प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९ - पाळीव दोस्त

Submitted by संयोजक on 19 September, 2021 - 07:20

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.

पाळीव दोस्त

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

फार पूर्वी घराच्या खिडकीमध्ये बर्डफिडर टांगला होता.
(आता पक्षांसाठी ते अयोग्य आहे असं कळल्यावर तो काढून टाकला आहे. त्यांच्यासाठी पावसाळ्यानंतर पाण्याची मात्र सोय असते.)
तिथे हे खारीचं आणि पोपटाचं सहभोजन..

Squirrel n Parrot.jpg

किती गोड आहेत इथले फोटो.माऊ आणि आजींचा तर सुंदरच.खार आणि पोपट पण आगळा फोटो.पक्षयांसाठी का अयोग्य आहे?आयतं खाऊन किडे शिकारीचं स्किल नाहीसं होईल म्हणून का?

मस्त फोटो आणि किस्से आलेत ईथे Happy
या गोमैय्याला खरे तर आम्ही पाळलेले नाही. उलट हिच आम्हाला दूध देऊन पाळते. पण जेव्हा केव्हा पुण्य कमवायचे असते तेव्हा हिला थोडा चारा भरवून येतो. अर्थात ही गोठ्यातली आपल्या मर्जीने चारा खाणारी आहे. तरी तिचाच चारा तिलाच भरवतो Happy

1632606481497.jpg

20130928_180234.jpg

जुना फोटो. आम्ही नाही पण कुशला हॉटेल वाल्यानी पाळलेले. छोटी भाची छान खेळत होती ह्यांच्याशी.

आणि हे दुसरे पुण्याचे काम
अर्थात हे देखील आमचे पाळलेले नाहीत. पर दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम म्हणत हे आमच्यापर्यंत आणि आम्ही यांच्यापर्यंत पोहोचतो Happy

IMG_20210926_045512.jpg

IMG-20131113-00615_0.jpg

आम्ही नाही पाळलेल्या. आंबेजोगाईला जाताना भावाने काढलेला फोटो आहे, हाही जुनाच आहे.

हे आमच्या वंदू मावशीच्या घरातील ब्रुनो आणि झिगी.
स्थळ : कोकण,वेंगुर्ला
IMG_20210926_053124.jpg

दोघांनाही माझ्या मावस भाऊ मयुरेशने अडोप्ट केले आणि आधी वैरी सारखे वागणारे दोघे आता एकमेकांसोबत रुळले आहेत.

IMG_20210926_060303_0.jpg

हा ब्रुनोचा क्लोजअप Wink
IMG_20210926_053256.jpg

अय्यो मुभा आणि माऊ एवढे गुण्यागोविंदाने कसे काय राहतात?
अनु बॅटमॅन Lol सगळ्यांचे फोटो छान

सगळेच फोटो मस्तच आहेत.
पिल्लू असतानाचा हा आमचा मोती. आता चांगला बागडत असतो सगळीकडे. कोणी निघालं बागेत की हा पुढे. पावसाळ्यात कोंडी ( खडकात तयार झालेले नैसर्गिक खळगे हे जास्त खोल आणि मोठे नसतात ) पाण्याने भरतात त्यात पोहायला फार आवडतं. मुलांशी लपाछपीचा खेळ खेळण्यात पटाईत झालाय. मोsss ती अशी हाक मारून लपलं की बरोब्बर शोधून काढतो.

IMG-20201012-WA0010.jpg

20210712_210126.jpg

Pages