लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथला एक आय डी आहे वल्लरी म्हणून
ती फार सुंदर साड्या विकते तिचं फेबु पेज ही आहे
किंमती अगदी वाजवी आणि कलेक्शन भयंकर सुंदर आणि वास्ट
सो एकदा हवे तर तिच्याशी ही बोलून बघ...

Submitted by अनिश्का >> करते त्यांनां विपु.. धन्यवाद Happy

Celebration बरोबरच थोड्या पार पाडायच्या जबाबदारीच्या बाबींची यादी इथे असावी म्हणुन...
मोठ्या लग्नकार्यात विघटन होऊ न शकणार्‍या सजावटीच्या गोष्टी फार न वापरणे, पर्यायी recyclable गोष्टी वापरणे, कचर्‍याची योग्य विल्हेवाट, अन्नाचा अपव्यय टाळणे ह्या गोष्टी थेट वधू वरांना काळजी करावी अशा नसल्या तरी वधू वराने पुढाकार घेत ही जबाबदारी एखाद्या ह्या बाबतीत उत्साही असलेल्या व्यक्तीस नेमून दिल्यास चांगले.
उत्साहाच्या वातावरणात वयस्कर, तब्येतीच्या स्पेसिफिक तक्रारी असणार्‍या आणि लहान मुले ह्यांच्याकडे दुर्लक्ष होते त्याकडे खास लक्ष देणार्‍या जबाबदार व्यक्ती असाव्यात.
डॉक्टर, हॉस्पिटलचे contacts आणि पत्ते आधीच अरेंज करून ठेवावेत.
चोर लोकही हात मारून जाणार नाहीत ह्याकडे लक्ष असू द्यावे.

लोकहो त्यांना लग्नसमारंभाचे प्लानिंग सांगा. संसाराच्या युक्त्या नको Proud

Submitted by ऋन्मेऽऽष >> संसाराच्या युक्त्या सुद्धा चालेल की..त्याची पण गरज पडणार आहे आता मला Proud अनुभवाचे बोल खूप महत्वाचे Happy

Celebration बरोबरच थोड्या पार पाडायच्या जबाबदारीच्या बाबींची यादी इथे असावी म्हणुन...
मोठ्या लग्नकार्यात विघटन होऊ न शकणार्‍या सजावटीच्या गोष्टी फार न वापरणे, पर्यायी recyclable गोष्टी वापरणे, कचर्‍याची योग्य विल्हेवाट, अन्नाचा अपव्यय टाळणे ह्या गोष्टी थेट वधू वरांना काळजी करावी अशा नसल्या तरी वधू वराने पुढाकार घेत ही जबाबदारी एखाद्या ह्या बाबतीत उत्साही असलेल्या व्यक्तीस नेमून दिल्यास चांगले.
उत्साहाच्या वातावरणात वयस्कर, तब्येतीच्या स्पेसिफिक तक्रारी असणार्‍या आणि लहान मुले ह्यांच्याकडे दुर्लक्ष होते त्याकडे खास लक्ष देणार्‍या जबाबदार व्यक्ती असाव्यात.
डॉक्टर, हॉस्पिटलचे contacts आणि पत्ते आधीच अरेंज करून ठेवावेत.
चोर लोकही हात मारून जाणार नाहीत ह्याकडे लक्ष असू द्यावे.

नवीन Submitted by मी अश्विनी >> धन्यवाद.. नोट केलेत मुद्दे Happy

इथे मुंबईत काही लोकांनी जिरो वेस्टेज व विगन अश्या थीम वर ही यशस्वी लग्न समारंभ केले आहेत. प्री करोना अश्या बातम्या येत. हे शक्य आहे.
अमृ ताक्षर प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देण्या ऐवजी तुम्हाला पटलेले मुद्दे व माहिती हेडर मध्ये अपडेट करा. व एकत्रित सर्वांना धन्यावाद तिथेच लिहा. म्हणजे तुमचा वेळ वाचेल. जास्त वेळ आई बरोबर घालवा.

संसा राच्या युक्त्या वेगळा बाफ लागेल. इथे फक्त त्या दिवशीचे व आधीचे समारंभ जयमाला बिदाई व गृहप्रवेश परेन्त माहिती संकलित कर्ता येइल

संसाराच्या युक्त्या सुद्धा चालेल की..त्याची पण गरज पडणार आहे आता मला
>>>>>

त्याचा वेगळा धागा नंतर काढा. किंवा मी तर म्हणतो काढूच नका. या युक्त्या काड्या सारायचेच काम करतात. भले सांगणार्‍याचा हेतू काही का असेना. उगाच पूर्वग्रहदूषित नजरेने बघत एखादे नवीन नाते सुरू करण्यात काय अर्थ आहे? मनाची पाटी कोरी ठेवत सुरुवात करा. आणि जोडीदालाही तसेच करायला सांगा.

आणि हो, अमा म्हणाल्या तसे एकूण एक प्रतिसादाला उत्तर देणे गरजेचे नाही. प्रत्येक पोस्टचे धन्यवाद मानणे तर बिलकुल गरजेचे नाही. आणि प्रत्येकवेळी भलीमोठी पोस्ट कोट करने तर त्याहून गरजेचे नाही. पुढे संदर्भासाठी धागा वाचायला फार किचकट होतो.

Submitted by ऋन्मेऽऽष >> पटलंय मला तुमचं.. मी सगळ्या पोस्ट हेडर मधे संकलित करेल म्हणजे कुणाला हा धागा स्वतःसाठी पाहायचा असेल तर अडचण होणार नाही Happy

नातेवाईक कुठे कुठे सो.मि फोटो पोस्ट करतील. ते चटकन एकत्रित करता यावे यासाठी ठराविक हॅशटॅग हल्ली वापरतात. वेडिंग प्लॅनर असल्यास ते सांगतात, नाहीतर दांपत्यालाच ते ठरवावे लागतात. #अमृकीशादी नावाने मानवदादांच्या मायबोली २४ तास धाग्यावर बातमी दिली आहे Wink बाकीचे हॅशटॅग ठरवले की सांगा Happy

अभिनंदन आणि शुभेच्छा
लग्न वेगळ्या प्रांतातल्या ( आणि वेगळ्या भाषक) मुलाशी होतंय तर विवाहविधी - आधीचे, नंतरचे समारंभ कुणाकडच्या रीतीने होणार ते ठरवून घ्या.
मुलाकडील रीती माहीत करून घ्या.
त्यावरून गैरसमज, मानापमान होऊ शकतात.

१००
शक्य असेल तर जितका वेळ एकमेकांना देता आला तेवढा पहा, होणारा नवरा आणि आपल्या घरचे दोघांनाही Happy
आई बाबा खूप हळवेहोतात ह्या काळात त्यांना समजून घ्या Happy

आई बाबा खूप हळवेहोतात ह्या काळात त्यांना समजून घ्या Happy

Submitted by किल्ली >> इतक्यात हम आपके है कौन सिनेमा लागला होता त्यातील बिदाई वाला सीन पाहून आई रडायला लागली Sad खरचं खूप हळवे होऊन जातात आई बाबा बहिण भाऊ..मी पण कधी कधी होऊन जाते हळवी Sad

Submitted by भरत >> हो भरत हा मुद्दा तर आधीपासूनच लक्षात ठेवला आहे..त्यांच्याकडे नवरी मुलगी लग्नाच्या आधी किंवा लग्न जमायच्या आधी पाया लागत नाही आपल्याकडे मात्र लागतात म्हणून मी त्यांच्या पाया लागली होती तर मुलाच्या आईने मला मिठी मारली होती आणि पाया लागू दिले नव्हते

मानवदादांच्या मायबोली २४ तास धाग्यावर बातमी दिली आहे Wink बाकीचे हॅशटॅग ठरवले की सांगा Happy

Submitted by सीमंतिनी>> hashtag आवडलाच नक्की वापरेल माझ्या fb वर..thank you Happy

लग्नात बरेचसे टक्के खर्च खरेदीवर होतो .
१. खरेदीची लिस्ट बनवावी . प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज .
मानपानाची , वयैक्तीक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
काहीवेळा जवळचे मित्रमैत्रिणी , चुलत मामे भावंडं अचानक विचारतात - तुला लग्नात काय गिफ्ट देउ ??
आयत्यावेळी सुचत नाही . अशावेळी उगाचच वॉवचर्स , नको असल्यालेल्या गोष्टींपेक्शा हाताशी लिस्ट असलेली बरी पडते .
आम्ही एका मैत्रीणीला तिच्या रिसेप्शनसाठी ईमिटेशन ज्वेलरी दिली होती , एकीला रोजच्या मेकपचं सामान , एकाला केबीन बॅग -- अर्थात सगळं त्यांच्या पसंतीनेच . फक्त बिल आम्ही भरलं .
२. अनुने दागिन्यांचं सांगितलं त्याला अनुमोदन. सगळे दागिने एकावेळी नकोच. वर्शभर , सण समारंभ होतच रहातात . कधी कधी नंतर लक्शात येत , अरे रोजच्या वापरासाठी एखाद ब्रेसलेट हवं , कधीतरी नंतर एखादी मंसुची डीझाईन आवडते .
३.लग्नाच्या निमित्ताने बरीच खरेदी होते . किंवा जवळची लोक बर्याच भेटवस्तू देतात . सगळ्या गोष्टी एकदम सासरी घेउन जाउ नकोस Happy
बहीण , भाउ , मामा आत्या वगैरे नव्या जोडप्याला घरी जेवायला बोलावतात , त्यावेळी काहीतरी हातात भेटवस्तू द्यावी लागते . तेव्हा यातल्याच गोष्टी द्यायला सांगाव्यात Happy . उगाचच भारंभार खरेदी आणि नको असलेलं सामान टाळता येतं. अगदी विश्वासातल्या माणसाना स्पष्ट सांगावं , नंतरच द्या म्हणून .
४ माझ्या लग्नात , सासरकडून ५ साड्या देणार होते . अर्थात त्या लोकाना माहिती होते मी साड्या काही जास्त वापरणार नाही . नवर्याने माझ्यासाठी दोन पंजाबी सूट त्याच्या पसंती ने घेतले , उरलेले माझ्या पसंतीने . जरा महागातले , जरी वर्क चे , सिल्कचे वगैरे घेतलेले. बर्याच समारंभातात , सणांना मी भरपूर वापरले. साड्या पडून राहील्या असत्या. हे एक उदाहरण झालं . सासरच्या लोकांना विश्वासात घेउन काही पारंपारीक चालीरीतीना आपल्या सोयीप्रमाणे तोडगा काढा .
५.कपड्याची शिलाई फार लवकर नको , नंतर जाडी -बारीक झालीस तर फिटींगसाठी परत धावाधाव . पण ईतकीही आयत्यावेळी नको की ट्रायल साठी वेळ नाही किंवा टेलरकडे ईतक्या ऑर्डर्स आहेत की वेळेवर मिळतायेत की नाही याची धाकधूक .
६.जसजसे कार्यक्रम ठरत जातील आणि त्यानुसार कपड्याची खरेदी होत जाईल , तसतसे एकेका दिवसाचे सामान एकत्र करून , एका बॅगेत किंवा साडी बॉक्समध्ये टाकून लेबल करून टाकावं . आयत्यावेळी शोधाशोध होत नाही . घरातल्या सगळ्यांनीच !
७. लग्नानंतर आठवडाभर काही समारंभ असतील तर त्यानुसार ही शक्य असेल तर अगोदरच बॅग्ज भरून ठेवाव्यात .

आणि मला वाटतंय सगळं घर पाहुण्यांनी भरून गेलंय आणि माझे सगळे जवळचे नातेवाईक आपुलकीने व काळजीने मला सल्ले देतायत..अजून दारी तोरण लागायचे आहेत पण या धाग्यावर आली की आधीच नवरी वाली फिलिंग येतेय Happy

स्वस्ति छान प्रतिसाद. पण एक वेगळा विचार सुचतोय म्हणून सांगते, लग्नाची आपली अशी खरेदी तर असतेच, मुलामुलीचे कपडे दागिने वगैरे , पण तेही घेताना नंतर किती वापरणार आहोत ते विचार करून घ्यावे , i mean try to avoid heavy clothes as much as possible, खरंच सांगते , पडून राहतात नंतर. त्यामुळे स्वस्ति यांची पंजाबी सूटची आयडीया पटली.

दुसरे म्हणजे आहेर देणे आणि घेणे , ही भानगड पूर्णपणे टाळताच आली तर बघा. खुप सुटसुटीत खरेदी आणि सुटसुटीत लग्न वाटते. माझ्या भावाच्या लग्नात खूप अनुभव आला याचा आणि बहुतेक लोकांना ही कल्पना आवडली सुध्दा. त्याऐवजी पाहुण्यांना म्हणावं या , खा प्या , मजा करा मेहंदी डान्स etc, आशिर्वाद द्या आणि जावा Lol . तरीही नसले ऐकत तर जवळच्या नातेवाईकांना फक्त आपल्याला काय गरजेच्या गोष्टी असतील त्या भेट देण्यास सुचवा. बाकी सर्वांना नो आहेर देणे अन् घेणे. अर्थात तुमचे वेगवेगळे प्लॅनिंग असूच शकेल याबाबतीत, पण हे माझे मत सांगितले.

अमृताक्षर, जास्त सूचना वाचू नको.त्यापेक्षा तो वेळ होणार्‍या नवर्‍याशी बोलण्यात घालव. Wink>>>> गुड वन Lol

अमृताक्षर, जास्त सूचना वाचू नको.त्यापेक्षा तो वेळ होणार्‍या नवर्‍याशी बोलण्यात घालव. Wink>>>> +++११११११११ देवकी सॉलिड सल्ला.

अमृताक्षर, जास्त सूचना वाचू नको.त्यापेक्षा तो वेळ होणार्‍या नवर्‍याशी बोलण्यात घालव. Wink>>>> गुड वन Lol

Submitted by भाग्यश्री१२३ >> त्यांना वेळ असायला हवा की पण Sad

Submitted by भाग्यश्री१२३ on 3 October, 2021 - 15:32 >> हो माझा सुद्धा हाच विचार आहे पण बघू आता त्यांच्याकडे काय पद्धत आहे तर

किंवा दोघांनी मिळून हा धागा वाचा. एक गडी मदतीला भेटेल..
- ईति संसाराची युक्ती

Submitted by ऋन्मेऽऽष >> Lol त्यांना सांगावं लागेल या मायबोलीवर..

दुसरे म्हणजे आहेर देणे आणि घेणे , ही भानगड पूर्णपणे टाळताच आली तर बघा. >> अगदी भाग्यश्री. आमच्या लग्नात माझ्या सासरचे या सूचनेला लगेचच तयार झाले. बहिणीच्या लग्नात तिच्या सासरच्यानी कां-कूं केलं. अर्थात त्यांच्या द्रुष्टीने त्यांनी दिलेली कारणे योग्य होती म्हणून आम्ही फार ताणून धरलं नाही.
अमृता , शेवटी ऐकावं जनाच करावं मनाचं Happy
इथल्या सूचना वाचून फक्त मान डोलवू नकोस , काही पटलं तर होणाऱ्या नवर्याशी चर्चा कर . आपल्याला काहीतरी वेगळे करायची हुक्की असते , पण समोरचा दुसरी बाजू समजावून देऊ शकतो.
म्हणून सगळे सांगतायत , त्याच्याशी गाठीभेटी वाढव , मनमोकळ्या गप्पा मार. शेवटी लग्न दोन कुटुंबाच आहे आणि एकदाच करायचयं.

दुसरे म्हणजे आहेर देणे आणि घेणे , ही भानगड पूर्णपणे टाळताच आली तर बघा.
>>>>
पूर्वापार चालत आलेली प्रथा तर चांगलीच आहे ही. लग्नघराला थोडे पैसे मिळतात. आर्थिक भार हलका होतो. ते लोकं एका डायरीत याची नोंद करतात. आणि तेच पैसे समोरच्या पार्टीचे लग्न असेल तेव्हा आहेर रुपाने परत करून त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी वापरायला देतात.
आता आहेर न घेण्याचे जे फॅड सुरू झालेय त्याची काही कारणे असतील. आपल्या जागी बरोबरही असतील. पण आहेर प्रथेला भानगड म्हटलेले पटले नाही ईतकेच.
दुसरे म्हणजे आहेर आणू नका असे लिहीतात तिथेही नवरानवरीला स्टेजवर भेटायला आणि फोटो काढून घ्यायला रांग तर लागलेली असतेच. त्यामुळे हे टाळल्याने सुटसुटीतपणा येतो लग्नात असेही वाटत नाही. उलट काही लोकं तरीही आहेराचे पाकीट सरकावून घ्या ओ घ्या ओ करून आणि नवरा-नवरी नको ओ नको ओ, पप्पा यांना सांगा ओ करून गोंधळ वाढवतात. तसेच काही जण पुष्पगुच्छ आणतात आणि बिनकामाचा ढिगारा वाढवतात ते वेगळेच.

आमच्या लग्नात सासरच्यांनी 'आहेर नको' आणि आम्ही 'असला तरी चालेल नसला तरी चालेल' असा अभूतपूर्व कम्युनिकेशन गोंधळ घातल्याने मला लोक आहेर देत होते, आणि सासरी कोणाला दिल्यास ते कडक नकार देत होते Happy (हा विषय आधीच्या बोलण्यात कधी निघालाच नाही त्यामुळे दोन्ही पार्टीना दुसऱ्या पार्टीचे धोरण ऐन वेळी कळले.) मग 'आहेर नको नको' म्हणून नवरा नवरी हात हलवतायत आणि लोक आधी आहेर स्वीकारलेला ज्यांनी पाहिला ते लोक रिसेप्शन च्या खुर्चीवर पाकिटं ठेवून सटकतायत असेही प्रसंग घडले.मी भरलेल्या इंजिनियरिंग बुक्स च्या बॅग्स बघून सासरचे आधीच दचकले होते.(असंही नाही की मी नंतर ती पुस्तकं वाचली Happy )

लग्नात अमकी खोली कोणत्या पार्टीची वगैरे वरूनही बरेच गोंधळ झाले पण मी नवरी असल्याने त्याकडे कानाडोळा केला.मुख्य दुःख म्हणजे त्या कंपनीच्या दुसऱ्या कार्यालयात लग्न करणाऱ्या पार्टीज ना एक मस्त वेलकम किट मिळायचा,सुई दोरा, बटन,मेणबत्ती काडेपेटी वगैरे गोष्टी असलेला.आमच्या कार्यालयात मिळालाच नाही.जोशी गोखले केटरर नसून बदामीकर होते.अर्थात बदामीकरही रुचकरच.

लग्नात मिळालेले निर्लेप, सॅलड बाउल,घड्याळं मला माहेरी गेले की अजूनही 'अगं हे घर आवरताना मिळालं' म्हणून देण्यात येतात.हल्ली मात्र आम्ही 'आहेर आणू नये' सूचना दिसली की अगदी व्यवस्थित पाळतो आणि लाखमोलाच्या शुभेच्छा देऊन जेऊन परत येतो.'आमचं ट्रॅफिक मधलं पेट्रोल हाच तुमचा आहेर समजावा' वगैरे Happy

एखाद्या लग्नाला जाताना मी निमंत्रण पत्रिका बघून घेतो. त्यात खाली 'आहेर व पुष्पगुच्छ आणू नयेत' ही ओळ नसेल तर मी पेनाने ती लिहून मग जातो. Wink
(कणेकरी आयडिया)

अहो मंड ळी लग्नातले किस्से त्या बाफ वर लिहा नं इथे वेडिग प्लॅनर व समारंभ कसा करायचा हेच लिहायचे आहे. नववधू तर्फे विनंती.

इथे सासरची मंडळी मध्यप्रदेशातील असल्याने आहेर नको वगैरे मान पान नको वगैरे नवे सुधारक पुणेरी विचार इथे चालणार् नाहीत असा अंदाज आहे. मान पान ह्याला एक वेगळा प्लॅनर माणूस नेमून त्याकडे ती जबाबदारी द्यावी जसे इथले जिजू.

Pages