न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.
काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.
गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.
ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.
हिंदी:
1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी
मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे.
मा. पृ.
मा. पृ.
अंगणात फुलल्या ची एक आठवण आहे.
माझ्या लहानपणी घरी अनेक लोक येत. काव्यसाहित्यविनोद चाले. तेव्हा एकदा अण्णा माईणकर ह्यांचा विषय निघाला. एका जाणकारांनी आठवण सांगितली ती अशी:
अण्णा माईणकरांकडे पायाची दासी चित्रपटाच्या संगीताचे काम आले होते. ते डोक्यात घोळत असताना एकदा वाटेतल्या सार्वजनिक मंडळात गणपतीची आरती (सुखकर्ता दुःखहर्ता) चालली होती तेव्हा अण्णा यांना एकदम ती चाल थोड्या फेरफारानिशी अंगणात फुलल्या साठी योग्य होईल असे वाटून त्यांनी ती बसवली.
संधीकाली या अशा, धुंदल्या
संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा, चांद येइ अंबरी
चांदराती रम्य या, संगती सखी प्रिया, प्रीत होइ बावरी
मुग्ध तू नि मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी, एकरूप संगमी
रातराणीच्यामुळे, श्वास धुंद परिमळे, फुलत प्रीतिची फुले
हे पूर्वी माझ्या लहानपणी
हे पूर्वी माझ्या लहानपणी रेडिओवर लागत असे. गोड आहे गाणं.
आगीन फुलेली तोडा बायांनो
आगीन फुलेली तोडा
लाल लाल मिरची तोडा बायांनो
लवंगी मिरची तोडा
- बकुळ पंडीत आणि जयवंत कुलकर्णी
या गाण्यात पुढे उसाचा पेरा देखिल आहे. कडव्यात जयवंत कुलकर्णी गातात ती ओळ सेम 'मी डोलकर' च्या चालीत आहे.
गाणं इथे ऐकता येईल : https://youtu.be/aVrnGheBOoI
आणि इथे बघता ऐकता येईल : https://www.youtube.com/watch?v=mVTw7bzzp70
दोनी गाणी किती सुरेख पहिले
दोनी गाणी किती सुरेख पहिले तर किती रोमँटिक आहे . आमच्या इथे रातराणी इत्तर आहे त्या बरोबर हे गाणे लिहिलेली चिट्ठी अशी गिफ्ट दिली तर काय मस्त होईल.
ये दोसती हम नही छोडेंगे. शोले.
गाण्यात पाने फुले नाहीत पण व्हिजुअली अमिताभ वडाच्या भरपूर पारंब्यांचे एक वन आहे त्यात लोंबकळतो. व दोस्ती
त्या पारंब्यांसारखीच एक मेकांत भावना गुंतलेल्या असलेली अशी आहे असा अर्थ अभिप्रेत आहे.
शांता शेळक्यांची "हे एक झाड
शांता शेळक्यांची "हे एक झाड आहे" ही कविताही स्वरबद्ध व ध्वनिमुद्रित झाली आहे.
किती सुंदर सुंदर गाणी आठवलीत
किती सुंदर सुंदर गाणी आठवलीत सगळ्यांना!
धागा काढताना 'झाडं/पानं/फुलं' इ. सार्वनामिक उल्लेख अभिप्रेत नव्हते, पण शीर्षकातून ते स्पष्ट होत नाही हे खरं आहे. 'उल्लेख'ऐवजी बहुधा 'नामोल्लेख' असं म्हणायला हवं होतं.
भरत, खरंच 'चित्रपट' विभागात काढायला हवा होता हा धागा. लक्षात आलं नाही. प्रशासकांना विनंती करते.
सामो, कविता सुंदर आहेत आणि धागा सार्वजनिक, त्यामुळे आक्षेप घेत नाही - तरीही निराळा धागा काढून त्यावर लिहिल्यास योग्य ऑडियन्सपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचतील असं मलाही वाटतंय. तसंच संपूर्ण कविता स्थायी धाग्यावर पोस्ट करताना प्रताधिकारभंग होत नाही ना हे तपासत असालच, पण मी माझ्याकडून आठवण करून देते.
मला आता चित्रपटसंगीत आणि कालगणना (वार, तिथी, महिना इत्यादींचे नामोल्लेख), झूलॉजी, खानपान असं काहीबाही सुचायला लागलं आहे.
काढतेच झालं तेही धागे! होऊ दे खर्च!
>>>>>हे तपासत असालच
>>>>>हे तपासत असालच
नाही तपासलेले.
वेबअॅडमिनना विपूने विनंती करते आता.
झूलॉजीचा सुद्धा एक धागा हवा.
झूलॉजीचा सुद्धा एक धागा हवा.
गं तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा
या गाण्यात बॉटनी आणि झूलॉजी दोन्हीचा अभ्यास आहे.
दिंडा तोड ग पोरी दिंड्याची
दिंडा तोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी...
वास ह्यो ऊसात येई कस्तूरीचा
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलया पार ग्वाड लागलं रं
याड लागलं रं याड लागलं रं
पुछे जो कोई मेरी निशानी
रंग हीना लिखना
फुलं झाली, पानं झाली मग काटे नकोत बॉटनीत?
काटों से खींच के ये आंचल
तुजे पायात रुतता काटा
माजे काळजाक लागता घाव
कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया
कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला - हे बहुतेक गैरफिल्मी असावे आणि खरा कल्पवृक्ष कोणी पाहिलाय ? पण चालवून घ्या
कल्पवृक्ष नारळाच्या झाडाला
कल्पवृक्ष नारळाच्या झाडाला म्हणतात.
सुंदर धागा!
सुंदर धागा!
माझ्या आवडत्या मोहाचा उल्लेख दिसला नाही इथे कुठे ...तर 'अशोका' मधलं
महुआ महुआ महका महका
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला ... वन वेळूचे वाजवी मुरली
आणि बॉलिवुड नसलं तरी कुमार गंधर्वांचं `टेसुल बन फूले' आठवलंच. पळसाचा बहार कुठल्याच हिंदी गाण्यात नाही असं कसं?
मोगरा फुलला
मोगरा फुलला
मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा
पुनरपि जन्मा येणे नाही
मेहंदी लगा के रखना.
मेहंदी लगा के रखना.
माझे जीवनगाणे : कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनातून कधी मनातून
दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन, घाशितो नाथाघरी चंदन
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल
कांदा मुळा भाजी येऊन गेलंय का
कांदा मुळा भाजी येऊन गेलंय का?
तुळशीच्या बनामधे हरी पाहिला,
तुळशीच्या बनामधे हरी पाहिला, बाई हरी पाहिला
राधिकेच्या खांद्यावरी हात ठेवीला
कभी नीम-नीम, कभी शहद-शहद
कभी नीम-नीम, कभी शहद-शहद
कभी नरम-नरम, कभी सख्त-सख्त
कळिदार कपुरी पान
त्या तिथे, पलिकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे !
गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे
कौलावर गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत ते केवढे !
बापरे काय धावतोय धागा
बापरे काय धावतोय धागा
रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे...... बेला चमेली का सेज बिझाया
हे झालं का गाणं?
पाडाला पिकलाय आंबा
सगळी गाणी, कविता मस्त.
हरीला आवडते
हरीला आवडते
हरीला आवडते
आवडते तुळशीचे पान
हरीला आवडते तुळशीचे पान
भजनी मंडळवाले हे गाणे जादूगर सैया छोडो मोरी बैया ह्या चालीत म्हणतात
https://youtu.be/hkssYBjVvxY
<<भजनी मंडळवाले हे गाणे
<<भजनी मंडळवाले हे गाणे जादूगर सैया छोडो मोरी बैया ह्या चालीत म्हणतात<< अगदी ... इथे वाचुन आता चेक केलं युट्युबवर.
हो. यु ट्यूबची लिंक दिली
हो. यु ट्यूबची लिंक दिली
(No subject)
हासत वसंत ये वनी अलबेला
हासत वसंत ये वनी अलबेला
प्रियकर पसंत हा मनी धरणीला
घनवनराई बहरुनि येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला
चाफा झाला पिवळा
जाइ-जुई चमेलीला भर आला शेवंतीला
घमघमला
इतरांच्या पोस्टी कुणी वाचतंय
इतरांच्या पोस्टी कुणी वाचतंय का ?
रिपीट होतायेत गाणी.
गुगल करून गाणी लिहीली तर FARHANITRATE / PRERAJULISATION सारखं होईल.
मेरा नाम है चमेली, मै हूं
मेरा नाम है चमेली, मै हूं मालन अलबेली
चली आई हूं बिकानेर से
हे दोन्हीकडे चालेल
सगळी भजनं लहानपणी ऐकली आहेत,
सगळी भजनं लहानपणी ऐकली आहेत, तेंव्हा व्हॅटसप फेसबुक नव्हते.
पण आज यु ट्यूबवर लगेच मिळतात आणि कुणीही म्हटलेल्या असल्या तरी त्याच चालीत असतात , भिन्न चालीतही मिळतात.
कशा काय ह्या चाली लोकांनी जतन केल्या असतील ?
>>>>>>.इतरांच्या पोस्टी कुणी
>>>>>>.इतरांच्या पोस्टी कुणी वाचतंय का ? Lol
रिपीट होतायेत गाणी.
हो ना कालपासून पहातेय. बट दॅट्स ओके. पण .... असो! मी 'बगळ्याची माळ' गाणे टाकलेले तेही कंट्रोल एफ करत प्रत्येक पानावर शोधून मग टाकलं होतं.
शां मा
शां मा

जादूगर सैंया
मस्त धागा आहे. मी नुसतंच वाचतेय. Couldn't catch up !!
लिंबलोण
उतरू कशी
असशी दूर लांब तू
झाले का ?
बिंबाधरा मधुरा : नाट्यगीत.
बिंबाधरा मधुरा : नाट्यगीत.
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते
अजून आपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते : भावगीत.
शिरीष कुसुमाहुनीही कोमल, कोमेजून ती काया जाईल. : भावगीत.
(रघुनंदन आले आले)
प्राजक्ताचे तरु मोहरते हृदयीच्या अंगणी. माझिया नयनांच्या कोंदणी
( चित्रपट कन्यादान)
यह चमेली सी सुगंधित रात मधु मुसका रही ( चित्रपट स्त्री: आज मधुवातास डोले.)
Pages