सासर परकं का वाटतं?

Submitted by हवा हवाई on 19 October, 2021 - 04:48

कुणाशी तरी बोलायचंय.
कितीही प्रयत्न केला समजून घ्यायचा, तरी सासर आपलं का वाटत नाही?
सासरी जायचं किंवा सासरचे घरी येणार म्हटलं कि महिनाभर आधीपासूनच टेन्शन यायला लागतं.
माझा प्रेमविवाह, लग्नाला दहा-बारा वर्षे झाली आहेत.
सासरचे सुरूवातीला विरोधात होते. सर्वोपतरी माझीही समजूत घालायचा त्यांनी प्रयत्न केला होता कि तु आमच्या मुलाबरोबर लग्न करू नकोस. सासूबाई उपासतापास करायच्या आमचं लग्न होऊ नये म्हणून.
इतक्या वर्षातही सुरुवातीला जी अढी बसली आहे मनात ती जाता जात नाहीये.
एकदा तर सासू मला म्हणाल्या अरेंज मैरेज केलं असतं मुलाचं तर अमूकतमूक इतका हुंडा मिळाला असता.
त्यात सासरी स्त्री-पुरुष भेदभाव जरा जास्तीच, किचनमधे पुरूषांनी जाऊ नये..ती सगळी कामं स्त्रीयांची.
याउलट माहेरी कधीही एकाही कामाला लहाणपणापासून हात लावू दिला नाही आईवडिलांनी.शिक्षण,करियर यावर कायम फोकस राहिला आहे.
कितीही ठरवलं कि आता त्यांचं वय झालं आहे, आपणच हट्टीपणा बाजूला ठेवून,समजूतदारपणा दाखवून गोड व्हावे पण तोंडदेखले गोड बोलणे अजिबातच जमत नाही.
नवरा नेहमी समजावतो कि नाती जपायला हवीत नंतर आपण एकटे पडू पण मला ते लोकं आपले वाटतंच नाहीत कितीही ठरवलं तरी आणि माझ्या माहेरचे आहेत कि मग एकटे का पडू आपण असं वाटतं.
तसंही नवर्याने जाणे,भेटणे याला माझा काहीही आक्षेप नसतो.
पण मला जायची अजिबातच इच्छा नसते.
कसा बदलावा माईंडसेट?

Group content visibility: 
Use group defaults

काल इकडची चर्चा वाचल्यावर नवर्याबरोबर डिस्कशन केलं, त्याचं म्हणणं आहे कि तो घरच्यांचं चुकत असेल तर त्यांना वेळोवेळी समजावतो पण माझ्या समोर नाही.

समजून घेऊन सगळ्या बाजूंनी विचार करायला लावणारे, प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.

किंवा कधी असाही विचार करुन पहा की तुमची जर सुन आली तर तीने तुमच्याशी कसं वागलेल आवडेल,तस आपण वागतोय का?

तुमची जर सुन आली तर तीने तुमच्याशी कसं वागलेल आवडेल,तस आपण वागतोय का?>>मुलगा ९ वर्षाचा असताना असा विचार हल्लीच्या जमान्यातल्या मातेला करता येणे कठीण आहे. एकतर अजून मुलाच्या लग्नाला किमान १५-१६ वर्ष आहेत. तेवढ्या काळात जग कमालीचं बदलू शकत.
विचार करा, १० वर्षापुर्वी whatsapp, swiggy, zomato, uber यातले कोणतेच अ‍ॅप आपल्या सेवेला हजर नव्हते. आता ह्या सगळ्या अ‍ॅप्सचा परीणाम आपल्या नातेसंबंधावर होत असतो.
"माझी सून अठवड्यातून ४ वेळा बाहेरून जेवण ऑर्डर करेल, मग मला कसे बर वाटेल? " असा विचार १५ वर्षापुर्वी एखादी माता करू शकली असती का? त्यामुळे "सुनने तुमच्याशी कसं वागलेल आवडेल,तस आपण वागतोय का?" हा विचार गैरलागू आहे.

सूनच कशाला, आपली मुलं सुद्धा कशी वागतील? हे आपण खात्रीशीर पणे सांगू शकत नाही. मुलांचं आपल्यावर कितीही प्रेम असलं तरी ती त्या काळाशी सुसंगतच वागणार, विचार करणार. आपल्याला त्यांचे विचार पटतीलच असे नाही.
खलिल जिब्रान च्या ओळी नेहमी लक्षात ठेवाव्यातः
You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow, which you cannot visit, not even in your dreams.

मुलगा ९ वर्षाचा असताना असा विचार हल्लीच्या जमान्यातल्या मातेला करता येणे कठीण आहे. एकतर अजून मुलाच्या लग्नाला किमान १५-१६ वर्ष आहेत. तेवढ्या काळात जग कमालीचं बदलू शकत.>>>>>>
एक्झाटली.

सुनने तुमच्याशी कसं वागलेल आवडेल,तस आपण वागतोय का?" हा विचार गैरलागू आहे.>>>>>> +100

काल इकडची चर्चा वाचल्यावर नवर्याबरोबर डिस्कशन केलं, त्याचं म्हणणं आहे कि तो घरच्यांचं चुकत असेल तर त्यांना वेळोवेळी समजावतो पण माझ्या समोर नाही.>. हे बहुतेक नवरे करतात असं मला वाटतं.
तुमचा नवरा हे करतो याचा अर्थ की, तुमचं सगळचं चुकतय असं त्याला वाटतं नसावं. तुम्हाला होणार्‍या त्रासाचीही त्याला थोडीफार का होईना कल्पना असावी.
मी माझ्या नवर्‍याला नेहमी सांगते की, तुझ्या आईची घर चालवायची एक पद्धत होती/ आहे. माझ्या आईची दुसरी होती/ आहे. आता आपल्या दोघांचे घर आहे, त्याची पद्धत तिसरीच असेल/ आहे. प्रत्येक घर वेगळं असतं. आणि आपलं घरं आपल्या आई-वडिलांच्या घरापेक्षा वेगळ असणारंच आहे.

हे खरं आहे. पटतंय पण प्रयत्न करून पण सलोख्याने वागणेच जमत नाही.>> तुम्हाला पटतय ही चांगली गोष्ट आणि सुरूवात आहे. या विचारावर प्रामाणिक राहून सलोख्याने वागणे म्हणजे काय, प्रत्यक्षात कुठली कृती, काय करायला पाहिजे, याचा विचार करा. तुम्हाला समजत नसेल तर नवर्‍याचा फीडबॅक वाद न घालता जशाचा तसा घ्या. किंवा त्यालाच विचारा , कसे वागायला पाहिजे. दोघे मिळून ऑपरेशन सलोखा चालू करा.
तुम्ही कोणती एखादी गोष्ट केल्यावर किंवा वागल्यावर सासूला आनंद होतो ते बघा, सुधारणा करत रहा. निरपेक्षपणे वागत रहा. नक्कीच तुम्ही कोंडी फोडू शकाल.
जेंव्हा वाद होतात तेंव्हा दोन सूत्र पाळा, वादाच्या विषयात अजून एक दुसरा मिसळू नका आणि चुकुनही जुने उकरून काढू नका. सासरच्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झालात तर तुम्ही नक्कीच जास्त सुखी व्हाल.
शुभेच्छा.

लोकडाउन मुळे घरीच आहे त्यामुळे घरातील नातेसम्बन्धान्विषयी नवे काहीतरी रोज् हाती लागते.

सासु सुन सम्बन्धात असे लक्षात आलेय की दोघीही त्याना एकमेकासम्बन्धी जे वाटते ते एकमेकान्सोबत शेअर करायचे सोडुन बाकी जगाशी शेअर करतात... हे बाकीचे जग तत्परतेने सासुने बोललेले सुनेला व सुनेने बोललेले सासुला पोचवतात. लगेच दोघीत रुसवे सुरु .. एवढेच होते तर मला बोलायचे, मी काय केले नसते का व. व. तेही परत बाकीच्या जगाकडे बोलले जाते... सासु सुना आपापसात बोलत नाहीतच.. हे बोललेले परत जगाचा प्रवास करुनच योग्य स्थळी पोचते.. मग परत दुसरा भडका.

एकन्दर, तुम्हाला ज्याचे जे खटकते ते त्यालाच सान्गा.. कित्येकदा आपण काही चुकीचे वागतोय/बोलतोय हे आपल्या लक्षात येत नाही. कित्येकदा समोरच्याला पुर्ण सन्दर्भ माहित नसतात त्यामुळे गैरसमज होतात.. त्यामुळे सरळ जे आवडले नाही ते बोलुन मोकळे व्हायचे. अर्थात समोर सासु असेल तर थोडे टॅक्टफुली बोलावे लागते, नाहीतर अजुन गैरसमज...

(मला तर आईशीही टॅक्ट्फुली बोलावे लागते, ती काय गैरसमज करुन घेईल याचा अजुनही मला अन्दाज आलेला नाही.. Happy )

मला तर आईशीही टॅक्ट्फुली बोलावे लागते >> + infinity. आणि हे मोठे झाल्यावरच नव्हे तर साधारण 12-13 वर्षे वया पासून, आई बाबा आजी आजोबा एकदंरीत मोठी माणसे यांच्याशी टॅक्टफुली बोलावे, वागावे लागते हे कळले, आणि काही मित्रांत याविषयी बोलणेही होत असे.

मला तर आईशीही टॅक्ट्फुली बोलावे लागते, ती काय गैरसमज करुन घेईल याचा अजुनही मला अन्दाज ....अगदी अगदी झाले ग!

एकुणच नातेसम्बन्ध टिकवुन ठेवणे ही मोठी कसरत आहे.. त्यात परत आतले व बाहेरचे हा फरक असतोच.. माहेरच्या लाथा गोड लागतात, सासरच्या गोड लागत नाहीत..

>>>>>>>>>>मला तर आईशीही टॅक्ट्फुली बोलावे लागते, ती काय गैरसमज करुन घेईल याचा अजुनही मला अन्दाज ....
अरे तुम्ही माझ्या मनातले कसे बोलताय राव Wink अर्थात अगदी पटले/ आवडले/ कळले/समजले/अगदी अगदी झाले.

अजुन एक सान्गु का? मला आई व मुलगी दोघीन्शी टॅक्ट्फुली बोलावे लागते... कधी फट्ट म्हणता ब्रम्हहत्या होईल याचा भरोसा नाही. Lol

माझीच मेली पिढी अशी कशी बोटचेपी निघाली काय माहीत... माझ्या मैत्रिणीही हीच सहवेदना व्यक्त करतात..

एकुणच नातेसम्बन्ध टिकवुन ठेवणे ही मोठी कसरत आहे. >> Happy त्यापेक्षा ही कसरत करण्याची बायकांना हौस असते हे महत्त्वाचे.

सासरे म्हणाले 'निघतो' तर थोडीच जावई येऊन धागे काढतो, बायकोला कितीही वाईट वाटले तरी. (नियम सिद्ध करण्यापुरता एखादा अपवाद असेल पण बहुतेक वेळा फार पडलेली नसते.) फार फार तर मेव्हण्याला 'आमचं न ऐकता भलत्या वेळी निघाले, तुम्ही जमलं तर घ्यायला जा' असला एखादा फोन करतील. "माझं घर मी असं चालवतो, असेल प्रॉब्लेम तर घेऊन जा तुमची मुलगी" हा खमकेपणा बाईत नसतो म्हणून कसरती कराव्या लागतात.

सी, 100 वेळा agree Happy

साधनाताई, मी टेक्निकली तुझ्या पुढच्या पिढीतली आहे पण माझी पण सेम अवस्था आहे. इथेही मला वाटतं दोष आपल्या आपल्या स्वभावाचाच आहे. तुझी मुलगी तर मोठी आहे माझं अडिच वर्षाचं टिल्ल काल मला म्हणालं "आई, you should talk a little more respectfully with me, तू मला आज हर्ट केलं"
मी इतकंच म्हणाले होते "बावळटा, पाणी असं पितात का?"

बाबो, रिया, माझा खापरपणतु पण असाच निघावा?????

अजुन कु** धड धुता येत नाहीत पण याना रिस्पेक्ट समजतो आणि हवायही... Happy

हे एक नवरा केला तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला समजून घ्यायचंच सहन करायचंच हे मुळात बायकांवर लादलेले सोशल कंडिशनिन्ग आहे. पुरुषांवर अशी सक्ती नसते. अनेक लोक बायको च्या माहेर च्यांशी जुजबी संबंध ठेवून असतात व बायको पण त्याला फार फार फोर्स करत नाही. उलट दबूनच राहतात घरगुती शांतते साठी.

थोडा वेळ घ्या. सर्व रिलेशन शिप इव्हेलुएट करा व ज्या जीवनात महत्वाच्यावाटतात/ वा टतात त्या ठेवून बाकी तुम्हीच रिजेक्ट करा किंवा बाउंड्री ज आखून द्या. मेंटेन होतील पण तुमच्या इनर कोअरला ठेच लागणार नाही. असे आपले सूख दुसृयाच्या हातात ठेवून जगणे बरोबर नाही.

रिया Lol

अजुन कु** धड धुता येत नाहीत पण याना रिस्पेक्ट समजतो आणि हवायही... Happy>>>>>>> Lol
अगदी अगदी
साडेतीन वर्षाच्या लेकीला रागावलं किंवा एखादा फटका दिला तर 'सॉरी बोल मुझे' म्हणून रूसून बसते.

अजुन कु** धड धुता येत नाहीत पण याना रिस्पेक्ट समजतो आणि हवायही... >>>अगदी अगदी ,पण कधी कधी वाटतं हीच पिढी ok आहे give respect take respect आपण बोलतो पण घरातील काही विशेषतः वडीलधाऱ्या मंडळींनी respect देऊन बोलावं अशी आपण फारशी अपेक्षा नाही ठेवत पण ही पिढी आपल्या सारखी नाही,आणि तेही चांगलंच आहे,
त्यांना काय हवंय ते कशात तडजोड करणार नाहीत ते बऱ्याच वेळा स्पष्ट सांगतात आपल्या सारख नाही,नक्की स्वतः लाच धड खात्री नाही काय हवंय नी नकोय ते

हे एक नवरा केला तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला समजून घ्यायचंच सहन करायचंच हे मुळात बायकांवर लादलेले सोशल कंडिशनिन्ग आहे. पुरुषांवर अशी सक्ती नसते. >> +१००.
मी तर हल्ली सासू-सासर्‍यांसाठी काही करायची वेळ आली तर हे दोन निकष लावते १) मला हे काम करायला मोकळा वेळ आणि एनर्जी आहे का? २) माझ्या नवर्‍याला सेम काम माझ्या आई-वडिलांसाठी (त्याच्या सासू-सासर्‍यांसाठी) करायची वेळ आली तर तो किती तत्परतेने करेल? मुळात त्याने काही काम करावं अशी अपेक्षा माझे आई-वडिल ठेवतील का?

हे एक नवरा केला तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला समजून घ्यायचंच सहन करायचंच हे मुळात बायकांवर लादलेले सोशल कंडिशनिन्ग आहे
>>>>

हे ही समाजाकडूनच निर्माण केलं जातंय की. माझ्या एका पोस्टिला 'अजूनही सासर आपलं वाटत नाही का' वगैरे तुम्हीच लिहिलं होतं की. मग किमान तुम्हाला तरी यात नवल वाटायला नको आहे खरंतर

मग किमान तुम्हाला तरी यात नवल वाटायला नको आहे खरंतर>> मला काय वाटायचे आहे नवल नॉट माय इशू .

असे धागे निघतात हेच मजेशीर आहे.

रिया Happy मायबोलीवर असा विरोधाभास खुप पाहिलाय...

हे एक नवरा केला तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला समजून घ्यायचंच सहन करायचंच हे मुळात बायकांवर लादलेले सोशल कंडिशनिन्ग आहे. पुरुषांवर अशी सक्ती नसते.>>>>>>

नवर्याच्या कुटुम्बासोबत सासरी बाईला कायम राहावे लागते. नवरा त्याच्या सासरी पाहुण्यासारखा दोन दिवस जातो आणि दोन्ही दिवस रगडुन पाहुणचार उपभोगतो. बाई नवर्यासोबत वेगळी राहात असेल, सासरचे दुर असतील तरी ती सासरी गेल्यावर पाहुणी नसते. कामे करायची वेळ आली की ती घरचीच आणि काही फायदा असेल तर ती वेगळी राहणारी ठरते.

साधा सोपा उपाय आहे.
कुटुंब नको,मुल नको,सासू नको,दिर नको कोणतीच जबाबदारी नको.
पण वडिलार्जित संपत्ती फक्त हवी
नवरा फक्त हवा.
अशा वृत्तीच्या सर्व स्त्री पुरुषांनी आधुनिक विज्ञाना चा फायदा घेवून सेक्स ची भावना निर्माण करणारी सर्व हार्मोन्स शरीरातून नष्ट करावीत.
ना लग्न करावे असे वाटेल,ना सेक्स साठी पुरुष हवा असे वाटेल.
ना कोणतीच जबाबदारी अंगावर येईल.
बायकांना सासर aawdat नाही म्हणून ज्या आई वडिलांनी आपली संपत्ती,जवानी,कष्ट पणाला लावून मुलाला वाढवले असते.त्याला दोन पैसे कमावण्यााठी लायक बनवले असते त्यांना सोडून द्यावे.
असा विचार स्वार्थी स्त्रिया च करू शकतात.
अशा स्त्रियांनी पहिलेच हे सर्व स्पष्ट सांगावे.
उपकार ची फेड करणे ही पुरुषांची वृत्ती आहे .
आई ही स्त्री आणि वडील हे पुरुष ह्यांचे उपकार मुलगा म्हणून पुरुष नाकारू शकत नाही.
इतका स्वार्थी ,मंद बुध्दी चा पुरुष नक्कीच नसतो.

हाहा... पुरुषाने जन्मदात्यान्चे उपकार विसरु नयेत मात्र स्त्रीने ते विसरुन जावे... जाउदे, ह्या आइडीचे असेच प्रतिसाद असतात, बिचार्याने कधी कुठे मार खाल्लाय त्यालाच ठाउक.

गरजा सगळ्यान्च्याच आहेत म्हणुन समाज निर्माण झाला.
ताकदवरान्ची सोय पाहताना काही घटकान्वर अन्याय झाला/केला गेला.. त्या कडवट आठवणी पिढ्यान्पिढ्या स्म्रुतीन्वर कोरल्या गेलेल्या आहेत, त्या विसरु म्हटले तरी बिसरता येत नाहीत... म्हणुन मग सासरचे कारले तुपात तळले व साखरेत घोळले तरी कडुच राहते... Lol

साधना मॅडम माहीत आहे ना.
लग्न करण्याची हौस कशाला पाहिजे .
दुसऱ्याचे सुखात चालेल ल कुटुंब ची वाट लावण्यासाठी.
सरकारी नोकरीत मुलगा आहे,श्रीमंत मुलगा आहे ,अमेरिकेत राहणाऱ्या मुलगा आहे पण कुटुंब वर प्रेम करणारा आहे हे माहीत असून किती स्त्रियांनी लग्नाला नकार दिला आहे.
एक पण मिळणार नाही.
खरे रंग लग्न झाल्यावर च दाखवणार.

Pages