
लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..
सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..
1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी
इथे सगळ्या ताईबाई परत लग्न
इथे सगळ्या ताईबाई परत लग्न करायचा विचार करतायत..>>>>
खूप आवर घालावा लागतोय मनाला, त्यात दिवाळी येतेय..
ते सोनचाफा चं पान बघुन तर इतकी खाज सुटलि आहे बोटांना लॉल...
दोन्ही साड्या सुंदर अमृता.
सोनचाफाची ज्वेलरी अतिशय पातळ
सोनचाफाची ज्वेलरी अतिशय पातळ आहे. पत्रा असावा अशी. आत्ताच एका मैत्रिणीने $१०० मध्ये काय काय ऑर्डर केलं. You get what you pay for हेच खरं.
@माझेमन खूप खूप धन्यवाद.
@माझेमन खूप खूप धन्यवाद. सगळ्या लिंक्स पहिल्या व नोट केल्या. पण थीममध्ये साडी नाही असे सांगितले आहे. मी ड्रेसच शोधत आहे, एक इथे घेतला आहे. पण तरी मला डाउट होता की नक्की हल्ली काय घालतात ? म्हणजे सेलेब्रिटीची फोटो व्हिडिओ वगैरे पाहिलेत पण साधारण आपल्यासारख्यांच्या लग्नात काय ट्रेंड आहे. मी ओव्हरवेट ही आहे त्यामुळे जरा फ्लॅटरींग ड्रेसेसच्या शोधात आहे.पण etsy वरचे ड्रेस आवडलेत. ऑरगंझा साडी पण सुंदर. थँक्स परत एकदा
सोनचाफाची ज्वेलरी अतिशय पातळ
सोनचाफाची ज्वेलरी अतिशय पातळ आहे. पत्रा असावा अशी.
>>>>>
हो का? मी एक ऑक्सडाईज्ड मंगळसुत्र, दोन कानातले घेतले होते. आणि एक नाजूक मण्यांचा हार मला गिफ्ट मिळाला होता. फारसा हेवी स्टफ घेतलाच नव्हता त्यामुळे मला समजलं नाही. परत रेकमेंड करणार नाही कुणाला.
सोनचाफा ज्वेलरीचा आमचा अनुभव
सोनचाफा ज्वेलरीचा आमचा अनुभव चांगला आहे. नणंदेने साबांना एक नेकलेस कानातले सेट दिलाय, तो खूप छान आहे. कुंदन/खडे टाईप. कानातले झुंबर/झुमके आहेत तेही चांगले वाटले. बाकी १ ग्रॅम चा वगैरे अनुभव नाही. सायो म्हणते आहे ते बहुतेक १ ग्रॅम चं असावं.
पुण्याचे आद्या ज्वेलरी ओव्हर
पुण्याचे आद्या ज्वेलरी ओव्हर रेटेड आहे..डिझाईन्स सुरेख आहेत आणि आधि किम्मती पण ओके होत्या.
माझ्याकडे आद्या चे सिंगापूर वाल्या ब्रांच चे काही दागिने आहेत.पण आता ब्रँड च्या नावाखाली काय पण लुटालुट चालु झालेली आहे. तशाच डिझाईन्स आता कस्टमाईझ करून पण मिळू शकतील. मूळ किम्मत मुद्दाम ४ हजाराला छोटेसे चांदीचे कानातले, मग सेल म्हणुन ३८०० ला लावलेले पाहिले.
१ चांदीचा तन्मणी पेंडंट मंगळसुत्रात, १३ हजारा ला लावला होता. मग लोकल एरियातून सेम तसाच बनऊन घेतला निम्म्याहून कमी किमतिला पडला.
शिवाय सायली राजाध्यक्ष वगैरे..साधीशी कॉटन साडी जराशी जर लाऊन वगैरे ८-१० हजारांना विकतात ब्रँड म्हणुन.
सो दागिने घेताना जरा सांभाळून.
(ईथे कुणी असेल त्या त्या ब्रँड चे तर हे माझे पर्सनल ओपीनीयन आहे असे समजावे)
शिवाय सायली राजाध्यक्ष वगैरे.
शिवाय सायली राजाध्यक्ष वगैरे..साधीशी कॉटन साडी जराशी जर लाऊन वगैरे ८-१० हजारांना विकतात ब्रँड म्हणुन.>> डिझाइन सेन्स नाही तिला आजिबात. काहीही कुठेही चिकटव ते फक्त.
प्र९, हो, १ ग्रॅ. बद्दलच
प्र९, हो, १ ग्रॅ. बद्दलच म्हणते आहे. मैत्रीणीने तेच ऑर्डर केलं होतं.
बाकी दागिन्यांचा अनुभव नाही.
आद्याच्या किंमती काहीही आहेत. त्यामानाने मोहा किंचीत स्वस्त आहे पण चांदीची ऑक्सिडाईझ्ड ज्वेलरीवाले भरपूर आहेत.
इतका ओसाड का केला धागा पाच
इतका ओसाड का केला धागा पाच दिवस, संपली काय शॉपिंग? - https://youtu.be/0_jqfezGhjI हे घ्या इअररिंग इन्स्पिरेशनसाठी
झाले का लग्न? दसरा शुभ
झाले का लग्न? दसरा शुभ मुहुर्त होता.
रेजिस्टर करा, आणि सगळे पैसे
रेजिस्टर करा, आणि सगळे पैसे म्युच्युअल फंडात टाका
बन्या, तुम्ही पण असेच केले
बन्या, तुम्ही पण असेच केले होते का? तुमच्या फॅमिलीत सगळ्यांनी असेच केले का?
लग्न फेब्रुवारी मध्ये आहे ना
लग्न फेब्रुवारी मध्ये आहे ना? वेळ आहे अजुन तसा बराच तयारीला.
हो लग्न February मधे आहे..घरी
हो लग्न February मधे आहे..घरी काही महत्वाचे काम आल्यामुळे शॉपिंग सद्या बंद आहे.. लग्नाची खरेदी झाली की टाकते इथे..
सीमंतिनी खूप सुंदर कानातले
सीमंतिनी खूप सुंदर कानातले आहे आणि गाणं पण मस्त..
तुमची शॉपिंग झाली नसेल तर एक
तुमची शॉपिंग झाली नसेल तर एक लेहंगा पाहून घ्या. छोट्या फंक्शनला शोभेल.
https://odette.in/products/sky-color-lehenga-choli?variant=3930998613612...
काय झालं मग?
काय झालं मग?
Pages