तुमचे या वर्षाचे संकल्प पूर्ण झाले का?

Submitted by आशुचँप on 29 December, 2021 - 06:12

कटप्पा यांचा धागा वाचल्यावर माझ्या मनात हा प्रश्न आला की आपण दर वेळी हे असं करणार तसे करणार संकल्प करतो तो किती जणांचा पूर्ण होतो

ज्यांनी कुणी केले असतील आणि नेटाने पूर्ण केले असतील त्यांनी याबद्दल लिहा, बाकीच्यांना मार्गदर्शक ठरतील
ज्यांचे नाही झाले त्यांनीही लिहा की काय झालं म्हणून पूर्ण नाही झाले, त्या गोष्टी टाळून या वर्षी करता येतील का ?

मी देखील अनेक संकल्प केले होते त्यातले काही झाले काही नाही

1 हिमालयन ट्रेक - दर वर्षी संकल्प करताना या वेळी एक तरी हिमायलन ट्रेक करायचा असे ठरवतो, ते चक्क या वर्षी झाले
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा बेस कॅम्प चा ट्रेक करून आलो

2 सायकलिंग - जवळपास नाहीच, 2000 किमी तरी होतील असे वाटलेलं, पण 500 पण नाही झाले, बाकी अनेक गोष्टीत वेळ गेल्याने सायकल कडे दुर्लक्ष झाले

3 रनिंग - वर्ष संपता संपता जोर चढला आहे, गेल्या दोन तीन महिन्यात बऱ्यापैकी झालं आता पुढच्या वर्षी दर महिना किमान 50 किमी तरी रनिंग व्हावं ही अपेक्षा

4 वाचन - बरेचसे झालं, साधारणपणे 50 ते 52 नवीन पुस्तके वाचली, त्यात किंडल अनलिमिटेड चा मोठा वाटा
नंतर मग पर्वतरोहण विषयावर भरपूर वाचन झालं, जी बरेचदा वाचायची ठरवून मागे राहिली होती ती झाली पूर्ण

5 व्यायाम - जागतिक योगा दिनाच्या आधी तयारी म्हणून सूर्यनमस्कार घालायला सुरु केले होते, 108 चा संकल्प होता, तितके नाही झाले पण 75 पर्यंत घातले
पण नंतर कंटाळा आला आणि थांबले ते थांबलेच
काही महिने योगा चे ऑनलाइन क्लासेस लावले होते, तेही नंतर बंद झाले

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यायाम करेन नियमित,कोणतेच व्यसन करणार नाही
असे संकल्प कोणी करू नयेत.
चटावलेले लोक कधीच सुधारू शकत नाहीत.

Pages