लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्वालियर ला करा, उषा किरण पॅलेस मध्ये.(अगदी हे नाही, पण हल्ली मोठी हॉटेल्स पण परवडणारी वेडिंग पॅकेज देत आहेत.)
किंवा ताज चंदेला खजुराहो.
चंद्रपूर ला वगैरे चांगली हॉटेल्स आहेत का?
किंवा इंदोर ला.एमपी महाराष्ट्र दोन्ही ला जवळ.

Submitted by mi_anu >> gwalior तर माझे सुद्धा fav आहे तिथे एक खूप सुंदर temple आहे तिथे फोटोशूट करायचा विचार चालूच होता माझा..मागच्या महिन्यात gwalior फिरून आलोय..
देते त्यांना options Gwalior आणि indore

जयपूर, उदयपूर, भोपाळ ... करून वज्रेश्वरी म्हणलं नाही का कोणी? Proud

Submitted by अमितव >> मला तर ते जास्त आवडले असते काय नाहीतर नुसती पैसै उधळपट्टी.. मी तर म्हणत होती घरामागे मस्त प्रशस्त गजानन मंदिर आहे खूप सुंदर परिसर आहे तिथे करू लग्न पण ना माहेरच्यांनी ऐकल ना सासरच्यांनी.. Sad

रागावणारा जावई वगैरे शोधून त्याचा मानपान नीट राहील असे पाहणे.
लग्नात उगाच इकडे तिकडे धावणाऱ्या पोरट्यांना हाणण्यासाठी एक माणूस,
बुंदीवाला तसेच इतर वाढप्यांना मार्गदर्शन करायला बोटांत किमान 3, 4 जाडजूड अंगठ्या घातलेला काका.
मठ्ठा वाढण्यासाठी तांब्या.
येणार जाणार पाहुण्यांना रामराम शमशाम करायला 2 काका लोक टोपी घालून
स्टेजवर चढणाऱ्या लोकांना आवरायला 2 पहिलवान
बामनाच्या तोंडात अक्षता मारणाऱ्या पोरांना अखंड अक्षतांचा पुरवठा होईल अशी सोय
तसेच, तोंडात अक्षता जाऊ नयेत म्हणून बामनाला फेस शिल्ड
ऐनवेळी रडायला आले नाही तर पटकन चिमटा घेणारी/ ग्लिसरीन देणारी मैत्रीण.

परंपरेनुसार लग्न माझ्या गावी व्हायला पाहिजे होत Sad
>>>>>
एखादी परंपरा आपल्या फायद्याची आहे म्हणून ती परंपरेच्या नावाखाली पाळायला जाऊ नका. दूरचा विचार करा. तुमची मुलीची बाजू आहे आणि आपल्या समाजात बहुतांश परंपरा नवरदेवांच्या म्हणजेच पुरुषांच्या बाजूने आहेत. त्यामुळे आमच्याकडे बाई जुन्या परंपरा मानत नाही, आम्ही मॉडर्न विचारांचे आहोत असे डाईलॉग अध्येमध्ये फेकत राहा..आणि स्वत:ला सोयीचे पडेल तेच करत राहा..

नवरीचे घर जिथे असते तिथे लग्न करतात कारण धावपळ करणे व्हेन्यु मॅनेज करणे काँट्रेक्टर व इतर बाबतीत पैसे वाचवणे बेटर डील्स हे मुलीच्या नातेवाइका ना त्यांच्या गावी शक्य असते कारण जुने संबंध असतात मुली कड च्या लोकांनी सर्व उचलून दुसृया ठिकाणी जाउन लग्न लावून द्यायचे म्हणजे ह्या ऑप्शन्स व इज कमी होते. म्हणून ही जुनी परंपरा होती.

माझ्या नणंदेच्या लग्नात आम्ही ह्या बाबतीत चांगलेच गंडलो होतो. हे ट्विन लग्न होते दोघा भावांचे एकातच व त्या मुलीच्या वडिलांनी( हे नागपूरकरच होते) नागपूरलाच लग्न करायचे व सर्व काय काय करायचे वगैरे स्वतः पुढाकार घेउन ठरवले. माझे सासरे वारलेले अहोंना काही अनुभव नाही ह्या बाबतीत व साबा पुण्यात रिटायर्ड लाइफ त्यामुळे हैद्राबाद हून आम्ही गेलो नागपुरास व कार्य पार पडले. ठरवले तसे अहोंनी त्या दुसर्‍या ब्राइड च्या वडिलांना पैसे दिले होते. आम्ही दोघे हैद्राबादला परत आलो तेव्हा काही दिवसांनी त्यांचे पत्र आले त्यात इतर खर्च बोली शिवाय व आमच्या संमती शिवाय केलेले त्याचे आयटम वाइज बिल पाठवले होते. ते आम्ही कसे ही करून दिले पण मग फार काटकसर करावी
लागली कारण तेव्हा माझा पगार १२०० रु व ह्यांचा ४००० आसपास होता.

ज्येना व सासु सासरे एकदम गेस्ट ऑफ ऑनर असल्याने त्यांना कमी त्रास होईल असे ठिकाण निव् डावे. उदय पूर जयपूर कोणाच्याच जवळ नाही त्या मुळे ते रूल्ड आउट आहे. नागपूर खरेच त्यांना फार दूर व तिथे खरेच लग्न उन्हाळ्यात असेल तर फारच गर्मी असते. भोपाळ किंवा फार तर इंदूर बरे पडेल.

इतर नातेवाइक मंडळींना यायला सोपे असे ही ठिकाण निव डावे. म्हणजे जाण्याये ण्याचा तिकिटाचा खर्च व हॉटेलचा खर्च कमी होईल जय पूर उदयपूरला हा खर्च फार होईल.

भोपाळ असेल तर लोकल नातेवा ई क फक्त जाउन येउन हे सोपे पडेल. जिजूंचे मत बघा व पुढे जा शुभेच्छा.

अमा पानभर पोस्टी टाकते तर काही नाही... मी तीन ओळीचा एकदम थेट सल्ला दिला २४तासवर बातमी आली. Wink Happy
फुकटचा सल्ला नं २ - जयपूर तर जयपूर. नवरा, नवरी, भटजी, मेक-अपवाली ताई, नि एक व्हिडीयो तंत्रज्ञ एवढेच जण जयपूरला जाऊन मस्त झोकात लग्न लावा. बाकीच्यांना झूमवर बघू दे. कुठे जयपूरात सगळ्यांच 'रूक्मिणी रूक्मिणी' झेलायचं... Wink
(नवरीने प्रतिक्रिया न देता लाजणे अपेक्षित Wink )

सगळ्यांनी एकदम परफेक्ट सल्ले दिलेत.
सध्याच्या काळात लग्नावर किती मेम्बर असे लिमिट पण आहे ना?त्या निमित्ताने जरा आटोपशीर लग्न करता येईल.

ताई, हा बघा एक पीस... कसा वाटला सांगा...>> मला ताई म्हणू नका Sad मीच उलट तुम्हाला आदराने ताई म्हणायला पाहिजे होत
>> तुम्ही आदराने सी ना ताई म्हणा, त्या वयामुळे तुम्हाला ताई म्हणत आहेत बहुतेक Wink

माझी सुचना तुमच्या उत्साहावर पाणी ओतू शकते म्हणून आधीच माफी मागते. पण याचा जरूर विचार करा.

करोना अजून भारतातून पूर्णतया गेलेला नाही. परत एखादी लाट येण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. प्रवास व लग्न या दरम्यान शेकडो माणसांशी आपला संबंध येतो. अशावेळी डेस्टीनेशन वेडींगसाठी मुद्दाम दुसर्या शहरात तेही ज्येष्ठ नागरीक, लहान मुले घेऊन जाण्याचा धोका का पत्करा?

दुसरं म्हणजे तुमच्या किंवा अहोंच्या शहरात नेमका लग्नावेळी लॉकडाऊन लागला तर जुन्या ओळखी वापरून वेन्यू, केटरर, डेकोरेटर वगैरेशी निगोसिएशन करून सर्विस प्रोवायडर आणि तुम्ही या दोन्ही बाजूंना याचा कमीत कमी आर्थिक फटका बसेल असा मार्ग काढता येऊ शकेल. डेस्टीनेशन वेडींगमध्ये हे पॉसिबल होईल का? करायचेच झाले तर कॉंट्रॅक्टमधे असा काही क्लॉज घालता येईल का ते पहा.

आणि वरचे दोन्ही पॉईंट दोन्हीकडच्या ज्येष्ठांना जरूर सांगा.

Biggrin अहो, रोलची डिमांड... कापड दुकानदार रोल मध्ये होते मग कोण बायांना काकू म्हणतो. नेहमी ताई, मॅडम, दिदी असं असतं.. बाकी चिडवताय मला म्हातारीला ते आलं हो लक्षात...
माझेमन... टू लेट... मी आधीच पाणी ओतून ५ लोकात लग्न करा सुचवलं...

माझेमन+१
वेडींग प्लॅनर, डेस्टिनेशन वेडींग वगैरे साठी बजेट वडील लोकांचे आहे की नवरा/नवरी टॉप अप करणार आहेत हे महत्वाचे मुद्दे आहेत.
आधिच साड्या, मेक अप, ज्वेलरी, हॉल, घोडा, सजावट, जेवण वगैरे मधे अर्धा जीव जातो.
पण सर्व लगीन सराई साठी ऑल द बेस्ट! Happy

Submitted by अमा >> thank you.. घरी discussion चालू आहे लवकरच काहीतरी solution निघेल अशी अपेक्षा.. Happy

फुकटचा सल्ला नं २ - जयपूर तर जयपूर. नवरा, नवरी, भटजी, मेक-अपवाली ताई, नि एक व्हिडीयो तंत्रज्ञ एवढेच जण जयपूरला जाऊन मस्त झोकात लग्न लावा. बाकीच्यांना झूमवर बघू दे. कुठे जयपूरात सगळ्यांच 'रूक्मिणी रूक्मिणी' झेलायचं... Wink
(नवरीने प्रतिक्रिया न देता लाजणे अपेक्षित Wink )

Submitted by सीमंतिनी >> Lol सल्ला चांगला असला तरी लग्न हे नातेवाईकांच्या साक्षीने करावे.. शास्त्र असतं ते Proud
इथे जरी थट्टा मस्करी चालू असली तरी two states wedding मधे असे problems नॉर्मल असतात त्यात दोन्हीकडच्या लोकांचे एकमत होईपर्यंत नवरा नवरी टेन्शन मधे असतात..मग नवरी हुशार असेल माझ्यासारखी तर माबोवर सल्ले मागायला धागे काढते Lol

Submitted by MazeMan >>तुमचे सगळेच मुद्दे माझ्या डोक्यात होते आणि खरं सांगायचं तर मलाच destination wedding मधे interest नाही मुलाने नागपूरला वरात घेऊन यावे आणि सगळ्या नातेवाईकांच्या साक्षीने पारंपारिक पद्धतीने लग्न होऊन नवरीला घेऊन जावे इतकी माफक अपेक्षा आहे पण...इतक्या सहज आपल्याला हवे तसे सगळे झाले तर ते लग्न कुठले! लग्नात गोंधळ गडबड दोन्हीकडील लोकांचे एखाद्या गोष्टीवर लवकर एकमत न होणे हे भारतातील लग्नातील वैशिष्ट्ये आहे नवरा नवरी बिचारे सगळ सुरळीत होण्याची वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नाही

मस्त होनेवाला है सब.लोड नाही लेनेका.लग्न, कॉश्च्युम, डेस्टिनेशन, खाणे हे सर्व नश्वर आहे.नंतरचा संसार, थोडी भांडणं, शनिवार रविवार बँक, दळण, बिलं भरणं,कार आणि टू व्हीलर इन्श्युरन्स रिन्यू करणं आणि मध्ये वेळ उरला तर प्रेम हे शाश्वत आणि अमर आहे Happy

आधिच साड्या, मेक अप, ज्वेलरी, हॉल, घोडा, सजावट, जेवण वगैरे मधे अर्धा जीव जातो.
पण सर्व लगीन सराई साठी ऑल द बेस्ट! Happy

Submitted by aashu29 >> हो ना..आधीच इतका खर्च होतोय की अजून पुढे काय काय होईल काय माहित..एकदाच साड्या ज्वेलरी साठी वाईट नाही वाटत कारण त्या परत परत वापरता येतात पण खूपच महाग wedding vennue खूप सगळी सजावट यावर पैसे उधळताना मन दुखते..
लग्न आमच्या गावी नागपूरला नाही झाले तर लग्नाचा खर्च 50:50 असा करणार आहोत..अर्थात मी आणि नवरा मुलगा आमच्या आई वडिलांना जमेल तितकी मदत करणारच आहोत (थोडी saving आधीच करून ठेवली होती मी atleast लग्नाचे कपडे तरी स्वतःच्या पैशाने खरेदी करावे आणि बाबांना जरा कमी त्रास व्हावा ही अपेक्षा)

Submitted by mi_anu >> देव करो तुम्ही म्हणता तसे सगळे बरोबर व्हावे पण आता खरचं प्रॉब्लेम्स चालू आहेत..काही तोडगा निघत नाही आहे किती दिवसापासून wedding vennue वरच discussion अडकलय.. कधी एकदाच हे लग्न उरकेल आणि आपण आपले रोजचे काम ऑफिस करायला मोकळे होऊ असं झालंय आता तर दोघांनाही.. Sad

तब तक ये लाईट मॉव्ह/ओनीयन कलर का घागरा देखो और खुश हँ जाव
https://www.myntra.com/Lehenga-Choli/Readiprint-Fashions/Readiprint-Fash...

अर्थात हे कपडे प्रत्यक्ष बघूनच घेतले जाणार.ऑनलाईन योग्य साईझ शरारा/वेडिंग साडी घ्यायला आणि मग रिटर्न न करायला एखाद्या फर्जंदाचेच निधडे काळीज हवे.

माबोवरील सुचनांचा अभ्यास झाला असेल तर क्रिप्या करके भावी वराशी अधुन नधुन दोन-चार शब्द बोलुन घेत जा. उगाच मायबोली म्हणजे कोणी सवत (पुलि) आहे असे नको वाटायला तिकडच्या स्वारीला.

Pages