प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९ - पाळीव दोस्त

Submitted by संयोजक on 19 September, 2021 - 07:20

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.

पाळीव दोस्त

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

निरू तुमचे सगळे फोटो एक से एक असतात. टारझन नाव शोभतंय खरंच त्याला.

बाकी पण सगळे ससुले, माऊई, डाल्मेशिअन गाय, माऊ गोड गोड

हे आमचे पाळीव प्राणी - मंकी (पांढरा बोका) & सॅमी

b3.jpg

चिंचेवर चढून आजूबाजूची पहाणी..

(पहिल्यांदाच आरण्यकला घेऊन गेलो होतो. आणि तिथे हा भराभर पस्तीस, चाळीस फूट वर गेला होता. आम्ही सगळेच भयंकर टेन्स झालो होतो. पण आला सहज खाली परत..)


इथले माऊज चे फोटो प्रचंड हॅन्डसम आहेत.
हा धागा सारखा पाहिला तर एखादि माऊ घेऊनच येईन मी.

हा गाण्याच्या क्लास खालचा भुभु.खूप सालस आणि गरीब आहे.
IMG_20210307_125041_0.jpg

@धनुडी हो थोडीफार काळजी घ्यावी लागते फॅन पासून जपावं लागतं.. माझ्या कडच्या जोडीने 10-15 अंडी दिलेली त्यांचीच ही पिल्लं.. Happy आता स्नोई सारखे मोठे झाले आहेत..
Screenshot_2021-09-20-22-36-25-26_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
.
Screenshot_2021-09-20-22-38-09-41_4949498873baccbde9dc7a221b759985_0.jpg

पावसाळ्यात सोसायटीच्या बागेमधे Stone Pathway वर पहुडलेला टारझन..
अब किसिको वहाँसे आना जाना मना है..।


सगळ्या माऊड्या गोडच, मांजर बघितलं कि मला त्याच्या गालात तोंड खुपसावसं वाटतं खुप लाड करावे
सामो, टारझन नाव आहे.

सगळे पाप्रा खुप छान. एवढ्या लाडाच्या प्राण्यांना कुत्री मांजर म्हणवत नाहीये आदरमोद.
टारझन च नाक मस्त आहे. एवढं लाल नाक कधी पाहिलं नव्हतं मांजराच.

हा  आहे आमचा गुंडू! एकदम लाडोबा आहे. आम्ही खूप पसारा करतो ही गोष्टं त्याला खूप आवडते (म्हणजे असं आम्हाला वाटतं)

WhatsApp Image 2021-09-21 at 3.46.20 PM.jpegWhatsApp Image 2021-09-21 at 3.47.26 PM.jpegWhatsApp Image 2021-09-21 at 3.50.48 PM.jpeg

IMG_9375.jpeg
सामो, मैत्रेयी, धनुडी तुम्हाला निओ आणि ब्लूकडून थँक्यू! हा ब्लूचा आमच्या घरी पहिला दिवस. निओदादाच्या गादीवर बसून त्याच्याशीच मुजोरी करतोय कसा पहा.

Pages