प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९ - पाळीव दोस्त

Submitted by संयोजक on 19 September, 2021 - 07:20

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.

पाळीव दोस्त

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

माऊला साप बीप दिसला का?
मला वाटतं ती घाबरली नसेल.दबा धरण्याच्या पवित्र्यात सावध असेल. समोर एखादा फॅटी न्यूट्रिशीयस पक्षी असेल.

IMG_20210920_172735_0.jpg

3 म्हशी 3 बगळे , नेरळमध्ये दिसले होते.

पुलंचा पाळीव प्राणीमध्ये विनोद आहे. कुणी कुणाला पाळलंय हेच समजत नाही.
Proud

My building catIMG_20210505_073827__01__01__01.jpg

कसले क्युट फोटो आहेत एकेक.

बहीणीची मुलगी परवा तिच्या अंजुमाऊला, मातोश्री माऊ खाऊ का गिळू करत होती तेव्हा कुत्री म्हणाली तिला, हाहाहा. मला एकदन मी अनु आठवली, ती पण तिच्या धाग्यावर रागाने कुत्री म्हणाली होतीना. तो किस्सा मी सांगितला. भाचीबाई आणि मी मग खूप वेळ हसत होतो.

बाय द वे फोटो कधीपर्यंत टाकायचे आहेत. अपने पास बहोत है.

आमचा टारझन..


कसले भारी एक्सप्रेशन देतायत प्राणी एकेक
ते गिनींपिग मला ससे वाटले.
अमांची सोसायटी माऊ थोडी रागात वाटतेय.
मी इथला पाळीव प्राणी धागा वाचून मांजरीला कुत्री म्हणणं सोडून दिलं Happy

अमांची सोसायटी माऊ थोडी रागात वाटतेय.... बोका असावा.गोल गरगरीत तोंड आणि बिलंदर भाव.
टारझन,त्यामानाने मऊ दिसतोय.
नवीं पिल्ले मस्तच.
2 दिवसांपूर्वी ग्रिलामध्ये कबुतर, नेट खालून यायचा प्रयत्न करत होते .त्यावेळी मी म्हटले काय कुत्रं घुसायचा प्रयत्न करतेय.मग अनुच्या धाग्याची आठवण होऊन हसायला आले.

अईग किती क्युट माऊ सगळी, केयाचं माऊ पांढरं शुभ्र सशाला सारखं आहे. सामो गिनी पिग्ज मला पण ससेच वाटले.
अमांची सोसायटी माऊ थोडी रागात वाटतेय.>>+११
जुई तुमचा स्नोई क्युट आहे. मोकळा असतो का? जपावे लागत असेल आजूबाजूच्या मांजरापासून.
माऊई कसला गोड आहे. निओ, ब्लू पण मस्त.
आणि आता माझ्या हिरोची एन्ट्री " टारझन "ला मुआ खुप साऱ्या पाप्या. त्याचं गुलाबी नाक कसलं गोड आहे.

Pages