प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९ - पाळीव दोस्त

Submitted by संयोजक on 19 September, 2021 - 07:20

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.

पाळीव दोस्त

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

IMG_20210922_225725.jpg

सध्या आईच्या फोन मध्ये आमच्या माऊचा हा एक फोटो भेटला तो इथे टाकत आहे.
माझा फोन कोमातून बाहेर आल्यावर अजून फोटो टाकेन.

बापरे
धीट माऊ आहे
नंतर मार पडला असेल देव्हाऱ्यात गेल्याने.

परवाच टाकल्याने हाताशी होता हा फोटो. हा आमचा कॉकटील चिकू.
कॉकटील्स हे आपल्या देशी पोपटाचे (रिंगनेक पॅरटचे) ऑस्ट्रेलियन चुलतभाऊ.
यांना पक्ष्यांतले कुत्रे समजतात कारण हे फार सोशल असतात.

IMG_4104.jpg

धन्यवाद. हल्लीच दिरांनी फोटो पाठवलेला. खूप माऊ आहेत अजून. ह्या एकसारख्या मीही पहील्यांदा बघितल्या.

सिंबा कसला आहे.

सिंबा नाव मला जाम आवडतं, माझ्या चुलतभावाकडच्या भु भुचं होतं.

कॉकटेल चिकू भारी.

भक्तीमग्न माऊ वाह.

नंतर मार पडला असेल देव्हाऱ्यात गेल्याने.
Submitted by mi_anu >>>
छे ओ.. सर्व मांजरे मातोश्रीचे लाडके असल्याने काय कोणाची हिम्मत की त्यांच्यावर हात उचलणार.
या फोटोत असलेली कॅप्टन आजारपणामुळे गेल्या वर्षी देवाघरी गेली.
बाकी तिन्ही पिल्ले अजूनही देव्हाऱ्यात जातात.
पण बत्ती चालू असली की जात नाहीत.
मम्मी देवपूजा करत असली की गप्प बसतात.
नंतर मग मस्ती चालू.

IMG_20210924_005725.jpg

वय: दोन वर्षे
बसण्याच्या आवडत्या जागा - कोणत्याही प्रकारचा डब्बा, बेसिन, आणि सर्वात आवडती जागा म्हणजे दादाचा लॅपटॉप :|

क्यूट आहे कॅप्टन ...
आमच्या वेडूला पण प्लॅस्टिक पिशवीत, ब्राऊन बॅग मधे किंवा चादरीच्या खाली जाऊन बसायला आवडतं.

IMG_7232.JPG

नाही गं अनु प्लास्टिक च्या पिशवीत जाऊन बसायला खुप आवडतं मांजरांना. खेळतात खुप.
वरची मांजरं आणि ससू गोडDSC01134_1.JPG

बापरे, पण प्लास्टिक बॅग मध्ये वगैरे जाणं धोकादायक आहे.>>>>>>>>>>>> हो मला पण वाटतं तसं मी नेहेमी असते त्यामुळे माऊजवळ, जनरली ती ग्रोसरी आणली की लहान मुलांसारखं चेक करायला येते काय काय आणलं Proud आणि पिशव्या रिकाम्या केल्या की आत जाऊन बसते. ५-१० मिनिटं बसू देते मग काढते बाहेर Happy

कावळा हा प्राणी (पक्षी पक्षी) पाळीव असतो की नाही हा वादाचा विषय..
पण मला प्राणी पाळायला आवडतात (किंवा आपलेसे करावे वाटतात) ते त्यांची नैसर्गिक परिस्थिती शक्यतो न बिघडवता. म्हणजे बंदिवान करुन नाही. थोडंस खाणंपिणं ठीक आहे..
आमचे बुलबुलही तसेच आणि चिमण्याही तशाच..
घर करणं, अंडी घालणं, पिल्लं वाढवणं.. सगळं सगळं आमच्या बाल्कनीत.. पण खाणं पिणं, ये जा.. परस्पर बाहेरच्या बाहेर.

तर हा आधी बाल्कनीत येऊन खाऊ मागणारा आमचा कावळा..

Crow 1.jpg

अटेंड करायला उशिर झाला की मग आमच्या लिव्हिंग रुम मधे येउन हक्काने खाणं मागतो..

Crow 3.jpg

आणि हा त्याचा क्लोजअप..

Crow 2.jpg

भारी आहे
काव काव करून आज उशीर का झाला म्हणून झापत पण असेल.

आमच्या खिडकीत येतात दोन कावळे, एकाचा पाय वाकडा आहे, आणि दुसऱ्या कावळ्याला माझा लेक स्पायडरमॅन कावळा म्हणतो. तो कधीच सरळ बसत नाही कायम तिरकाफिरका Lol आणि हे दोघे शिळी पोळी खात नाहीत. ताजी कणीक किंवा पोळी. शिळी पोळी तशीच ठेवतात खिडकीत.
निरू पहीला फोटो मस्त च आलाय कावळूचा

सगळे फोटो खूप छान आहेत.
टारझनसाहेबांची ऐट आहे. Happy

सेनापती आजींचा मागच्या पानावरचा फोटो पाहिल्यावर असे वाटले की आजी फोटोग्राफराला झापतेय - "बघ हं, अनु. मागच्या वेळी तू भैंकर फोटो काढलेलास. या वेळी नीट काढ!"

सामो, अनु, धन्यवाद.
पुढचा फोटो कोणीतरी टाका म्हणजे मला पुढचे टाकता येतील.

सेनापती आजी अतिशय शिष्ट आहेत.रोज न चुकता शी करतात.'मेल्यानो, तुमच्या बोरिंग जगात रोज दर्शन देऊन उपकार करतेय तुमच्यावर' असे भाव असतात चेहऱ्यावर.
परवा बॅटमॅन माऊ इतकं जाड झालं होतं की त्याला 2 फूट कुंपणावरून उडी मारायला पण बराच वेळ विचार करावा लागत होता.मुलीला विचारलं बॅटमॅन प्रेग्नंट आहे का.तेव्हा तिने मूर्खांत काढून ज्ञान दिलं की बॅटमॅन मुलगा आहे.
हे बॅटमॅन माऊ
IMG_20210925_233611.jpg

अनु Lol

.
.
कोणीतरी येणार येणार गं म्हणता म्हणता... हे आले Proud आणि त्यांचे लाड-कोड करता करता आजीची एकच धांदल उडाली.
Manee_pille.jpeg

.
.
कोणी रागे भरले की पटकन आजीच्या कुशीत येऊन उगी उगी करून घ्यायचे, लगेच बरे वाटते. Proud
Manee_ugi_ugi.jpeg

.
.
सायंकाळी अंगणातला दिवा लागला म्हणजे या स्टुलात स्वतःला असे अडकून घ्यायला आम्हाला फार आवडते. दिव्यावर उडणारे किडे एकेक करून टपकन खाली भुईवर पडला रे पडला की चपळाईने पटकन स्टुलातून बाहेर येऊन त्याला गट्टम करायचा की परत स्टुलात अडकून घ्यायचे.

Manee_daba.jpeg

.
.
अरे काय! सुट्टी संपवून तुम्ही परत निघालात? केंव्हा भेटणार पुन्हा? Sad

Manee_bye.jpeg

Pages