लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुक वर रेडिमेड रुखवत करून देणारे बरेच आहेत. एक सजविलेले रुखवत टेबल होउन जाउ द्या.

Submitted by अमा >> शोधते आता रुखवत वाले thank you..

अमृताक्षर अभिनंदन..! >> धन्यवाद Happy

वर सगळ्यांनी छान सल्ले दिलेत ते तुम्हांला कामी येतीलचं.. पण लग्नाच्या तयारीत तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका कारण घरातलं लग्नकार्य म्हटलं म्हणजे खूप धावपळ असते, त्यामुळे शारीरीक थकवा येतो. लग्नाची खरेदी लवकरच सुरु करा. लग्न किंवा साखरपुडा होण्याच्या दोन-तीन दिवस आधी छान झोप घ्या कारण नंतर एकदा का लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले की, कामाच्या,पाहुण्या- रावळ्यांच्या गडबडीत झोप आणि आराम ह्याचं खोबरं नक्कीच होणार..

कार्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बाहेर उन्हात फिरणं टाळा. >> हो हे खरं तर सगळ्यात महत्वाचं आहे आणि नवरी मुलगी लग्नाच्या आधी आजारी पडताना खूप वेळा पाहिलं आहे मी.. इतक्या मायेने मला काळजी घ्या सांगतात मस्त वाटतंय नक्की लक्षात ठेवेल हा मुद्दा..

बाकी घरचे सांभाळून घेतीलच..!

शुभेच्छा तुम्हांला आणि हो .. लग्नाला बोलवा..!! >> होय पत्रिका टाकणार आहे मी इथे.. सगळ्या माबोकरांना यायचं आहे Happy

Submitted by रूपाली विशे - पाटील

एकदा जमल्यास मस्त मिनीमल मेकप,नऊवारी रेशमी 25000 वगैरे वाली पैठणी,ढेपे वाडा किंवा फोर्ट जाधवगडला(म्हणजे घर रिनोव्हेशन विसरा), आधी आकाशापर्यंत फ्लो होणारा वन पीस गाऊन घालून फोटोशूट वगैरे करून परत एखादे लग्न(माणूस तो च ठेवून) करावे की काय >>>
अगदी अगदी
यावेळी सुरेख ट्रॅडीशनल बनारसी शालू चालेल मला. काय सुचलं मला त्यावेळी मी नेटची डिझायनर साडी (अहोंच्या भाषेत मच्छरदाणी) नेसली होती रिसेप्शनला.

अभिनंदन अमृताक्षर Happy
लग्नात तुम्ही शक्यतो natural makeup करा.
आपल्याला जास्त makeup ची सवय नसते आणी खुप केला तर आपण कोण तरी दुसरेच वाटतो.

अमृताक्षर अभिनंदन!
सगळे सल्ले छानच आहेत आणि तुम्ही लग्न एंजॉय करा. पण स्वत:ची काळजी घ्या. मेडिकल चेकप, फायनान्शिअल प्लानिंग हेही किमान बेसिक बोलून घ्या. आवडीनिवडी, करिअर, पुढे शिकायचं असेल तर ते हे आधीच सांगितलं असलं की बरं असतं.
आणि मुख्य म्हणजे, ब्रायडल तयारी, मेकप वगैरे मध्ये 'स्वत:ला' विसरू नका. म्हणजे खरेदी करताना निवड करणं, खाण्यापिण्याच्या सवयी हे एकमेकांच्या सहवासाने किंवा खरंच मनापासून बदलावंसं वाटणं खूप छान आहे, पण हे लगेच जमत नसेल तर अट्टाहासाने करू नये शक्यतो.

मी नव-याला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला पुढे शिकायचं आहे, सगळा स्वयंपाक येत नाही पण थोडी आवड आहे तर शिकेन जमेल तसं, नोकरी सोडणार नाही वगैरे अगदी सहजपणे सांगितलं. त्याची हरकत नव्हती. साखरपुडा झाला आणि तो पुन्हा अमेरिकेला गेला. सुटीसाठी आला होता तेव्हा ठरलं आमचं लग्न.
मग साड्या घेताना तो नव्हताच, दोन्ही घरची सख्खी मंडळी होती. माझा शालू सासरी कोणाला फारसा आवडला नाही, पण मला जामच आवडला होता. मी तो घेऊ नये असा आग्रह त्यांनी केला, पण मी दुसरं काही बघितलं नाही. मग कोणी ताणलं नाही. पण प्रत्यक्ष लग्नात अनेकांनी 'वेगळं आणि सुरेख डिझाईन आहे.' असं म्हटलं तेव्हा मग ते पटलं. पण ही गोष्ट वरकरणी किरकोळ वाटली तरी मला आयुष्यभर समाधान देणारी आहे. मी तो शालू अगणित वेळा हौसेने नेसले.

अमृताक्षर , तिकडे कां पो वरची मजा वाचली.
अभिनंदन आणि शुभेच्छा ! मस्त enjoy करा लग्न समारंभ , इथे फोटो ही दाखव सगळे.
रच्याकने, तू आणि तुझा भाचा दोघे ही मस्त दिसताय तिकडच्या फोटोत.

आपल्याला जास्त makeup ची सवय नसते आणी खुप केला तर आपण कोण तरी दुसरेच वाटतो.

Submitted by अमुपरी >> हो माझ्यासोबत तर असच होत मला अजिबात मेकअप चांगला नाही दिसत..

Submitted by प्रज्ञा९ >> धन्यवाद तुमचं अगदी पटलंय लग्न म्हंटले की सासर माहेरची मंडळी वेगवेगळी मते देतात प्रत्येक बाबतीत सगळ्या बाबी जुळत नाही आणि कधी कधी सगळ्यांची मन जपताना आपली आवड निवड जपली जात नाही पण मी जमेल तितकं सगळ एन्जॉय करायचं प्रयत्न करेल आणि शॉपिंग तर नक्कीच स्वतःच्या आवडीनुसार करेल..

अमृताक्षर , तिकडे कां पो वरची मजा वाचली.
अभिनंदन आणि शुभेच्छा ! मस्त enjoy करा लग्न समारंभ , इथे फोटो ही दाखव सगळे.
रच्याकने, तू आणि तुझा भाचा दोघे ही मस्त दिसताय तिकडच्या फोटोत.

Submitted by मनीमोहोर >> धन्यवाद मनीमोहोर
मी तुमच्या उकडीच्या मोदकांची खूप मोठी फॅन आहे मी एक दोन वेळा प्रयत्न देखील केला पण तुमच्या इतके सुंदर मला कधीच जमणार नाही वाटतं..तुमच्या एक मोदकांचा फोटो मी save करून ठेवलाय Happy

अमृताक्षर,
आयुष्यभराच्या आठवणी, लग्नात सगळं छान व्हायला हवं यासाठी प्रयत्न नक्की करा पण त्या सगळ्याचा स्ट्रेस घेऊ नका. तुमच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम बघा गडबड गोंधळ होऊनही पुढे कसं सुरळीत झालं. तसंच लग्न समारंभातही काही वरखाली झालं तर ते कांदेपोहे समारंभासारखं हसतखेळत घ्या.

बाकी तुमची अवस्था बघून या ओळी आठवल्या

मैं देखू .....जो तुझको..... तो प्यास बढे
तू रोज..... तू रोज..... दो घुंट चढे....

पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा!

अमांनी सांगितलंय तसं हनीमूनला नाजूक साजूक चपला टाळच बाई. मस्तपैकी स्निकर्स घे. थंडी असेल तेव्हा, त्यामुळे कंफर्टेबल पण होतील.
मुळात लग्नात कपडे, चप्पल, हेयर accessories वर अति खर्च टाळावा. नाही म्हणजे लग्न एकदाच होतं, पण त्या गोष्टीही फार वेळा वापरून होत नाहीत.
वजन कमी होत नसेल तर आटोक्यात ठेव. कमी करायच्या नादात फास्टिंग वगैरे करू नको. ऐन लग्नात विकनेस येतो कारण खूप काम करायचं असतं आपल्यालाही. माझ्या लग्नाची सगळी खरेदी मीच केली. शेवटी लग्नाच्या ४ दिवस आधी सलाइन लावून घ्यावं लागलं. प्रचंड थकवा आणि low bp. काळजी घे.

अजून एक
हनिमून आणि इन जनरल 'जोडवी,लग्नातलं मंगळसूत्र, चुडा हे काढू नये, अशुभ सूचक असतं.' असं ज्येना आणि नातेवाईक अगदी निक्षून, डोळे वटारून, घोळात घेऊन घेऊन सांगतील.त्यांना गोड हसून हो म्हणून हे विचार बाहेर निघताना दाराच्या मागे ठेवून देऊन व्यवस्थित चोरीमारी, धोका होणार नाही असे खोटे मंगळसूत्र, नो चुडा(पाहिजेच असल्यास एखाद्या ब्रेसलेट ला चुडा म्हणता येईल मनात, आणि इकडे तिकडे भरपूर चालता फिरताना पायात जखम होऊ नये, काचू नये म्हणून जोडवी काढून, नीट कम्फर्टेबल शूज घालून वावरावे.(कॅनव्हास किंवा स्पोर्ट शूज चा कम्फर्ट चांगला, पण समुद्र किंवा पावसात जाणार असल्यास भिजलेले शूज पुढे तासनतास वाळणार नाहीत आणि पायाला थंडी वाजत राहील.एक फ्लोटर टाईप टिपिकल रबरी अँटी स्किड रेनी शूज बरोबर असलेले बरे.)

कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळता आले तर बरे(घरात जेवणं 2-3 ला होतात म्हणून न खाता थांबणे, झेपत नसताना तिखट खाणे इत्यादी).
या सवयीं कॅरी ओव्हर होतात.
(हे सर्व मी आजूबाजूला घडताना पाहते.लेडीज रूम मधला संवाद :"शादी से पहले जो करियर ग्रोथ करना है, जहां घुमना है घुम ले.बाद मे जिंदगी अपनी नहीं रहती.झंड हो जाती है.") 'लग्नापूर्वी' आणि 'लग्नानंतर' असे आयुष्याचे दोन क्लिअर आणि विरुद्ध भाग बनू नयेत, नाईलाजाने बनत असले तर ते चांगल्या प्रकारे एकत्र/शेजारची स्टेशने बनवण्यासाठी काय करता येईल विचार करत रहावा.
(या धाग्यावर जरा सिरीयस झाले.पण असे नंतर अजिबात सस्टेन न करता येणारे चक्रम कॉम्प्रो प्रेमा खातर सुरुवातीला मुलगा मुलगी दोघे करतात.)

अनु +१
ते स्वत:ला विसरू नका म्हणताना हेच सगळं होतं डोक्यात, मोबाईल वरून लिहीपर्यंत पेशन्स संपले Wink

अजून एक सल्ला.

मुलाकडची मंडळी समंजस आहेत हो....अशा वाक्याने सुरुवात करून मग नंतर कुचाळक्या सुरू करणा-यांपासून लांब रहा.

इथला एक आय डी आहे वल्लरी म्हणून
ती फार सुंदर साड्या विकते तिचं फेबु पेज ही आहे
किंमती अगदी वाजवी आणि कलेक्शन भयंकर सुंदर आणि वास्ट
सो एकदा हवे तर तिच्याशी ही बोलून बघ...

माझ्या बाबतीत हे "लग्नापूर्वी आणि नंतर" पार्टिशन ठळक दिसतं पण अनेक बाबतीत परिस्थिती कारण ठरली आणि अनपेक्षित वळणं घेत आम्ही सगळेच काही ना काही तडजोडी करत पुढे आलोय. पण पुढे शिकायचं हे अजूनही चमकून जातं मनात आणि नवरा अजूनही या गोष्टीला पाठिंबा देतो.
असो. आता थांबते.

रुखवतात मांडा यचे जुन्या पद्धतीचे पदार्थ व वस्तू:
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या
४) किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
५) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.

६) सप्तपदीची वचने लिहि लेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले.
अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे. ह्याचे मला फार फार नवल वाटे कसे करतात हे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
हे मी अगदी सत्तर च्या दशकातले सांगते आहे आता अजून नवे प्रकार आहेत.

लग्नाची बाकी पूर्वतयारी होत राहील आणि घरातले अनुभवी लोक ते सांगतीलच. पण मुख्य तयारी तुमची मानसिक आहे, जी तुमची तुम्हालाच करायची आहे. त्यामुळे भरपूर वेळा जमेल तसे भेटा. Happy

आत्या काकी मावशी ह्यांना मंगला श्ट्के लिहायच्या ड्युटीला लावा.

दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस तयार करा. चांगल्या क्वालि टी ची प्रसाधने घ्या नायका साइट वर मिळतील. व बेसिक मेक अप शिकून घ्या. पहिले वर्श भर अनेक सण समारंभ न नॉर्थ मधील सासर आहे तर मुंह दिखाई वगै रे प्रसंग असतील तर सारखे तयार व्हावे लागेल. त्या मानाने तयारी करा.

पहिल्या वर्शात जे सण येतात त्याला ब्राइड ला माहेर कडून काही काही देतात. तर सर्वच दागिने लग्नातच घेउ नका आई बाबांना सांगा असे दहा बारा बारके सेट ची जुळणी करा जे प्रत्येक सणाला देता येइल म्हणजे बजेट मध्ये राहील. ( हा आमचा मराठी मध्यम वर्गीय विचार आहे )

पत्रिका टाकणार आहे मी इथे.. सगळ्या माबोकरांना यायचं आहे
>>> सही... मायबोलीकर गटग होईल मस्त...
अभिनंदन तुम्हाला आणि MP मध्ये जाताय तर पोहा आणि जलेबी शिकून घ्या..सासरच्यांना खुश करायला ( जमत नसल्यास बाहेरून विकत आणून) बरी पडेल...

सगळेजण छान सल्ले देत आहेत
अमा, तुमच्या पोस्टी फारच cute आहेत
मला असं कुणीतरी हवं होतं सांगणार, असं वाटत आहे. काही गोष्टी आधी समजल्या असत्या तर आणखी व्यवस्थित handle झाल्या असत्या. आता हा धागा म्हणजे छान documentation आहे. लग्नाळू मंडळी साठी Happy

मला असं कुणीतरी हवं होतं सांगणार, असं वाटत आहे. काही गोष्टी आधी समजल्या असत्या तर आणखी व्यवस्थित handle झाल्या असत्या. >> धन्य वाद अहो मला ही असे कोणी तरी हवे होते. व आता मुलीची आई म्हणून हळू हळू तयारी चालू आहे. अजून दोन ती न वर्शे आहेत. पण् जुळणीस वेळ लागतो.

मिपा वर एक धागा आहे. एका गुरुजींनी लिहिलेला. दोन तीन वर्शा पूर्वी लिहिला असेल. त्यात फुलांची सप्तपदी कशी घालायची ते डिटेल वारी दिलेले आहे फोटो सहित. ते ही बघोन घ्या नवलाईचा प्रकार आहे.

सध्या कन्यादान ऐवजी कन्यामान हा एक नवा प्रकार सुरू आहे. मला जास्त माहिती नाही. पण सर्च करून लिहिते. काय काय विधी करायचे ते पण आधी ठरवून घ्या .

इथले सगळे मुद्दे वाचतेय खूप गोष्टी नव्याने माहिती होत आहे हा धागा माझ्यासाठी खूप मार्गदर्शक ठरणार आहे तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार..अजून येईल तशा सगळ्या पोस्ट वाचून एक wedding list बनवणार आहे ज्यात हे सगळे मुद्दे आठवणीने लिहून ठेवणार (काही विसरून वेळेवर गोंधळ नको व्हायला)
तब्येतीचा मुद्दा जास्त लक्षात ठेवणार..
कामाच्या व्यापामुळे इच्छा असूनही प्रत्येक पोस्ट ला personally रिप्लाय करता येत नाहीये पण सगळ्यांचे मुद्दे अतिशय महत्वाचे आणि नवीन आहेत माझ्यासाठी..
माझी सगळ्यात मोठी आत्या प्रत्येक लग्नात manager असायची वय जास्त असल्यामुळे तिला सगळे रीती रीवाज लग्नात लागणाऱ्या गोष्टी सगळ माहिती होत आमच्या घरी कुणाचं लग्न असेल की ती दोन दिवस आधी जाऊन सगळ्यांना अधिकरवजा सूचना करायची आणि नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी यांची लोखंडी पेटी भरायला मदत करायची त्यात बारीक सारीक गोष्टी असायच्या..तांदूळ सुपाऱ्या.. पण माझं दुर्दैव की तीन महिन्या आधी ती वारली Sad सगळ्यां काका आत्याच्या पोरांची लग्न तिच्या हाताने झाले होते..
पण आज वाटतय ती कमी सुद्धा भरून निघाली इथे सगळे लोक इतक्या सुंदर पद्धतीने इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगत आहे की मला खात्री आहे माझ्या लग्नात कुठलीच कशाचीच कमी भासणार नाही सगळ परंपरेनुसार व्यवस्थित होईलच पण आधुनिक पद्धतीने एन्जॉय पण भरपूर करता येईल ( मला खरच खूप गहिवरून आलंय इथल्या मोठ्या लोकांच्या आपुलकीने सांगितलेल्या पोष्टी वाचून)
Happy
माबोवर असणे म्हणजे खरच एक मोठा परिवार लाभणे आहे.. मी भाग्यवान आहे तुम्ही सगळे माझ्या लग्नाचे साक्षीदार होत आहात..

अमा तुमच्या सगळ्या पोस्टी खूप छान आहेत मी जमेल तेवढं सगळ करेल आणि special thanks त्या सगळ्यांना जे MP मधले रीती रिवाज इथे मला सांगत आहेत कारण त्यांच्याकडच्या लग्नाबद्दल खरच आम्हाला जास्त काही आयडिया नाही त्यामुळे कुठे काही कमी राहून जाईल का ही भीती वाटते सारखी..

मला असं कुणीतरी हवं होतं सांगणार, असं वाटत आहे. काही गोष्टी आधी समजल्या असत्या तर आणखी व्यवस्थित handle झाल्या असत्या. आता हा धागा म्हणजे छान documentation आहे. लग्नाळू मंडळी साठी Happy

Submitted by किल्ली>> मी खूप लकी आहे मला सांगणारे भरपूर लोक मिळाले आहेत जाम भारी वाटत आहे..मनावरचं ओझं कमी झालं एकदम.. Happy

Pages