कटप्पा यांचा धागा वाचल्यावर माझ्या मनात हा प्रश्न आला की आपण दर वेळी हे असं करणार तसे करणार संकल्प करतो तो किती जणांचा पूर्ण होतो
ज्यांनी कुणी केले असतील आणि नेटाने पूर्ण केले असतील त्यांनी याबद्दल लिहा, बाकीच्यांना मार्गदर्शक ठरतील
ज्यांचे नाही झाले त्यांनीही लिहा की काय झालं म्हणून पूर्ण नाही झाले, त्या गोष्टी टाळून या वर्षी करता येतील का ?
मी देखील अनेक संकल्प केले होते त्यातले काही झाले काही नाही
1 हिमालयन ट्रेक - दर वर्षी संकल्प करताना या वेळी एक तरी हिमायलन ट्रेक करायचा असे ठरवतो, ते चक्क या वर्षी झाले
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा बेस कॅम्प चा ट्रेक करून आलो
2 सायकलिंग - जवळपास नाहीच, 2000 किमी तरी होतील असे वाटलेलं, पण 500 पण नाही झाले, बाकी अनेक गोष्टीत वेळ गेल्याने सायकल कडे दुर्लक्ष झाले
3 रनिंग - वर्ष संपता संपता जोर चढला आहे, गेल्या दोन तीन महिन्यात बऱ्यापैकी झालं आता पुढच्या वर्षी दर महिना किमान 50 किमी तरी रनिंग व्हावं ही अपेक्षा
4 वाचन - बरेचसे झालं, साधारणपणे 50 ते 52 नवीन पुस्तके वाचली, त्यात किंडल अनलिमिटेड चा मोठा वाटा
नंतर मग पर्वतरोहण विषयावर भरपूर वाचन झालं, जी बरेचदा वाचायची ठरवून मागे राहिली होती ती झाली पूर्ण
5 व्यायाम - जागतिक योगा दिनाच्या आधी तयारी म्हणून सूर्यनमस्कार घालायला सुरु केले होते, 108 चा संकल्प होता, तितके नाही झाले पण 75 पर्यंत घातले
पण नंतर कंटाळा आला आणि थांबले ते थांबलेच
काही महिने योगा चे ऑनलाइन क्लासेस लावले होते, तेही नंतर बंद झाले
नववर्षाचे संकल्प अजून ट्रॅक
नववर्षाचे संकल्प अजून ट्रॅक वर आहेत ना??
ज्यांचे नसतील त्यांच्यासाठी खवचट reminder
आणि जे सिनसीअरली प्रयत्न
आणि जे सिनसीअरली प्रयत्न करतायत त्यांचे कौतुक
धागा वर काढायची वेळ झाली!
मावळत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आली,
धागा वर काढायची वेळ झाली!
वेळ कमी पडतोय आणि संकल्प फार
वेळ कमी पडतोय आणि संकल्प फार आहेत. स्पेस स्टेशनवर काय जायला मिळणार नाही. पण भटकंती उरकायच्या आहेत.
धाग्याच्या शिर्षकात असलेल्या
धाग्याच्या शिर्षकात असलेल्या प्रश्नाचे उत्तर - नाही.
तरीही इथे पुढच्या वर्षीसाठी लिहुन ठेवते. ३१.१२.२०२३ ला असलेच तर वाचुन हसेन तरी.
१. नियमीत धावणे, सायकलिंग (आशुचँप स्टाईल नाही तर आपले रोज दोनेक किमी, सायकल दरुस्तीला दिलीय, आज मिळेल), योगाभ्यास, प्राणायाम.
२. यंदा वेगवेगळी प्रशिक्षणे घेतली, त्यातला काहीतरी उद्योग सुरु करेन.
३. नाती सुधारेन.
४. स्वतःकडे लक्ष देईन, भयंकर दुर्लक्ष झालेय माझे माझ्याकडे गेल्या दोन वर्षात.
५. छंद अनेक होते/आहेत. नंतर निवांत वेळ मिळाला की करेन म्हणत त्यांना टांगुन ठेवलेय. पण वाळुसारखी हातातुन वेळ निघुन जातेय असे आता वाटायला लागलेय. प्रत्येक क्षण काहीना काही कामात/छंदात गुंतवायचा प्रयत्न करेन.
६. हे करायचेच यासाठी स्वतःला सतत ढकलत राहिन.
नका हा धागा वर काढू....
नका हा धागा वर काढू....
त्रास होतो
म्हणून मी काही संकल्प वगैरे
म्हणून मी काही संकल्प वगैरे ठेवत नाही बघा

मी जिना चढ-उतार करणार आहे.
मी जिना चढ-उतार करणार आहे. नो लिफ्ट! घर - १४ वा मजला
लिफ्ट चौदावा मजला दाखवेल,
लिफ्ट चौदावा मजला दाखवेल, जिना चौदावे रत्न.
Choose wisely.
पुढच्या वर्षी दर महिना किमान
पुढच्या वर्षी दर महिना किमान 50 किमी तरी रनिंग व्हावं ही अपेक्षा>>>
शेवटचे 3 महिने जमलं हे
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये दर महिना 50 किमी रनिंग केलं
हेच कंतीन्यू व्हायला पाहिजे आता
हो जमेल तितक नियमित व्यायाम
हो
जमेल तितक नियमित व्यायाम करेन असा सं. होता तो बर्याच अंशी सफल झालाय.
आता २०२३:
१) डांस्/स्विमिंग क्लास लावेन. स्विमिंग अर्धवट राहिले होते काही वर्षांपुर्वी. निदान १ तरी क्लास लावेन यातला.
२)कानाच्या पाळी वर २न्ड स्पॉट पियर्सिंग करायचेय (किती ही मुर्ख वाटला तरी आहे हा संकल्प माझा :(.. वडील्/नवरा विरोधात आहेत)
३)मँडरीन शिकायचेय..हे अवघड वाटतेय
नवीन वर्षात एका आयडी साठी
नवीन वर्षात एका आयडी साठी अन्य कुणाच्याही आयडीचा वध करणार नाही हा संकल्प मी करून काय फायदा ?
या वर्षी अंबानी समूहाची मत्ता जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर नेईन, हा संकल्प मी एकट्याने करून काय फायदा ?
या वर्षी एकही नवीन ड्ड्युआयडी बनवणार नाही हा संकल्प....
मी जिना चढ-उतार करणार आहे. नो
मी जिना चढ-उतार करणार आहे. नो लिफ्ट! घर - १४ वा मजला >> गुडघ्यांची कायमची वाट लागू शकते. Be careful.
मी काही संकल्प लिहिले होते,
मी काही संकल्प लिहिले होते, कुठल्या धाग्यावर ते आठवत नाही, पण त्यांचा स्टेटस खालीलप्रमाणे:
१. किमान ३ धागे काढणे - पूर्ण झाला
२. बिजागऱ्याना तेल घालणे आणि सुकडू सुताराकडून दुरुस्त करून घेणे - तेल घातले, दुरुस्ती बाकी आहे
३. इतर संकल्प आठवत नाहीत.
यान वीनवर्षा तरि लायन्स
1. यान वीनवर्षा तरि लायन्स इंडस्ट्रीजसही तएंटि लियावि कतघेणा रआहे.
2. माझी विश वसुंद रीऐश वर या राव च्याघ रीजाऊन शी लोप्या च्याग प्पामार ताना यूमि सडसुसं धीअ सेसांगनार.
1 year fitness routine with
1 year fitness routine with personal trainer...Diet nahi follow kel pan...
Fitness level mast vadhaliye.
Have lost close to 7 kgs in a year.. but that was bonus with the fitness routine
मी जिना चढ-उतार करणार आहे. नो
मी जिना चढ-उतार करणार आहे. नो लिफ्ट! घर - १४ वा मजला Happy
>> Do it with proper preparations Samo.
I did 10 floors *10 times last week.
No impact. Exercised as usual the next morning
शैलपुत्री व नानबा धन्यवाद.
शैलपुत्री व नानबा धन्यवाद. ऑलरेडी किंचित संधीवात (आर्थ्रायटिस आहे). आधी डॉक ना विचारते आज / उद्यात.
मी यावर्षी काहीही संकल्प
मी यावर्षी काहीही संकल्प करणार नाहीये.
I will take the year day by day as it comes and try to do something little good each day.
डॉग फोबिया असलेल्या मी २०२१
डॉग फोबिया असलेल्या मी २०२१ नोव्हेंबर मधे माझ्या बहिणीकडे सुट्टीसाठी गेले आणि तिच्या डॉगीनी ( माउवीने )माझ्यावर पूर्णच जादू केली , मला बदलून टाकलं !
एकच संकल्प केला होता २०२१ संपताना .. त्याप्रमाणे मार्च २०२२ मधे ऑष्कु बेबी उर्फ ऑस्करने (आमच्या डॉगीने ) घरात /आयुष्यात एन्ट्री केली आहे :),
वाह ! बोलक्या डोळ्यांचा
वाह ! बोलक्या डोळ्यांचा सॉफ्ट टॉईज वाटतोय....
वाह ! बोलक्या डोळ्यांचा
वाह ! बोलक्या डोळ्यांचा सॉफ्ट टॉईज वाटतोय....
फारच गोड आहे ऑस्कर.डोळे.
फारच गोड आहे ऑस्कर.डोळे.
खुपच क्युट ऑष्कु बेबी .
खुपच क्युट ऑष्कु बेबी .
खूप क्यूट!
खूप क्यूट!
आमच्या इथे एका आठमजली
आमच्या इथे आठमजली इमारतींमध्ये ( सरकारी स्कीमने बांधून दिलेल्या आणि भक्कम)
लिफ्ट,जिना आणि चाकाच्या खुर्चीसाठी उतारही दिला आहे. तो उतार ज्येष्ठ नागरिक मुद्दामच वापरतात. सुरेख व्यायाम आणि नो प्रोब्लेम. उतारावर आपल्या सोयीनुसार पावले टाकता येतात तसे जिन्यावर होत नाही, उतरताना गुडघ्यांवर जोर येतो.
पुढल्या वर्षी काही तरी संकल्प
पुढल्या वर्षी काही तरी संकल्प करावा दरवर्षाच्या शेवटच्या दिवशी लिहणार करणार!
ह्यावर्षीचा पुरा झाला!!
>>>>>>> उतरताना गुडघ्यांवर
>>>>>>> उतरताना गुडघ्यांवर जोर येतो.
बरोबर चढणे योग्य आहे पण उतरणे हे गुडघ्यांच्या दृष्टीने, अॅडव्हायझेबल नाही.
१. असे जिना चढणे उतरणे हे
१. असे जिना चढणे उतरणे हे ठरावीक वेळी म्हणजे व्यायामाच्या वेळी करणे वेगळे.
आणि आपण जेव्हा केव्हा वर खाली जाउ तेव्हा व्यायाम होईल म्हणुन लिफ्ट घेण्या ऐवजी चढणे उतरणे वेगळे.
दुसरी केस असेल तर माझ्या वरच्या पोस्टवर ठाम आहे.
२. उतरताना उलटे उतरुन बघा.
जसे आपण स्टीप स्लोप असताना एखाद्या टेकडीवरुन उतरताना सरळ उतरत नाही. उलटे उतरतो.
तसेच पायर्या उतरताना उलटे उतरले तर गुडघ्यावर कमी दाब येईल.
पण अर्थात असे उलटे उतरताना एका हाताने रेलींगचा सपोर्ट घ्यावा लागेल, किमान हाताशी असावा लागेल. किंवा तसे आवर्जून करणे उत्तम.
माझा संकल्प-
माझा संकल्प-
फुल्ल पार्टी करणार... 2023 संपूर्ण एन्जॉय करणार.. वेगवेगळे पदार्थ खाणार...वेगवेगळ्या जागा फिरणार... भरपूर व्हरायटी ड्रिंकस ट्राय करणार...
Pages