कटप्पा यांचा धागा वाचल्यावर माझ्या मनात हा प्रश्न आला की आपण दर वेळी हे असं करणार तसे करणार संकल्प करतो तो किती जणांचा पूर्ण होतो
ज्यांनी कुणी केले असतील आणि नेटाने पूर्ण केले असतील त्यांनी याबद्दल लिहा, बाकीच्यांना मार्गदर्शक ठरतील
ज्यांचे नाही झाले त्यांनीही लिहा की काय झालं म्हणून पूर्ण नाही झाले, त्या गोष्टी टाळून या वर्षी करता येतील का ?
मी देखील अनेक संकल्प केले होते त्यातले काही झाले काही नाही
1 हिमालयन ट्रेक - दर वर्षी संकल्प करताना या वेळी एक तरी हिमायलन ट्रेक करायचा असे ठरवतो, ते चक्क या वर्षी झाले
नोव्हेम्बर मध्ये कांचनगंगा बेस कॅम्प चा ट्रेक करून आलो
2 सायकलिंग - जवळपास नाहीच, 2000 किमी तरी होतील असे वाटलेलं, पण 500 पण नाही झाले, बाकी अनेक गोष्टीत वेळ गेल्याने सायकल कडे दुर्लक्ष झाले
3 रनिंग - वर्ष संपता संपता जोर चढला आहे, गेल्या दोन तीन महिन्यात बऱ्यापैकी झालं आता पुढच्या वर्षी दर महिना किमान 50 किमी तरी रनिंग व्हावं ही अपेक्षा
4 वाचन - बरेचसे झालं, साधारणपणे 50 ते 52 नवीन पुस्तके वाचली, त्यात किंडल अनलिमिटेड चा मोठा वाटा
नंतर मग पर्वतरोहण विषयावर भरपूर वाचन झालं, जी बरेचदा वाचायची ठरवून मागे राहिली होती ती झाली पूर्ण
5 व्यायाम - जागतिक योगा दिनाच्या आधी तयारी म्हणून सूर्यनमस्कार घालायला सुरु केले होते, 108 चा संकल्प होता, तितके नाही झाले पण 75 पर्यंत घातले
पण नंतर कंटाळा आला आणि थांबले ते थांबलेच
काही महिने योगा चे ऑनलाइन क्लासेस लावले होते, तेही नंतर बंद झाले
सर एक नवीन धागा येऊच द्या
सर एक नवीन धागा येऊच द्या
का आलाय आधीच, हे या आधीही ऐकल्या वाचल्या सारख वाटत आहे
देजा वू म्हणतात तसं
. ६ वर्षाच्या ब्रेक नंतर जॅाब
. ६ वर्षाच्या ब्रेक नंतर जॅाब मिळाला आणि तो ही माझ्या आधीच्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रात.. कधीकधी आपण स्वत:ला उगाचच कमी समजतो>>>>> वाह मस्तच
खूप खूप अभिनंदन
माझेही कितीतरी वर्षे सुरू आहे, फिल्ड बदलून काहीतरी वेगळं करावं, पण समहाऊ जमत नाहीये
आशु - माझं बहुतांश वाचन ऐतिहासिक, भटकंती, किंवा सायन्स फिक्शन इतकंच आहे तरीही
किंडल वर नारायण धारप समग्र वाचून काढले, जेफ्री आर्चर ची क्रोफर्ड क्रोनिकल्सची 4 पुस्तके वाचली, अच्युतगोडबोले यांचे अनर्थ, अतुल कहाते यांचा सीरिया, देवदत्त पटनाईक चे मिथक
लेट भुट्टो इट ग्रास, शांताराम ही अजून काही आवडलेली पुस्तके
रानभुली - मी तर आता dslr कुठं न्यायचा नाही हे ठरवलं आहे,विशेषतः ट्रेकिंग सायकलिंग ला
विनाकारण ओझे आणि मोबाईलवर आता खरेच चांगले येतात
माबोवरचा यकःश्चित आयडी ऋ,
माबोवरचा यकःश्चित आयडी ऋ, सुधरलास का काय?
अनुल्लेखासारखं शस्त्र नाही. कीप इट अप. (जर मला वाटतंय तसं असेल तर)
अनुल्लेखासारखं शस्त्र नाही.
अनुल्लेखासारखं शस्त्र नाही. कीप इट अप. >>> अगदी असेच काही नाही. पण येस्स, जोपर्यंत आपले मनोरंजन होतेय तोपर्यंत होऊ द्यावे, बोअर झाले की सोडून द्यावे. सगळा खेळ कंट्रोलचा आहे
सर तुमच्याकडे तर तत्वज्ञानाचे
सर तुमच्याकडे तर तत्वज्ञानाचे भांडार आहे
तुम्ही एखादा चॅनेल का सुरू करत नाही
कित्येक लोकांना लाभ होईल
मनोरंजन तर नक्की होईल याची खात्री आहे
https://www.maayboli.com/user
https://www.maayboli.com/user/57027/created
लिखाण नै हो
लिखाण नै हो
युट्युयब चॅनेल
तिकडे करा ना मनोरंजन
मला वाटतं कि एखादा चित्रपट
मला वाटतं कि एखादा चित्रपट बनवावा आणि तो युट्यूबवर रिलीज करावा.
गेला बाजार वेबसिरीज एखादी.
हो वेबसिरीज मधे पहिजे तेवढा
हो वेबसिरीज मधे पहिजे तेवढा आचरटपणा करता येईल सर तुम्हाला
परत तुम्हाला विषयाचा तोटा नाही, अक्षरशः कशावरही बोलू शकता तुम्ही अधिकाराने
घ्याच एकदा मनावर
आपण सगळीकडेच प्रमोट करू
त्या क्षेत्रात एक शाहरूख आहे
त्या क्षेत्रात एक शाहरूख आहे ..
चला आता धाग्यावर बोलूया
नुकतेच एक ठरवलेले ते करून आलो.. या वर्षातलाच नाही तर आयुष्यात पहिल्यांदा केलेय ते. ठरवत होतो पण जमत नव्हते. आज जमवले.. पण इथे नको. नवीन लेख टाकतो.
विचार ?
विचार ?
विचार ?>>>> बेक्कार हसतोय
विचार ?>>>>
बेक्कार हसतोय
हो वेबसिरीज मधे पहिजे तेवढा
हो वेबसिरीज मधे पहिजे तेवढा आचरटपणा करता येईल सर तुम्हाला>>>>
त्या क्षेत्रात एक शाहरूख आहे ..>>>
हे मी काय वाचतोय

साक्षात सर म्हणू राहिलेत हे
आताच तिकडे सरांचे कौतुक करून आलो तर हे
असे धक्के देत जाऊ नका सर, वय झालं आहे (शाहरुख चे )
सरांनी काय जादु केली समजत
सरांनी काय जादु केली समजत नाही. प्रत्येक धाग्यावर सर उगवतात.
विचार ?
विचार ?
>>>>
तो करून फक्त केस गळतात..
तो आयुष्यात नाही करणार..
तसेही माणूस स्वत:चा कमी आणि लोकांचा विचार जास्त करतो.. त्यामुळे हो, मी ॲक्चुअली विचार न करता जगणे पसंद करतो..
चला शुभरात्री.. मॉर्निंग वॉल्कचे व्यसन लागल्याने लवकर झोपायला जायचेय.. संकल्प तुटता कामा नये..
मावळत्या वर्षाला निरोप
मावळत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आली. संकल्प विसरा आणि या भराभरा


दुसऱ्या फोटोत इतक्या
दुसऱ्या फोटोत इतक्या नेलपॉलिशच्या बाटल्या का ठेवल्यात?
न्युइयर गिफ्ट आहे?
नेल पॉलिशचा वास तसाच येतो.
नेल पॉलिशचा वास तसाच येतो. फसायला होतं.

सॉलिड
सॉलिड
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
पहाटे झकास सायकल राईड आणि
पहाटे झकास सायकल राईड आणि नंतर कॉफ़ी पिऊन वर्षाची सुरुवात पण झकास झाली
रन पण करायचा होता पण सकाळी लॉक न्यायला विसरलो आणि सायकल नुसतीच ठेवणे धोक्याचे वाटले
बघू संध्याकाळी करीन
रस्त्यावर फुल्ल गर्दी, सगळे संकल्प वाले पहाटे फिरायला, पळायला आलेले
म्हणलं यातल्या निम्म्या लोकांचे तरी तडीस जाऊ देत, आणि ही गर्दी वर्षभर दिसत राहू देत
आज संकल्प न करता फिरायला गेलो
आज संकल्प न करता फिरायला गेलो होतो. उन्हाळ्यापर्यंत टिकले आणि पावसाळ्यात बंद नाही पडले म्हणजे बास.
पहाटे झकास सायकल राईड आणि
पहाटे झकास सायकल राईड आणि नंतर कॉफ़ी पिऊन वर्षाची सुरुवात पण झकास झाली>> मस्त. वाचूनच फ्रेश वाटलं.
बिना हँगओव्हरची सुरवात वर्षाते उद्धारी.
मी २९ ता. ला नागपूरहुन परतलो आणि व्यायाम बंद पडला होता आठवडाभर जवळपास तरी परतल्यावर सुरू केला नव्हता. आज पासून परत फुल रुटीनमध्ये सुरू केला मस्त वाटलं.
हंगोव्हर थोडासा होताच
हंगोव्हर थोडासा होताच
रात्री डबल ब्लॅक घेतली होती
ती मी अगदी खास प्रसंगीच घेतो
एकच ठरवला होता पण थंडी माहोल (मस्त गजल ऐकत होतो) च्या नादात अजून एक घेतला
मग बास म्हणलं नैतर सकाळचा सगळा बोजवारा उडाला असता
खूप संकल्प आहेत , ते पूर्ण
खूप संकल्प आहेत , ते पूर्ण होत नाहीयेत
कमालीचं नैराश्य आल आहे त्यातून बाहेर पडण्याचा संकल्प केला आहे पण जमतच नाहीये
खूप गळून गेल्यासारखं वाटत
छोटे छोटे संकल्प करा, एकदम
छोटे छोटे संकल्प करा, एकदम वर्षात इतकं वगैरे नको
या महिन्यात इतके किंवा अगदी या आठवड्यात
दिवसाला रोज फक्त 5 सूर्यनमस्कार घातले तरी चालतं, मोजूनपाच मिनिटे लागतात
कुठे तरी कशात तरी सातत्य ठेवलं तर आपोआपच त्याची गोडी लागते आणि न ठरवताही पुढच्या वेळी आपसूक एक जास्तीचा सूर्यनमस्कार घातला जातो
मला रनिंग ला असे व्हायचं, कमालीचा कंटाळा यायचा, नको नको होऊन जायचं, अगदी ज्याला हेट तिरस्कार म्हणतात ते झालेले
मग एक मित्राने संगीतल्यानुसार फक्त एक किमी पळायला सुरू केलं, बस कितीही वाटलं तरी एक किमी ला थांबायचं आणि घरी यायचं
सलग एक आठवडाभर नेमाने फक्त एक किमी पळालो
आपोआपच पुढच्या आठवड्यात दोन किमी पळालो
प्रकृती मुळे व्यायाम जमत नसेल तर मी रोज 15 मिनिटे पुस्तक वाचन करीन, सोशल मीडिया आणि टीव्ही सोडून बागकाम, संगीत, एखादे वाद्य शिकणे, हस्तकला असं काहीतरी क्रिएटिव्ह करीन हा संकल्प करा
तेही अवघड वाटलं तर सरळ वही घ्या आणि रोज काहीही लिहा त्यात, जप, वाक्ये काहीही मनात येईल ते
हात डोळे आणि डोकं यांचं सुंदर को ओरडीनेशन लिहिताना होते
जे मोबाईल किंवा संगणक वर होत नाही
एक स्थिर बैठक आणि हातात पेन घेऊन लिहिताना आपलं आपल्यालाच बरे वाटते
बघा प्रयोग करून
Thank you
Thank you
हाय्ला! वर्ष संपलं पण??
हाय्ला! वर्ष संपलं पण??
फायनान्शियल इयर संपले...
फायनान्शियल इयर संपले...
फायनान्शियल इयर संपले...>>???
फायनान्शियल इयर संपले...>>???
Pages