मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेखाचा मुद्दा समजतच नव्हता. 6-7 पोळ्या 14 लोकांना नाश्त्याला कशा काय पुरतील ? आणि त्यांचं सारखं काय नाटक असतं आम्ही मोठे , 25-26 वर्ष वयाच्या पोरी आणून बसवल्यात इथे वगैरे...मग काय जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करावा का नवीन सिझन आता ?
सोनालीशी भांडायला फारच आवडत त्यांना.उगीच खाजवून खरूज काढत असतात. टिपिकल सासू रोल इथे पण

आज पण टास्क बिघडवला. बहुतेक हा सिझन असाच जाणार. टास्क रद्द होत होत..

सई पुष्कर पासून मेघा फुटल्यावर मेघाला अजुन जास्त सपोर्ट मिळाला आणि सई पुष्की सर्वात मोठे व्हिलन ठरले >>> पण हे खूप उशिरा झालेलं ना, पन्नास दिवस झाल्यावर, त्याही नंतर खरंतर. इथे सर्व लवकर लवकर होतंय की काय.

मागच्या सीझनमध्ये टास्क पूर्ण होण्यासाठी किती धडपड करायचे, शेवटी शेवटी वीणा स्वत:हून नॉमिनेट व्हायलाही तयार असायची.

पहिला season पाहिला की मेघा, सई यांना bigg boss बद्दल प्रचंड आदर, प्रेम आहे हे दिसून यायचं....second season मध्ये शिवानी च्या वागण्याने तो थोडा कमी झाल्यासारखा वाटला... आताच्या सीजनमध्ये तर कोणालाच bb बद्दल काहीच वाटत नाही असं वाटते.. सर्रास टास्क रद्द होऊ देतात... खरंतर bb च झोपला आहे असं वाटतं... चांगली कडक शिक्षा द्यायला पाहिजे टास्क रद्द करावा लागला तर...
आजचा task मीनल मुळे बिघडला... तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती कारण सुरवात तिने केली... बाकीचे तर काय अर्धवटच आहेत ... तिने sportingly खेळायला पाहिजे होते...

सगळ्यांना superiority complex आहे म्हणाले होते ना म मां.

सगळ्यांना नॉमिनेट करायला हवं पुढच्यावेळी.

यंदा आवाज बदलला आहे का bb चा. दोन सीझन रत्नाकर तारदाळकर होते, त्यांचा जास्त आवडायचा मला.

सगळ्यांना नॉमिनेट करायला हवं पुढच्यावेळी.>>+१
त्या मडक्याच्या कार्यात काय युक्ती वापरता आली असती? आपल्याला काही करता आले नाही तर समोरच्याचे काम बिघडवायचे हेच पहिल्या सिझन पासून होत आले आहे. सगळी मडकी फुटणार ते लगेच लक्षात आले होते. प्लास्टिकची मडकी तरी द्यायला हवी होती.
प्रत्येकवेळी दिलेले कार्य अर्ध्यात सोडून देतात किंवा रद्द हे लोक, त्यापेक्षा तकेषीज कॅसल सारखे गेम ठेवायला हवेत. जास्त खर्च नको असेल सरळ सरळ लंगडी, खो-खो, कब्बडी, कुस्तीचे सामने ठेवावेत. कार्य रद्द झाले रे झाले कि सामने रंवायचे.

आज चहा चपाती विशेष भाग होता असे वाटत होते. किती किचकिच करते सुरेखा. पोळ्या लाटणे आणि भाजणे सोपे असते का कणिक भिजवलेली असली तरी. विशाल एकटाच काय बोलत असतो, आज तर मला वाटलं समोर सोफ्यावर कोणीतरी बसलंय पण कसचं काय Lol कोडी आणि वस्तू ओळखणे छान होता गेम. तो मडक्याचा तर समजलाच नाही. कोडं काय होतं आणि मीनल टेबलखाली काय गेली शोधायला. जमिनीवर बसणं आणि उठणं ही आविष्कारसाठी मोठी कसरत होती. उद्या मीरा आणि तृप्तीचं वाजणार आहे.

त्या मडक्याच्या कार्यात काय युक्ती वापरता आली असती? >>>>>>> विकासने छान युक्ती वापरली. मडकी झाडावर ठेवली त्याने.

आजचा टास्कही रद्द झाला. कोण कोणाशी भाण्डत होत तेच कळत नव्हत. सगळ मजेशीर वाटत होत. विशाल पोट धरुन बसला होता. त्याच्या पोटाला इजा झाली का?

कोडी आणि वस्तू ओळखणे छान होता गेम. >>>>>>>>> सहमत. स्नेहाला उत्तर लगेच सापडल. ते टेबलच कोड मीनलने आधी सोडवल होत, पण उत्तर चुकीच निघाल.

जय त्याच्या टिममध्ये सुरेखाताईची चुगली करत होता आणि सुरेखाताईकडे त्याच्या टिमची अस नाही का वाटल का कुणाला?

ती तुपारे स्मोकिंग करते का,काल स्वीमिंग करून आल्यावर विकखस बोलत असताना मध्येच बहुधा ती स्मोकिंग रुम असावी ,तिथे गेली आणि आली.
सिझन 1 ला सर्रास दाखवत होते,सिझन 2 ला अजिबात नाही दाखवल.काल दाखवल अस वाटत आहे.

काल तर पोहे की चपाती यावरच किती वेळ घालवला .. कुडची ताई तर सदा सासू मोड मध्ये असतात सोनाली सोबत बोलताना.. डोळे आवाज एकदम वाढवतात.. 6 7 चपात्या च्या पिठात सगळया लोकाना कस काय खाऊ घालणार होत्या त्यानाच माहित.. परत पोहे पण करा वेगळे.. या वेळी मीरा ला डबल ढोलकीचा खिताब मिळणार... आधी म्हणते चपात्या कशाला नाश्त्याला .. आम्ही मळलेल पिठ आयत वापरणार.. जेव्हा कळाल सुरेखा ला चपात्या हव्या तेव्हा म्हणते तुम्ही खाणार का चपात्या ..मी करते..रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आलाय... कधी वाटत मद्दाम करते का.. फुटेज खायला.. कारण माहित आहे हे सगळ रिकॉर्ड होतय ..आणि आपल वागण/खोट बाहेर निघणार

ती तुपारे स्मोकिंग करते का,काल स्वीमिंग करून आल्यावर विकखस बोलत असताना मध्येच बहुधा ती स्मोकिंग रुम असावी ,तिथे गेली आणि आली.>> मी पण केल ऑबसर्व.. 2 3 दिवसा आधिच्या भागात बेड वर झोपून सोनाली आणि मिनल बोलत होत्या गायत्री बद्दल की कशी ती जय जिम करायला गेला की स्विमिंग करायला जाते.. Happy फुटेज घ्यायला...

ती तुपारे स्मोकिंग करते का,काल स्वीमिंग करून आल्यावर विकखस बोलत असताना मध्येच बहुधा ती स्मोकिंग रुम असावी ,तिथे गेली आणि आली. >> ती खुप जास्त स्मोकिंग करते असं तुपारे सिरीअल चालु असताना वाचलं होतं. तिच्या दातांवरुन मागे कोणीतरी बोललं ना ते त्यामुळेच असेल.
काल पहिल्यांदाच स्मोकिंग रुम पाहिली या सिझन मधे.
मीरा एकदम पलटी आहे....पोळ्या आणि पोहे वाद रंगणार या वीकेंड ला.

<<ती तुपारे स्मोकिंग करते का,काल स्वीमिंग करून आल्यावर विकखस बोलत असताना मध्येच बहुधा ती स्मोकिंग रुम असावी ,तिथे गेली आणि आली.<<
अगदी हेच आलं डोक्यात, तिला तिथे शिरतांना पाहुन.

अन नंतर बराच जोर चढला होता बाईला. किती ओरडत होती,, संचालक, संचालक! अस Proud

कुडची ताई तर सदा सासू मोड मध्ये असतात सोनाली सोबत बोलताना.. डोळे आवाज एकदम वाढवतात.. >>> +111111 अगदी
काय ते चहा चपाती,२ तास उठल्यापासून.
सोनाली पण बरोबर टशन देते.

सुरेखा डोक्यात गेली आहे. काय ते पोळ्यांवरून बडबड. आणि किती! कोणीतरी आयता नाश्ता देणार मग गप खावा ते नाही, त्या करणार्‍याला उलट अजून एक पदार्थ करायला सांगायची हिंमत कशी होते?
बाकी मला टास्क्स बघायला मजा येते आहे. रिजल्ट काहीही होवो. काल संचालक कम्प्लीट भंजाळले . कुणी पाणी सांडले, कोण चालतच नाहीये, कोण खाली उतरले, कुणी रिकाम्या बादल्या डोक्यावर घेऊन उभे, कुणी तोंडात पाणी भरून बसलेला पण बादली गायब, कोणी नुसताच ओरडतोय, सगळे बघून फार हसायला आले.
काल उत्कर्ष बराच दिसला. निगेटिव च वाटतोय अजून. ती कोडी फारच सोपी होती. इतके प्लनिंग करून उत्कर्ष टीम ला काहीच जिंकता आले नाही. मला विकास ने त्याच्याबद्दल सांगितलेले ऑब्जर्वेशन आवडले.

हिंदी बिग बॉस जोरात सुरू आहे, कोणीतरी धागा काढा.. मी आता मराठी बिग बॉस वरून तिकडे शिफ्ट झालोय..जोरात सुरू आहे तो सिझन...

बाकी मला टास्क्स बघायला मजा येते आहे.>>>+११११
मीरा फार पलट्या मारते, बोललेल कधीच मान्य करत नाही. बिग बॉसचा फोन आल्यावर तर ती सगळ्यांना एका लाईन मध्ये उभे रहा असे सांगून गेली. सुरेखाच पाणी सांडल्यावर ती काही काळासाठी रणचंडी झाली होती.बाकी बिग बॉसचे काम मात्र वाढवून ठेवलंय स्पर्धकांनी, रोज नविन task शोधावे लागतील.

मलाही टास्क्स मधली मजा आवडत आहे.
मला नाही वाटत मिनलने काही चूकीचे केले, दुसर्‍याचे पाणी सांडणे ऑबव्हियस आहे अशा टास्क्मधे !
विशालची तोंडात पाणी ठेवायची आयडिआ भारी !
मिनल फार आवडत आहे मला , हुषार आहे ती, प्लॅनिंग -लॉटिंग पण करते आणि टास्क्स पण !
परवा मीराला गप्प केलच आणि गायत्रीला हिची स्ट्रॅटेजी पटत नव्हती तर तिला चक्क म्हंटली कि तू जरा बाहेर जा बरं , गायत्री चक्क गेली Biggrin
जयला भाव देत नाही अशी ती एकटी मुलगी आहे , बाकी सगळ्या बायका सुरेखा ताईंसकट फार भाव देतात त्याला.
त्या सुरेखाला आता बाहेर काढा, खाष्ट सासू रोल ती फार मिस करतेय!

हिंदी बिग बॉस जोरात सुरू आहे, कोणीतरी धागा काढा.. मी आता मराठी बिग बॉस वरून तिकडे शिफ्ट झालोय..जोरात सुरू आहे तो सिझन...
<<
यस्स , सुरु करा धागा, मलाही आवडली आहे जंगल थीम आणि स्पर्धक !
विशाल कोटियन आणि त्याच्या शाब्दिक कोट्या एक नंबर Proud
करण कुन्द्रा , जय भानुशाली आणि तेजस्वी पण चांगले आहेत.
बाकी मॉडेल्स आणि बॉडी बिल्डर्स या चौघांपुढे डंब दिसातायेत !
हिन्दी मराठी दोन्ही बिबॉ मधे जय-विशाल नावे चर्चेत Happy

जय ची पण काही स्ट्रॅटेजी असू शकेल. तो मीराशी आणि मीनलशी फ्लर्ट करताना दिसला नाही. कदाचित वर्क होणार नाही हे माहित असावे! बाकी लहान मोठ्या सगळ्यांशी फ्लर्ट करत असतो.

एवढी मेहनत करून शेवटी एकमताने कँप्टनशिपसाठी उमेदवार निवडण्याची संधी,बिबॉसनेच सहज विजयी टीमकडून काढून घेऊन चक्क हरलेल्या टीमकडे दिली.
चलते रहो,खेलते रहो बिबॉस
आत बघू.निदान बी टीम तरी याचा फायदा घेते का.

त्या सुरेखाला आता बाहेर काढा, खाष्ट सासू रोल ती फार मिस करतेय! >>> हाहाहा. तो ही गेलाय हातून, स्वाभिमानमध्ये सविता प्रभूणेला दिला तो रोल.

ब्रेकच्या आधी काय गाणं लावलेलं जय आणि स्नेहा एकमेकांना बघत होते वगैरे. ब्रेकनंतर तसं काहीच नाही. तृप्ती मीरा भांडण उद्या असेल. एक टीम बिचा आणि एक ए टीमचा असा सामना होईल का की टीम ए दोन निवडेल टीम बी मधून. टीम ए मध्येपण एकमत नाही झालं तर. आविष्कार दिसला एकदाचा टास्कमध्ये.

मीनलला ए टीमवाले एवढी नावं का ठेवतात. मला आवडते ती. मी एक एपिसोड मागे असते, ते बघून मला उगाच नावं ठेवतात अस वाटलं. चर्चा तिचीच करत होते दोन तीनदा.

Pages