
सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.
………………………………………………………………………………….
अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात. साधारणपणे प्रौढांच्या पचनसंस्थेत रोज ७०० मिली. वायू तयार होतो आणि कोणत्याही वेळेस त्यातील सुमारे १०० ते २०० मिलिलिटर वायू तिथे अस्तित्वात असतो. वायूच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो फार साठून न राहता शरीराबाहेर पडतो. त्याचे बाहेर पडण्याचे दोन मार्ग म्हणजे तोंड आणि गुदद्वार. अशाप्रकारे शरीरातून जे वायू उत्सर्जन होते ते मुळातून समजून घेण्यासाठी हा मर्यादित लेख.
पोटातील वायूनिर्मितीची कारणे :
पचनसंस्थेत वायू तयार होण्याचे दोन स्त्रोत असे आहेत:
१. तोंडातून जठरात गिळली गेलेली हवा आणि
२. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नपचनपदार्थांवर सूक्ष्मजंतूंच्या झालेल्या प्रक्रियेतून निर्माण होणारे वायू.
वरील पहिल्या प्रकारे जी हवा जठरात जाते तो बाहेर टाकण्याचा प्रमुख मार्ग म्हणजेच ढेकर देणे. याउलट आतड्यांमध्ये तयार झालेले वायू बाहेर टाकण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे पाद सुटणे.
आता या दोन प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे सविस्तर समजून घेऊ.
ढेकरनिर्मिती
आपण तोंड उघडले की काही प्रमाणात हवा आत शिरतेच. पण ती जर मोठ्या प्रमाणात ‘गिळली’ गेली तर ती जठरात जाऊन बसते. असे होण्यासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात :
१. भरभर खाणे व पिणे
२. च्युईंगम चघळणे
३. धूम्रपान
४. फसफसणाऱ्या शीतपेयांचे सेवन (बिअर, इ.)
यातील १ ते ३ मध्ये ढेकर आली असता त्यातून मुख्यत्वे नायट्रोजन व ऑक्सिजन बाहेर पडतात. पण चौथ्या कारणाचे बाबतीत बाहेर पडणारा मुख्य वायू हा कार्बन-डाय-ऑक्साईड असतो. गिळलेल्या हवेपैकी बरीचशी हवा ढेकरेच्या स्वरूपात बाहेर निघून जाते. परंतु थोड्या प्रमाणात जठरातील ती हवा पुढे आतड्यांमध्ये सरकते.
पादनिर्मिती
जेवणानंतर जठर विस्तारते आणि लहान आतडी उत्तेजित होतात. त्यामुळे जठरात उरलेला वायू पुढे सरकतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन व शोषण होते. परंतु अन्नातील अर्धवट किंवा न पचलेले घटक पुढे मोठ्या आतड्यात शिरतात. इथे अनेक उपयुक्त सूक्ष्मजंतूंचे वास्तव्य असते. या जंतूंच्या एन्झाइम्सची या अन्नघटकांवर रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून काही प्रकारचे वायू तयार होतात. त्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि मिथेन या वायूंचा समावेश होतो. हायड्रोजन सल्फाइड व अन्य काही सल्फरयुक्त पदार्थांमुळे या वायुस दुर्गंधी येते.
इथले काही सूक्ष्मजंतू हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्साईड हे वायू वापरुन टाकतात. त्यामुळे वायूसाठा काहीसा कमी होतो. या सर्व दीर्घ प्रक्रियेनंतर जो काही वायू उरतो तो सगळा गुदद्वारामार्गे पादरूपात बाहेर पडतो. या वायूचे दर 24 तासातले प्रमाण हे जेवणातील अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. निरोगी अवस्थेत ते साधारणपणे 200 ते 700 मिलिलिटर या दरम्यान राहते. इतका वायू बाहेर पडण्यासाठी 24 तासात सुमारे 14 ते 18 वेळेस पाद सोडला जातो.
आतड्यातील वायूनिर्मितीचे प्रमाण अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. असे अन्नघटक आणि त्यातील विशिष्ट रासायनिक पदार्थ यांचा आता विचार करू. समतोल आहारात पोळी/भाकरी, भात, भाज्या, डाळी, उसळी, तेल, दूध, तूप, अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो. या सगळ्यामधून आपल्याला मुख्यत्वे कर्बोदके, मेद आणि प्रथिने ही मूलभूत पोषणद्रव्ये मिळतात. यातील काही ठराविक प्रकारच्या द्रव्यांपासून अधिक वायूनिर्मिती होते. त्याची काही उदाहरणे आता पाहू.
अधिक वायूनिर्मितीस उत्तेजन देणारे विविध अन्नपदार्थ आणि त्यातील संबंधित रसायने अशी आहेत :
१. बटाटा, मका व गहू : यातील कर्बोदके (Starches) ‘जड’ प्रकारची असतात.
२. कडधान्ये (चवळी, वाटाणा इत्यादी) : यात stachyose व raffinose ही जड कर्बोदके असतात. कडधान्यांना भिजवून मोड आणताना त्या भांड्यातील पहिले पाणी फेकून दिले असता ही बऱ्यापैकी निघून जातात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये ही साध्या कडधान्यांपेक्षा कमी वायूनिर्मिती करतात.
३. विविध प्रकारचे बीन्स : यातले काही तंतुमय पदार्थ पचत नाहीत. तसेच त्यांच्यात अन्य एक रसायन (AI) असते जे आपल्या आतड्यातील कर्बोदक पचविणाऱ्या एंझाइमला विरोध करते. बऱ्याच बीन्समध्ये TI नावाचे एक प्रथिन असते. या प्रथिनामुळे आपल्या अन्य एका पाचक एंझाइमला विरोध होतो. या कारणास्तव बीन्सच्या पचनाचे प्रमाण काहीसे कमी राहते.
जर आपण बीन्स व्यवस्थित शिजवून घेतले तर ते विरोधक प्रथिन बर्यापैकी नष्ट पावते.
४. शीतपेयातील गोड पदार्थ : अशा बऱ्याच पेयांत ‘साखरमुक्त’ या नावाखाली अन्य गोड पदार्थ घातलेले असतात उदाहरणार्थ : xylitol, mannitol, sorbitol. ही रसायने आतड्यातील जंतूसाठी मोठे ‘खाद्य’ ठरतात.
५. दूध व दुग्धजन्य पदार्थ : यातील Lactose या शर्करेचे पचन आशियाई वंशात प्रौढपणी बर्यापैकी कमी असते.
पचनसंस्थेमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन ढेकर व पाद यांच्यातर्फे होते हे आपण पाहिले. कधीकधी जेवणानंतर २-३ ढेकरा येणे हे नैसर्गिक आहे. एक प्रकारे ते पोट भरल्याचेही लक्षण असते. तीच गोष्ट ठराविक प्रमाणातील पादालाही लागू होते. मात्र जेव्हा काही कारणांमुळे पचनसंस्थेत बिघाड होतो तेव्हा वायूनिर्मिती आणि त्यांचे उत्सर्जन खूप प्रमाणात होते. अशी काही महत्त्वाची कारणे किंवा आजार आता थोडक्यात पाहू.
अतिरिक्त ढेकर
दिवसाकाठी वारंवार ढेकर येणे हे खालील आजारांचे/बिघाडांचे लक्षण असू शकते :
१. जठरदाह किंवा पेप्टिक अल्सर : यामध्ये ढेकरांच्या जोडीने मळमळ, छातीत जळजळ आणि अपचन ही लक्षणे दिसतात.
२. पित्ताशयाचे आजार
३. काही गोळ्यांचे दुष्परिणाम : यामध्ये मधुमेह उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दिली जाणारी गोळी metformin हिचा समावेश आहे.
पाद उत्सर्जन समस्या
गुदद्वारातून वायु सुटत राहणे हे नैसर्गिक आहे. काही व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत वायूनिर्मिती जास्त होते. नक्की किती मर्यादेच्या पुढे अतिरिक्त वायूनिर्मिती म्हणायची याची ठोस व्याख्या नाही. आतड्यांच्या काही आजारांमध्ये वायू उत्सर्जन नीट न झाल्यामुळे संबंधित रुग्णास वारंवार पोट फुगल्याची भावना होत राहते. अशा आजारांमध्ये बद्धकोष्ठता, आतड्यांच्या हालचालींचे बिघाड(IBS), पचनात बिघाड करणारे काही ऑटोइम्युन आजार, दुग्धशर्करेचे अपचन आणि काही जंतुसंसर्ग यांचा समावेश होतो. वैद्यकात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे (ibuprofen, statins) सुद्धा अशा वायुसमस्या निर्माण होतात. अशा विविध आजारांमध्ये सुटणाऱ्या पादास बर्यापैकी दुर्गंधी असते.
जेव्हा ढेकर अथवा पाद यांचे प्रमाण त्या व्यक्तीस सहन होण्यापलीकडे असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. पचनसंस्थेसंबंधी अन्य जी लक्षणे दिसत असतील त्यानुसार डॉक्टर योग्य त्या तपासण्या सुचवतात. त्यानुसार योग्य ते निदान आणि उपचार करता येतात. संबंधित आजारांवरील विस्तृत विवेचन हे स्वतंत्र विषय असून या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत.
सामाजिक संकेत व मनोरंजन
ढेकर व पाद या दोन्ही क्रियांदरम्यान विविध छटांचे आवाज येतात. त्यामुळे त्या लक्षवेधी ठरतात. एखाद्या समूहात त्यांच्या आवाजा/वासानुसार ज्या काही प्रतिक्षिप्त क्रिया उमटतात त्यातून संबंधितास लाजल्यासारखे व नकोसे वाटते. त्यामुळे समूहात असताना या नैसर्गिक क्रियांची ऊर्मी दाबण्याकडे कल राहतो. वेळप्रसंगी त्यात यशस्वी होण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.
त्यातल्या त्यात ढेकर हे प्रकरण काही संस्कृतींत समूहमान्य असते. पोटभर जेवणानंतर आलेली ढेकर हे तृप्तीचे लक्षण मानले जाते. लहान मुलांच्या जडणघडणीत या क्रियांच्या आवाजांचा चेष्टा आणि मनोरंजनासाठी भरपूर वापर केला जातो. साहित्यक्षेत्रात या क्रियेला विनोद, म्हणी, वाक्प्रचार आणि सुभाषितांमध्ये बर्यापैकी स्थान मिळालेले आहे.
समाजात काही जणांनी या क्रियांची भीड आणि संकोच कमी व्हावा यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले दिसतात. याचे काही मजेशीर किस्से जालावर वाचण्यास उपलब्ध आहेत. अधूनमधून मोठ्यात मोठी ढेकर काढण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात त्या आवाजाची तीव्रता उपकरणाद्वारे मोजली जाते. आतापर्यंत अशा मोठ्या आवाजाच्या तीव्रतेचा जागतिक विक्रम ११० डेसिबल या तीव्रतेचा असून त्याची गिनीज बुकात नोंद झालेली आहे !
हे एक भारीच ....
2019 मध्ये सुरतमध्ये मोठ्याने पादण्याची स्पर्धा आयोजित केली होती (https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/gujarat-fart-competit....) त्यासाठी आधी ६० जणांनी नाव नोंदवले होते. परंतु आयत्या वेळेस अनेकांनी लाजून माघार घेतल्याने शेवटी फक्त तीन स्पर्धक उरले ! एकंदरीत ही स्पर्धा म्हणजे फुसका बार निघाली. तरीदेखील संबंधित संयोजक आशावादी असून भविष्यात त्यांचा अशा स्पर्धा पुन्हा घेण्याचा मानस आहे.
आणि हे तर भलतेच ...
अमेरिकेची टीव्ही अभिनेत्री स्टेफनी हिचा ‘उद्योग’ तर भन्नाट आहे; अगदी आचरटपणाच. ती स्वतःचा पाद बाटल्यांत भरून ऑनलाईन विकते ! त्यावर तिला लाखोंची कमाई झाली ( https://www.loksatta.com/trending/viral-news-tv-star-earn-rs-38-lakh-in-... ). हे ‘उत्पादन’ विकत घेणारेही धन्यच.
पण हाय रे ! हा उद्योग करताना तिच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम झाला आणि तिचा हा उद्योग बंद पडला https://www.loksatta.com/trending/viral-news-stephanie-matto-made-rs-37-...).
असे हे पादपुराण !
आपल्या पचनसंस्थेत दररोज वायूनिर्मिती होते. एका प्रमाणाबाहेर तो वायू साठू लागला की त्याचे ढेकर व पाद अशा दोन्ही प्रकारे उत्सर्जन होते. त्यातून आपल्याला मोकळेपणाची भावना येते. अशा या दोन प्रक्रियांविषयी काही मूलभूत माहिती इथे लिहिली. समाजात या नैसर्गिक क्रियांबद्दल चारचौघात बोलणे हे काहीसे निषिद्ध मानले जाते. परंतु त्याच बरोबर या क्रियांचा उपयोग करमणूक आणि मनोरंजनासाठीही काही क्षेत्रात केलेला आढळतो.
नेहमीप्रमाणेच उत्साही चर्चेचे स्वागत आहे.
……………………………………………………………………………………………………..
छान, माहितीपूर्ण आणि विनोदी !
छान, माहितीपूर्ण आणि विनोदी !!!

तो श्लोक 'थ्री ईडियट्स ' मधे वापरला आहे बहुतेक. या लिंकच्या शेवटी आहे.
प्रतिसादही मनोरंजक
मुख्यचित्र
हे वाचाhttps://www.insider
हे वाचा
https://www.insider.com/reality-star-made-200k-fart-jars-selling-them-as...
काही जण अशा पद्धतीने जारमधे ढेकर देऊन ते जार विकतात..
मला प्रश्न पडलाय की विकत घेणारे लोकं नक्की कशासाठी वापर करत असावे
शाखा ने पण हा धंदा सुरू केला
शाखा ने पण हा धंदा सुरू केला पाहिजे.

एक माणूस सगळ्याच्या सगळ्या बरण्या विकत घेईल
पाद येणे - हे चूकीचे वाटते
पाद येणे - हे चूकीचे वाटते आहे. पाद असे नाम आहे का?
अर्थात पादली. लोल!!!
पादण्याची भावना होणे योग्य होइल.
अमक्या व्यक्तीला पादण्याची भावना झाली व ती व्यक्ती व्यक्त झाली
अजुन एक प्रश्न - पादणे ही
अजुन एक प्रश्न - पादणे ही नैसर्गिक क्रिया लज्जास्पद का मानली जाते? वय वाढत जाते तसे लज्जा कमी होउ लागते का? उदाहरणार्थ - वृद्ध व्यक्ती बिनधास्त चारचौघात, पादू शकतात वगैरे?
मला वाटतं याची ३ कारणे असावी -
(१) वृद्धावस्थेत एकंदरच बॉडी कंट्रोल्स कमी होतात
(२) वृद्ध व्यक्ती सहसा उपवर नसल्याने त्यांना तसा काही 'चारचौघातन पादण्याकरता' इन्सेन्टिव्ह नसतो.
(३) एकंदरच वय वाढते तसे कळत जाते की आपण विश्वाचे केंद्र नाही, सगळेजण आपल्याकडे बघत बसलेले नाहीत. तेव्हा, उगाच कॉन्शस होण्याचे कारण नसते.
इथे माबोवरती अज्ञान, अजाण
- कमेंट काढुन टाकली.
Nah!! It wasn't in good taste
My apologies
सामो चौथे कारण रोज मरे त्याला
सामो चौथे कारण रोज मरे त्याला कोण रडे सारखे रोज पादे त्याला कोण लाजे हे असावे
>>>>>>>>>रोज मरे त्याला कोण
>>>>>>>>>रोज मरे त्याला कोण रडे सारखे रोज पादे त्याला कोण लाजे हे असावे Happy
हाहाहा
पचनसंस्थे संदर्भात,
पचनसंस्थेसंदर्भात, कोलोरेक्टल कॅन्सर (colorectal cancer) बद्दल लिहावे अशी विनंती.
भारतात या कर्करोगाचे रेग्युलर स्क्रीनिंग होत नाही असे नीरीक्षण आहे. पण स्क्रीनिंगमध्ये लवकर सापडल्यास उपचार होउ शकतात.
अमेरीकेत ५० + वयाच्या लोकांना रेग्युलर स्क्रीनिंग करुन घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
पैकी स्टूल सँपल देउन केले तर दर वर्षी करत बसावे लागते.
कोलॉनोस्कॉपी केली तर निगेटिव्ह आल्यास १० वर्षानंतर करा असे सांगतात.
पूरक माहिती आणि विनोदनिर्मिती
पूरक माहिती आणि विनोदनिर्मिती बद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार !
काही किस्से वाचताना हहपुवा च्या पुढची पायरी ओलांडावी लागली . त्याला मी हहपासु असे नाव ठेवले आहे ! याचा अर्थ चाणाक्ष मंडळी ओळखतीलच
...
* पाद असे नाम आहे का? >>
होय, असे नाम आहे. हे बघा :
पाद =
पु. अपानवायु; गुदद्वारानें सुटलेला वायु.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6
त्यावरूनच पादणे हे अकर्मक क्रियापद झालेले आहे.
* कोलोरेक्टल कॅन्सर बद्दल
* कोलोरेक्टल कॅन्सर बद्दल लिहावे अशी विनंती.
>>>
यासंदर्भात वय ५० नंतर ज्या चाळणी चाचण्या असतात त्याबद्दल मी यापूर्वीच हा धागा काढलेला आहे :
https://www.maayboli.com/node/65663
तिथे काही रोचक चर्चा झालेली आहे ती पाहता येईल.
तिथे अजय यांनी लिहिलेला स्वानुभव भारी आहे .
धमाल धागा आहे.
धमाल धागा आहे.
छान माहिती आणि प्रतिसाद पण भारीच.
मला हरभरा डाळ नाही झेपत. खूप पाद तयार होतो
* हरभरा डाळ पचन >>>>
* हरभरा डाळ पचन >>>>
जेव्हा आहारात पचायला जड असणाऱ्या प्रथिनांचे पदार्थ असतात तेव्हा त्याच्या जोडीने माफक प्रमाणात तेल व तूप हे जरूर खावे. त्यामुळे पचनसंस्थेत विविध हॉर्मोन्स स्त्रवतात. त्यांच्या प्रभावाने पाचक एन्झाइम्स स्त्रवतात आणि त्यामुळे प्रथिनांचे पचन चांगले होते.
डाळींमध्ये बघता हरभरा आणि उडीद डाळी या वायुनिर्मितीच्या बाबतीत शिरोमणी म्हणता येतील. या डाळिंपासून केलेले काही पदार्थ खाताना त्याच्या जोडीने चांगले मेद पदार्थ आपण आहारात घेतो. याची दोन सुंदर उदाहरणे देतो:
१. इडली किंवा मेदुवडा यांच्याबरोबर नारळाची चटणी
२. पुरणपोळी बरोबर तूप किंवा दूध
ह्या दोन्ही उदा.मध्ये आपल्याला जड प्रथिनाबरोबर चांगला मेद पदार्थ असा सुरेख संयोग झालेला दिसतो. त्यामुळे पचन सुलभ होते.
इथे मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते.
या प्रकारच्या खाद्य सवयी परंपरेने शतकानुशतके चालू आहेत.
याउलट, प्रथिने, मेद हे आधुनिक वैज्ञानिक संशोधन तसे अलीकडील २-३ शतकांमधील आहे.
काही हजार वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या पूर्वजांनी असे सुरेख खाद्यसंगम आहारात योजिले त्याचे मला कौतुक वाटते. ते अनुभवजन्य पारंपरिक ज्ञान दाद देण्याजोगे आहे.
पादणे आणि ढेकर देणे ह्या
पादणे आणि ढेकर देणे ह्या दोन्ही बाबतीतल्या लोकांच्या प्रतिक्रियांमध्ये त्या त्या देशांतील संस्कृतीनुसार वेगळेपण आहे असे मला वाटते. आपल्याकडे कुणी पादले तर तो मस्करीचा विषय होतो, पादणारा सुद्धा खजील होतो. वास्तविक खजिल होण्यासारखे त्यात काय आहे हे कळत नाही. "पादणे म्हणजे पचनसंस्था दुबळी. आणि म्हणून ती व्यक्ती सुद्धा दुबळी. म्हणून ती व्यक्ती मस्करीचा विषय" अशी तर समजूत यामागे नसेल ना? वीरश्री संचारणारे भाषण आवेशात देत असणारा वक्ता जर मध्येच पादला तर ते सर्वाधिक हास्यास्पद होते. त्यामागे कदाचित हीच समजूत कारणीभूत असावी काय? खरे तर शिंकणे, खोकणे, ढेकर देणे तशीच पादणे ही सुद्धा फक्त एक शारीरिक प्रतिक्रिया आहे. त्यापलीकडे त्याला काही अर्थ नाही.
तिकडे युरोपात (विशेषतः इंग्लंडमध्ये) मात्र ढेकर देण्याबाबत असे आहे. तिकडे लोक भर ट्रेनमध्ये गर्दीत रूमालात फराफरा नाक शिंकरतील. पादतील सुद्धा. त्याचे त्यांना काही वाटत नाही. पण कुणी ढेकर दिला तर ते मात्र त्यांना फार किळसवाणे वाटते. आपल्याकडे सार्वजनिक जागेत ढेकर देणे फार कॉमन आहे. उलट त्याकडे 'खाऊनपिऊन सुखी आहे' अशा अर्थाने पाहतात. पण तिकडे तसे नाही. तिकडे असताना सुरवातीला ऑफिसात मी लंच करून आल्यावर जोरात ढेकर द्यायचो. आपली नेहमीची सवय. पण नंतर कुणीतरी मला सांगितले कि असे ढेकर देत जाऊ नकोस, इथे लोकांना ते किळसवाणे वाटते. मग मात्र मी लंच करून ढेकर वगैरे सगळे झाल्यावरच आत येऊ लागलो. अमेरिकेत सुद्धा कदाचित हेच कल्चर असेल. अतिपूर्वेकडील देशांत जपानमध्ये वगैरे याकडे कसे पाहतात माहित नाही.
असो. काही झाले तरी आजूबाजूचे लोक काय म्हणतील असा विचार करून आपले शारीरिक आवेग रोखू नयेत असे मला वाटते. त्यांना योग्य पद्धतीने वाट करून जरूर द्यावी पण रोखू नये. त्याचे दुष्परिणाम असतात. उदाहरणार्थ, शिंक येणे ही फार तीव्र प्रतिक्षिप्त क्रिया आहे. कारण ती श्वसन संस्थेची गरज आहे. पण तरीही शिंक रोखणारे लोक आपण पाहतो. त्यांचा शिंकेचा सुरवातीचा आवेश जबरदस्त असतो. पण नंतर ते तो प्रयत्नपूर्वक रोखतात आणि शेवटी नुसतेच खिस्स करतात! हे अजिबात न पटणारे आहे. मला खरेतर अशा लोकांची कीव करावी वाटते. हीच गोष्ट खोकणे, पादणे, ढेकर देणे यालासुद्धा लागू पडते नाही का?
गॅसेस बाहेर पडताना बऱ्याचदा
गॅसेस बाहेर पडताना बऱ्याचदा घाण वास येतो आणि त्यामूळे चार चौघात खजील झाल्या सारखे वाटू शकते...पण तरीही वेगाचे धारण करू नये च..
आजूबाजूचे लोक काय म्हणतील असा
आजूबाजूचे लोक काय म्हणतील असा विचार करून आपले शारीरिक आवेग रोखू नयेत असे मला वाटते.
>> +११ .
रोखल्यास त्रास आपल्यालाच होणार ...
शिंक ही तर संरक्षक प्रतिक्षिप्त क्रिया आहे.
वरच्या श्वसनमार्गातील नकोसे द्राव त्यातून आपण बाहेर टाकत असतो.
अशीही एक छो.जा.
अशीही एक छो.जा.

मॅडमनी जाहिरातीतच स्पष्ट केले आहे: ढेकर देणारा, पादणारा नको
ढेकर देणारा, पादणारा नको >>>
ढेकर देणारा, पादणारा नको >>>
मग पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर शोध घ्यायला पाहिजे त्यांना !
कठीण आहे.....
....
पाद या अटळ नैसर्गिक शारीरिक क्रियेसंबंधी जर कोण जर कोणीही, "मी नाही त्यातला/ली" असे म्हणत असेल तर ते धादांत खोटे आहे
धमाल धागा आहे.
धमाल धागा आहे.
छान माहिती आणि प्रतिसाद पण भारीच.
जे भिजायला, शिजायला जड ते पचायलाही जड !
छोले, राजमा,वाल, मटकी, चवळी,उडीद मूग असा क्रम ... जड ते हलके! आजार्याला मूगाचीखिचडी, कढण वै देतात .
No farters/burpers हे नवीनच
No farters/burpers हे नवीनच कळलं.
अशा बायका नवरा लग्ना नंतर पादला तर काडीमोड घेतील...
छोले, राजमा,वाल, मटकी, चवळी
छोले, राजमा,वाल, मटकी, चवळी,उडीद मूग असा क्रम ... जड ते हलके! >> छान.
यावरून मायबोलीवरील जुनी उजळणी :
अटकुबाई मटकुबाई
पावट्याचं खाणं
अर्धी रात्र झाली नाही
ढुंगण गाई गाणं
.....
No farters/burpers हे नवीनच कळलं. >>
हो ना, घोरण्यावरुन घटस्फोट होतात हे माहिती आहे. पण आता इथे तर लग्न व्हायचाच वांधा
>>>अटकुबाई मटकुबाई
>>>अटकुबाई मटकुबाई
पावट्याचं खाणं>>>
यावरून मराठी म्हण झाली...
पाद-याला पावट्याचं निमित्त.
पावटा आणि गॅस ह्यांचे अतूट
पावटा आणि गॅस ह्यांचे अतूट नात.
तरी पावटा खाण्याची ओढ काही कमी होत नाही
माझे प्रिय आहे पवट्याचा मसाले भात.
बेसन म्हटले की दूध तूप हवेच
बेसन म्हटले की दूध तूप हवेच
भजी - दही ताक
पिठले -तूप
गट्टे की सबजी -दही ताक कढी
पुरणपोळी , पुरण - तूप , दूध
* गट्टे की सबजी >>
* गट्टे की सबजी >>
म्हणजे नाही समजले
मराठीत काय म्हणतात ?
संडगा .
सांडगे .
ब्लॅक cat हिंदी प्रदेशात जास्त मनाने अस्तित्वात अस्तात.
ते फक्त नावाला मराठी आहेत
सांडगे .>>> धन्स. आवडतातच !
सांडगे .>>> धन्स.
आवडतातच !
गट्टे की सबजी >>>>> कढी गोळे
गट्टे की सबजी >>>>> कढी गोळे करा. गट्टे की सब्जी. बेसनाचे तिखट + मीठ + आमचूर+ सुंठ घालुन भिजवुन ते गोळे उकडायचे. मग फोडणी करुन ते घालायचे. आणी फेटलेले दही त्यात ओतायचे. राजस्थानी भाजी आहे.
बाकी लेखावर प्रतीसाद नंतर. हसूच आवरेना वाचतांना.
https://www.nehascookbook.com
https://www.nehascookbook.com/gatte-ki-sabji-recipe-how-to-make-gatte-ki...
देवा ! या विस्फोटक लेखामध्ये रेसेपीची लिंक द्यावी लागेल असे वाटले नव्हते.

विस्फोटक लेखामध्ये रेसेपीची
विस्फोटक लेखामध्ये रेसेपीची लिंक >>>
छान माहिती
धन्स !
स्फोट होण्यासाठी असंच दमदार खावे लागते ना !
Pages