न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.
काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.
गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.
ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.
हिंदी:
1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी
मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे. 
बाजे रे मुरलिया बाजे
बाजे रे मुरलिया बाजे
अधर धरे मोहन मुरली पर
होठ पे माया बिराजे… बाजे रे
(हरे हरे बांस की बनी मुरलिया
मर्म मर्म को छुए अंगुरिया)
कभी नीम नीम कभी शहद शहद.....
कभी नीम नीम कभी शहद शहद.....
झालं का??
गल्ली वेगळी आहे पण .....रंग
गल्ली वेगळी आहे पण .....रंग हीना लिखना>>>>>हे मला इतके दिवस रंगही ना लिखना ऐकू यायचं,
चुकीच्या ऐकू आलेल्या
चुकीच्या ऐकू आलेल्या गाण्यांमधली बॉटनी - असाही एक धागा काढता येईल.
तसाच एक झूलॉजी चा काढला तर त्यात 'उंदरीवरनं सुंदरी व्हावे' सर्वोच्च स्थानी हवं.
हे गाणं आज भूले बिसरे गीत
हे गाणं आज भूले बिसरे गीत मध्ये ऐकलं. यापूर्वी ऐकल्याचं आठवत नाही.
चलो चलो चलें हम बबूल के तले
ठंडी ठंडी हवा हमें पंखे झले
हम नहीं जाएंगे उई काटा चुभ जाएगा
- लंगडी होके चलो गी तो और मजा आएगा
ऐसी बातें कहनेवाले तेरा मूंह जले
दर्याखोर्यात फुलसी तू गं
दर्याखोर्यात फुलसी तू गं रानजाई
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही
अरे मनमोहना
स्वप्न झरे फुल से, मीत चुभे शुल से
लुट गये सिंगार सभी बाग के बबुलसे
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवां गुजर गया गुबार देखते रहे
लव लव करी पातं
डोळं नाही थार्याला
>>>>>.चलो चलो चलें हम बबूल के
>>>>>.चलो चलो चलें हम बबूल के तले
ठंडी ठंडी हवा हमें पंखे झले
गोड असतात जुनी गाणी.
चंद्रावरती दोन गुलाब
चंद्रावरती दोन गुलाब
सहज दृष्टिला घडला लाभ
--
वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते
मी प्रीत भावभोळी पतिदेव पूजिते
--
तुला ते आठवेल का सारे?
दवांत भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले
बनातुनि केतकीच्या येति सुगंध शिंपित वारे
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतिल काय तुला रे?
--
केतकीच्या बनात
उतरत्या उन्हात
सळसळ पानांत
जपून जा
गुळाचा गणपती - गदिमा - पुल - आशा
पत्ता पत्ता बूटा बुटा हाल
पत्ता पत्ता बूटा बुटा हाल हमारा जाने है
..
..
कांटा लगा, हाय लगा... हे पण बॉटनीत येईल वाटतं..
ओळखीचा हा सारा परिसर
ओळखीचा हा सारा परिसर
ही हसणारी सकाळ सांगे,
सखे साजणी, हेच तुझे घर
हा रस्ता हा हळवा पिंपळ
ही पानांची मंजुळ सळसळ
हा वडिलांचा रम्य बंगला
लालभडक हे वरचे छप्पर
बागबगिचा रेखीव अंगण
हे मेंदीचे सुरेख कुंपण
हे बकुळीचे झाड घालिते
सडा फुलांचा हिरवळीवर
हळवा आहे का ते?
हळवा आहे का ते?
हो. हळवाच असू शकेल.
हो. हळवाच असू शकेल.
कांटा लगा, हाय लगा... हे पण
कांटा लगा, हाय लगा... हे पण बॉटनीत येईल वाटतं.. >> हो, शिवाय त्यात इमली, बेरी वगैरे आलेच आहेत की!
सजल नयन नितधार बरसती गाण्यात
सजल नयन नितधार बरसती गाण्यात "तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले" आहे, ते चालेल का?
तोच चंद्रमा नभात गाण्यात
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
गेले ते दिन गेले गाण्यात
कदंब तरुला बांधून दोला
कांटा लगा, हाय लगा... मध्ये
कांटा लगा, हाय लगा... मध्ये फक्त बेर
इमली आणि बेरी ते "इमली का बुटा बेरी का पेड" मध्ये
Oh बंगले के पीछे ऐवजी मी इमली
Oh बंगले के पीछे ऐवजी मी इमली के पीछे म्हणत होतो
फूल गुलाब का
फूल गुलाब का
लाखों मे हजारों मे
एक चेहरा जनाब का
शुभ्र फुले वेचुनी रचिला हार
शुभ्र फुले वेचुनी रचिला हार तू जूईचा, म्हाणालीस चंद्रोत्सव हा सावळ्या भूईचा.
( दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे)..
मोगरा फुलला, मोगरा फुलला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुले वेचिता बहरू .........
एक होता विदूषक मधली लावणी, ही
एक होता विदूषक मधली लावणी, ही बॉटनी झुऑलॉजी दोन्हीत बसते !
या गाण्याच्या कोरीओग्राफीला त्या वर्षीचं नॅव्हनल अॅवॉर्ड मिळालं होतं, ही प्रॉपर फडावरची लावणी, आ़जकालच्या लावणीं मधल्या बाया आयटेम गर्ल भोजपुरी वाटतात..
यातले नृत्य बघा, अस्सल आहे.. मधु काम्बीकर कमान टाकून नंतर पेटत्या दीपमाळा घेऊन नाचते तेंव्हा लावणी वेगळ्याच लेव्हलला जाते, दोन हतात २ दीप्॑माळा, एक डोक्यावर आणि एक ती सर्वात शेवटी तोंडाने उचलते.. केवळ अप्रतिम !
आई आणि मुलाने एकत्रं परफॉर्म केलेल्या लावण्या दाखवणारा हा एकमेव सिनेमा असावा ?
https://youtu.be/wdNxEJrWriw?si=-bCjO3xx3OarrhJie1:33 पासून पुढे नक्की पहा.)
भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, फुलांचा भार
डोळ्यांतून हलका पाऊस भिजला, मोरनी झाले भार
बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान
जाळीमंदी लपल्या ग पोरी, गोरी त्या छान छान छान
अलवार फुलांची होरी, राजस गोरी गहिनागौर
ह्या कळ्याफुलांच्या देठांमधले रंग सये गर्भार
देहाला डसले जहर तयाची लहर पेटते ओठी
हा बहर कहर अंगात, विकावी रात पांखरासाठी
पौषात हिवाळी रात गळ्यामंदी हात गच्च गुंफावे
मोकळ्या खुळ्या देहाच्या विभवांवरी जाणते रावे
भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, गगन घनदाट
डोळ्यांत लालसर गडद गर्दशी स्पर्शजांभळी रात
(ना. धों. महानोर , आनंद मोडक आणि फेवरेट ड्युओ भोसले, रवींद्र साठे)
हिल, हिल पोरी हिला
हिल, हिल पोरी हिला
तुझे कप्पालीला टिला
तुझा पदर वाऱ्याशी उडतो
अगं बघून जीव धडधडतो
तुझा पदर वाऱ्याशी उडतो
अगं बघून जीव धडधडतो
तुझी नखऱ्याची चाल,
करी जीवाच हाल
माझे गुल्लाबाचे फुला
केली शेज फुलांची छान
केली शेज फुलांची छान
जाई शेवंती मदनबाण
वाट पाहुनी नयन सख्या शिणले
Pages