..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र. ८/५५

गुलाम नबी आजाद एकदा एका 'वेणूगोपाल अय्यर' नावाच्या ज्योतिषाकडे जातात. त्यांचा हात बघून वेणूगोपाल विचारतो की तुमच्या मुलांपैकी कुणी गातं का? आजाद साहेब म्हणतात की त्यांची मुलं - सद्दाम आणि सोफिया दोघेही बाथरूम सिंगर आहेत, पण फारसे काही खास गात नाहीत. वेणूगोपाल म्हणतो की काहीतरी गडबड आहे. तुमचा मुलगा अतिशय दैवी आणि गोड गळ्याचा असायला हवा होता. कदाचित तुमच्या त्या गायक मुलाचा जन्मच झालेला नाही. त्याचा आत्मा अजून भटकतो आहे.
'बरं मग?' - आजाद.
'मग काही नाही... माझ्याकडे दोन गोळ्या आहेत. त्यातली निळी गोळी घेतलीत, तर आज तुम्ही घरी गेल्यावर झोपून जाल आणि मी सांगितलेलं सगळं विसरून जाल. पण लाल गोळी घेतलीत तर मी प्लँचेट करून त्या आत्म्याला बोलवू शकतो... लक्षात घ्या, एकदा का लाल गोळी घेतलीत, तर पुन्हा मागे फिरणे नाही'

ख खो अ जा, परंतू निदान खरंच असा काही दैवी आवाज असू शकतो का हे तरी कळेल, म्हणून आजाद साहेब लाल गोळी घेतात आणि त्यांना घेरी येते. जागे होतात तेव्हा एका प्रचंड मोठ्या पांढर्‍या खोलीत ते आणि ज्योतिषी बसलेले असतात. ज्योतिषासमोर कसला तरी कागद असतो. त्यावर एक नाणं ठेवून त्यावर त्याने बोट ठेवलेलं असतं. टेबलावरचा सी एफ एल बल्ब अचानक फुटतो आणि बाहेर विजा कडाडतात. आजाद साहेबांचे डोळे विस्फारतात. त्या अंधूक प्रकाशात त्यांना जवळचा पाण्याचा ग्लास अचानक आपोआप सरकताना दिसतो. ज्योतिषी आनंदविभोर होऊन नाचू लागतो. 'माझा प्रयोग सक्सेसफुल झाला. तुमच्या न जन्मलेल्या मुलाचा आत्मा इथे उपस्थित आहे. तुम्ही आता त्याच्याशी बोलू शकता.' आजादांना आता तो अ-शरीर दैवी गळा कसा आहे ते ऐकायचं असतं. पण इकडे त्या ज्योतिषाचीच नुसती बडबड चाललेली असते. तर मग आजाद त्या आत्म्याला कोणतं गाणं म्हणून विनवतील?

योग्य उत्तर: वावे
ए अज-नबी तू भी कभी आवाज दे कहीसे

Lol अज नबी
किती तो द्राविडी प्राणायाम.....!!!

कोडे क्र. 8/५६
सत्तरच्या दशकातील गोष्ट आहे. एका देशात लष्करी उठाव झाला आणि एका लष्करशहांनी विद्यमान प्रधानमंत्र्यांना पदच्युत करून सत्ता हातात घेतली. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी प्रधानमंत्र्यांना अटक करायचा हुकूम दिला. प्रधानमंत्र्यांना घ्यायला पोलीस आले तेव्हा त्यांच्या बेगमने त्यांना अटक न करण्याबद्दल गयावया केली. पण पोलीस पडले हुकमाचे ताबेदार. ते त्यांना पकडून घेऊनच गेले. तेव्हा बेगमने लष्करशहांच्या नावाने बोटे मोडत हे गाणे म्हटले...

Try again Happy

भारी Happy

कोडे क्र. ८/५७

पार्वतीबाईंनी शंकररावांना वेळेत घरी येण्याबद्दल अनेकदा तंबी दिलेली असते. पण एकदा इंद्रसभेत रंभेचे नृत्य पाहण्यात फार रात्र होते आणि ते दबक्या पावलांनी घरी येतात. येऊन पाहतात तर पार्वतीबाईंनी शंकररावांची जिरवायला आतून लॅच लावून घेतलेला असतो. आता ते घाबरतात कारण 'गौरी झाली दुर्गा' चा प्रयोग पाहण्यापेक्षा पुन्हा एकदा हलाहल प्यायलेले परवडले, हे त्यांना माहीत असतं. मग ते हळूच वाड्याच्या मागच्या बाजूला येतात आणि नंदीच्या खिडकीतून डोकावून त्याला हाक मारतात.
"pssst... नंदी..."
"कोण आहे?" नंदी डोळे चोळत जागा होतो.
"श्शू:... ओरडू नकोस. जा हळूच घराची चावी शोधून आण आणि मला दे"
"चोर...चोर!" नंदी ओरडायला लागतो.
"अरे बैलोबा, मला ओळखलं नाहीस का? जा पटकन चावी घेऊन ये" असं ते एका गाण्यात म्हणतात.

कोडे क्र. ८/५७:

भारी आहे कोडे.
बुल्ला कीं जाणा मै कौन?
(बुल, ला की. जा ना. मै कौन?)

मोरोबा, धमाल.

आर्या आणि श्र ... मस्त डिकोडिंग.

एक अ ति सोपं.

कोडे क्र. ८/५८

"मोरोपंत राऊत आहेत का?" अशी खणखणीत आवाजात हाक देऊन गजाभाऊ वालावलकर मोरोपंतांच्या घरात येऊन पडवीत ऐसपैस बसले. दोघेही शाळूसोबती. लहानपणापासूनचे दोस्त. आता मोरोपंत शहरात रहायला गेले पण गजाभाऊ अजून गावातच राहून घरचा सुतारकामाचा व्यवसाय सांभाळत, वाढवत राहिले.

मोरोपंत बाहेर येताच गजाभाऊंनी त्यांना जुनी लाकडी कार दिली.

यंदाच्या सुटीत गावी आल्यावर मोरोपंतांनी घराची संपूर्ण साफसफाई काढली होती. त्यातच त्यांना त्यांच्या
लहानपणी त्यांच्या वडिलांनी ही खास करवून घेतलेली त्यांची ही खूप जुनी व्हॅन अडगळीत सापडली. परसातील पायरीचं झाड एकदा वादळात पडल्यावर त्यातून घरात बरंच फर्निचर करून घेतलं त्यात ही व्हॅनही बनवून घेतली होती गजाभाऊंच्या वडिलांकडून.

"ही घे तुझी मोटार. रिपेअर करून एकदम नव्यासारखी करून आणलीये."

"अरे वा, कुठे ओरखडे नाही ना पाडलेस?" मोरोपंतांनी विचारणा केली.

त्यावर गजाभाऊंनी चक्क गाणे गात हातवारे करत एक छानसा नाच करून दाखवला.

करेक्ट मोरोबा.

उत्तर : ( मोरोबा)

ना 'चरे' मोरा आंब्याच्या व्हॅनात

कोडे क्र. ८/५9

स्टॅन्ड अप कॉमेडियन बनायचेच म्हणून आयुष ने फ्री स्टेज शो केले मात्र त्याच्या जोक्स ना कुणीच हसेना... आता कसे व्हिडीओ टाकावे जर ऑडियन्स हसतच नसेल तर... त्याला अचानक एक युक्ती सुचली... वेड्यांच्या हॉस्पिटलात शो केला तर?
ठरले.. शो सुरु झाला एकामागून एक जोक्स आले तरी कोणीही हसत नव्हते... अचानक आयुष च्या डोक्यात आले... तो म्हणाला.. हसा रे... आणि आश्चर्य... सगळे खळखळुन हसू लागले... आयुष कोणते गाणे म्हणेल...

मस्तच कोडं मामी.
मोरोबांनी मोराचं गाणं लगेच ओळखलं Light 1
मी हिंदी गाणी आठवत बसले होते. मोरा गोरा अंग वगैरे Lol

कोडे क्र. ८/५9

स्टॅन्ड अप कॉमेडियन बनायचेच म्हणून आयुष ने फ्री स्टेज शो केले मात्र त्याच्या जोक्स ना कुणीच हसेना... आता कसे व्हिडीओ टाकावे जर ऑडियन्स हसतच नसेल तर... त्याला अचानक एक युक्ती सुचली... वेड्यांच्या हॉस्पिटलात शो केला तर?
ठरले.. शो सुरु झाला एकामागून एक जोक्स आले तरी कोणीही हसत नव्हते... अचानक आयुष च्या डोक्यात आले... तो म्हणाला.. हसा रे... आणि आश्चर्य... सगळे खळखळुन हसू लागले... आयुष कोणते गाणे म्हणेल...

>>>>> मै ने कहा 'फूलों' से हसो तो वो खिलखिलाकर हंस दिये

अर्थात अशा दुर्दैवी रुग्णांना फूल म्हणणं जरा हिंसक वाटतंय.

इतकी सारी पी एच डी लेव्हल ची कोडी झाल्यावर लोकांना inferiority complex होऊ नये म्हणून माझ्या तर्फे एक बालवाडी लेव्हल चे कोडे !

भागिदारीत काम घेणारे दोन सुतार, एकाकडे फक्त करवत आहे, दुसर्‍याकडे फक्त हातोडा. दोघेही एका इमारतीला लाकडी जिना बनवायचे काम घेतात. सकाळी एक सुतार येऊन बघतो तर दुसरा अजूनही आलेला नाही. तो कोणते गाणे म्हणेल ?

Pages