सासर परकं का वाटतं?

Submitted by हवा हवाई on 19 October, 2021 - 04:48

कुणाशी तरी बोलायचंय.
कितीही प्रयत्न केला समजून घ्यायचा, तरी सासर आपलं का वाटत नाही?
सासरी जायचं किंवा सासरचे घरी येणार म्हटलं कि महिनाभर आधीपासूनच टेन्शन यायला लागतं.
माझा प्रेमविवाह, लग्नाला दहा-बारा वर्षे झाली आहेत.
सासरचे सुरूवातीला विरोधात होते. सर्वोपतरी माझीही समजूत घालायचा त्यांनी प्रयत्न केला होता कि तु आमच्या मुलाबरोबर लग्न करू नकोस. सासूबाई उपासतापास करायच्या आमचं लग्न होऊ नये म्हणून.
इतक्या वर्षातही सुरुवातीला जी अढी बसली आहे मनात ती जाता जात नाहीये.
एकदा तर सासू मला म्हणाल्या अरेंज मैरेज केलं असतं मुलाचं तर अमूकतमूक इतका हुंडा मिळाला असता.
त्यात सासरी स्त्री-पुरुष भेदभाव जरा जास्तीच, किचनमधे पुरूषांनी जाऊ नये..ती सगळी कामं स्त्रीयांची.
याउलट माहेरी कधीही एकाही कामाला लहाणपणापासून हात लावू दिला नाही आईवडिलांनी.शिक्षण,करियर यावर कायम फोकस राहिला आहे.
कितीही ठरवलं कि आता त्यांचं वय झालं आहे, आपणच हट्टीपणा बाजूला ठेवून,समजूतदारपणा दाखवून गोड व्हावे पण तोंडदेखले गोड बोलणे अजिबातच जमत नाही.
नवरा नेहमी समजावतो कि नाती जपायला हवीत नंतर आपण एकटे पडू पण मला ते लोकं आपले वाटतंच नाहीत कितीही ठरवलं तरी आणि माझ्या माहेरचे आहेत कि मग एकटे का पडू आपण असं वाटतं.
तसंही नवर्याने जाणे,भेटणे याला माझा काहीही आक्षेप नसतो.
पण मला जायची अजिबातच इच्छा नसते.
कसा बदलावा माईंडसेट?

Group content visibility: 
Use group defaults

कुठल्याही नात्यात दोन्ही बाजूंनी समान आपुलकी असल्याशिवाय ते नाते टिकत नाही. दुर्दैवाने, आपल्या समाजात , सूनेने ठराविक कर्तव्ये पार पाडल्याशिवाय तिला आपुलकी , प्रेम , कौतुक मिळत नाही ( हे सन्माननीय अपवाद वगळून), ही वस्तुस्थिती आहे.
म्हणजे एका बाजूने 'अटी लागू' अशी परिस्थिती असताना, सुनेने सासरच्या लोकांनी कसेही वागले, तरी त्यांना आपलं मानूनच पहिल्या दिवसापासून त्यांना आदराने वागवावे, त्यांचं सगळं प्रेमाने करावं, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. हा जुलमाचा रामराम, मग समोरून जास्तच मनस्ताप दिला गेल्यास, फार काळ टिकत नाही.
मग पुन्हा हल्लीच्या मुलींना जुळवूनच घेता येत नाही, असा निष्कर्ष काढायला सगळे मोकळे.

>>>>>>>>>>>>एक नातलग ही जबाबदारी इतक्या आंधळेपणाने निभावताना पाहिले आहे की त्यांची स्वतः:ची मुलगी आईवडलांपासून मनाने दूर गेली.सुनेने सासूचे पाणी मस्तपैकी जोखले आणि अक्षरशः सूनवास चालू झाला.बरे सासू शिकली सवरलेली आणि नोकरी करणारी होती.

+१०० असे उदाहरण माझ्यादेखील पहाण्यात आहे.

नवा संसार सुरु होताना दोन्ही बाजूंचे पूर्वग्रह (सासरचे लोक मला त्रासच देणार, सून माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावूनच घेणार इत्यादी इत्यादी, स्त्री वर्गा कडून मारले जाणारे टोमणे ) हे बरेच अंशी वादांना कारणीभूत होतात. तसेच दोन्ही बाजूंकडून असण्याऱ्या अति अपेक्षा आणि त्यामुळे होणारे अपेक्षाभंग (चर्चेच्या अभावामुळे) हे देखील वादांना कारण असतात. त्यामुळेच मी वर म्हटल्याप्रमाणे "मॅरीड कपल्स होस्टेल्स " असावी. लग्नानंतर किमान वर्षभर नवपरिणितांनी अशा होस्टेलवर काढावे, कदाचित याकाळातच दोन्हीबाजुना एकमेकांची खरी गरज कळू शकेल. ज्येष्ठ व्यक्तींनी पण योग्यवेळीच स्वकमाईची योग्य गुंतवणूक करून वृद्धाश्रमाचा रास्ता स्वतःच धरावा. मुलांना सक्षम बनवलेले असल्यामुळे मुले स्वतःचा संसार स्वतः सांभाळू शकतील हा विश्वास बाळगावा आणि त्यांच्या संसारात लुडबुड (दोन्ही बाजूच्या ज्येष्ठानीं ) करू नये.
"मॅरीड कपल्स होस्टेल्स " हा नवीन व्यवसाय देखील होऊ शकतो. कपल्स साठी १RK खोली, जेवण , नाश्ता , लॉंड्री इत्यादींची सोय . मुले झाली तर तेथेच पाळणाघराची सोय इ.इ. करिअर ओरिएंटेड कपल साठी हि खूपच चांगली सोय होऊ शकेल. तसेच बऱ्याचशा जबाबदाऱ्या (पती-पत्नी दोघांच्याही) कमी होतील. आणि बरेचसे संसार सुखाचे होऊ शकतील.

मी लग्न करत नव्हतो त्यात एक कारण सासू सुनेचे पटत नाही व होणार्‍या कटकटी आजूबाजूला पहात होतो. पण आई म्हणाली की सासू सुनेचे नाते हे तसेही विळ्याभोपळ्याचे असते. सुदैवाने लग्न झाल्यावर नातेवाईक मला विसरले व बायकोला ओळखू लागले. आईच्या तोंडातही माझ्या पेक्षा बायकोचे नाव अधिक असे. कारण तिचे उपयुक्तता मूल्य हे माझ्यापेक्षा कितीतरी अधिक आहे हे तिच्या केव्हाच लक्षात आले होते. तशी माझी पुण्याई बरी दिसते माझी कामे परस्पर होतात.

इथे सर्व मिळून सल्ले देण्याची स्पर्धा चालू आहे.
कोणासाठी सल्ले देताय . जीला पाहिजे होता ती कधीच गायब झाली आहे.
आणि आत्ता फुकटचे सल्ले देणे चालू आहे.
कोणालाच नको आहेत सल्ले.

सल्ला विचारणारी तुम्हाला कामाला लावून कधीच गायब झाली.
ज्या आयडी नी सल्ला मागितला त्या आयडी चे वय दोन महिने पण नाही.
फक्त ह्या विषयावर सल्ला मागण्यासाठी च त्या आयडी नी माय बोली चे सदस्य घेतले होते काय.
इथे काय त्या विषयातील तज्ञ आहेत काय.
ह्याच्या अगोदर पण भारतीय कुटुंब व्यवस्था ला टार्गेट करणारे आयडी दोन महिन्यांसाठी च आले आणि नंतर आज पर्यंत गायब आहेत.
हे षडयंत्र चा भाग आहे.
तुम्ही लोक नेहमीच फसत असता.
आणि असे षडयंत्र करणारे आयडी त्यांचे काम करून गायब होतात.

ओ आहे मी इथेच
प्रत्येकाच्या आडव्या तिडव्या वैयक्तिक प्रश्नांना उत्तरे देणे गरजेचे वाटत नाही मला.
मी माझ्यापुरता माझा प्रश्न जनरली मांडला होता त्याला हि लोकांनी दोन्ही बाजूंनी उत्तरं दिलीत जी मला पटलीत.
भारतीय कुटुंब व्यवस्था ला टार्गेट करून मजा पाहणे माझ्या धाग्याचा हेतू नव्हता.
विषयाला धरून प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे आभार!!

माय बोली वर ज्या ठराविक स्त्री आयडी आहेत
त्यांना जबाबदारी,कर्तव्य ह्या विषयी बिलकुल आस्था नाही
फक्त स्वार्थ,फायदा ह्या मध्ये खूप इंटरेस्ट आहे.
संपत्ती हवी पूर्वजांची पण त्यांच्या विषयी कोणतीच जबाबदारी नको ही वृत्ती.
कोणत्या तरी पुरुषांचा फायदा च होईल असे विचार मांडणाऱ्या स्त्रीमुक्ती वाल्या असतात त्यांच्या पासून ह्या प्रेरित असतात.
त्या सासू ,सासर ह्या विषयात कोणी पण पोस्ट केली की ह्या ..
कर्तव्याची जाणीव नसणाऱ्या..
जबाबदारी ची जाणीव नसणाऱ्या.
फक्त स्वार्थ च साधणाऱ्या..
स्त्रिया खूप मनापासून त्यांचे स्वार्थी विचार जोरात मांडत असतात.

Pages