सासर परकं का वाटतं?

Submitted by हवा हवाई on 19 October, 2021 - 04:48

कुणाशी तरी बोलायचंय.
कितीही प्रयत्न केला समजून घ्यायचा, तरी सासर आपलं का वाटत नाही?
सासरी जायचं किंवा सासरचे घरी येणार म्हटलं कि महिनाभर आधीपासूनच टेन्शन यायला लागतं.
माझा प्रेमविवाह, लग्नाला दहा-बारा वर्षे झाली आहेत.
सासरचे सुरूवातीला विरोधात होते. सर्वोपतरी माझीही समजूत घालायचा त्यांनी प्रयत्न केला होता कि तु आमच्या मुलाबरोबर लग्न करू नकोस. सासूबाई उपासतापास करायच्या आमचं लग्न होऊ नये म्हणून.
इतक्या वर्षातही सुरुवातीला जी अढी बसली आहे मनात ती जाता जात नाहीये.
एकदा तर सासू मला म्हणाल्या अरेंज मैरेज केलं असतं मुलाचं तर अमूकतमूक इतका हुंडा मिळाला असता.
त्यात सासरी स्त्री-पुरुष भेदभाव जरा जास्तीच, किचनमधे पुरूषांनी जाऊ नये..ती सगळी कामं स्त्रीयांची.
याउलट माहेरी कधीही एकाही कामाला लहाणपणापासून हात लावू दिला नाही आईवडिलांनी.शिक्षण,करियर यावर कायम फोकस राहिला आहे.
कितीही ठरवलं कि आता त्यांचं वय झालं आहे, आपणच हट्टीपणा बाजूला ठेवून,समजूतदारपणा दाखवून गोड व्हावे पण तोंडदेखले गोड बोलणे अजिबातच जमत नाही.
नवरा नेहमी समजावतो कि नाती जपायला हवीत नंतर आपण एकटे पडू पण मला ते लोकं आपले वाटतंच नाहीत कितीही ठरवलं तरी आणि माझ्या माहेरचे आहेत कि मग एकटे का पडू आपण असं वाटतं.
तसंही नवर्याने जाणे,भेटणे याला माझा काहीही आक्षेप नसतो.
पण मला जायची अजिबातच इच्छा नसते.
कसा बदलावा माईंडसेट?

Group content visibility: 
Use group defaults

CT all

कसा बदलावा माईंडसेट?>> नका बदलू काही फरक पडत नाही.>>+१११११

का बदलायचा?? आपण त्या घरात गेलो म्हणून?? अजिबात बदलू नका.

आपण भले आणि आपलं काम भलं असं वागा. मुळात कुणालाही काही explain करायला जाऊ नका. त्यांना समजत नाही. आपलं काय जळतं हे आपल्यालाच कळतं. आणि यात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज असं काही नसतं. असले प्रकार दोन्हीकडे पहायला मिळतात.
मनाविरूद्ध जाऊन त्यांच्याशी जवळीक साधायला जालही, पण तिकडचा रिस्पॉन्स ९०% तरी थंडच किंवा इग्नोरंट असतो. मग जी आपली चिडचिड होते, त्याला सीमा नाही. त्यापेक्षा ज्यानेत्याने आपापल्या घरात सुखी रहा.
रिसेंट स्वानुभववावरून.

माझी ही सेम स्टोरी आहे
स्वतःला बदलू नको , जशी आहेस तशी रहा खरी...
समोरचा आपोआप च अपेक्षा करायची बंद करेल , आणि तू ही हा काय बोलेल तो काय बोलेल हा विचार करत जगु नको आणि मग तुझी लाईफ सॉरटेड होईल
हे मला 10 वर्षा नंतर आलेलं शहाणपण आहे

सासर परकं वाटायची काही कारणं.
१. सासरकडच्या मंडळींना तुमची वेदना समजुन येत नाही.
२. ज्याच्या भरोश्यावर तुम्ही इकडे पाउल टाकलत तो तुम्हाला पुरेसा सपोर्ट करत नाही किंवा दुर्लक्ष करतो. (इथे थोडं वैचारिक द्वंद्व आहे).
३. तुम्ही पुर्णता वेगळ्या घरातुन आलात नी तुम्हाला इकडचे काही आचार विचार पटत्/मान्य नाहीत.
३. इकडची मंडळी तुम्हाला त्यांचाच एक भाग म्हणुन त्यांच्यात सामावुन घ्यायला किंवा आपलसं करायला का-कु करत आहेत.
४. तुम्ही सासु सासर्‍यांमधे आई वडिल शोधायला जात असाल पण त्यांनी अजुन तुम्हाला मनाने मुलगी म्हणुन स्वीकारले नसेल (त्यांना वेळ द्या)
५. मागच्या २०/२५ वर्षात त्यांच्या घरात चालत असलेल्या (किंवा त्यांना अंगवळणी पडलेल्या) गोष्टींना तुम्ही एकदमच बदलायचा प्रयत्न केला असेल आणी त्यांना आवडले नसेल.
६. इकडच्या मंडळींनी मुलाच्या लग्नाचे काही स्वप्न, आडाखे बांधले असतील (हे करु ते करु वगैरे वगैरे) ते करता न आल्याने मनात एक प्रकारची अढी असु शकेल
इ.इ.इ
आता,
तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या थोडं तुमच्या कलाने थोडं त्यांच्या कलाने घेवुन बघा. (स्वतःमधे सकारात्मक बदल करा (म्हणेज दुसर्‍यासाठी एकदम काकुबाई, होयबा होयबा नको स्वतःची डिग्नीटी शाबुत राह्य द्या))
त्यांना जे आवडत नसेल (योग्य ते) ते टाळण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जे आवडते नसेल (योग्य ते) ते त्यांना तस प्रेमाने स्पष्ट्पणे सांगा.
कालांतराने फरक पडेल ही आशा. शुभेच्छा.

सासरी जायचं किंवा सासरचे घरी येणार म्हटलं कि महिनाभर आधीपासूनच टेन्शन यायला लागतं.
>>>>>
म्हणजे तुम्ही एकत्र राहात नाही. मग कश्याला जास्त विचार करता Happy

तसेही ते लोकं फार गुणाचे आणि समजूतदार लोकं असले तरी परकं वाटणे नॉर्मल आहे. कारण प्रेम तुम्ही तुमच्या नवर्‍यावर म्हणजे तेव्हाच्या बॉयफ्रेंडवर केले होते. त्याच्या पुर्ण परीवारावर नाही. त्यांच्याशी तुमचे ट्युनिंग जुळायलाच हवे हे बिलकुल गरजेचे नाही. आपण प्रेम करतो त्याच व्यक्तीची ही प्रेमाची माणसे आहेत एवढेच त्यांच्यात स्पेशल असते. जसे आपल्या खास मित्राच्या दुसर्‍या एखाद्या खास मित्राशी आपले नाते असते तसेच आहे हे. त्याच्याशी आपण हसून बोलतोही. पण म्हणून तो ही लगेच आपला मित्र होईल हे गरजेचे नसते.

फक्त आपल्यातली माणूसकी कधी सोडू नका. आणि तुमच्यात छोटेमोठे काही का मतभेद असेनात, माणुसकीच्या नात्याने तुम्ही एखाद्याशी जितके चांगले वागू शकता तितके जरूर वागा.

सासु सासर्‍यांना शेवटी तुम्हालाच बघावं लागणार. की वृद्धाश्रमात सोडुन येणार..? नाही ना..?? मग कशाला वाईट होता...???
झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून वागा त्यांच्याशी. तुम्ही जशा तुमच्या जागी योग्य आहात असं तुम्हाला वाटतं तसेच ते त्यांच्या जागी योग्य असतील असं त्यांना वाटत असणार. बाकी संस्कार-बिंस्काराचं जाऊद्या परंतू वयाने मोठ्या असणार्‍या आपल्या नवर्‍याच्या आई-वडिलांसोबत बायकोने चांगलंच वागायला हवं. त्यांना काय हवं नको ते बघावं. आपल्या मुलाने असंच आपल्या मनाविरुद्ध लग्न केलं अन त्याची बायको आपल्या शेवटच्या क्षणी अशीच फटकून वागली अन मुलगा तिच्या मुठीत असेल तर त्यालाही तसंच वागावं लागलं.. तर..??? वेळीच सावरा... सासू-सासरे होते म्हणुन आपला नवरा या भुतलावर अवतरला अन आता तो आपल्या सोबत आहे याची मनात खोलवर कुठेतरी जाणीव ठेवा हा झाला एक मार्ग. बाकी आपल्याला दुसरा मार्ग अवलंबा म्हणणारे बरेच सापडतील... निर्णय तुमचा..! Bw

पूर्ण परिस्थिती मला माहित नाही. बदलू नको. का बदलायचं ? तू कशाला adjust करतेस असे सांगणारे इथे आहेत. पण तुमच्या आई वडिलांशी तुमच्या नवऱ्याचे तणावाचे संबंध असतील तर ते तुम्हाला मनातून खटकेल ना की आवडेल की तुम्ही उदासीन राहून सोडून द्याल ?

प्रेम जरी तुम्ही फक्त तुमच्या नवऱ्यावर केलं असलं तरी तुम्ही जर त्याच्या आई वडिलांशी प्रयत्नपूर्वक का होईना पण सलोख्याने वागलात तर लक्षात ठेवा तुमचं दोघांचं नातच अधिक गोड होणार आहे. त्यातून ही तुम्ही कायम ही एकत्र रहात नाही आहात म्हणजे रोज फार तडजोड करायची नाहीये. तेव्हा स्वतःकडे लहानपणा घ्या आणि त्यांच्याशी सलोख्याने वागायचा प्रयत्न करा . अंतिम फायदा तुमचाच होणार आहे. कधी कधी कमीपणा घेण्यातच मोठेपणा असतो.

भोचक आहे प्रश्न पण तरी विचारते कारण बरेच वेळा त्यात उत्तर असते - तुम्हाला मुले नाहीत का? सहसा नातवंडांचे संगोपन नीट होत आहे हे बघून सुनेला सहन करतात. नाहीतर तुम्हाला "सहन" करण्याचा त्यांना इंसेंटीव्ह काय?? (तुम्ही चांगल्याच वागत असलात तरी "आम्ही हिला सहन करतोय" असा जर अ‍ॅटीट्यूड असेल तर बदल घडवणे अवघड असते.)

एकदा तर सासू मला म्हणाल्या अरेंज मैरेज केलं असतं मुलाचं तर अमूकतमूक इतका हुंडा मिळाला असता. >> जेल पण झाली असती म्हणावं. बाकी ऐकवलं तर ठीक आहे, करा सहन असेच म्हणेन. पण हुंडा वगैरे बेकायदेशीर गोष्टी बोलायला लागल्या तर गोडीत दोन शब्द सुनावले पाहिजे.

माझ्या माहेरचे आहेत कि मग एकटे का पडू आपण असं वाटतं.>>>> तसेच तुमच्या सासरचे लोक, तुमच्या नवर्‍याच्या माहेरचे आहेत.
तुमच्या दोघांच्या अपब्रिंगिंगमधे फरकही असेल कदाचित. फारतर मायेने करू नका ,पण कर्तव्य म्हणून करा.अशी अने़क कर्तव्य आपण बरेचदा करत असतो.बाकी ते हुंडा वगैरे विचित्र आहेच.

तुम्हाला मुले नाहीत का?>>>>>> दोन मुलं आहेत. मुलगी नऊ वर्षे आणि मुलगा सहा वर्षे.

प्रेम जरी तुम्ही फक्त तुमच्या नवऱ्यावर केलं असलं तरी तुम्ही जर त्याच्या आई वडिलांशी प्रयत्नपूर्वक का होईना पण सलोख्याने वागलात तर लक्षात ठेवा तुमचं दोघांचं नातच अधिक गोड होणार आहे>>>>>>>
हे खरं आहे. पटतंय पण प्रयत्न करून पण सलोख्याने वागणेच जमत नाही.
दरवेळी त्या येतात दोन-तीन महिने राहण्याच्या हेतूने, पण नक्कीच काहीतरी खुसपट काढतात आणि दहा दिवसांत निघून जातात.त्यानंतर महिनोंमहिने नवर्याला वाईट वाटत राहते कि आई राहिली नाही, निघून गेली, तुच थोडं जमवून घ्यायला हवं होतं.या वयात आईचा स्वभाव बदलणं शक्य नाही.
मग असे वाटते कशाला जवळ जा आणि पुन्हा तेच सगळं.त्यापेक्षा दुर असलेलेच बरे. (हि नक्कीच पळवाट हे समजतंय पण उमजत नाही)

ममो किती समंजस प्रतिसाद.
सिमंतिनी Lol
माझ्या आईची एक शिकवण आहे -करुन वाट्यावर ठेवायचे. (कर्तव्य म्हणून करायचे बाकी कोणाला काय वाटते विचार करायचा नाही आणि आपण काही ही केले नाही याची आपल्याला वेळ निघून गेल्यावर खंत वाटू द्यायची नाही )

लग्न करताना अ‍ॅरेंज मॅरेज असो किंवा लव मॅरेज, दोन्ही बाजूच्या काही सदस्यांना ते लग्न मान्य नसल्यास ती नाराजी वागण्या-बोलण्यात येते आणि नव्या नात्यात दुरावा आणते. त्यात स्वतंत्र संसार असेल तर तुमचे घर हे तुमचे घर आणि जोडीदाराचे माहेर हे त्याच्या पालकांचे घर असे होते. आयुष्याची सुरवातीची २५-३० वर्षे आपण ज्या घरात वाढलेलो असतो, तिथले आचार-विचार आपल्यात भिनलेले असतात. सासरचे आचार-विचार फारच वेगळे असल्यास तो फरक वारंवार जाणवत रहातो. सासरच्या माणसांसाठी तुमच्या बाजूने जे योग्य वाटते ते मनापसून करा, जे अयोग्य वाटते त्याबाबत माझ्या मनाला हे पटत नाही असे नम्रपणे सांगा. प्रसंगानुसार सासरी रहायला जाणे टाळू नका आणि जाल तेव्हा फार टेंशन घेवू नका. त्यातून काही सकारात्मक होणार नाहीये.

माहेरच्या लोकांबद्दल जी जवळीक, विश्वास वाटतो तसे सासरच्या लोकांबद्दल वाटणे हे लगेच होणार नाही आणि माहेरची माणसे म्हटली तरी तिथेही सगळ्यासोबत आपली कंफर्ट लेवल एकसारखी नसते. तुमचे तर व्यवस्थित विरोध वगैरे होवून झालेले लव मॅरेज आहे तर १०-१२ वर्षं म्हणजे 'आपली माणसे' या दृष्टीने नाते नवेच आहे असे मी म्हणेन. 'सासरची माणसे ' असे म्हणून सगळ्यांना एक गठ्ठा मोजू नका. तोडणे फार सोपे आहे जोडायला वेळ द्यावा लागतो. सासरच्या प्रत्येक सदस्यासोबत व्यक्तीगत पातळीवर नाते जोपासायचा प्रयत्न करा. यात जोडीदाराची एक्सटेंडेड फॅमिलीही आली. हळूहळू दोन्ही बाजूने कंफर्ट लेवल वाढत जाईल, सासरच्या माणासांमधली काही मंडळी कालांतराने तुमचे 'माहेर' नक्की होतील.

बाकी साबाई काहीतरी खुसपट काढून निघून जात असतील तर त्यावर एक उपाय म्हणजे याबाबत स्पष्ट बोलणे, तेही तुमच्या जोडीदाराने. 'तू समजून घे, जमवून घे' असे म्हणून एकट्यावर भार टाकणे योग्य नाही. जोडीदाराच्या माहेरी सलोख्याचे संबंध राखायचे तर त्यासाठी जोडीदाराचाही सक्रिय सहभाग हवा. स्वभावाला औषध नाही हे खरे असले तरी 'आपल्यासोबत आई राहीली नाही' म्हणून नुसतेच वाईट वाटून घेणे आणि पत्नीने जमवून घ्यावे अशी ढोबळ अपेक्षा व्यक्त करणे असे करण्यापेक्षा त्यांनी या विषयावर आईसोबत शांतपणे बोलावे. सुनेला नाकारायच्या नादात त्या स्वतःच्या मुलालाच दु:ख देत आहेत, नातवंडांना आजीच सहवास मिळत नाही याची जाणीव करुन द्यावी. तुमच्याकडे रहायला आल्यावर, तुमच्याकडील वास्तव्याबाबत काय अपेक्षा आहेत, काय खटकते ते ही विचारावे. त्यांचा काय प्रतिसाद येतो ते पाहून त्याप्रमाणे तुम्ही दोघे मिळून नवर्‍याच्या माहेरी जवळीक वाढवण्यासाठी पुढे काय कसे करायचे ते ठरवा.

मनिमोहोर, लेखन वाचल्यावर जो विचार मनात आला, तोच तुम्ही छान शब्दात मांडला आहे. प्रतिसाद आवडला.
स्वाती2, सुंदर प्रतिसाद. मनापासुन पटला.

मुले आहेत ना... मग इतकं काय मनाला लावून घ्यायचं. निघते म्हणाल्या तर "थांबा, पराठे बांधून देते". समथिंग फॉर दि रोड द्या मायेने.. . खिटखिट केली की आई नमते हे मुलांना दिसलं की तुमचाच मुलगा तुमची सासू व्हायला वेळ लागत नाही. नवरा म्हणला तूच जुळवून घे तर 'नाही जमल ह्या वेळी जुळवायला, पण त्या प्रवासात सुरक्षित, सुखी, सुखरूप राहतील ह्याची काळजी मी घेतली आहे. तू टेंशन करू नकोस आईचं... पोहोचल्या का विचारायला मीच फोन करते' म्हणून त्याला दिलासा द्या. कमीपणा घ्या, जोडीने उपाय शोधा इ इ सगळं ठीक आहे पण हे वेळखाऊ उपाय आहेत. तुम्ही टेंशन करणार्‍या/चिडक्या होत्या म्हणून नवर्‍याने तुमच्याशी लव्हमॅरेज केले नाही तर तुम्ही प्रेमळ नि धडाडीच्या होता म्हणून केले. व्हाय लूज योरसेल्फ ओव्हर अदर पीपल्स बिहेवियर्स??

आस्क नूतन. मै तो भुल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे....
मनीमोहर, वाचल्यावर लगेच माझ्या जे मनात आलं तेच तुम्ही लिहिलंय.

आस्क श्रीदेवी Wink
मैं ससुराल नहीं जाउंगी, डोली रख दो कहारों
साल दो साल नहीं जाओगी, डोली रख दो कहारों

व्हाय लूज योरसेल्फ ओव्हर अदर पीपल्स बिहेवियर्स??>> तर्खड कर वारले. व्याख्ह्या विख्ही वुख्हू.

म्हातारा म्हातारीला स्विड गेम्स चे तिकी ट द्या. बचे तो मिया को पैसे मिलते. आजीला कल्पनेपेक्षा जास्त हुंडा मिळवायचा चान्स आहे. असे मन मारून राहाय्चे ते नाते तरी तितके महत्वाचे आहे का? स्वतःचा व सुखाचा विचार करा व निर्णय घ्या.

याउलट माहेरी कधीही एकाही कामाला लहाणपणापासून हात लावू दिला नाही आईवडिलांनी.>> हे चुकले आहे ना? एकटे राहिले तरी घरकाम
स्वयंपाक यायला हवा स्वतः पुरता. आजकाल मुले मुली घर भाड्याने घेउन राहतात व नोकरी कर तात तेव्हा हे स्किल गरजेचे आहे.

कितीही ठरवलं कि आता त्यांचं वय झालं आहे, आपणच हट्टीपणा बाजूला ठेवून,समजूतदारपणा दाखवून गोड व्हावे पण तोंडदेखले गोड बोलणे अजिबातच जमत नाही.>> म्हणजे तुमचा पण हट्ट आहे. त्या वर समुपदेशन घ्यायला हवे. इफ द हबी इज वर्थ ऑल धिस. वरना कटले.

दरवेळी त्या येतात दोन-तीन महिने राहण्याच्या हेतूने, पण नक्कीच काहीतरी खुसपट काढतात आणि दहा दिवसांत निघून जातात.
>>> tumhi nakki Kay karta.. Bharpur jantela sasu cha trass aahe.. tumchya tips cha fayda hoiil…

तुम्ही टेंशन करणार्‍या/चिडक्या होत्या म्हणून नवर्‍याने तुमच्याशी लव्हमॅरेज केले नाही तर तुम्ही प्रेमळ नि धडाडीच्या होता म्हणून केले.
>> how can you assume this Happy

>> how can you assume this Happy >>> Happy सासू उपास करायला लागल्यावर "आमरण का हो?" विचारलं नाही तिने म्हणजे प्रेमळ नि धडाडीचीच म्हणायची. पब्लिकली बोलायला एवढी दोन अझंप्शन्स पुरेशी आहेत. बाकी सगळं सेमच असतं प्रेमात Happy

स्वाती यांचा प्रतिसाद पटला. मनीमोहोर म्हणतात तसे प्रयत्नपुर्वक सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी अमा म्हणतात तसा काउन्सेलिंगचा फायदा होइल. काहीही झाले तरी तुमची आयडेन्टिटी बदलवून टाकणार्या गोष्टी स्वीकारु नका. पण तुम्ही स्वतःचेच बेटर वर्जन बनू शकता.

नवर्याचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आणि प्रसंगी त्याने सासरच्यांना त्यांची चूक दाखवणेही गरजेचे आहे.

खरंतर बॅचलर्स हॉस्टेल प्रमाणे मॅरीड कपल्स हॉस्टेल चालू झाली तर आजचे बरेचसे प्रश्न सुटतील.
प्रतिसाद कदाचित असंबद्ध वाटू शकतो, वाटल्यास क्षमस्व

Pages