कुरकुरीनी

Submitted by अश्विनीमामी on 29 July, 2021 - 21:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उकडलेला मॅकरोनी पास्ता एक वाटी, शेल पास्ता पण चालेल. चवी नुसार मीठ, चिमूट भर मिरे पूड, मिक्क्ष चीज दोन चमचे, अमूल बटर एक टी स्पून, परतायला तेल दोन चमचे, ऑलिव्ह ऑइल किंवा आपले साधे स्वयंपाकातले तेल. पण मोहरी तेल वापरू नये. ओरेगानो व हर्ब मिक्क्ष. प्रत्येकी एक एक टी स्पून. केचप एक- दोन चमचे. ( मॅक डोनाल्ड चे उरलेले एक पाकीट परफेक्ट फिट होते. )

क्रमवार पाककृती: 

खोलगट पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा त्यात तेल घाला व मध्यम आचेवरच ठेवा. मग ह्यात उकडलेला मॅकरोनी पास्ता घाला व हलक्या हाताने परतायला सुरुवात करा. आता त्यात अमूल बटर, सर्व मसाले , मीठ, मिरेपूड घालून मध्यम आचेवर परतत रहा. पास्त्याला सुरेख हलका ब्राउन रंग यायला हवा एका साइडने , एखादी लसूण पाकळी ठेचून घातली तरी चालेल आवडत असल्यास.
हवे तितके परतल्यावर गॅस बंद करा.

गरम असतानाच मिक्स चीज ते तुकडे दोन चमचे किंवा आव्डी नुसार घाला व एकदा हलक्या हाताने मिसळून दोन मिनिटे ठेवा. झाकण ठेवू नका वाफ धरली तर कुरकुरीत पणा कमी होईल.

लगेच खोलगट प्लेट मध्ये सर्व्ह करा. वरून केचप घाला आवड त असल्यास.

वाढणी/प्रमाण: 
एक व्यक्ती साठीच आहे.
अधिक टिपा: 

प्लेट मध्ये वाढून घेतल्यावर त्याच तव्यात एखादा मल्टिग्रेन ब्रेडचा तुकडा पण भाजून घेतला तर एका वेळची भूक भागते. अडीनडीला घरगुती पदार्थ.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा वा वा वा अमाजी.... आज सकाळी सकाळी माझ्या पोटात खड्डा पाडला तुम्ही. पोट गुर्रर्रर्रर्रर्र गुर्रर्रर्रर्रर्र करायला लागली की हो. Proud
विनंतीस मान देऊन तुम्ही ही कुरकुरिनी कृती लिहिलीत याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. Bw

छान!
तो व्हाईट सॉस पास्ता करताना हात भरून येतात.तेव्हा तो करण्यापेक्षा हे छान आहे.

व्हाइट सॉस प्रकरण आता कालबाह्य झाले आहे. ह्यातच थोडे अमूल फ्रेश क्रीम टाका. व कुरकुरीत करू नका मंद आचेवर दोन मिनिटी ठेवा.

अमा , फोटू किधर ???
मला फक्त व्हाईट पास्ता बनवता येतो , हा काहितरी नविन प्रकार ट्राय करेन .

अमा , फोटू किधर ???
मला फक्त व्हाईट पास्ता बनवता येतो , हा काहितरी नविन प्रकार ट्राय करेन .

मस्तच, Happy
मॅकरोनी विशेष आणत नाही पेन्ने , बो टाय आणतो. करून बघण्यात येईल. यालाच थंड करून बेझिल, चेरी टमेटोज्, ऑलीव्हज वगैरे घालून salad करता येईल.

पालखी Lol

मस्त पाककृती! धन्यवाद!
कुरकुरीत करेपर्यंत थांबायला जमलेच नाही. करतानाच तोंपासू.

86F97B23-8237-4440-BD21-B3F0E0AD6F63.jpeg

सोना धन्यवाद. मी पण केले की फोटो टाकते. वीकेंड असल्याने ऑर्डर केलेले बरेच अन्न फ्रिझ मध्ये आहे तेव्हा काही स्वयंपाकच केलेला नाही.
डब्यासाठी पास्ता बनवला की जो उरतो त्याचेच नेक्स डे हे बनते. वीक डे ला बघून.