कटप्पा यांचा धागा वाचल्यावर माझ्या मनात हा प्रश्न आला की आपण दर वेळी हे असं करणार तसे करणार संकल्प करतो तो किती जणांचा पूर्ण होतो
ज्यांनी कुणी केले असतील आणि नेटाने पूर्ण केले असतील त्यांनी याबद्दल लिहा, बाकीच्यांना मार्गदर्शक ठरतील
ज्यांचे नाही झाले त्यांनीही लिहा की काय झालं म्हणून पूर्ण नाही झाले, त्या गोष्टी टाळून या वर्षी करता येतील का ?
मी देखील अनेक संकल्प केले होते त्यातले काही झाले काही नाही
1 हिमालयन ट्रेक - दर वर्षी संकल्प करताना या वेळी एक तरी हिमायलन ट्रेक करायचा असे ठरवतो, ते चक्क या वर्षी झाले
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा बेस कॅम्प चा ट्रेक करून आलो
2 सायकलिंग - जवळपास नाहीच, 2000 किमी तरी होतील असे वाटलेलं, पण 500 पण नाही झाले, बाकी अनेक गोष्टीत वेळ गेल्याने सायकल कडे दुर्लक्ष झाले
3 रनिंग - वर्ष संपता संपता जोर चढला आहे, गेल्या दोन तीन महिन्यात बऱ्यापैकी झालं आता पुढच्या वर्षी दर महिना किमान 50 किमी तरी रनिंग व्हावं ही अपेक्षा
4 वाचन - बरेचसे झालं, साधारणपणे 50 ते 52 नवीन पुस्तके वाचली, त्यात किंडल अनलिमिटेड चा मोठा वाटा
नंतर मग पर्वतरोहण विषयावर भरपूर वाचन झालं, जी बरेचदा वाचायची ठरवून मागे राहिली होती ती झाली पूर्ण
5 व्यायाम - जागतिक योगा दिनाच्या आधी तयारी म्हणून सूर्यनमस्कार घालायला सुरु केले होते, 108 चा संकल्प होता, तितके नाही झाले पण 75 पर्यंत घातले
पण नंतर कंटाळा आला आणि थांबले ते थांबलेच
काही महिने योगा चे ऑनलाइन क्लासेस लावले होते, तेही नंतर बंद झाले
संकल्प पूर्ण झालेल्यांना
संकल्प पूर्ण झालेल्यांना ऋन्मेष सरांकडून शाहरूख खान यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण.
हार्दिक अभिनंदन. कांचन गंगा
हार्दिक अभिनंदन. कांचन गंगा बेस क्यांप बद्दल वेगळी लेख मालिका नक्की लिहा.
मी आजार पणाचा नेटाने सामना करायचा प्रण केला होता तो तडीस नेला.
बाकी सर्व आता आटो पायलट वर आहे. फार काही करावे लागत नाही.
एक चांगली डाएट आठ आठवडे फॉलो केली.
ज्यु धर्म त्या पुढे क्रिस्चानिटी व इस्लाम, रोमन साम्राज्य, पुरुशांचे विचित्र वागणे व त्यांची विचार सर्णी समजून घेणे ह्या संबंधाने वाचन केले. म्हणजे कसे की सीझर व पाँपेइ, ऑ गस्टस, कॅलिगुला, किंग हेरोड, त्या आधीचा डेव्हिड, व नेबुकदनेझार, जीझस क्राइस्ट चा उदय व मृत्यु
पुढे त्याचे दैवीकरण, त्या पुढे इस्लामचा उदय व पुढील साम्राज्ये, सलादिन ओटोमान्स मामुल्कस व पुढे
त्या बरोबरीने क्रुसेड्स व ह्या सर्वातील जनरल कृरता व सामान्य जनतेची ससेहोलपट, उपासमार , टॅक्स भरायला होणारी उपास मार हे ते सर्व वाचून काढले.
निरो कॅलिगुला व रोमन सैन्याने केलेला ज्यु मंदिराचा विध्वंस ह्या बद्दल पण वाचले( ह्यावर अनेक उत्तम् व्हिडिओ उपलब्ध आहेत. )
भारतात न्युज मिडी आचे होणारे मॅनिप्युलेशन बघून न्युज लाँड्री साइट ला गेम चेंजर सबस्क्रिप्शन घेतले. त्यांचे हप्ता व ऑफुल ऑसम पॉड कास्ट मस्त आहेत ते नेमाने ऐकले( काम करता करता.)
मर्ज ड्रॅगन गेम मध्ये इवें ट विन करण्या परेन्त प्राविण्य मिळवले.
आजाराचा धसका घेतला होता पण रिटायरमेंत परेन्त नोकरी नेटाने करायची असे ठरवून करत आहे डिसेंबर परेन्त तर पार पडले आता अकरा महिने उरले.
अमा शुभेच्छा. मस्त जावो
अमा शुभेच्छा. मस्त जावो तुम्हाला, हे वर्ष.
तिसरे अपत्य प्लान करणार होतो
तिसरे अपत्य प्लान करणार होतो
पण नाही जमले
आता नुकतेच दर सकाळी मॉर्निंग वॉल्क सुरू केल्याने येत्या २०२२ वर्षातही होणे अवघड वाटत आहे. त्यामुळे या संकल्पावर पाणी सोडावे का विचार करतोय.
संकल्प असा केला नव्हता पण
संकल्प असा केला नव्हता पण मागच्या लॉकडाऊनमधे अचानक लक्षात आलं कि दुसऱ्या बाळापासून स्वतः कडे चांगलेच दुर्लक्ष झाले आहे.
मग लॉकडाऊन आणि सक्ती हटवल्यानंतर ऑफलाईन योगा कोर्स केला. रोज एक तास योगा करते आहे.
केसांची काळजी महिन्यात एकदा मेंदी,शिकेकाई, अंडं वगैरे लावणे.
आहारात छोटे छोटे बदल केले, साखरेऐवजी गुळ वगैरे.
लिफ्ट चा वापर कमीत कमी.
साधेसुधेच गोल्स होते पण वर्षभर नियमित केले.
तितके नाही झाले पण 75 पर्यंत घातले>>>>>>>
75 सुर्यनमस्कार किती वेळात होतात? माझे 4 सूर्यनमस्कार आणि इतर योगासनातच एक तास होतो.
मॉर्निंग वॉल्कचाही संकल्प १
मॉर्निंग वॉल्कचाही संकल्प १ जानेवारी २०२१ पासून होता.
अखेरीस २२ डिसेंबर २०२१ ला सुरुवात केली.
जीथे पूर्वी दिवसातून एक वेळेस
जीथे पूर्वी दिवसातून एक वेळेस तोंड धुण्याची पंचायत होती तीथे रोज १० स्टेप्सचे कोरिअन स्किनकेअर रूटिन कोण फॅालो करणार..पण स्किनची पूर्णपणे वाट लागल्यानंतर आता डोळे उघडलेत ..गेले ३ महिने १० स्टेप्सचे नाही पण सकाळी ५ स्टेप्सचं स्किनकेअर रूटिन आणि रात्री झोपण्यापूर्वीचे ४ स्टेप्सचे रूटिन फॅालो करतेय आणि तीन महिन्यातच बऱ्यापैकी फरक पडलाय .. हेच रूटिन कायम ठेवायचा संकल्प आहे..आता सवय झालीए आणि आवाडही निर्माण झालीए म्हणून ब्रेक होईल असं वाटत तरी नाही.
संकल्प केले तर बायकोला किंवा
संकल्प केले तर बायकोला किंवा त्या संकल्पाशी संबंधित व्यक्तीला / मित्राला सांगावेत. सोशल मीडीयावर संकल्प सांगणे म्हणजे पारावर बसून चंची सोडत , तंबाखू मळत संकल्प सोडल्यासारखे आहे. इथे ना कुणी चेक करायला येणार ना कुणी कुणाला ओळखतं.
आमीर बसू ची " लाईटनिंग इन सोल्जरवाडी " हा चार हजार पानांचा ग्रंथ वाचून सोडण्याचा संकल्प केला आहे असे ठोकून दिले तरी चालते. आमीर बसू म्हणजे आमीर खान आणि बिपाशा बसू यातली उधार ऊसणवारी असू शकते. आपल्ञा संकल्पांचे आपणच बेस्ट जज्जेस असतो. संकल्प आपल्या फायद्यासाठी असतो. शाबासकीसाठी नाही.
आशुचँपचे संकल्प हे जगजाहीर असल्याने ते पूर्ण होतात कि नाही हे समजते. त्यामुळे अशांचा सन्माननीय अपवाद समजावा. काहींना सोशल मीडीयावर संकल्प केल्याने पूर्ण होईल असे वाटत असेल तर मनापासून शुभेच्छा ! हे खूपच नकारात्मक वाटत असेल तर इग्नोर करावे.
अमा - मस्त पोस्ट
अमा - मस्त पोस्ट
तुमची पोस्ट वाचूनही मलाही आता हे सगळं वाचावे वाटू लागलं आहे
रोमन कार्थेज हनीबाल यांच्या युद्धावर खूप वाचलं आहे पण बाकीचे सामाजीक आणि सामान्य नागरिक यांच्यावर नाही वाचले
कालिगुला खूप विकृत होता हे माहिती होते
कृसेड बद्दल पण जास्त नाही वाचलं
फक्त युद्ध आणि डावपेच हेच जास्त वाचले
नवीन वर्षात उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला
तिसरे अपत्य - सर, तुम्ही नेटाने प्रयत्न चालू ठेवा, यश येईल
हिम्मत ए मर्दा..
मृणाल - साधारणपणे मी अर्धा ते पाऊण मिनिटात एक सूर्यनमस्कार घालतो, कधी कधी एक मिनिटात एक
सुरुवातीला वेग चांगला असतो, नंतर ढेपळतो
आणि सलग 75 तर कल्पनाही नाही करवत (सलग 108 घालणारे आहेत महान लोक)
मी 12 चा एक सेट झाला की ब्रेक घेतो, थोडं पाणी पिऊन पुन्हा 12 असे करतो 6 सेट झाले असे पण नंतर पार दमलो आणि पुढे सोडून दिली
किती वेळ लागला हे मोजल नाही दीड एक तास लागला असावा
म्हाळसा - जे आहे ते
म्हाळसा - जे आहे ते कळण्यापलीकडे आहे पण तरीही तुम्हाला शुभेच्छा, नितळ कांतीसाठी
शांत माणूस -- मी तर कोणालाच सांगत नाही संकल्प, म्हणजे मायबोलीवर लिहिले नसावेत, आता आठवत नाही एक वर्षापूर्वीचे
पण मी माझ्या मोबाईलवर नोट्स मध्ये लिहून ठेवतो सेक्शन वाईज
सगळेच संकल्प इथे नाही लिहिले
त्यात जप लिहिणे, मानसिक शांतीसाठी प्रयत्न, करियर च्या दृष्टीने काय काय हेही सगळं आहे
त्यातलं काही जमलं काही नाही पण ते माझ्या मते अगदीच पर्सनल होत म्हणून तपशीलवार नाही लिहाल
धावणे, सायकलिंग, वाचन एकमेकांना प्रेरित करतात म्हणून ते आवर्जून लिहिले
म्हणूनच मी संकल्प लिहा असे म्हणत नाहीये पण केलेला संकल्प केला का याचा आढावा घायला हा धागा काढला
कुणी नाही लिहिलं तरी मनातल्या मनात जरी काय काय ठरवलं होतं हे आठवलं तरी उद्देश सफल
धावणे, सायकलिंग, वाचन
धावणे, सायकलिंग, वाचन एकमेकांना प्रेरित करतात म्हणून ते आवर्जून लिहिले >> यात काहीच शंका नाही. म्हणून सन्माननीय अपवाद म्हटले आहे.
तुमचे सायकलविषयक धागे वाचायला सुरूवात केल्यावर सायकल घेतली. चालवायला सुरूवात केली. सातत्य नाही. पण प्रेरणा मिळत राहते. हेच म्हणायचे होते. जर सायकलविषयक काही संकल्प केला तर तुम्हाला सांगितलेला फायदेशीर होईल. चेक राहतो. गाईडन्स मिळतो.
चेक राहतो. गाईडन्स मिळतो.>>>>
चेक राहतो. गाईडन्स मिळतो.>>>>>
नककीच, मी आता ९ जानेवारी ला हाफ मॅराथॉन धावणार असे माझ्या सगळ्या धावक मित्रांना सांगितले, आता तेच माझ्यापेक्षा लक्ष ठेऊन आहेत माझ्यावर. त्यांनी तर आठवड्याचे शेड्युलच दिले आहे कुठल्या दिवशी कुठला व्यायाम, किती रन, लॉग रन किती, रेस्ट कधी
आता ते नेमाने विचारतात की कुठवर चालली आहे तयारी, त्यांच्या धाकाने का होईना मी बापडा पळतोय
करेक्ट मेथड आहे ही.
करेक्ट मेथड आहे ही.
गेले ३ महिने १० स्टेप्सचे
गेले ३ महिने १० स्टेप्सचे नाही पण सकाळी ५ स्टेप्सचं स्किनकेअर रूटिन आणि रात्री झोपण्यापूर्वीचे ४ स्टेप्सचे रूटिन फॅालो करतेय>>>> डिटेल्स द्याल का म्हाळसा ताई
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा बेस कॅम्प चा ट्रेक करून आलो
>>>> हा अनुभव लिहा. बाकीचे संकल्पही आवडले.
>>डिटेल्स द्याल का म्हाळसा
>>डिटेल्स द्याल का म्हाळसा ताई
+१.
हो लिहायच आहेच, त्या आधी
हो लिहायच आहेच, त्या आधी केलेले कन्याकुमारी ते चेन्नई व्हाया पेंबम ब्रिज आणि रामेश्वरम ही सायकल मोहीम आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बद्दल पण केव्हापासून लिहायचं आहे. ते रखडलेच. आता निदान हे तरी नवीन वर्षात पूर्ण केलं पाहिजे
चेक राहतो. गाईडन्स मिळतो.>>>>
चेक राहतो. गाईडन्स मिळतो.>>>>>
नककीच, मी आता ९ जानेवारी ला हाफ मॅराथॉन धावणार असे माझ्या सगळ्या धावक मित्रांना सांगितले, आता तेच माझ्यापेक्षा लक्ष ठेऊन आहेत माझ्यावर. त्यांनी तर आठवड्याचे शेड्युलच दिले आहे कुठल्या दिवशी कुठला व्यायाम, किती रन, लॉग रन किती, रेस्ट कधी
आता ते नेमाने विचारतात की कुठवर चालली आहे तयारी, त्यांच्या धाकाने का होईना मी बापडा पळतोय Happy
नवीन Submitted by आशुचँप on 29 December, 2021 - 20:09
>>>>
+७८६
मी सुद्धा एक तत्व कायम पाळतो.

नेहमी ढिंढोरा पिटतो. मग मनाची नाही तर जनाची लाज बाळगून तरी आपण हाती घेतलेले कार्य तडीस नेतो
जसे आता मॉर्निंग वॉक आणि मग हळूहळू एकेक व्यायामप्रकार हे लक्ष्य आहे. चार दिवस नाही झाले पण चार धाग्यांवार आवर्जून या बद्दल लिहिलेय. व्हॉटसप स्टेटस टाकलेय. उद्या फेसबूकला फोटो टाकणार आहे, मग मायबोलीवर एखादा धागा... एवढा गाजावाजा करणार आहे छोट्या छोट्या एकेका गोष्टीचा की मागे हटायला लागलो तर माझ्या सावलीनेच मला झिडकारून पुढे ढकलायला हवे
सर, कुठला धागा वर काढायचाय ?
सर, कुठला धागा वर काढायचाय ? आदेश द्या सर.
पिहू, वर्षा- वेगळा धागा काढेन
पिहू, वर्षा- वेगळा धागा काढेन
मी सुद्धा एक तत्व कायम पाळतो. नेहमी ढिंढोरा पिटतो.>> मीही सेल्फ मोटिवेटेड नाही त्यामुळे कोटा फॅक्ट्री बघितल्यानंतर मी सुद्धा हाच फॅार्मुला फॅालो करतेय..व्यायाम केला की लगेच घामाने माखलेले फोटोज स्टेटसवर टाकायचे.. चार लाईक्स मिळाले की आपोआप मोटिवेशन मिळतं
अरे हो, अजून एका संकल्पाबद्दल सांगायचं राहीलं. ह्या एप्रिलमधे संकल्प केला होता की काहीही करून वर्षाच्या शेवटपर्यंत पुन्हा जॅाब सुरू करायचा. तो संकल्प दोन महिन्यातच पूर्ण झाला.. ६ वर्षाच्या ब्रेक नंतर जॅाब मिळाला आणि तो ही माझ्या आधीच्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रात.. कधीकधी आपण स्वत:ला उगाचच कमी समजतो
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा बेस कॅम्प चा ट्रेक करून आलो
>>>> हा अनुभव लिहा. >>>> + १०००.
मस्त धागा. आशुचँप तुमचे
मस्त धागा. आशुचँप तुमचे संकल्प मस्त आणि शुभेच्छा तुम्हाला.. काही पुर्ण झालेत काही नाहि. हरकत नाहि. जिंदगी मे कभि ना कभि कुछ ना कुछ तो छुटेगा ही, कितना भी भाग लो
किंडल मधे कोणती पुस्तकं आवडलीत ते ही लिहा..
म्हाळसा.. है शाब्बास! नव्या जॉब च्या ढीगभर शुभेच्छा आणि स्कीन केयर च्या पण. लव युवर्सेल्फ & बी कॉन्फीडंट! मी इन्नीसफ्री चे ३ स्टेप रुटीन आणलेय पण वीकली एकदा ही नियमित वापरणे जमत नाहिये.
अमा..मस्तच.
माझ्या संकल्पा बाबत जुन्या धाग्या वर लिहुन झालेय ..नवा आणि चांगला जॉब मिळवणे वर्ष सरता सरता पुर्ण झाला
(जुन्या कंपनीत १२ वर्षे होते
)
ऋन्मेष..वॉल्क वाचून दातात खडा आल्या सारखं झालं.. त्यापेक्षा चालायला जातो लिही
"सायलेंट अल्फाबेट" बद्दल काही वाचले आहेस का? मुलांच्य फोनिक्स बूक मधे माहिती मिळेल.. हिणवत नाहिये.. जेनुईनली सांगत आहे.
DSLR कॅमेरा घ्यायचा होता.
DSLR कॅमेरा घ्यायचा होता. राहून गेले.
(नवीन मोबाईलने येतात बर्यापैकी. पण सोमि वर ६०% च्या वर फोटोत सेमच वॉटरमार्क दिसतो. बहुतेक हा मोबाईल खूप जास्त खपला असेल.)
भटकंती पण नाही झाली. कोविडच्या आधी आसामची धावती ट्रीप झाली होती. त्या वेळी जास्त दिवसांसाठी रहायला जायचे ठरवले होते.
खूप काही राहून गेले. २०२० पासून मनासारखे काही होत नाहीये.
मी कोणतेच संकल्प करत नाही
मी कोणतेच संकल्प करत नाही .केले की हमखास पूर्ण होत नाहीत माझ्याच्याने
संकल्प शब्दाची जरा भीतीच
संकल्प शब्दाची जरा भीतीच वाटते. ठरवलेल्या गोष्टी झाल्या की नाही हा अप्रोच बरा वाटतो. मनासारख्याच झाल्या पाहिजेत असेही नाही.
कुणी गेल्या वर्षी सायकल
कुणी गेल्या वर्षी सायकल चालवण्याचा अयशस्वी संकल्पधारक असेल तर मला जुनी सायकल विकत घ्यायची आहे.
संकल्प न टिकल्यास फिरत्या ढालीप्रमाणे फिरती सायकल ठेवता येईल.
एक धागा विणता येईल त्यासाठी.
अमा, तुमची पोस्ट प्रेरणादायी आहे. तुमची करोनाकाळातही कामावर जायची धावपळ पाहिली आहे. सतत आनंदी आणि आशावादी असावं तर असं. _/\_
ॠ, संकल्प मजेशीर आहे तुमचा. आदर्शाच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जाणं म्हणतात ते हेच कि काय? अबकी बार अबराम की काय?
ऋन्मेष..वॉल्क वाचून दातात खडा
ऋन्मेष..वॉल्क वाचून दातात खडा आल्या सारखं झालं.. त्यापेक्षा चालायला जातो लिही Sad

"सायलेंट अल्फाबेट" बद्दल काही वाचले आहेस का?
>>>>>>
मी वॉल्क बोलताना ल सायलंटच ठेवतो, लिहीताना मात्र ल लिहितो. जसे आपण ईंग्लिशमध्ये WALK लिहिताना L लिहितो, पण बोलताना सायलंट ठेवतो
रच्याकने, हि ऋन्मेषची स्टाईल आहे.
पण आपण चूक सुधारणेच्या हेतूने दाखवले त्याबद्दल धन्यवाद
सर, तुमची पिचकॉलॉजी भल्या
सर, तुमची पिचकॉलॉजी भल्या भल्यांना समजलेली नाही सर. मायबोली आणि तुमची जी चेमिस्ट्री आहे ती शिकवण्याचे क्लासेस काढावे लागतील. हा कोर्स केलेल्यांनाच तुम्हाला अनुस्वार देता येईल असा नियम करता येईल.
अबकी बार अबराम की काय? नको,
अबकी बार अबराम की काय?
नको. तो शाहरूख आहे. पण तसे मला परवडणार नाही. लोकांना उगाच चर्चेला विषय
मी आपल्या पारंपारीक पद्धतीनेच तिसर्या अपत्याचा विचार करत होतो. पण स्कूल फीज पाहता आता तिसर्या अपत्याला जन्म देऊन सरकारी शाळेत घालून त्याच्याशी दुजाभाव करणे पटत नाही.
सर, एक धागा काढून क्राऊड
सर, एक धागा काढून क्राऊड फंडींगचे आवाहन करा. आपण त्याला लंडनच्या इंग्लंडला सेंब्रीड्ज मधून शिकवू.
Pages