हमरस्त्याला (हायवे) चांगला चहा मिळण्याची ठिकाणे

Submitted by शांत माणूस on 9 November, 2021 - 10:00

आज ताम्हिणी घाटातून कोकणात जाऊन आलो. रस्त्याला कुठेही फक्कड किंवा झटका चहा मिळाला नाही. वरंधा घाट मार्गे गेलो असतो तर भजी आणि वाफाळलेला तरतरी येणारा चहा मिळाला असता. तिथेही एक दोन ठिकाणचा चहा चांगला नसतो.
रस्त्याला चहाचे ठिकाण माहिती असेल तरच बरे. नाहीतर चहाच्या पत्तीचे उकळलेले पाणी प्यावे लागते. इथे वेगवेगळ्या रस्त्याला प्रसिद्ध असणा-या चहाच्या ठिकाणांबद्दल हितगूज करूयात.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चहा पित नाही, पण माझा चहाबाबत अति फसी असणारा नवरा तक्रार करत नाही त्यामुळे ताम्हणी घाटाच्या अलीकडे 'क्विक बाईट' चा चहा आणि स्नॅक्स रेकमेंड करेन. तिथे ब्रेकफास्ट, लंच, कॉफी , आईस्क्रीम बऱ्याच वेळेस खाल्लं आहे आणि आवडलं आहे.

हमरस्त्यावर कुठेही चांगला चहा मिळणार नाही. केळशीलाच जाणार असाल तर सरळ दापोली पर्यंत या. सेवानिकेतन हॉस्पिटल समोर थोड्या अंतरावर हिंदुस्थान बेकरी आहे. उत्तम चहा, पॅटिस आणि सामोसे मिळतात.

बरोबर.
चांगला चहा मिळणे दुरापास्त होत चाललं आहे.

हे नेहमी प्रवासात सोबत बाळगले तर खुप फायद्याचे आहे... अगदी उदकशांती साठी मॅगी पासून चहा पर्यंत

घरात वापरायला ठीक आहे, पण गाडीत लावणार कसे? त्यापेक्षा थर्मासमध्ये चहा घेऊन जाणे बरे. (शक्य असल्यास)

घरात वापरायला ठीक आहे, पण गाडीत लावणार कसे? त्यापेक्षा थर्मासमध्ये चहा घेऊन जाणे बरे. (शक्य असल्यास)
Submitted by उपाशी बोका on 10 November, 2021 - 08:18

गाडीत वापरण्यासाठी : https://www.amazon.in/Spedy-Stainless-Kettle-Electric-Heater/dp/B07KB5G3...

(वि.सू. - गाडीची बॅॅटरी जुनी झालेली असल्यास इंजिन सुरु ठेवून वापरावे.)