बॉटनी इन बॉलीवुड (चित्रपटसंगीतात आलेले झाडाझुडुपांचे/फुलापानांचे उल्लेख)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 December, 2021 - 16:32

न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्‍याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.

काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.

गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.

ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.

हिंदी:

1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी

मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद टवणे सर. फार सुंदर गाणे कळले. माझ्या बाबांना आणि लाडक्या मैत्रिणीला पाठवले आहे. डोळ्यात अश्रू आले हे गाणे ऐकताना. इतकी सुंदर कविता शेअर करण्याकरता, दोन दोन व्यक्ती आहेत हे कळून भयंकर श्रीमंत वाटले.
>>>>>विश्रब्ध मनाच्या कातरवेळी - प्राजक्त,
https://www.aathavanitli-gani.com/Song/Vishrabdha_Manachya

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरत्या नभाची सूर्यास्त छाया
एखाद्या प्राणात बुडून पूर्ण
.
एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल,
विलग पंखांचे मिटत मन
एखाद्या प्राणाचे विजनपण
एखाद्या फुलाचे फेडीत ऋण
.
गीतात न्हालेल्या निर्मळ ओठा,
प्राजक्तचुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्माचे सावळेपण,
एखाद्या प्राणाची मल्हारधून
.
एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या प्राणाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा,
एखाद्या सरणा अहेवपण

संदीप खरेचं अजून एक.
मी मोर्चा नेला नाही..
(मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही आंबाही झालो नाही)

सब जो गए बाग मेरा बुढ्ढा भी चला गया
सब तो लाए फूल बुढ्ढा गोभी लेके आ गया
मैं हो गयी बदनाम मुझे बुढ्ढा मिल गया

रानजाई सळसळे वळे ती व्यथित हृदय कवळीत l त्या तरुतळी विसरले गीत.
पैल तटी न का तृण मी झाले, तुडविता तरी कधी, पैल तटी न का कदंब फुलले करिता माळा कधी. कशी काळ नागिणी सखे ग...
त्या दिसां वडाकडेन गडद तीनसानां मंद मंद वाजत आयली तुजीं गों पायंजणा
कमलादलात नवा गंध आला रे नंदलाला रे नंदलाला रे.
सुटली वेणी सुकला मरवा, जळते मी हा जळे दिवा.
निशिगंधाची बाग सभोती तुझी नि माझी जुळली प्रीती
चंद्र चवथीचा रामाच्या ग बागेमध्ये चाफा नवतीचा
देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी
हिरव्या साडीस पिवळी किनार ग रानी लिंबास आला बहार ग
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा.
जाळीमंदी पिकली करवंदं
व्हटाचं डाळिंब पिकलं
तू तर चाफेकळी.
ह्यातली बरीच गाणी इथे लिहिली गेलीही असतील कदाचित. पूर्ण धागा वाचलेला नाही.

तिन्ही लोक आनंदाने भरुन जाउ दे रे
या गाण्यात अनेक विषय एकत्र आलेत.
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा,
..
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी, (झूलॉजी)
..
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना...
चांदण्यात आनंदाच्या..
पौर्णिमा स्वरांची माझ्या.. ( ॲस्ट्रॉनॉमी)

1). आज से तेरी सारी गलियां मेरी हो गयी आज से मेरा घर तेरा हो गया.......
तू मांगे सर्दी में *अमिया* जो मांगे गर्मी में मुंगफलियां तू बारिश में अगर कहदे जा मेरे लिए तू धुप खिला

2) बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे......

3) उड जा काले कावां .......
बागों में फिर झूले पड़ गए
पक गयी मिठियाँ अम्बियाँ

चढ़ गयो पापी बिछुआ (ओ बिछुआ हाय रे, पीपल छैयाँ बैठी पल-भर)
------------------------------------
लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का
बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला (गोजिरवाणी मंजूळगाणी वाजविते बासुरी डाळींब ओठाला)
आली ठुमकत नार लचकत (डाळींबाच दानं तुझ्या पिळलं ग व्हटावरी, गुलाबाचं फूल तुझ्या चुरडलं गालावरी)
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे (मोर केशरांचे झुलती पहातेस दारी)
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे (पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या)
स्वयें श्रीराम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती (ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकील)
तंबाखूची रसाळ पोथी
कळीदार कपूरी पान (रंगला काथ केवडा, बारीक सुपारी निमचिकनी घालून, जायपत्री वेलची लवंग वरी दाबून)
राजसा जवळी जरा बसा (भलताच रंगला काथ, मी ज्वार नवतीचा भार)
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात (त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली)
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी

असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवी कासावीस झाल्यावीण;
तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण त्याची नाही;
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे;

मैं तुलसी तेरे आंगन की

एक लडकी को देखा तो ऐसा लगा
जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब

हिन्दी सिनेमातील अजरामर गाणी आहेतच

जब तक रहेगा समोसेमे आलू, तब तक रहेगी ओ मेरी शालू
मै तो रस्ते से जा रहा था …. मिरची लगी तो मै क्या करू
हाय हाय मिर्ची (दुल्हन हम ले जायेन्गे ??)
स्ट्रॉबेरी आंखे - सपने

प्राचीन काळी मिसरी म्हणजे तंबाखू भाजून काळी मिश्री बनवतात तीच फक्त माहीत होती <<< फारएण्ड, हो हो. आम्हालाही तेच फक्त माहीत. त्यामुळेच आशाबाईंच्या 'रोज रोज आंखोंतले' या गाण्यात 'जब से तुम्हारे नाम की मिसरी होट लगाई है' ही ओळ ऐकली रे ऐकली की आम्हास एकाच वेळी संभ्रम आणि हसू उसळून येई. Proud

कांटा लगा >> बोरी आणि बाभळी.
कांटा लगा म्हणजेच बाभळीचं झाड आहे. बेरी म्हणजे बोरी. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ही म्हण या गाण्यावरून आली असावी.

केवडा नाही आला ना वर ? केवड्याचं बन
https://youtu.be/eTbzFnREZWQ?t=124

माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी
राखण करतेय मी रावजी

या गाण्यात मळा आहे. म्हणजेच संपूर्ण बॉटनिकल गार्डन आलं. अशा रितीने हा धागा सुफळ संपूर्ण झाला.

आमच्या कडे सध्या डोंगरी देव हा उत्सव सुरू आहे त्यातील एक गाणं
लाल्या वंदरू बंदर काठी गया वं...
भरण्या आणितो नारळाच्या गोणी वं.....
अज्ञातवासीजींना माहीत असणार.

समईच्या शुभ्र कळ्या
(केसांतच माळलेली जाई पायाशी पडते)

मी मज हरपून बसले गं
(प्राजक्तासम टिपले गं)

मोदभरे उमलल्या कुमुदिनी शांत स्वरांनी मोहित केले.कुणी बाई गुणगुणले.
गुंफिते माळ बकुळफुलांची... मानसकन्या कण्व मुनींची.

धागा खूपच आवडला.

अब के बरस भेज भैयाको बाबुल
( अंबुवा तले फिरसे झुले पडेंगे)

पिवळी पिवळी हळद लागली

बॉटनीतील नवीन प्रयोग वगैरे -

टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगा
आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा

थिऑलॉजिकल ऍनॅटॉमी आणि एन्टेमॉलॉजी

मारुतीच्या बेंबीत शिरलाय भुंगा

गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी.

मर्म बंधातली ठेवही. मध्ये ह्रू दया बु जी लीन लोभी अलि हा. मकरंद ठेवा लुटण्यासी आला.

सुन मेरे बंधु रे , सुन मेरे मितवा, सुन मेरे साथीरे
होता तू पिपल मै होती, अमर लता तेरी

यात विशिष्ट झाड किंवा फूल नाहीये ( अख्खी बाग आहे Happy
शोखियों मे घोला जाये फूलोंका शबाब

हे बहुधा गैर फिल्मी असावं नूरजहां चं
इन खजूरों के तले

काली घटा छाय ( कली को बालोंमे सजाय)

छान धागा आणि प्रतिसाद.

अंगणात फुलल्या जाई जुई
जवळी ग माझा पती नाही।

माळ्याच्या माळ्या मध्ये कोण गं उभी
वांगी तोडते मी रावजी

पिवळी पिवळी हळद लावली
भरला हिरवा चुडा

लटपट लटपट तुझं चालणं ग....
जशी चवळीची शेंग कवळी..

सात सुरांवर तनमन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही

इथे कविता बाद आहेत तरीही त्या देण्याचा मोह आवराला नाही म्हणून. :
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
माझे घर चंद्रमौळी आणि दारात सायली. ( ही इंदिरा संतांची कविता. ही गीत म्हणून ध्वनिमुद्रित बहुधा झाली असावी)
तशीच ही कुसुमाग्रजांची एक कविता:
निळवंतीच्या फुलू लागल्या कळ्या कुंपणावरी,
येऊनी रात्रीच्या प्रहरी
परत जायचे विसरुनी गेल्या जलदेवी कोणी
झाला उष: काल राणी !
उषास्वप्न हे उरले मागे तुजसाठी रमणी
झाला उष: काल राणी !

Pages