सासर परकं का वाटतं?

Submitted by हवा हवाई on 19 October, 2021 - 04:48

कुणाशी तरी बोलायचंय.
कितीही प्रयत्न केला समजून घ्यायचा, तरी सासर आपलं का वाटत नाही?
सासरी जायचं किंवा सासरचे घरी येणार म्हटलं कि महिनाभर आधीपासूनच टेन्शन यायला लागतं.
माझा प्रेमविवाह, लग्नाला दहा-बारा वर्षे झाली आहेत.
सासरचे सुरूवातीला विरोधात होते. सर्वोपतरी माझीही समजूत घालायचा त्यांनी प्रयत्न केला होता कि तु आमच्या मुलाबरोबर लग्न करू नकोस. सासूबाई उपासतापास करायच्या आमचं लग्न होऊ नये म्हणून.
इतक्या वर्षातही सुरुवातीला जी अढी बसली आहे मनात ती जाता जात नाहीये.
एकदा तर सासू मला म्हणाल्या अरेंज मैरेज केलं असतं मुलाचं तर अमूकतमूक इतका हुंडा मिळाला असता.
त्यात सासरी स्त्री-पुरुष भेदभाव जरा जास्तीच, किचनमधे पुरूषांनी जाऊ नये..ती सगळी कामं स्त्रीयांची.
याउलट माहेरी कधीही एकाही कामाला लहाणपणापासून हात लावू दिला नाही आईवडिलांनी.शिक्षण,करियर यावर कायम फोकस राहिला आहे.
कितीही ठरवलं कि आता त्यांचं वय झालं आहे, आपणच हट्टीपणा बाजूला ठेवून,समजूतदारपणा दाखवून गोड व्हावे पण तोंडदेखले गोड बोलणे अजिबातच जमत नाही.
नवरा नेहमी समजावतो कि नाती जपायला हवीत नंतर आपण एकटे पडू पण मला ते लोकं आपले वाटतंच नाहीत कितीही ठरवलं तरी आणि माझ्या माहेरचे आहेत कि मग एकटे का पडू आपण असं वाटतं.
तसंही नवर्याने जाणे,भेटणे याला माझा काहीही आक्षेप नसतो.
पण मला जायची अजिबातच इच्छा नसते.
कसा बदलावा माईंडसेट?

Group content visibility: 
Use group defaults

आला धागा लायनीवर >> अगदी हेच लिहिणार होते. खूपच वेळ लागला ह्या विषयावरच्या धाग्याला लायनीवर यायला. Proud Proud

स्वतःचे आई वडील नाही तर बायकोचे पण आई वडील सुखात राहिले पाहिजेत हा विचार पुरुष नेहमी करतो.
व्यक्ती स्वतंत्र च्या फालतू कारणाने तो जबाबदारी टाळत नाही.
स्वतः च्या कमाई नी शिक्षण घ्या ,स्वतः संपत्ती निर्माण करा .
आणि मग व्यक्ती स्वतंत्र च्या गप्पा मारा.
शिक्षण आई वडील देणार.
पंचवीस वर्ष ह्यांचा सर्व खर्च आई वडील करणार.
आई वडिलांची संपत्ती वर हक्क सांगणार.
पण त्यांच्या शेवटच्या पाच दहा वर्षाच्या परावलंबी आयुष्याची जबाबदारी नाकारणार .
ही जगातील सर्वात स्वार्थी ,मतलबी जमात आहे.
पण हीच लोक वयस्कर झाली शरीराने साधं सोडली की पैसा सुद्धा कामाला येत नाही.
अशा वेळी मुलगा आणि सून ह्यांना नाव ठेवण्यात हीच स्वार्थी जमात आघाडीवर असते.

मी अशा मूर्ख स्त्री ला बायको म्हणून स्वीकारली नाही.
माझी पत्नी सर्वगुण संपन्न आहे कोतुंबिक मूल्य,आधुनिक मूल्य ह्या सर्वात पारंगत आहे.जबाबदारी ची पूर्ण जाणीव आहे तरी कशातच कमी नाही

Anisha ka
जेव्हा तुम्ही लग्न केले.
लव असेल किंवा जुळवलेल तेव्हा.
नवरा का पसंत केला.
श्रीमंत आहे,चांगला नोकरीला आहे,बापाची खूप संपत्ती आहे.
हे बघून च ना.
मग तेव्हा स्पष्ट सांगितले का त्यांना की नवऱ्याचे आई वडील ,बहीण, भावू ह्यांच्या शी मी लग्न झाल्यावर काहीच संबंध ठेवणार नाही.
पटत असेल तर हो म्हणा?
तुम्ही खरे उत्तर ध्या संपत्ती,नोकरी ह्याला भाळून च लग्नाला हो सांगितले ना?

स्वतःचे आई वडील नाही तर बायकोचे पण आई वडील सुखात राहिले पाहिजेत हा विचार पुरुष नेहमी करतो.>>>>> आणी हे जेव्हा तो करतो, तेव्हा त्याला बायकोचा बैल आहे असे त्याच्या माहेरचेच लोक म्हणतात, या बद्दल काय?

<<<<<शिक्षण आई वडील देणार.
पंचवीस वर्ष ह्यांचा सर्व खर्च आई वडील करणार.
आई वडिलांची संपत्ती वर हक्क सांगणार.
पण त्यांच्या शेवटच्या पाच दहा वर्षाच्या परावलंबी आयुष्याची जबाबदारी नाकारणार .
ही जगातील सर्वात स्वार्थी ,मतलबी जमात आहे.
पण हीच लोक वयस्कर झाली शरीराने साधं सोडली की पैसा सुद्धा कामाला येत नाही.
अशा वेळी मुलगा आणि सून ह्यांना नाव ठेवण्यात हीच स्वार्थी जमात आघाडीवर असते.>>>>>> मुलाचे शिक्षण त्याचे आई वडील करतात, मग मुलींना काय जन्मापासुन स्कॉलरशिप मिळते का? उलट ती दुसर्‍या घरी जाणार आहे हे माहीत असुनही कर्ज काढुन मुलींना डॉक / इंजीनीअर / वकिल/ इतर अनेक क्षेत्रातले शिक्षण दिले जाते/ बनवले जाते ते काय दोन नंबरच्या पैशावर का?

काहीतरी तर्कशुद्ध बोला की. उगाच उचलला कि बोर्ड नी पाठवली पोस्ट सोमि ला.

रश्मी मॅडम नीट वाचा.
स्वतःचे आई वडील आणि बायकोचे आई वडील हे दोन्ही पुरुषांसाठी महत्वाचे असतात .असे लिहल आहे मी.

सासर कधी आपले वाटणार अशा विचार करणाऱ्या स्त्रिया .स्वतःच्या आई ,वडिलांची पण जबाबदारी घेत नाहीत .त्यांना स्वतःची ऐश ,आणि स्वतंत्र हेच महत्वाचे वाटते.
स्वतःच्या आई वडीलंची जबाबदारी पण भावा वर टाकून हात वर करतात.

स्वतःचे आई वडील आणि बायकोचे आई वडील हे दोन्ही पुरुषांसाठी महत्वाचे असतात .असे लिहल आहे मी.>>>>> मी तेच लिहीलय की जेव्हा असा पुरुष बायकोच्या माहेरचा विचार करतो, तेव्हा त्याला त्याच्या घरचे बायकोचा बैल किंवा नोकर म्हणतात. पहाण्यातले उदाहरण आहे म्हणूनच बोलतेय.

<<<<<सासर कधी आपले वाटणार अशा विचार करणाऱ्या स्त्रिया .स्वतःच्या आई ,वडिलांची पण जबाबदारी घेत नाहीत .त्यांना स्वतःची ऐश ,आणि स्वतंत्र हेच महत्वाचे वाटते.
स्वतःच्या आई वडीलंची जबाबदारी पण भावा वर टाकून हात वर करतात.>>>>>>> अशी दोन - तीन उदाहरणे बघुन बोलताय का ? उलट आजकाल मुली नोकरी करुनही दोन्ही जबाबदार्‍या निभावतात. माझ्या परीचयातल्या काकुंनी स्वतःच्या बेड रीडन सासुसकट पुतण्या व स्वतःच्या बहिणीच्या मुलाला पण स्वतःच्या दोन मुलांबरोबर वाढ्वले, ते ही नोकरी करुन तुटपुंज्या पैशात. अश्या अनेक स्त्रिया भेटतील तुम्हाला. उघडा डोळे बघा नीट !

अशा स्त्रिया असतील किंवा पुरुष हे आदरणीय च आहेत.
कर्तव्य,जबाबदारी ह्याची जाणीव असणारी लोकांचीच गरज आहे.
ज्यांना कर्तव्य आणि जबाबदारी नको त्यांनी स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करावे .
चांगल्या लोकांत लुडबुड करू नये.

स्वत:ला विसरून सगळ्यांच्या सेवेला वाहून घेतलेली बाई सर्वगुणसंपन्न असते बहुतेक. आमच्यासारख्या पामरांना ते कुठे जमणार?
सासर आपलेसे वाटलेच पाहिजे अशी अपेक्षा पण सासरच्या लोकांना ती किती आपलीशी वाटते हे बघायची गरज नाही ना.
आज जी सासू झालेय ती सुद्धा कधितरी सूनच होती, आणि आजची सून उद्या जाऊन सासू होईलही. पण सून या कॅटेगरीमधे असताना तिने चौकोनात बसलंच पाहिजे, सगळ्यांशी जुळवून घेतलंच पाहिजे, आणि यात सासरला प्रेफरंस दिलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरा म्हणू नये आपला.
वर जे निकष मुली नवरा शोधताना लावतात तसेच मुलंही लावतात की. गोरी हवी, सडपातळ हवी, जास्त शिकलेली हवी ( किंवा नको पण- नाकापेक्षा मोती जड), माहेरी जास्त लटांबर नको(आमच्या मुलाला त्यांना पोसायला लागायला नको), हुंडा जास्त आणणारी (आता हे एकदम गुपचुप बोलायचं, हल्ली घेत नाहीत असं दाखवायचं ना), नोकरी करणारी असेल तर १००% घर सांभाळून नोकरी करणारी हवी, लग्नानंतर लगेच पाळणा हलला पाहिजे, त्यातही मुलगाच जन्माला घालायचा(पहिला दिवा), नंतर अजून एक मुल हवंच(भावंड नको का), etc etc.
थोडक्यात काय तर कंम्प्लेंट करू नये.

माझ्या मैत्रिणीचे लग्न झाले. पहिल्या लग्नात डिवोर्स झालेला. हा तिचा दुसरा विवाह. नवऱ्याचा देखील दुसरा विवाह. तोही घटस्फोटित. तर यांच्या लग्नाचं काय मोठं कौतुक करायचं आणि कशाला. बघितलं तर यांचं दुसरं लग्न. पहिले लग्न टिकावे म्हणून नीट वागण्याची यांना अक्कल नव्हती, आता दुसरं लग्न पण मोडतंय कि नाही बघा थोड्याच दिवसात. असले विचार त्यांच्या तोंडावर बोलून दाखवले गेले सासरच्यांकडून. शिवाय, मुलीचे आयुष्य विस्कळीत झाले होते पहिल्या लग्न आणि डिवोर्स प्रकरणात. पण, दुसऱ्या लग्नात नवऱ्याने खूप सपोर्ट दिला आणि तिचे छान करिअर झाले. तर त्याची पण जलसी. आता तर सासरच्यांनी तिलाच नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या लेकाला देखील परके करून टाकलेय. दोघांनाही सासरी - म्हणजे पतीच्या आई-वडील, भाऊ, बहीण व इतर नातेवाईक यांच्या कडे जाण्याची अथवा संपर्क ठेवण्याची इच्छा होत नाही.

म्हारी छोरी छोरोंसे कम है क्या असे म्हणत मुलींना मुलासारखे शिक्षणाचे, करीअरचे स्वातंत्र दिले गेले पण त्याचवेळी मुलांना मात्र मुलींसारखे घरकाम आणि स्वयंपाक करणे शिकवले गेले नाही परीणामतः मुलींच्या मागचे घरकाम, स्वयंपाक तर सुटले नाहीच पण शिवाय स्वतःचे करीअर यशस्वी करण्याची जबाबदारी देखील स्वतःलाच उचलावी लागली. घरच्यांचा पाठिंबा जसा पुरूष गृहीत धरतात तसा गृहीत धरणे तर आजही अशक्यच.
आताही अमांच्या पोस्टमधून जावई जसे आपल्या सासरच्यांशी अलिप्त संबंध ठेवून असतात तसेच सुनेनेही वागावे असे आले आहे. I think we are repeating the same mistake! सुनेने आणि जावयाने आपले आपले सासर सांभाळावे असे संस्कार करणे हे अधिक श्रेयस्कर ठरेल.
पुरुषसत्ताक पद्धतीत पुरूषांना जे आध्यारूत फायदे मिळतात ते स्त्रिया कितीही पुरूषांच्या बरोबरीने जबाबदारीने वावरल्या तरी ते फायदे पुरूषांनाच मिळतात आणि स्त्रियांना मिळत नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे पुरूषांना स्त्रीच्या जबाबदाऱ्या उचलायला लावणे हा अधिक समतेकडे नेणारा मार्ग असेल. तूही घरकाम करू नकोस आणि मीही घरकाम करणार नाही. तू माझ्या आईवडीलांना विचारू नकोस आणि मी तुझ्या आईवडीलांना विचारणार नाही हे असे नकारात्मक सहजीवन जगण्यापेक्षा आपण दोघे मिळून या जबाबदाऱ्या घेऊ (अर्थात शक्य तितक्या) असे सहजीवन अधिक समृद्ध करणारे असेल असे मला वाटते.
थोडेसे अवांतर: परवा तैत्तिरीय उपनिषदावरचे विवेचन ऐकताना एक भारी शोध लागला! या उपनिषदातल्या श्लोकाची पुढील ओळ सगळ्यांनाच माहीत असेल -
मातृ देवो भव| पितृ देवो भव| आचार्य देवो भव| अतिथि देवो भव||
पण याच्या पुढची ओळ मला तरी माहित नव्हती आणि ती फारच practical advice देणारी आहे! पुढची ओळ अशी आहे -
यानि अनवद्यानि कर्माणि| तानि सेवितव्यानि| नो इतराणि| यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि||
अर्थात आई, वडिल, आचार्य, आणि अतिथि हे पूजनीय आहेत, त्यांचा आदर्श तुझ्यासमोर असला पाहिजे. पण आमची केवळ सुकर्मे तू आचरावीस. आमच्या चुकांची पुनरावृत्ती करू नयेस. आमच्या वाईट सवयींचे अनुकरण तू करू नकोस.
या दुसऱ्या ओळीमुळे या दोन्ही श्लोकांचा अर्थ परिपूर्ण होतो. सासरी अथवा माहेरी केवळ वयाने ज्येष्ठ असणे म्हणजे आदर्श होणे नव्हे. त्यांच्या अपत्यांनी याचे भान ठेवावे आणि विवेकाने वागावे असे या श्लोकात सांगितले आहे.

श्रीमंत आहे,चांगला नोकरीला आहे,बापाची खूप संपत्ती आहे. ----- माझ्या नवऱ्याच्या वडिलांचं स्वतःच घर संपत्ती काही नव्हती, अजुनही नाही , नवऱ्याला नोकरी ही नव्हती( लग्नाच्या वेळी ) ,
माझं प्रेम कॉलेज मधील आहे आणि त्याच साठी कठीण काळात त्याला न सोडता मी लग्नाचा निर्णय घेतला...
आज आमचा दोघांचा बिझनेस आहे आणि स्वतःचे घर ही आहे जे आम्ही दोघांनी लग्ना आधी घेतले....
मुळात च माझ्या घरातून नवऱ्यावर अवलंबून न राहता जीवन कसे व्यतीत करावे हे शिक्षण फार चांगलं दिलं गेलं आहे...
माझ्या नवर्याला फार अभिमान आहे माझा. आणि आमच्या घरात हे जे तुम्ही म्हणताय असल्या फालतू गोष्टी होत नाहीत , तुम्हाला पडलेले प्रश्न जसं की घरातल्यांची जबाबदारी नाकारली का??? पैसे बघून लग्न केलं का ही आमच्या घरातल्या ( दोघांच्या ) लोकांचीमेंटलिटी नसल्याने नीट चाललंय....

अजून एक सासरच्या आणि माझ्यात जे वाद झाले काही कारणाने त्या पाठ ची कारणं नवर्याला चांगलीच माहीत आहेत आणि त्या बाबतीत तो मला योग्य सपोर्ट करतो....

त्यामुळे प्रत्येक स्त्री म्हणजे तुमच्या बायको सारखी संपत्ती बघून नवऱ्याशी लग्न करते हा जो जजमेंट आहे न ते न करता जरा दमान घ्या.. .

मला तुम्हाला इतकं पर्सनल बोलायचं कारण नव्हतं... वर मी तुम्हाला म्हणाले ते अजिबात सिरीयस नव्हतं... पण तुम्हाला पर्सनल व्हायचं होतं म्हणून मला व्हावं लागलं...

आधी मला तुमचे कमेंट वाचून मज्जा वाटायची कारण मला असं वाटायचं की तुम्ही समोर्चायची मस्करी करता पण इथे सॉरी टू से तुम्ही तुमच्या घाण मेंतालिटी ची झलक च दाखवलीत....

यापुढे माझ्यावर पर्सनल कमेंट्स नाही केल्यात तर बरं होईल....

तुम्ही खरे उत्तर ध्या संपत्ती,नोकरी ह्याला भाळून च लग्नाला हो सांगितले ना? ------ हेच तुमच्या बायको ला ही लागू होते आणि बहिणीला आणि आई ला देखील...
तुम्ही तुम्हाला मुलगी झाली तर नक्की च हे बघून च त्याला द्याल....

तुमच्या जवळ पस झालेल्या 2 4 गोष्टींनी जर सरसकट सर्वाना च तुम्ही एक तागडी मध्ये तोलत असाल तर तुमची वृत्ती , जग फार लहान आहे
डबक्यातून बाहेर या

@ Hemant 33
सगरे प्रतिसाद धमाल करमणूक Rofl

>>माझी पत्नी सर्वगुण संपन्न आहे कोतुंबिक मूल्य,आधुनिक मूल्य ह्या सर्वात पारंगत आहे.जबाबदारी ची पूर्ण जाणीव आहे तरी कशातच कमी नाही >> अरे देवा! मग त्यांनी काय पाप केलं आणि हे भोग वाट्याला आले!!!

अरेच्चा!
मला माहीतच नव्हतं संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती, त्याचा पगार, त्याच्याकडे भारी वाहनं आहेत का, त्याच्याकडे भरपूर सोनं नाणं आहे का वगैरे बघून लग्न करायचं असतं ते.... आता लग्नाला 3 वर्ष झाल्यावर कळून काय फायदा?
मी आपलं बावळटा सारखं मुलाचा स्वभाव, आमचे जुळणारे विचार , मेडिकल रिपोर्ट्स वगैरे बघून लग्न केलं. आधी ज्ञान मिळालं असतं हेमंत सरांकडून तर किती बरं झालं असतं नाही?

पुरुषसत्ताक पद्धतीत पुरूषांना जे आध्यारूत फायदे मिळतात ते स्त्रिया कितीही पुरूषांच्या बरोबरीने जबाबदारीने वावरल्या तरी ते फायदे पुरूषांनाच मिळतात आणि स्त्रियांना मिळत नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे पुरूषांना स्त्रीच्या जबाबदाऱ्या उचलायला लावणे हा अधिक समतेकडे नेणारा मार्ग असेल. तूही घरकाम करू नकोस आणि मीही घरकाम करणार नाही. तू माझ्या आईवडीलांना विचारू नकोस आणि मी तुझ्या आईवडीलांना विचारणार नाही हे असे नकारात्मक सहजीवन जगण्यापेक्षा आपण दोघे मिळून या जबाबदाऱ्या घेऊ (अर्थात शक्य तितक्या) असे सहजीवन अधिक समृद्ध करणारे असेल असे मला वाटते.
>>
+१०० जिज्ञासा!

हेमंत खूप जनरलायझेशन करत आहात. सर्व प्रतिसादांशी प्रचंड असहमती. मुली पण मुलांइतकीच घराची/ आई वडिलांची/ सासू सासर्‍यांची जबाबदारी घेत असतात. दोन चार उदाहरणावरुन जनरायझेशन करता येत नाही.

लग्न करतांना सज्ञान मुलीने/ मुलाने आपल्या भावी जोडीदाराबद्दल कुठले निकष ठरवायचे आहेत याचे त्यांना स्वातंत्र द्या. मग ते निकष काय वाट्टेल ते असू द्या उदा - आर्थिक, शौक्षणिक, बाह्य रुप, अभिनय क्षमता, कला गुण.... २० वर्षांची सज्ञान, शिकलेल्या मुलीला तिचा स्वत: चा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र नाही आहे हे कशाचे लक्षण आहे?

मुली फार मोठ्या बदलांना सामोरे जातात. आई वडिलांच्याकडे मुली लहानाच्या मोठ्या होतात, साधारणत: २०-२७ त्या सोबत राइ राहिलेल्या अस्त असतात. लग्नानंतर त्यांना घर बदलावे लागते , संपुर्ण नव्या कुटुंबांत त्यांचा प्रवेश होतो. बहुतेक ठरवलेल्या विवाहांत सासरकडचे सर्व पात्रे अगदी नवीनच असतात. या नव्या परिवारांतल्या प्रत्येक सदस्यासोबत जुळवून घेणे म्हणजे किती तरी मोठ्या बदलाला त्या सामोरे जातात. या नव्या बदललेल्या जगांत, मागचे सर्व विसरून त्यांनी एकरुप होत... सासू -सासरे- दिर-नणंद-लहानगे-मित्रमंडळी यांची कुठलीही तक्रार न करता सेवा करावी अशी अपेक्षा करणे थोडे जास्त होते. त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा बदल असतो, तो सुसह्य कसा करता येईल हे नवरोबानेच बघायला हवे. हे नवरोबाच करु शकतो आणि ते त्याचे कर्तव्यच आहे. समजुतदार पणा दोघांकडेही (नवरा - बायको, सून - सासू) असायला हवा तरच दोघांचा संसार सुखकारक बनेल.

बहिणाबाई चौधरी यांच्या शब्दांत- ' अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.... '

<< पुरुषसत्ताक पद्धतीत पुरूषांना जे आध्यारूत फायदे मिळतात ते स्त्रिया कितीही पुरूषांच्या बरोबरीने जबाबदारीने वावरल्या तरी ते फायदे पुरूषांनाच मिळतात आणि स्त्रियांना मिळत नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे पुरूषांना स्त्रीच्या जबाबदाऱ्या उचलायला लावणे हा अधिक समतेकडे नेणारा मार्ग असेल. तूही घरकाम करू नकोस आणि मीही घरकाम करणार नाही. तू माझ्या आईवडीलांना विचारू नकोस आणि मी तुझ्या आईवडीलांना विचारणार नाही हे असे नकारात्मक सहजीवन जगण्यापेक्षा आपण दोघे मिळून या जबाबदाऱ्या घेऊ (अर्थात शक्य तितक्या) असे सहजीवन अधिक समृद्ध करणारे असेल असे मला वाटते. >>

------ सहमत....

सासर आणि माहेर हे एकत्र कुटुंब आहे हे अजूनही का समजत नाही दोघेही. माझ तुझ काय. आपल का नाही म्हणत. कायदेशीर रित्या सुद्धा हल्ली सगळ आपल च (दोघांचही) असत. संपत्ती आणि आई वडिलांची जबाबदारी सुद्धा.
पण एकंदरीत समाजात लग्न झाल्यानंतर आईवडिलांची काळजी मुली जास्त घेतात असे दिसते. आईवडिलांची काळजी घेण्यासाठी जवळ रहाणारा नवरा शोधणे, वगैरे. मुल बिनधास्त बायकोला घेउन जातात परदेशी. Happy

शुभ प्रभात : फार डोकी गरम झाली तर आई कुठे काय करते धाग्यावर मी रोजचे एपिसोड लिहीते ते वाचून हसून घ्या लोक्स.

पूर्वी सुना न शिकलेल्या लहान वयाच्या आर्थिक पाठबळ नसलेल्या माहेरी परत जायचा एस्केप रूट उपलब्ध नसलेल्या होत्या अश्या व्हलनरे बल व्यक्तीचे हाल हाल करणे टाकून बोलणे उपासमार करणे कामाच्या डोंगरा खाली गाडणे हुंड्यासाठी जाळून मारणे किंवा आत्महत्या करण्यास उद्युक्त करणॅ अशे हाल होत व अजूनही होत आहेत. ह्या विरुद्ध त्या मुलीने काहीच विरोध करू नये अशी अपेक्षा असली तर ती बरोबर आहे का हे
आत्म संशोधन करण्याची गरज आहे. इज मॅरेज रिअली वर्थ इट? नवरा बायकोंची इक्वल पार्टनर शिप असावी सर्व बाबी वर ही एक सिंबायोटिक व दोघांच्या जीवनात व्हॅल्यु अ‍ॅडिशान करणा री असावी ही ग्रो न अप अपेक्षा चूक आहे का? इट इज अ डील बिटवीन टू अ‍ॅडल्ट्स हो ना?!

नाहीतर घरात काम करणारी सतत कामजीवना साठे उपलब्ध मुकी मोलकरीण हवी आहे का तपासून पहावे.

हे मी उगीच ज्ञान फेकत नाही. माझी सासू सावत्र, त्यांचा वाढदिवस हिटलरच्याच जन्म दिनाच्या दिवशी. मला माहेरचा सपोर्ट नाही उलटे म्हातार्‍या आई वडिलांची जबाबदरी होती. ती पार पाडून. लग्न तुटू न देता २५ वर्शे पार पाडून नवृयाच्या माघारी मुलीला वाढवून समर्थ केले आहे.
ह्यात माझी वैयक्तिक झीज सहन केलेले अपमान ह्या बाबत कोणी ही कधी तू कशी आहेस हे विचारलेले नाही. उलट दुस्वास व कशी काय ही सर्वाइव्ह करते अशी टीका झेल लेली आहे. तुम्ही साहानुभूती मागता अशी ही टीका ऐकली आहे. ह्यातून व्यक्ती काही शिकते. ते फक्त शेअर केले आहे. सल्ला नाही देत कोणा लाच. नव्या मुलींना मन मारून जगावे लागू नये हीच सदिच्छा आहे. ह्यात विरोधाभास नाही. मी कायमच हेच म्हण त आले आहे. आई कुठे काय करते बाफ वरील पोस्टी बघा.

मुलीला आपलेसे करणे सन्मानाने वागवणे ही सासरच्यांची पण जबाबदारी आहे. व्हॉट से सासरवाले?!

मुलीला आपलेसे करणे सन्मानाने वागवणे ही सासरच्यांची पण जबाबदारी आहे. ...... एक नातलग ही जबाबदारी इतक्या आंधळेपणाने निभावताना पाहिले आहे की त्यांची स्वतः:ची मुलगी आईवडलांपासून मनाने दूर गेली.सुनेने सासूचे पाणी मस्तपैकी जोखले आणि अक्षरशः सूनवास चालू झाला.बरे सासू शिकली सवरलेली आणि नोकरी करणारी होती.

Pages