ओडीन डायरी

Submitted by आशुचँप on 2 August, 2021 - 15:48

भुभुच्या गंमती जमती धाग्यावर हा विषय चर्चेला आला आणि लिहायचा प्रयत्न केला. सगळ्यांना काही पोस्ट आवडल्या त्यामुळे मग वेगळा धागा काढून त्या इथे हलवत आहे.
आशा करतो आमच्या ओडीन ची डायरी तुम्हालाही वाचायला आवडेल.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी
ओडीन हे आमचे लाब्रॅडॉर भुभुचे नाव
तो आता दीड वर्षाचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अनु
तुम्ही इंस्टा वर असाल तर odin_the_god_of_hunger
नावाने त्याचे अकाउंट आहे
तिकडे त्याचे रेग्युलर फोटो आणि व्हीडिओ टाकत असतो मी

मस्त आहेत पोहोण्याचे किस्से Happy एका मैत्रिणीकडे लॅब्राडूडल आहे. तिला पण असेच भयंकर पाण्याचे आकर्षण. कितीही घाण पाणी असले तरी उडी मारते त्यात. इकडे लहान मोठे पाँड तर खूप आहेत. एकदा तर ग्रूमर्स कडे जाऊन आल्या आल्या हातातून सुटून पळाली आणि एका चिखलाच्या पाण्याच्या डबक्यात उडी मारली होती तिने!! Lol इतके महागाचे ग्रुमिंग अक्षरशः मातीत Happy चांगली मोठी आहे आकाराने, त्यामुळे तिने नॉटी वागायचं ठरवलं तर मैत्रिणीला आवरतच नाही कधी कधी.

पहिलेच भुभु पालक असल्याने कदाचित
चुकत माकत शिकतोय, तसे त्याचे भरपूर लाड होतात
पण मी थोडा शॉर्ट टेम्पर असलेला आहे
त्यामुळे खातो कधी कधी एखादा फटका
नंतर पश्चात्ताप होतो अर्थात

मस्तच हपिसातून शनिवारी दुपारी वाचायला तर बेस्ट. अडोरेबल पप. ट्विटर अकाउंट पण काढा आम्ही तिथेच पडीक पणा करतो.

लोकांना वाटतं आमचं काहीतरी भन्नाट ट्रेनिंग सुरू आहे. प्रत्यक्षात तो बाटली टाकतो आणि मी घेऊन येतो इतकंच. >> Lol

मैत्रेयी Lol

औंध येथील शासकीय पशू ( vet ) रुग्णालयाचा नंबर आहे का कोणाकडे ? नेटवर सर्च केल्यावर मिळाला नाही..
तसेच तिथला काही अनुभव आहे का ?

कांचनजुंगाचा पुढचा भाग येईपर्यंत हा धागा शोधून घेतला. निराशा तर नाहीच झाली. उलट इमोशनल झालो.
हळूहळू वाचतोय. आपल्या आवडीनिवडी खूपच जुळतात.

बऱ्याच गॅप नंतर ओड्याची डायरी वाचली. ओट्यापाशीचा फोटो कसला आलाय. आजी पण सही आहेत.
ओडिन उपाशी होता ते वाचून कससंच झालं, तुम्हाला सगळ्यांना पण त्रास झाला असणार त्या दिवसात.
पोहण्याचे किस्से भारी. मैत्रेयी चा पण सॉलिड किस्सा आहे.

ओडिनच्या फॅन्क्लबमधे आणखी एकीची भर पडली आहे आता Happy मस्त आहे डायरी!
देखण्या मुग्ग्याला भेटत राहीन आता अशीच वरचेवर.

Pages