मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ह. उ. चा परफॉर्मन्स बघता तो शेवटच्या आठवड्यात पण दिसेल.>> यांच्या पेक्षा पहिल्या सिजन चे आस्ताद आणि रेशम बरेच बरे म्हणायाचे

काल सगळ्यात फनी काय असेल तर आविष्कार ने लुटुपुटुचा खेळ करून म्हणे मी जय ला बाजुस सारून किल्ल्या मिळवल्या! नंतर उत्क्याला म्हणतो, तुझ्याबरोबर माझा खेळ बहरतोय वगैरे Lol
बी ग्रुप चे काय डिस्कशन झाले दाखवलेच नाही. मीनल ला लागल्यावर एकदम खेळ बंद केला ते फारच वाईट दिसले.
नंतर उत्क्याने नॉमिनेट केल्यावर विशाल ची आरशासमोर रीअ‍ॅक्शन क्यूट होती मात्र. असेच काही पाहून पब्लिक खूष होते.
पण उत्क्या म्हटला ते बरोबर होते. हे लोक काय गप्पा मारायला अन भांडी घासायला आलेत का फक्त?!

एकदम खेळ बंद केला ते फारच वाईट दिसले.>>+१
त्यांनी काहीही करून खेळायला हवे होते. हारले असते तरी लोकांची मने जिंकली असती. आपल्या गटासाठी खेळायचे सोडून वर विकासलाच कशाला हवी आहे टेम्प्टेशन रूम असे बोलून अपराधी ठरवत होता. पण उत्कर्षने जिंकून त्यालाच नॅामिनेट केले.
या आठवड्यात विशाल मित्र म्हणून आणि खेळाडू म्हणून फारच वाईट दिसला.

किल्ली टास्क मधे जय चालत गेला असता तरी किल्ली त्यालाच मिळणार होती, त्याने एवढी झटापट का केली? की फिजिकली दुसऱ्याला इंटिमिडेट केल्या शिवाय टास्क पुर्ण केल्याचे समाधान मिळत नाही?

त्यांनी काहीही करून खेळायला हवे होते. हारले असते तरी लोकांची मने जिंकली असती... खेळायला ऊभे होतेच की, पण त्यांचे मोराल डाउन होता मिनलच्या इंज्युरी मुळे. सोनाली पण लंगडत होती. विशालने पण झोंबा झोंबी केली असती तर त्याला उभे रहाता आले असते.
उगाच पळायचे नाटक करण्यात काय पॉइंट होता.

विशाल तरी सुद्धा एकटा लढला असता तरी ते बघायला आवडले असते.
न खेळणे म्हणजे जयने एक धक्का दिला कि सगळा टास्क त्याच्या हातात देऊन हे बसणार रडत.
प्रत्येकवेळी जय असाच खेळतो आणि खेळणार. प्रत्येकवेळी हे खेळून हारतात. आता न खेळता हरत राहणार तर मग आपण काय बघायचे? बर खेळले नाहीत मग पुन्हा यांच्यातच वाद आणि रुसवे-फुगवे. मग आहेच उत्क्या आग लावायला, जय सोनालीशी कामापुरते गुलुगुलु बोलायला, स्नेहा विशालला सपोर्ट मागायला आणि गायत्री वा वा फेअर खेळतोस म्हणत त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला.
सहानुभूती एका पॅाईंटपर्यंत मिळेल पण नंतर काहीच करत नाहीत म्हणून लोकांची नाराजीच मिळेल.

समजा विशालला लागले असते तर मिनल नक्की जिद्दीने पळाली असती.
आय होप मिनलची दुखापत फार गंभीर नाही. एकमेव तगडा प्लेअर गमावेल टीम बी.

जय उत्कर्षला तर बाहेर चांगलं दिसण्यासाठी ममां चक्क खोटे वागायला सांगत आहेत.कोणाला लागल्यावर तुम्हाला वाईट वाटले नाही तरी तसे दाखवा म्हणाले चक्क...
गायत्री चांगलीच दुखावली आहे...
ती स्नेहा कित्ती चीप आहे बापरे..मांजरेकर काय बोलतात ते तिला कळत नाही का? एका point ला जय जरा सिरियस झाला पण ती मूर्ख बाई सतत हसत काय होती..खूपच राग आला तिचा..काहीच सेन्स नाही तिला. वैयक्तिक आयुष्यात काय करत असेल कुणास ठाऊक पण सध्यातरी नॅशनल टीव्ही वर दिसत आहोत याचं भान ठेवले पाहिजे.त्याचं भान नसेल तेही एकवेळी ठीक पण बाहेरून बघणारा host काय बोलतोय हे तर समजून घ्यावे ना.खरंच बाबा दिसतं तसं नसतं..नुसतं दिसायला सुंदर असून चालत नाही थोडी बुद्धीही असावी लागते.

आज जाम बोअर झालं. बोअर वीक आणि बोअर वीकेंड चावडी.
मांजरेकरांना जास्त आरडाओरडा करू नका असं सांगितलं आहे वाटतं. प्रेमात बोलत होते.
स्नेहा मठ्ठ बाई आहे. समोरचा माणूस टोमणा मारतो आहे हे पण दिसत नाही वाटतं. मांजरेकर उघड उघड तिचा चीपपणा सांगत होते आणि ही बाई हसते काय. बावळट च आहे.
गायत्री आणि मीरा जर बाहेर पडून स्वतंत्र खेळल्या तर सगळी गणितं बदलतील.

मांजरेकरांना जास्त आरडाओरडा करू नका असं सांगितलं आहे वाटतं. प्रेमात बोलत होते.>>> प्रत्येक चावडी झाली की मी नेहमी इथे लिहितो मांज्याच्या दात ओठ खाण्याबद्दल ते त्यांनी वाचलं असावं. आता पुढच्या आठवड्यात बघा कसा परिणाम दिसून येईल याचा.

आज मांजरेकर पण बोलले..बिग बॉस मध्ये टास्क खेळणे ,जिंकणे इतकंच महत्त्वाचे नसून माणूस म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणे महत्त्वाचे आहे. जे A टीम मधल्या लोकांना कधीच नाही जमणार कारण त्यांची मूळ प्रवृत्तीच नीच आहे...सध्यातरी मला विशाल आवडतोय.

विशाल वाईट नाही आहे. फक्त एकदा हे वाचा....
1)विकास ला हार पचत नाही. त्यांनी काय केले आत्तापर्यंत गेम मध्ये बाईकच्या टास होता विशाल ने त्याला कव्हर केले होते. जास्त वार विशालने आपल्यावरच घेतले होते.
2) तू पाण्याचा टास्क होता भांडे हातात घेऊन पाण्याची पातळी कमी होऊ द्यायची नव्हती त्यात तो आउट झाला आणि विशाल शीच वाद घालू लागला. विशाल च्या टीममधून खेळतो तो त्या टीम साठीच खेळतो. विकास हार मान्य करायला तयार नसतो.
3) विकास विशाल बद्दल मागे बोलत असतो. विशालच्या डोक्यात वेगळेच काहीतरी चालू आहे त्याचा वेगळाच काहीतरी प्लॅन आहे. खरंतर विशाल पुढचा कधीच विचार करत नाही. विकास पुढचा विचार करतो त्याला विशाल आणि सोनाली ची मैत्री जवळीक खटकते. त्याच्या वागण्यातून आणि बोलण्यात पण खूप वेळा दिसून आले जेव्हा ब्लॅक रोज आणि रेड रोज चा तास होता तेव्हा रोज सोनालीला दिला होता आणि रेड रोज मीनलला दिला होता. तेव्हा विकास सोनालीला असा बोलला की तो रेड रोज तुला द्यायला पाहिजे होता. त्याने असं करायला नाही पाहिजे होतं. खरंतर तो फूट पाडायला बघतोय पण तो फुट चाला पण कळून देत नाहीत आणि प्रेक्षकांना पण कळून देत नाही. असं काही वाईट त्याच्या मनात नव्हता तर त्याने सोनालीला समजायला पाहिजे होतं की विशाल अगदी जवळ तूच आहे. नको ही गोष्ट एवढे मनाला लावून लावून घेऊस. मैत्रीमध्ये एवढं चालतच. अजून बरंच काही बोलला ही गोष्ट विशालला खटकली. तरी त्यांनी ही गोष्ट दुर्लक्ष केली.
4) भोपळ्याचा तास काय वाग लागतो विकास गेम खेळायला पुढे आला तर नाहीच उलट सांगितले A टीम ला की मी खोटं खोटं बोलेल तुम्ही नाही म्हणून सांगायचे त्यालाही वाटत होते मीरा फेरी जिंकावी. त्याला वाटलं A टीम नंतरच्या फेरीत मला मदत करेल. अरे भावाच्या फेरीत मीनल आदेश किंवा सोनाली कोणीही एक जिंकली असते. आणि दुसर्‍या फेरीत तो जिंकला असतास तरी कॅप्टन्सी टास्कमध्ये काहीतरी करून तुला जिंकले असते बी टीमने. जेव्हा एटीम ने धोका दिला तेव्हा विशाल अस तुला वाचवायला आला त्याने पुढचा मागचा विचार न करता. त्यामुळे तो नॉमिनेशन मध्ये आला या गोष्टीचा कुठे तरी मनामध्ये तुला सुद्धा वाईट वाटायला हवं होतं तेसुद्धा जाऊद्या.
5) हिरा टास्क : बी टीम नेहमी तुझ्या बाजूने उभी असते एकदा तरी हिरा उचलून कोणा एकाला वाजवे असे नाही का वाटले मनाला. तुला कोणी वाचवलं नाही म्हणून तुला वाईट वाटलं पण तू पण कोणासाठी तरी काहीतरी कर ना.
6) सगळे म्हणतात विशाल टीमचा विचार करत नाही. तो टीम हाच विचार करतो, तेव्हा तो ज्या टीम मधून खेळतो तेव्हा त्याच टीम चा विचार करतो ज्या वेळी टीम त्याच्या एकट्याची गरज असते तेव्हा तो त्या टीमसाठी उभा राहतो. ज्या वेळेस त्याच्या एका मताने कुठला सदस्य वाचत असेल तर तू B टीम चाच वाचवतो. A टीम चा नाही वाचवत. विकास मध्ये मी पण आज जास्त आहे मी सेव्ह झालो पाहिजे माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं झालं नाही की रडतो.
7) छकुलीचा टास्क ती गोष्ट सोनाली दुसऱ्या पाशी बोलली म्हणून तो चिडला होता विशाल विशाल ला असं कुठेतरी वाटतंय विकास फूट पाडायची बघतोय दुसऱ्या दिवशी विशालने विकासाची राहिलेली भांडी घासली नाहीत कारण की आपण एवढे आपल्या माणसासाठी करतो तरी हे असे वागतात असे. त्यामुळे विशाल हर्ट झाला होता आणि विकासने कुठेच विशाल सांगितले नव्हते की विशाल माझी भांडी घास विकास मी गृहीत धरले की सगळ्यांची कामे करतो म्हणजे तो करेल परत सकाळी भांडण यावरून काहीतरी झाले. तेव्हा सोनाली विशाल ची बाजू घेत होती. त्यावेळी विकासचे हे वाक्य होते इतके धक्के खाऊनही तू त्याचीच बाजू घेते. यावर विशाल चिडला होता. नंतर विशाल हा विषय सोडून दिला. विकास ला माहित आहे की छोट्या छोट्या गोष्टीवरून विशाल चिडतो याचा फायदा त्याने पुढे घेतला.
8) नॉमिनेशन टास्क : विशाल अगदी शांतपणे आपली मते मांडत होता त्याने मीनल ला सेव्ह केले विकास ने पण मान्य करायला हवे होते तो मीनल ला सेव्ह करणार जास्त न वाढवता तो थांबला असता. विकास च्या मनात विशाल बद्दल कुठे ना कुठे तरी राग आहे त्याने बरोबर गाडी टाकली त्याला आधी चिडवायचे शांतपणे मग आपण मग आपण मग आपण उत्तर द्यायचं पुढच्याला वाईट ठरवायचं आणि आपण चांगलं व्हायच विकास डोके ठेवून आलाय आहे की आपण स्वतःहून वाईट वागायचं नाही दुसऱ्याला वाईट वागायला लावायचं बोलायचे मिळवायची म्हणजे समोरचा वाईट होईल आणि आपण चांगले सेक्सी विकासचा डोक्यात पहिल्यापासूनच विशाल होता. बरोबर विकास मी विशाल चा गेम केला. हेच विशाल कळत नाही आपला रागाचा फायदा घेत आहेत. विकास आधी दुसऱ्याला आवाज चळवळीला होतो म्हणून स्वतःचा आवाज चढतो यामुळे पुढचा वाईट ठरतो आणि तो चांगला
9) विकासला कॅप्टन होयचे मी कॅप्टन झालो पाहिजे असं त्याला वाटतं. म्हणून तर सारखा भांडत असतो. विशाल असं नाही. विशाल कॅप्टन्सी टास्कमध्ये कधी स्वताचा विचार करत नाही. आउट झाला की लगेच मान्य करतो.
10) डेविल टास्क : पहिल्या फेरीत विशाल झाला. त्यांनी मान्य केले विकास च्या टीमने जेवढे त्यांच्या डोक्यात आले तेवढे त्यांनी त्यांच्याकडून करून घेतले. पण दुसऱ्या दिवशी विशाल टीमच्या वेगळ्या कल्पना होत्या आणि त्या भारी होत्या. विशाल बोलला की आम्ही उद्या काय करतो फक्त तयारी ठेवा. यावर विकास बोलला तुम्ही जे कराल त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे. प्रेक्षकांना हे वाक्य लक्षात ठेवा. विकास काय बोलला ते यावरून कळतं विकास च्या डोक्यात काय चाललंय ते. विकासने पहिल्या फेरीत आपले कपडे पाडली त्याला विशाल सांगितले नव्हते की तू तुझी कपडे फाड म्हणून स्वतःचा डोकं वापरून कसे कपडे वाचवायचे याचा विचार विकास करायला हवा होता. मिनिटांनी कसे भारी डोके वापरले. मीनल आऊट झाली पण तिने किती भारी ते मान्य केलं. विकास नंतर हार पचतच नाही. इथे पण किती शांतपणे विसरला खवळले. विशाल चीडला की मग हा पण चिडून मोठ्यांदा बोलायला लागला म्हणला कसा दहा हजाराची कपडे फाडली मी तुला कोणी बोलले फाड म्हणून दुसऱ्यांना वाईट ठरवून तू चांगला झालाच भावा भारी गेम खेळलास. विशाल वाईट नाही आहेत त्याला वाईट बनवला गेला आहे. स्वार्थी पण नाही आहे तो नेहमी तुमचा आणि दुसऱ्याचा विचार करतो. आत्तापर्यंत कॅप्टन पदासाठी कधीही लालच दाखवली नाही. आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा आणि आपली माणसं आपल्या बद्दल आपल्या पाठीमागे असे बोलतात म्हणून त्याला खूप खटकला आहे. एवढे होऊनी जेव्हा आपल्या माणसाला त्याची एकट्याची गरज असेल तेव्हा तो नेहमी त्यांच्या बरोबर उभा राहील. हा रागीट आहे मान्य आहे पण वाईट आणि स्वार्थी नाही. तू वाईट बोलला तर तोंडावर बोलतो माघारी बोलत नाही.
Copy paste from fb

नंतर उत्क्याने नॉमिनेट केल्यावर विशाल ची आरशासमोर रीअ‍ॅक्शन क्यूट होती मात्र. असेच काही पाहून पब्लिक खूष होते.
<<<
अगदी हेच्च लिहायला आले होते, अनेक चूका करूनही काहीतरी असे करतो विशाल ज्यामुळे तोच शो चा हिरो आहे हे पुन्हा पुन्हा प्रुव्ह होते, नो मॅटर कोण टास्क्स जिंकतोय , कोण मास्टरमाइंड आहे… … कशानेही काही फरक पडत नाही कारण हिरो कसा असतो तसा विशाल वागतो Happy

विकेंड बोअर आहे का, फार कोणाला बोलले नाहीत का, टास्क खेळत नाहीत म्हणून टीम बी ला पण बोलावे की. मिनल पडली त्याबद्दल काय झालं.

सारंगेच्या चुका दाखवताना हसत हसत सांगतात आणि मग ती तशीच वागते.

आविष्कार गेला म्हणतात. बी टीम मध्ये होता म्हणून votes मिळत होती. टीमची साथ सोडली मग लोकांनी votes देणं बंद केलं. गा दा वाचली. तिला पण घालवायचे ना.

गायत्रीच्याबद्दल जरा वाईट वाटले पण हेही आठवले की एक आठवड्यापूर्वीपर्यन्त कसला माज करायच्या या दोघी. चेहर्‍यावर कायम कुचकट भाव. आता त्या ग्रुपचेच दोघे त्यांना म्हणतायत की इथवर आम्ही यांना फुकटच आणले इ . टाइम टाइम की बात है.
स्नेहा सगळ्यात इरिटेट होते आहे. तिच्या आणि जय बद्दल च्या चाळ्यांबद्दल बोलताना गुदगुल्या झाल्यासारखी हसत होती. तिला ती कॉम्प्लिमेन्ट्च वाटते की काय न कळे.
मीनल इतक्या जोरात पडली तर टास्क बंद कसा केला नाही आश्चर्य आहे. आपल्याला तो भाग दाखवलाच नाही. ममां बरोब्बर बोलले उत्क्याला. डॉक्टर म्हणवतो तर जाऊन बघायचं ना त्या मीनल -सोनाली ला निदान.
आज एक सोनाली सोडून बाकी सगळ्यांचे कपडे महा भिकार.

स्नेहासाठी आधीच्या मैत्रिणींना सहज दूर केलं जयने आणि उतक्याने साथ दिली त्याला यात. ग्रेट.

मला गा दा अजूनही आवडत नाही, मीराला मी कधीच हेट करत नव्हते. स्नेहा डोक्यात जाते. चीप वाटते.

नेक्स्ट वीक स्नेहा कॅप्टन असली तरी तिचा पचका होईल, कोणालाच काढायचे नाहीत bb. आविष्कार गेला असेल तर तो त्यांना नको होता आणि आदिशने त्याला वाचवले म्हणून त्याची शिक्षा आदिशला दिली असावी.

आविष्कारसोबत गा दा गेली असती तर फार बरं झालं असतं.

अन्जू दादूस गेला अशी आवई उठायची दर वेळी आणि दादूस मात्र आहे आत . आविष्कारच पण तसं होउ शकते.
गादाला स्वत ला वाटत नाही ये की ती टिकेल.

आज मंमांनी बर्‍यापैकी शान्त राहून शाळा घेतली पण तरी सगळे मुद्दे घेतले सार्कास्टिक पद्धतीने !
बापरे ती स्नेहा कित्ती अनॉयिंग आणि मठ्ठ !
सार्कॅस्टिक टोमणे ऐकून ही बाई लाजत होती नाहीतर मग येड्यासारखी हसत होती Uhoh
गायत्री मीरा डिझर्व व्हॉट दे आर गेटिंग , बना अजुन उत्क्याच्या मैत्रीणी Proud
विकासला अगदी करेक्ट फिडबॅक दिला , विशालला बर्‍यापैकी सौम्य समज दिली पण ते दोघं हुषार आहेत, होपफुली हिंट घेतील !
उत्क्याचे काही होऊ नाही शकत, हलकट गुलाम!

ती स्नेहा सगळ्या च्या पलीकडे गेली आहे. तिला कशाचा काही फरक पडत नाही. कोडगेपणा, संधी साधूपणा, मठ्ठ पणा याचे अजब मिश्रण आहे ती.

श्श्या राव! खुप प्रयत्न करुनही या सीझनमध्ये कुणीच आवडत नाहीये!

पहील्या दोन्ही सीझनमध्ये आतापर्यंत काही पक्के आवडीचे आणि काही पक्के नावडीचे तयार झालेले!

विशाल आणि ग्रूप खुपच भरकटलाय खर म्हणजे तो ग्रूप राहिलाय की नाही तेच कळत नाही!
टीम A मधले लोक सुट्टे सुट्टे (उत्क्या सोडून) आवडतात पण ते ग्रूप करुन बसलेकी त्यांचा राग यावा असेच वागतात!!

पण काहीही म्हणा मांज्या इथल्या मी लिहिलेल्या कमेंट्स वाचतो. मी बोललो होतो मांज्याने चिडायला ओरडायला नको तर खरोखरच शांत होता. आता पुढच्या आठवड्यात मस्त राडा होईल असा स्टेज तयार केलाय. अचानक माझ्यावर मांज्याला गाईड करण्याची मोठी जबाबदारी आली आहे.

Pages