मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्कर्षमध्ये काय हुशारी दिसली मांजरेकरांना? मला तो गायत्री इतकाच डंब वाटतो. फक्त तोरा करत नाही, इतकंच.
एकामागोमाग एक चुकीच्या गोष्टी करत गेला. त्या डिफेंडही करता येत नाही. फक्त कोणाशी टोकाचं वागत नाहीए. विशाल बोलण्यात कमजोर दिसतोय म्हणून त्याला टार्गेट करतोय.

मांजरेकर आणि प्रेक्षकांनी सांगितलेली "मीरा असं असं म्हणाली "ही प्रत्येक गोष्ट ऐकून ती आश्चर्यचकित होतेय. त्या सांगितलेल्या काही गोष्टी मीही ऐकल्या नाहीत. पण मी टीव्ही समोर बसून पाहत नाहीए.
तरीही सगळ्याच गोष्टी तिने न बोललेल्या असतील हे शक्य वाटत नाही.
आपण बोलतो त्याचा अर्थ तिला कळत नसेल?

अविष्कारची पेटिची स्टोरी मुद्दाम घुसडलेली वाटतेय मला. अन त्यामुळे त्याला आज मिळणारी सहानुभुतिही (प्रोमोत दाखवल आहे त्याप्रमाणे) . अर्थात अविष्कारला तसही 'बिचारा' करुन ठेवलय असे ममां स्वतःच म्हणालेत अन तो वाटतोही तसाच फ्रस्टेटेड.

उत्कर्षसाठी त्याच्या भाववाने म्हणजे आदर्शने बाहेर खूप फिल्डिंग लावली आहे,त्याच्या जोरावर आणि शिंदेशाहीवर हे आनंदपुत्र विनर होऊ नये एवढीच इच्छा.
छान खेळत पुढे गेला तर चालेल,पण वशिल्याच तट्टू होऊन नको.

वशिला आणि fans यांच्या जीवावर मराठी bb जिंकता येईल अस मला वाटत नाही. त्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे (राज्याबाहेर, देशाबाहेरही बघितलं जातंय). अगदी काही टक्के लोकं बघत असतील तरीही जास्त म्हणावं लागेल म्हणून जयपेक्षा विशालला वोटिंग जास्त होतं.

आदर्श शिंदेने तर मांजरेकराना डबल ढोलकी घोषित केलेय.एकूणच जातीच card खेळलं जातंय.पोस्ट मध्ये जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय ,सोलापूर असे उल्लेख करून भावनिक कार्ड वापरत आहे.शिंदे फॅमिलीला सर्व महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आणि आता आदर्श शिंदे ते bigg boss साठी सोयीस्कर विसरत आहे.

उत्कर्ष गुडी गुडी रहायचा प्रयत्न करतोय पण फसेल त्यामुळे. जय गायत्री मीरा यांच्या गेम चा स्वतःसाठी वापर करुन घेतो आहे.
काल फॅन ने केलेल्या चुगली वर विश्वास नाही म्हणाला ..
मीरा काल खुप दुखावलेली वाटली चुगली ऐकल्यावर.. जय आणी गायत्री ने तिला वापरुन घ्यावं हे तिला खुप लागलंय आत असं वाटलं...त्यात आणि ममां तिला सारखेच बोलत होते. ती रडली तेव्हा ते नाटकं वाटलं नाही. खरच रडली बहुतेक.
स्नेहा ला पंच टास्क मधे पण परत ओरडा बसला, वुमन कार्ड खेळली म्हणुन....आणि ते योग्य च होतं...
ती स्नेहा मधेच दुसर्‍या कुठल्या भाषेतले शब्द वापरत असते ? काही कळत नाही.
शिवलीला चा व्हिडीओ लावला तेव्हा विशाला ला खरखुरं रडु येत होतं तर सुरेखा आणि सोनली बळंच रडायचा प्रयत्न करत होत्या..

आज च्या प्रोमो मधे बघुन अविष्कार आणि स्नेहा मधे मैत्री वगैरे सुरु करतायत की काय असं वाटतय..स्क्रीप्टेड असेल तर प्रेमात पण पाडतील परत...उगीच नाही घेतलय त्यांना एकत्र एवढ नक्की

म मां नी मीराला अति टार्गेट केलं अस मलाही वाटलं.

मी चुगली सीन्स बघितले नाहीत मात्र. कालचा आज बघेन.

समहाऊ मीरा मला गायत्रीपेक्षा फार उजवी वाटते.

मिराचा सगळा ह्रिदम मांजरेकर डिस्टर्ब करतात.
तिचे कपडे तीने मस्त केरी केले होते. सोनालीने वेस्टर्न कपडे घातले होते पण कीती अनकंफरटेबल होती.
उलट त्रृप्ती देसाई पिवळ्या साडीत उठून दिसल्या. त्या पुरेशा एग्रेशन नी खेळत नाहीत, नाही तर नोन अथलिट गटात जास्त पुढे गेल्या असत्या.

त्या गायत्रीपेक्षा मला मीरा केव्हाही आवडेल पुढे गेलेली. तिने ती चुगली लक्षात ठेवावी नक्कीच. उत्कर्ष चुगली वर विश्वास नाही असं म्हटला, त्यापेक्षा फॅन ला थॅन्क्स म्हणुन सोडून द्यायचं आणि जरा लक्ष ठेवायचं - की चुगली खरी असेल तर ?
आविष्कार ला काल ममां च बिचारा बनवत होते. छकुला पण म्हटले !
मला तो एकच फाइट वाला टास्क बोअर झाला. आवरा! असं झालं. त्यापेक्षा तो गाण्यांचा गेम चांगला होता.
शिवलीला चा मेसेज पाहून डोळ्यात पाणी वगैरे ठीक आहे पण विशाल ला पार हुंदके वगैरे येत होते Happy

मांजा फुल बायस आहे.. मीरा वर घसरतो कुठलाही मुद्दा असला की..
मला मीरा मध्ये दिव्या दिसू लागली आहे... लेट्स सी...

शिवलीलाचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे उद्या कुठे तर ,त्याची पत्रिका फिरते आहे सोमीवर, असे असेल तर image साठीच तिने शो सोडला असेल.

उत्कर्षने चुगलीला सकारात्मक प्रतिसाद दिला पण तो हे मनात ठेवेल आणि नंतर बदला घेईल म्हणूनच तर महेश त्याला म्हणाला की तू राजकारणात जा. आदर्शची पोस्ट वाचली. बिग बॉस म्हणजे शाळा आहे का एका भावाला वाचवायला दुसर्याने जायला. सहन होत नाही तर जायचं कशाला बीबी मध्ये. म्हणे मित्र आणि फॅनचे फोन येतात, ते सगळ्यांना येत असतील, म्हणून कोणी माझा बबड्या किती निरागस हे दाखवायला स्वतःची चावडी उघडत नाही. त्याचं तो बघायला समर्थ आहे. नाही समर्थ तर आदर्शने स्वतः जायचं होतं बीबी मध्ये. मग बाहेर राहून उत्कर्षने परशालिटी होते म्हणून बोंबाबोंब केली असती.
शिवलीला इमेजसाठी बाहेर पडली हे नक्की. इंदुरीकर तिला ट्रोल करत आहेत असे व्हिडीओ बघितले तू नळीवर.
अविष्कारला का इतका बिचारा केलाय. कोणी या आधी कमजोर स्पर्धक नव्हतेच का आत. त्यागराजही लगेच बाहेर पडला होता, त्याचं काय एवढं.
शिवलीला बोलत असताना विशाल एवढा ढसाढसा काय रडत होता आणि सुरेखा सोनाली पण उगाच नोटंकी.

गायत्री डन्ब आहे, मिराच कौतुक होताना कसली फुगुन बसली होती.उत्कर्ष ,जय्,अक्षय ला पण ममा काय सान्गतात ते निट कळत नव्हत का? चेहर्‍यावर अगदी हरवलेले भाव असतात.

उत्कर्ष येडा वाटला जयवर विश्वास आहे वगैरे बोलताना, कदाचित ठेवेलही लक्षात पण फॅनवर विश्वास नाही म्हणून इनडिरेक्ट्ली अपमानच केला !
मीराचा गेम चेन्ज झाला आणि ती जय गायत्रीच्या विरुद्ध गेली तर अजुन मजा येईल पहाताना !
सध्या म.मां नी ‘मेघाला सगळं कळतं’ वरून ‘मीराला सगळं कळतं‘ लाइन उचलली आहे , टेक अ हिन्ट मीरा !
मलाही विशालचं रडणं बघून हसु आलं , ४ दिवसाच्या सहवासात रडारड , बिबॉ मटेरिअल आहे खरा Proud

विकेंड दुसरा भाग मी पळवत बघितला. गायत्रीला म मां नी का सांगितलं की तू सर्वात जास्त सेफ आहेस. त्यामुळे ती आपण वागतो ते बरोबर आणि fans ना हेच आवडतं गृहीत धरणार. आपण पहिल्या नंबरवर आहोत वोटिंग मध्ये अस तिला वाटणार. खरं तर ती पाच नंबरवर होती. विशाल, जय, विकास, मिनल तिच्यापुढे होते.

अस काहीच सांगायला नको होतं म मां नी.

मीराला fan ने सांगितलेलं पटलेले दिसलं, बरं झालं, जपून राहील ती.

अविष्कारबद्दल वाईट वाटलं. तो तरी कशाला पाच लाख घेऊन गेम सोडत होता आणि अस करायला नको होतं. तो आवडत नसला तरी सहानुभूती वाटली. तीच bb ना निर्माण करायची असेल तर, झालं तसं.

गायत्रीला म मां नी का सांगितलं की तू सर्वात जास्त सेफ आहेस. त्यामुळे ती आपण वागतो ते बरोबर आणि fans ना हेच आवडतं गृहीत धरणार. आपण पहिल्या नंबरवर आहोत वोटिंग मध्ये अस तिला वाटणार.
<<
नाही पण लगेच सांगितल कि वोटिंग लाइन्स बन्द होत्या Happy
पण झाला तिचा गैरसमज तर चांगलय तसही शो साठी, निगेटिव कॅरॅक्टर्स लागतात , सोशल मिडियावर पब्लिकने चर्चा करणे, कोणाला तरी हेट्रेड देणे गरजेचे असते Wink

ते आहेच. तशीही ती स्वत:च्या प्रेमात जास्त वाटते. दुसऱ्या कोणाचे opposite टीमचे कौतुक असो की कोणी चांगलं खेळले तिथले तरी तिला टाळ्याही वाजवायच्या नसतात. हिच्याबद्दल काही चांगलं सांगितलं की खुश. राहुदे तिला वाटलं असेल मी पहिल्या नंबरवर ह्या गैरसमजात (जर झाला असेल तर) .

आज सगळयान्ना बिबॉमध्ये हसताना, मस्करी करताना बघून छान वाटल. नाहीतर नेहमी कचाकच चालू असते. अस बॅलन्सड दाखवायला हव.

मीराला टिम बी मध्ये जायचे आहे अस वाटतय. विशालशी बोलत होती.

विकासच्या मुलाबद्दल ऐकून वाईट वाटल.

जय सगळया मुलीन्शी ( गायत्री सोडून) फ्लर्ट करत होता. स्नेहाशी भाण्डी घासत असताना फ्लर्ट करताना पाहून गायत्रीचा चेहरा पडला. आज हिच आणि जयच बिनसलय का? दोघ बोलत नव्हते एकमेकान्शी.

टास्कच्या वेळी जयच्या अन्गात कोण शिरत हे तोच जाणे.

आज सगळयान्ना बिबॉमध्ये हसताना, मस्करी करताना बघून छान वाटल. नाहीतर नेहमी कचाकच चालू असते. अस बॅलन्सड दाखवायला हव.>>विकासच्या मुलाबद्दल ऐकून वाईट वाटल.>>+११

ग्रूप फुटायला लागलेत..... मांजरेकरांचे मनावर घेऊन सगळेच आपल्या ग्रूपपासून बाजुला होवून सिंपथी घ्यायला निघालेत...... विशाल तर बळेच त्याच्या ग्रूपशी भांडत होता..... खुप अनप्रेडिक्टेबल आहे तो!
स्नेहा, जय, मीरा सगळेच त्या ग्रूपच्या बाहेर पडायला बघतायत..... मग ग्रूपमध्ये राहिले कोण गायत्री?
जय ज्या पद्धतीने फ्लर्टींग करतोय सगळ्यांशी ते आपल्या प्रेक्षकांना फारसे रुचणार नाही..... याउलट बाहेर कुणाशी तरी आहे आणि ती त्याच्यासाठी खुप महत्वाची आहे हे सांगणारा विशाल लोकांच्या गुडबुक्समध्ये जाईल!!
अविष्कार नॉमीनेशनमध्ये नाहिये त्यामुळे वाचेल अन्यथा कालच्या त्या सूटकेसप्रकरणानंतर तो असाही सगळ्यांच्या नजरेतुन उतरला होता!!

अक्षय चांगला माणूस वाटतोय पण काही खेळतच नाहिये त्यामुळे तो किंवा दादूस बाहेर पडतील यावेळेस..... अक्षय आता जोडीचा टास्क नाहिये तरी उत्कर्षला सोडायलाच तयार नाहिये.... उत्कर्ष आणि जय सोडले तर बाकीच्यांशी तो फारसे बोलताना दिसतच नाहिये!!

<<आज सगळयान्ना बिबॉमध्ये हसताना, मस्करी करताना बघून छान वाटल. नाहीतर नेहमी कचाकच चालू असते. अस बॅलन्सड दाखवायला हव.<<अगदी ... आज अगदी फ्रेश वाटत होते सगळे. जय ही हसत खेळत होता ते आवडले. सगळे आपल्या पर्सनल लाईफबद्दल थोडे थोडे बोलले ते बरं वाटल. सोनाली ही आवडली. विशाल काहीतरी निगेटीव्ह विचार करतोय का?

सुरेखाबाई अन कधी कधी मिनलही विदाउट मेकप पाहुन कसेसेच वाटते. त्यांना कोणीतरी सांगा बॉ... अगदी लाईट मेकप राहु देत जा चेहर्यावर. या बाबतीत स्नेहाला शंभर पैकी शंभर गुण! इव्हन दादुसचा चेहरा ही फ्रेश, हसरा असतो.

विकासच्या मुलाबद्दल ऐकुन वाईट वाटले.
जय भारी फ्लर्ट करत होता स्नेहाबरोबर.

जय खरच स्प्लिट्स्॑विला मोड मधे आहे आणि मुलींनाही मज्जा येत होती, स्नेहा सोनाली दोघीही लाजत होत्या, जय ची स्ट्रॅटेजीच आहे ती आणि सक्सेसफुल होतेय Wink
देसी बॉइज गाणं लावायचं राहिलय फक्तं जय साठी Proud
विकासच्या मुलाबद्दल ऐकून खरच वाईट वाटलं, जेन्युइन्ली बोलला, सिंपथी घेण्यासाठी नाही बोलला किंवा रडारड सुद्धा नाही केली !
आज विशालला काय झालं होतं Uhoh
नॉमिनेशन्स बाकी बिगबॉसला हवे असलेल्या पब्लिकची झाली , यावेळी तृप्ती किंबा दादुस जातील बहुदा #बिगबॉसखेलगए

चावडी नंतर सगळं विस्कटून टाकलं ममांनी.प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने पाहतोय.विकास समोरच्याला भीती वाटेल(मुलांच्या काळजीमुळे असेल) इतका शांत असतो म्हणून कदाचित विशाल बिथरला असेल,पण त्याने उगीच मीराच्या मागे जाऊ नये.

आज विशालला काय झालं होतं}}हो ना काय बिघडलं होत काय माहीत, आधी बोललेला की मला प्लॅंनिंग मध्ये घेऊ नका. आता म्हणतो की मला सोडून काय बोलतात
मी मीरा ला सांत्वन काराईला जातो, आधी सोनालीला मस्का लावत होता लव्ह अँगल साठी, आणि आता सांगतो की माझी बाहेर relation शिप आहे ते
पूर्णपणे भरकटत लया सारखे झाले आहे. रियली वरीड अबाऊट हिम

विकासच्या मुलाला काय झालं, मी अजून बघितला नाहीये एपिसोड.

मी विशालला वोटींग केलं, कितीवेळा देता येईल यावेळी. मी दोनदा दिलं.

विशाल ने लव अँगल ट्राय केला असे मला नाही वाटले. सुरुवातीच्याच एपिसोड मधे त्याने बाहेर असलेल्या त्या मुलीबद्दल सांगितलं होतं. आणि सोनालीलाही स्पष्ट सांगितलं परवा.
काल सगळ्यांना डॅमेज कन्ट्रोल करा - पर्सनल बोला असे सांगितले होते की टास्क नव्हता म्हणुन आराम करत होते काय माहित. कुणी कुणाशी भांडाभांडी करत नव्हते. विशाल ची धुसफूस अशीच आपली उगीच कॅटेगरी. जयलाही फार जास्त फुटेज मिळते. तोही मुद्दाम लोक बदलून बदलून जाऊन बोलतो किंवा मुली असतील तर फ्लर्ट करतो. कन्टेन्ट मिळेल याची काळजी घेतो. काल बिबॉ ने मुद्दाम इन्डिविजुअल टास्क ठेवला असावा. कोणाच्या हातात कोणाचे फोन हेही त्यांनीच ठरवले होते. त्यामुळे सगळेच लोक एकमेकाशी मिंगल करत होते, अन दोन्ही टीम चे लोक एकत्र येऊन वीकेस्ट लोकांना नॉमिनेट कसे करायचे याची आपसात स्ट्रॅटेजी करत होते. अपेक्षित लोक नॉमिनेट झाले बरोब्बर,
विशाल ने संचालक होणे आणि अक्षय ला नॉमिनेट करणे असे एका दगडात २ पक्षी मारले हुषारी दाखवून. विकास कायम विचारात गढलेला वाटतो. उत्कर्ष दिसलाच नाही काल फारसा.

अक्षय गेला तर बरंय.. तसं पण तो फक्त टॉर्चर टास्कमध्ये तेवढा दिसला आहे. दादुस आणि तृप्ती थोडा का होईना कन्टेन्ट देत असतात.

Pages