
बरं झालं अत्ता वाचतेय
बरं झालं अत्ता वाचतेय
सारखंच हहगलो. होतय. पण मी निदान घरी आहे. ऑफिस मध्ये फुटले मी, काल आणि सकाळी. मग कशीबशी गपबसले.
डॉक्टर हा लेटेस्ट किस्सा वाचून आमचा लहान पणचा पोहायचा किस्सा आठवला. आम्ही सगळी भावंडं नदीत पोहायला जायचो तेव्हा पाण्यात असताना कोणाच्या बाजूने बुडबुडे आले कि लगेच हसायला नी चिडवायला सुरवात व्हायची.
पण हा वरचा किस्सा वाचून जरा कसंतरीच झालं( उगीच वास इमॅजिनेशन करतेय)
**पोहायला जायचो तेव्हा
**पोहायला जायचो तेव्हा पाण्यात असताना कोणाच्या बाजूने बुडबुडे आले कि >>>
अगदी...अगदी
मजेदार अनुभव असतो तो !
भारी लेख. काही वेळा शरीरात
भारी लेख. काही वेळा शरीरात अडकलेले वायू पोहताना ढेकर आणि पादमार्गे बाहेर पडतात असा अनुभव आहे. बॉयन्सीमुळे हे होत असावे.
लेखात केलेल्या 'प्रतिपादनाला' पूरक असे अजून काही अनुभव - पोट खराब झालेले असताना जरा ताण देऊन काढलेले 'पादत्राण' अतिदुर्गंधीयुक्त असेल, तर ते 'उत्पादन' मस्तकात जाऊन 'आपादमस्तक' शिरशिरी येते. मग तो दुर्गंध सोडत सोडत सारे घर 'पादाक्रांत' केले जाते. आपल्यासारखाच वायू सोडणारा कुणी 'संपादक' आजूबाजूला असल्यास विचारायलाच नको!
पादणे ही नैसर्गिकच क्रिया असल्यामुळे त्या विषयाला स्पर्श केल्याबद्दल लेखकाने वा प्रतिसादकांनी 'पादस्पर्शम् क्षमस्व मे' म्हणायची काही गरज नाही.
गर्ल फ्रेंड आणि बॉय फ्रेंड
गर्ल फ्रेंड आणि बॉय फ्रेंड एकमेकांच्या सानिध्यात जेव्हा मुक्तहस्ते ... सॉरी ... मुक्तगुदे, विनासंकोच "हवा का झोंका" सोडतात तेव्हा त्यांच्या मैत्रीने पुढची पायरी गाठली आहे असे समजतात ... म्हणे !!
हर्पा
हर्पा
दरवेळी ते वाचून चपला काढायचो.
संपादक शब्द कायमचा बदलून गेला.
लहानपणी घराजवळ रामाचे मंदिर होते, तिथे बाहेर 'पादत्राणे येथे सोडा' ही सूचना लिहिलेली पाटी होती, खोडकर मुलांनी 'त्रा' वर काळं फासून खोडी केली होती.
लष्कराच्या भाकर्या धाग्यावर
लष्कराच्या भाकर्या धाग्यावर एक से एक येणार्या (वृत्तपत्रलेखननिकृष्टतेच्या) पोस्टी पाहता आजकाल संपादक या शब्दाचा अर्थ हा घेण्यास हरकत नसावी.
अ गा गा गा .... एक से बढकर एक
अ गा गा गा .... एक से बढकर एक
* आपल्यासारखाच वायू सोडणारा कुणी 'संपादक' आजूबाजूला असल्यास >>
खरं आहे ! शालेय वयात संपादक नक्की काय करतात हे माहीत नसले तरी त्या शब्दावरूनचा विनोद तेव्हाच चालू होतो.
...
* गर्ल फ्रेंड आणि बॉय फ्रेंड एकमेकांच्या सानिध्यात जेव्हा मुक्तगुदे, विनासंकोच "हवा का झोंका"
>>
भारी ! तसेच लग्नानंतरही पहिल्या एक दोन रात्री मध्येच विवाहितांना सुद्धा हा ठराव/ करार करावा लागतोच .
..........
* ''पाद * णे येथे सोडा' ही सूचना >>>
पादत्राणे शब्दाची मधोमध फोड करून धमाल करणारेही आहेतच
लहानपणी एक गाणे होते
लहानपणी एक गाणे होते
साडेदहा वाजले
बाबुराव आले
पाटावर बसले
ढुम्मकन पादले
--------------------------------------------------------
अजुन एक मस्त गाणे होते -
एक होती ऊ
तिला झाली टु
टु गेली बाजारात
तिला सापडला पैसा
आई आई या पैश्याचे काय आणू
भाजी आण
चिरु कशी
खस्साखस्स
शिजवु कशी
रट्टारट्टा
खाऊ कशी
मट्टामट्टा
झोपू कशी डाव्या कुशीवर
पादू कशी
ढुम्म!!
इथे लहान मुले खूप हसतात.
छान.
छान.
अगदी आपल्या आजोबा पणजोबांच्या काळापासून हे एक मजेदार कोडे मुलांना घालायचे :
अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर
मध्ये बसला ससा
हात नाही पाय नाही
फटकन उडतो कसा !
ओळखा काय ??? अर्थात **
सामोरे लहान मुलं कशाला मी पण
सामो लहान मुलं कशाला मी पण हसते
लहानपणी कोणी फुसकुली सोडली तर
लहानपणी कोणी फुसकुली सोडली तर "आदा मादा कोण पादा, दामाजीचा रेडा pada
आम दाम धुस्स.....(पुढचं आठवत नाही) असं म्हणून शब्द जिथे संपतील ती मुलगी/मुलगा या पराक्रमाचे जनक ठरले जायचे.
(पुढचं आठवत नाही >>> 'घोडा
(पुढचं आठवत नाही >>> 'घोडा म्हणे ढामढूम, का रे मेल्या पादलास तूच' ... असे आहे ते
हे सगळ्यांकडे बोट फिरवून बोलत असताना मग शेवटी तू किंवा च चे बोट शिताफीने आपल्या नावडत्या व्यक्तीकडे करायचे असा प्रकार असायचा !
आमचे संस्कृतचे मास्तर 'पावणे
आमचे संस्कृतचे मास्तर 'पावणे दोन' आणि 'सव्वा दोन'ला संस्कृतमध्ये 'पादोन-द्वि वादनम्' आणि 'सपाद-द्वि वादनम्' म्हणतात हे सांगताना चेहर्यावर इतका साळसूद भाव आणायचे की आम्हाला वाटायचं की हे फार साधे आहेत. गॅसेस होऊन शौचास होणे - ह्या क्रियेला मी 'पादोन द्वि वादनम्' हे नाव ठेवले होते.
आम्हि पकिस्तानात जात असु.
आम्हि पकिस्तानात जात असु.
शौचास जायचे आहे असे सान्गायचे असेल तर पाकिस्तानात जाउन येतो असे म्हणत असु
आम्हि पकिस्तानात जात असु
आम्हि पकिस्तानात जात असु >>>
आमचे थोडे सुधारित होते :
खेळत असताना जर का एखाद्याला शू लागली तर तो पाकिस्तानला जायचा आणि
शी लागली तर चीनला !
तेव्हा चीन हा अधिक वाईट शत्रू मानला जायचा
"ऐक ना, एक खाजगी गोष्ट मघाशीच
"ऐक ना, एक खाजगी गोष्ट मघाशीच मला कळली आहे आणि आपल्या एका सरांची आहे... पण तू कुणाला सांगणार तर नाहीस ना?"
असे म्हणून मित्राला आत्मविश्वासात घेऊन थोडे बाजूला न्यायचे आणि मग त्याने, "काय आहे रे? कुठल्या सरांची? सांग सांग, फक्त तुझ्यात माझ्यातच राहील प्रॉमिस" असे त्याने म्हटले की खच्चून पादायचे. तो बिचारा नंतर प्रचंड चिडायचा
अशी पोराटकी शाळेत खूप चाले. काही काही महाभाग तर भर वर्गात किंवा मोठ्या ग्रुप मध्ये मध्येच उठून "ए ऐका रे, सरांचा महत्त्वाचा निरोप आहे शांतपणे ऐका सगळ्यानी" असे म्हणून सगळ्याना शांत करून जोरात पादायचे उद्योग करीत.
वेगळाच होता सेन्स ऑफ ह्युमर त्या काळातला
>>सारखंच हहगलो. होतय.>>> +९९९
>>सारखंच हहगलो. होतय.>>> +९९९
>>>पादोन-द्वि वादनम्' आणि 'सपाद-द्वि वादनम्>>> भारीच
हरचंद पालव चा प्रतिसाद एकदम
हरचंद पालव चा प्रतिसाद एकदम मजेदार...
असेच कॉलेजात असताना कोणीतरी गॅस सोडला. कोण रे कोण रे असे झाले. कोणीच कबूल करत नव्हते तर एक जण सिरियसली म्हणाला की जर गॅस सोडला तर उजव्या कानाची पाळी खूप गरम होते. असे म्हणाल्याबरोबर एक आपल्या कानाच्या पाळीकडे खरोखर गरम झाली का ते चेक करू लागला व आम्हाला कोण ते कळले. सगळे सॉलिड हसले मग....
असले उद्योग तेव्हा खूप
असले उद्योग तेव्हा खूप चालायचे.ना कोणाला मनापासून राग यायचा. ना कोणाला अपमान वाटायचा.नी कोणाचा इगो दुखावला जायचं
स्वयं केंद्री स्वभाव नव्हता कोणाचं
त्या मुळे गमती जमती चालायच्या आणि त्याला रागाने उत्तर न मिळता .मनापासून दाद मिळायची
ही त्या काळाची गोडी होती.
आता अशी कोणी मस्करी केली तर मारामारी होईल.
धमाल आणल्याबद्दल सर्वांचेच
धमाल आणल्याबद्दल सर्वांचेच आभार !
आपली हास्यजत्रा, हहपुवा >> हहगलो >> हहपासु अशा चढत्या क्रमाने जात आहे
...........................................................
एरवी संभाषणांमध्ये संकोचयुक्त असलेला पादाचा विषय मराठी साहित्यात मात्र मुक्तपणे व्यक्त होतो. माझ्या आठवणीतील काही उदाहरणे :
१. बारोमास कादंबरीतले एक वाक्य : ‘पादाचा वास कुठे झाकते का?”
२. अनिल अवचटांचा (बहुतेक) महर्षी विनोद यांच्यावरील लेख : एकदा तरुणपणी अवचट आणि त्यांचा कंपू विनोद यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी, नव्हे पाडण्यासाठी गेलेला होता. तेव्हा व्याख्यान चालू असताना ही मंडळी तोंडाने पादल्यासारखे आवाज मुद्दाम काढीत. हे त्यांनीच लिहिले आहे.
३. पुस्तकाचे नाव आठवत नाही पण त्यात तुरुंगातील कैद्यांचा जीवनक्रम वर्णन केलेला आहे. त्यात असे काहीसे वर्णन होते :
... सकाळ झाली. दोन्ही कैदी डोळे चोळत उठले. भिंतीला टेकून बसले. त्यातील एकाने मांडी वर करून ‘ढाम’ अशी जोरदार बांग दिली !...
इथे एक लक्षात येतं. जेव्हा माणूस तुरुंगासारख्या ठिकाणी येऊन पडलेला आहे आणि कालांतराने वेगळ्या जीवनानुभवांना सामोरे जातो, तेव्हा नेहमीच्या व्यवहारातील असले क्रिया-संकोच गळून पडतात. एक नैसर्गिक क्रिया म्हणून ती अगदी सहज दुर्लक्षिली जाते.
https://www.news18.com/news
https://www.news18.com/news/buzz/joe-biden-camilla-parker-bowles-cop26-s...
थोर राष्ट्रपती बायडन ह्यांनी ह्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे.
त्यांचा हा कार्यक्रम आवाजाची रेंज, कालावधी आणि घ्राणेंद्रिय गोचर परिणाम ह्याकरता आजही नावाजला जातो म्हणे.
विंडसर राजवाड्या च्या सरदारीण बाई आजही त्याबद्दल बोलतात.
विंड सर ह्या नावाला साजेसा हा कार्यक्रम होता.
विशेष म्हणजे गॅसगो इथे जगबुडी कशी थांबवायची ह्याची परिषद होती तिथे वातावरणात विषारी वायू सोडणे थांबवा असे समस्त जगाला आवाहन करून लगेच हा नैसर्गिक वायू निर्मितीचा प्रयोग झाला त्यामुळे त्याची पर्यावरण प्रेमींकडून विशेष वाहवा होत आहे!
मी पण थोडा वाह्यात पणा करतो
मी पण थोडा वाह्यात पणा करतो इथे...
"आंख मारे ओ लडकी आंख मारे" हे गाणं आंख च्या जागी पाद टाकून ऐका

"सिटी बजाये.... सताये" याला वेगळाच अर्थ मिळाला की नाही
>>>>नैसर्गिक वायू निर्मितीचा
>>>>नैसर्गिक वायू निर्मितीचा प्रयोग झाला>>>
हे पाहा पादावर चालणारी कार
https://www.youtube.com/watch?v=OJ0RT350bBM
*बायडन ह्यांनी ह्या क्षेत्रात
*बायडन ह्यांनी ह्या क्षेत्रात मोठी ''
* सिटी बजाये.... सताये"
*पादावर चालणारी कार
>>>
सर्व प्रकार एकदम भारी आहेत
छान !
आम्ही प्यार च्या जागी पाद
आम्ही प्यार च्या जागी पाद टाकून गाणी म्हणायचो...
प्यार मांगा है तुम्ही से.. न इन्कार करो...
प्यार को हो जाने दो .. प्यार मे खो जाने दो ...
चाहिये थोडा प्यार... थोडा प्यार चाहिये...
प्यार का दर्द है... मीठा मिठा .. प्यारा प्यारा...
प्यार कि एक कहानी सुनो... एक लड़का था....
Pages