बॉटनी इन बॉलीवुड (चित्रपटसंगीतात आलेले झाडाझुडुपांचे/फुलापानांचे उल्लेख)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 December, 2021 - 16:32

न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्‍याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.

काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.

गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.

ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.

हिंदी:

1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी

मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोरी गोरी पान फुलासारखी छान
(हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान)
यातपण बॉटनी आणि झूलॉजी एकत्र आलेत.

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली

फुलले रे क्षण माझे
(मेंदीने शकुनाच्या)

पर्दा है पर्दा
(किसी हँसीन की तरफ ये गुलाब फेकूंगा ) Happy

फूल गुलाब का
लाखों में हज़ारों में एक चेहरा जनाब का (बिवी हो तो ऐसी)
**
ईचक दाना बीचक दाना
दाने ऊपर दाना
ईचक दाना
छज्जे ऊपर लड़की नाचे
लड़का है दीवाना
ईचक दाना
बोलो क्या?
अनार
ईचक...

छोटी सी छोकरी, लालबाई नाम है
पहने वो घाघरा, एक पैसा दाम है
मुँह में सबके आग लगाये आता है रुलाना
ईचक दाना
बोलो क्या?
मिर्ची !!

हरी थी मन भरी थी, लाख मोती जड़ी थी
राजा जी के बाग़ में दुशाला ओढ़े खड़ी थी
कच्चे-पक्के बाल हैं उसके मुखड़ा है सुहाना
ईचक दाना...
बोलो क्या? बोलो बोलो
बुड्ढी !!
भुट्टा !
**

छान धागा.

पण या धायाचे शीर्षक धाग्यातील माहितीशी जुळत नाही. धाग्यात हिंदी व मराठी अशा दोन स्वतंत्र चित्रपट व्यवसायातील माहिती आहे पण शीर्षकात मात्र फक्त बॉलीवुडचा उल्लेख आहे. तो बदलुन, बॉटनी ईन ईंडीयन फिल्मस् असा करावा, ही विनंती.

उड जा काले कावा तेरे मुँह विच खंड पावा
ले जा तू संदेसा मेरा, मै सदके जावा
बागों में फिर झुले पड गये, पक गई मिठिया अम्बिया...

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
...
वाऱ्यावर येथिल रातराणी हो धुंद
..
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध
(ही कविता म्हणून जास्त प्रसिद्ध असली तरी सी. रामचंद्रांच्या संगीतात आणि आवाजात हे गाणं म्हणूनही ऐकायला खूप छान आहे!)

करवंद घ्या हो करवंद फक्त ऑडियो आहे

बोरं घ्या बोरं

माझिया माहेरा जा

अंगणात पारिजात, तिथे घ्या हो घ्या विसावा
दरवळे गंध, चोहिकडे गावोगावा
हळूच उतरा खाली, फुलं नाजूक मोलाची
माझ्या मायमाउलीच्या काळजाच्या की तोलाची

दोनोने किया था प्यार मगर मुझे याद रहा तू भूल गयी
मेरी महुआ ओ मेरी महुआ

लब हिले तो मोगरे के फुल खिलते है कही
(आप की आंखो मे कुछ महके हुए से राज है)

पर्बतों के पेडोंपर शाम का बसेरा है
सूरमई उजाला है चंपई अंधेरा है

रजनीगंधा फुल तुम्हारे

फिजा में भी खिली रहे ये कली अनार की
(ये जिंदगी उसी की है)

पहाडियों की बुलंदीयों से
कभी चनारों के दरमियां से
(तुझे बुलाए ये मेरी बांहे)

मेंहदी है रचनेवाली
हाथों मे गहरी लाली

मेंदहीसे पिले होंगे हाथ
सहेलियों के साथ मगनमे नाचुंगी

दूर कही एक आम की बगिया
बगिया मे है ठंडी छांव
छांव मे एक कच्चा रस्ता
रस्ते मे प्यारा सा गांव
(‘झुबैदा’ चित्रपटातील सुंदर अंगाईगीत

https://youtu.be/L3O9OfnmEpQ )

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी

शेती बागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
(सुन्या सुन्या मनामधे भास हलके)

कहने को जश्न-ए-बहारा है
इश्क ये देख के हैराँ है
फूल से खुशबू ख़फ़ा-खफा है गुलशन में
छुपा है कोई रंज फिज़ा की चिलमन में

कच्ची कली कचनार की तोडी नही जाती

पत्ता पत्ता बुटा बुटा
हाल हमारा जाने है

फिर छिडी रात बात फुलों की
रात है या बारात फुलों की

देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए
दूर तक निगाह मे है गुल खिले हुए

भंवरेने खिलाया फुल
फुल को ले गया राजकुंवर

मुस्कुराती सुबह की और गुनगुनाती शाम की
ये कहानी गुल की है, गुलशन की है, गुलफाम की

फुलों का तारों का सबका कहना है

एक 'केशरी चुना' सोडल्यास केशर महागच आहे गाण्यांत.
केशराची सावली, सुगंध किंवा लोळणे अशक्यच.
शिवाय केशर लावायचे म्हटले तर त्या हवामानात बाकी झाडे बाद.

होंठ जैसे के भीगे-भीगे गुलाब
गाल जैसे के दहके-दहके अनार
मेरे घर आयी एक नन्ही परी

स्वप्न झ़रे फुल से, मीत चुभे शुल से
लुट गये सिंगार सभी बाग के बबूल से
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवां गुजर गया गुबार देखते रहे

थका-थका सूरज जब नदी से होकर निकलेगा
हरी-हरी काई पे, पाँव पड़ा तो फिसलेगा
(ओ साथी रे दिन डुबे ना - ओंकारा)
काई - शेवाळं

मौसम बदले चोला
रंग बसंती आवे
सरसों पीली धूप से
छनती छनती आवे

कैसा सोग लगा है
अब के हरियाली पे
खाली झूले झुले
आमों की डाली पे

चल पीपल की छांव मे गिद्दा डालेंगे
भंगडा डालेंगे

(दर्दा मारया माहिया - पिंजर)

पार्वती वेची बिल्वदळे

...फुले लहडली प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्न शंकर
सुमने कसली हास्य हराचे भूमिवर निथळे

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी उजळली...

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्णे कमळे
पाचमण्यांच्या किरणांसमही हिरवी दुर्वादळे

अमर भूपाळी मधली आणखी एक रचना - गोल तुझ्या शरीराचा डौल

जान्संघ सुकुमार पोटर्‍या ati नाजूक ग कर्दळी

मस्त धागा. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार व्रृक्षापरी आलंय का प्रतिसादात
बॉटनी आणि सिनेमा एकत्र म्हटलं की मला चुपके चुपके च आठवतो

आडवाटेला दूर एक माळ
तरु त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिपिंत जीवनाशी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरुवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरु वाट तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेई उडवूनी त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्णराशी

>>>>..फुले लहडली प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्न शंकर
सुमने कसली हास्य हराचे भूमिवर निथळे
बाप रे! काय सुरेख उपमा आहे. प्रचंड धन्यवाद, भरत.

पार्वती वेची बिल्वदळें
शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळें
.
धुके तरळते धूसर धूसर
भस्ममाखले दिसे चराचर
उष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप भोळे
.
फुले लहडली प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्‍न शंकर
सुमने कसली हास्य हराचे भूमीवर निथळे
- गदिमा

त्या तिथे पलीकडे तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे

गवत उ़ंच दाट दाट
वळत जात पायवाट
वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे

कौलारू गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता स्वागत ते केवढे!

थोर नगरीत वसे, सात तालांचा हसे,
वाडा सामोरा उभा कुण्या राजाचा दिसे !
खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे !
..
.
.

ऊठ पोरी ऊठ आता (काय सारं स्वप्नं होतं ?)
ऊठ पोरी ऊठ आता, जायचे नं शेतावरी

चला बिगीबिगी चला गं
शेत भान्गलाया चला ग
डोईवर दिसं आला !

यात शेती व केळी....

आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू

हिरवी श्यामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लव फुलशेती, जुई शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू

दिवसामागून दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधी रे येशील तू

धरेस भिजवून गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू

शारद शोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले, अंतरीचे हेतू

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बल
पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू

पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभी पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू

कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा

बारीक सुपारी निमचिकनी घालून
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून
बांधले तसे या कुडीत पंचप्राण
घ्या रंगत करि मर्दुनी, चतुर्दशगुणी, सख्या सजणा

धाग्याचा विषय पहा बरं.
----
हे गाणं नाही आलंय ना अजून?
नाच रे मोरा
आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

Pages