लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by जेम्स बॉन्ड >> Lol Lol बोलते हो मी तिकडे सुद्धा.. पण तिकडची स्वारी स्वतःच जास्त बिझी असल्यामुळे ही शंका खर तर मला यायला लागलीय आता Wink

मग तर उपायच खुंटले. आता काय बोलणार. जाचु द्या तुम्ही तसा विचार नका करु (पर्वा इल्ले. डोमा बाहुली आणी कपाळावर हात मारणारी सुद्धा)

Submitted by जेम्स बॉन्ड >> Lol ये ऑफिस जान लेके मानेगा kind of झालंय आजकाल सगळ्यांचं..त्यामुळे कितीही इच्छा असली तरी हे गोड गुलाबी दिवस लवकरच संपून वास्तविक दुनिया दिसायला लागते तरी बघू अजून किती दिवस ही नवलाई टिकवता येते तर Happy

खूप दिवसांनी ह्या धाग्यावर आले. शुभेच्छा दिल्या आहेत वाटतं... असतील तर परत एकदा घे ... धागा वाचून आपल्या कुटुंबातलंच लग्न असल्यासारखं माबोकरांना वाटतंय पाहून मौज वाटली....
मी म्हातारी ह्या बाबतीत ढ, अडाणी (इथल्या सुचवण्या मात्र खूप एन्जाॅय करतेय)फार काही सुचवू शकत नाही पण एवढं नागपूर कार्यस्थळ ठरलं तर पराते सभागृह अजिबात घेऊ नको २०१९ फेब चा ताजा अनुभव आह. सध्या नागपुरात राहात नसल्याने फार काही माहिती नाही पण कोराडीला खूप छान, सर्वसोयीनेयुक्त कार्यालय निघालंय ... ही ऐकीव माहिती!
छान तुझ्या मनासारखं कार्य पार पडण्यासाठी शुभेच्छा!

छान तुझ्या मनासारखं कार्य पार पडण्यासाठी शुभेच्छा!

Submitted by मंजूताई >> thank you मंजुताई
ते पराते सभागृहाचं लक्षात ठेवेन Happy

लग्नाचे कपडे तरी स्वतःच्या पैशाने खरेदी करावे आणि बाबांना जरा कमी त्रास व्हावा ही अपेक्षा>>> किती विचारी आहेस Happy

अनू म्हणते तसे काआआआही काऴजी करू नकोस. सर्व मस्त छान आणि गोड गोड होइल. एंजॉय दीज डेज .

ओनियन कलर लेहेंगा किती सुंदर आहे.
हा धागा आणि त्या वरील लींक पाहिल्या तर माबो वर मिरॉ च्या अ‍ॅड्स येत आहेत आता सतत Sad

अमृता खूप खूप अभिनंदन !!!
खूप छान सल्ले देत आहेत सर्वजण. सर्वानुमते,, योग्य ते निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा...

रच्याकने, अनुने सुचविलेले कलेक्शन वेळ काढून पाहणार आहे. ( सध्या नेट स्लो आहे घरी )

अनु तुम्ही दर्शन रावल च न्यू साँग पाहिलं का? तेरा नाम अस काहीतरी आहे.. लग्नावरच आहे मला इथे लिंक देता येत नाहीये त्यात तिने yellow lehnga घातलाय खूप सुंदर आहे तो..मला तसा कपडा असलेला plain skirt वाला lehnga हवाय मी खूप online sites वर चेक केलं पण तसा similar नाही भेटत आहे तुम्ही एकदा पाहा ना ते song Happy
तुम्ही लिंक दिलेला lehnga पण खूप सुंदर आहे पण त्यात yellow colour नाहीये वाटतं मला आता हळदी साठी पाहिजे त्यामुळे yellow हवाय

अमृताक्षर, त्यातल्या त्यात हा आहे जवळ जाणारा.पण ब्लाउज ची तशी फॅशन नाहीये.
चंदेरी किंवा सिल्क गोल्डन यलो लेहंगा म्हणून सर्च कर
https://www.ajio.com/aks-checked-lehenga-choli-set-with-dupatta/p/461367...

अमृताक्षर, त्यातल्या त्यात हा आहे जवळ जाणारा.पण ब्लाउज ची तशी फॅशन नाहीये.
चंदेरी किंवा सिल्क गोल्डन यलो लेहंगा म्हणून सर्च कर
हा मस्त आहे एक

https://www.perniaspopupshop.com/sanya-gulati-mustard-yellow-embroidered...
https://www.nykaafashion.com/aks-yellow-gold-foil-printed-lehenga-choli-...

https://www.ajio.com/aks-checked-lehenga-choli-set-with-dupatta/p/461367...

Thank you अनु तो ajio वाला स्कर्ट छान वाटतोय मला वाटतं स्कर्ट आणि टॉप वेगवेगळे घ्यावे लागेल एकत्र पाहिजे तसे मिळणार नाही.

पुण्यात असशील तर कॅम्प - clover center मध्ये हवे तसे ब्रायडल ड्रेसेस/लेहेंगे शिवून मिळतात.

Submitted by ए_श्रद्धा >> सद्या नाहीये पुण्यात पण लवकरच जाणार आहे..पुण्यात शॉपिंग खूप परवडेल..चांगल्या वस्तू आणि वरायटी जास्त..कॅम्प कडे पण चक्कर टाकून येईन

Submitted by mi_anu >> wow तो Myntra वाला orgenza फॅब्रिक स्कर्ट मस्त आहे तसा छान दिसेल फ्लोरल print skirt आणि plain blouse त्यावर..

स्वगत:
असा अभ्यास कॉलेज नि नोकरीत केला असता तर... Happy

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ! Happy

ह्या सर्व चर्चांमधून आणि लग्न होई पर्यंत एवढा अनुभव पाठीशी येईल की 'अमृतानुभव' ग्रंथ लिहायला हरकत नाही नंतर! Wink Light 1

खूप खूप शुभेच्छा अमृता.. तुझ्या मनात असेल ते सगळं तुला मिळू दे..
इतके दिवस फक्त वाचत होते.. आज वेळ काढून अनु ने सुचवलेले सगळे लेहंगे बघतेय.. किती सुंदर सुंदर रंग आहेत..

अमृतानुभव' ग्रंथ लिहायला हरकत नाही नंतर! Wink Light 1

Submitted by कृष्णा >> Lol मला डायरी लिहायची सवय आहे त्यात भर म्हणून मी आता एक वेगळी डायरी बनवली आहे ज्यात तो भेटला त्या दिवसापासून तर लग्नापर्यंत चा सगळा प्रवास वेळ मिळेल तसा लीहतेय (सगळ्यांनी म्हंटल्या प्रमाणे लग्न जुळणे आणि लग्न होणे या मधील दिवस फारच सुंदर असतात तर वाटले आपल्या शब्दात जमेल तसे लिहून ठेवावे) त्यात आठवणी म्हणून पहिल्यांदा भेटू तेव्हाचा आणि लग्नाचा वगैरे फोटो पण लाऊन ठेवणार..
ही wedding diary म्हणजे खरचं अमृकी शादी की बखर असू शकते Wink
शुभेच्छा साठी thank you Happy

खूप खूप शुभेच्छा अमृता.. तुझ्या मनात असेल ते सगळं तुला मिळू दे.. >> thank you इथल्या इतक्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोबत आहेत तर सगळ एकदम सुरळीत पार पडेल याची खात्री आहे.. मी एक वेगळा धागा काढून माझी शॉपिंग आणि साखरपुडा लग्नाचे फोटोज् आणि किस्से टाकणार आहे..लवकरच..आणि धाग्याच शीर्षक असेल #अमृकीशादी Wink

Submitted by MazeMan >> पाहतेय सगळ्या साईट्स.. इथे मला शॉपिंग ला मदत करणाऱ्या मुलीकडील सगळ्या नातेवाईकांचे खूप आभार Happy सगळी शॉपिंग झाली की फोटोज् टाकेन इथे

Pages