....................... सह्याद्रीच्या गर्भामध्ये दडलेलं मानवी लोकवस्तीपासून दूर असलेलं जणू काही या मानवरूपी जनावराच्या माणसाळलेल्या प्रवृत्ती पासून सावध राहण्यासाठी हा 'आसरा' काही दैवी दानशूरांनी निर्माण केला होता. दुतर्फा अशोक आणि शाल वृक्षांची गर्दी असलेलं, सभोवताली 'कदंब', 'किकर', 'मधुक', 'पिंपळ', 'किथुक' वृक्षांनी बहरलेलं 'आसरा' हे एक नीरव शांततेचं सौख्य होतं! या वृक्षावर आपले पंख फडफडवणाऱ्या 'तितिर', 'चक्रवाक', 'सारंग','धनछडी','रानराघू' यांच्या मंजुळ ध्वनींनी सदासर्वदा फुललेलं असायचं!
'आनंद' हा एक 'नागरिक' मासिकामध्ये 'पत्रकार' होता. जन्मत:च अनाथ! त्याचं संगोपन एका अनाथालयात झालं होतं! त्यामुळे त्याची नात्यांची वीण घट्ट कुठे बसलीच नाही. सदासर्वकाळ तो मायेच्या शोधात असायचा! 'बालपण' हे काय असतं हे त्याला कधीही न उलगडलेलं कोडं होतं! खरच 'बालपण' असतं तरी काय? "भावी आयुष्याचं वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणाऱ्या जीवासाठी पूर्ण तरतूद म्हणून निसर्गानं निर्माण केलेला शीतल पाण्याचा तो चशकच नाही काय! असे कितीतरी असंख्य विचार त्याच्या मनोमनावर आदळायचे मग तो उगाचच हसायचा!
पत्रकारीतेमध्ये तो समाजमनाच्या निरनिराळ्या छटांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे रंग भरायचा! एके दिवशी त्याला 'आसरा' या वृद्धाश्रमाची माहिती मिळाली. आई बाबांच्या मायेपासून आधीच पोरका असलेल्या आनंदला त्या वृद्धाश्रमाची ओढ असणं सहाजिक होतं, मग त्याने रविवारी आश्रमाला भेट देण्याचे ठरविले.
प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच असीम निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेलं ते आश्रम जणुकाही एक रमणीय, प्रेक्षणीय स्थळच आहे असा त्याला भास झाला. आतमध्ये जाण्यासाठी किमान एक किलोमीटर तरी त्याला पायपीट करावी लागली. हिरव्या हिरव्या गवताचे गार गालिचे सुंदर सुशोभित सजलेले होते. जवळच फुलांची एक बाग होती. 'राणचाफा','केवडा', 'जाई-जुई', 'शेवंती', 'मोगरा' आणि लाल-गुलाबी गुलाबपुष्पांनी ती बहरलेली होती. एक दिव्य परिमळ त्या आसमंतात पसरला होता. त्या मुग्धं वातावरणानेच तो अतिप्रसन्न झाला.
सर्वप्रथम त्याने संचालकांची भेट घेतली आणि त्यांना रीतसर माहिती देऊन तो वृद्धाश्रमातल्या आश्रीतांना भेटण्यासाठी निघाला. सहा-सहा फुटांच्या अंतरावर लहान लहान पर्णकुट्या होत्या. त्यांची बांधणी वनातील आश्रमाच्या पर्णकुटी सारखीच होती. एका पर्णकुटी मध्ये दोन व्यक्ती राहत! तो पहिल्या पर्णकुटी समीप आला. आतमध्ये जवळ-जवळ पंच्याहत्तरीच्या वयामधले गृहस्थ सूर्य स्त्रोताचे स्मरण करीत होते. आनंदाची चाहूल लागताच त्यांनी नेत्र उघडले आणि एक मंद स्मित करून त्याला जवळ बोलाविले. "बोला काय मदत करू शकतो मी आपली!" या आपुलकीने आनंदचे काळीज भारावून गेले. क्षणभर तो त्या सजीव मूर्तीकडे एकटक बघतच राहिला. त्यांनी आनंदला परत तोच प्रश्न केला. तेव्हा कुठे 'आनंद' भानावर आला. 'आनंद' म्हणाला,"नमस्कार बाबा मी एक पत्रकार आहे. 'नागरिक' मासिकासाठी मला काही माहिती हवी आहे म्हणून मी आलो!" खरं तर तो मासिकासाठी नव्हता आला. त्याला जवळून त्या व्यक्तीचे जीवनदर्शन अनुभवायचे होते. "विचारा काय विचारायचे ते!" "बाबा आपलं नाव काय? आपण वृद्धाश्रमात कशे आलात? आपली मुले कुठे आहेत?" अशी कितीतरी प्रश्न आनंदनी एकादमातच विचारले.
........ बाबांनी मंद स्मित केलं आणि बोलले मी 'गजाननराव' आयुष्याची संपूर्ण हयात गिरणीमध्ये कामातच गेली. पत्नी होती 'कल्याणी' ती पण कर्करोगाने काळाच्या पडद्याआड गेली. मला दोन मुलगे आहेत. एक 'विकास' आणि छोटा 'कल्याण' दोघेही कर्तबगार! एक चांगला 'कलेक्टर' आहे आणि दुसरा 'इंजिनियर'!
आनंदने प्रश्न केला, "मग तुम्ही त्यांच्याकडे का नाही राहत?" "हे बघ बेटा! मी त्यांच्याकडे नाही राहत ती माझ्याकडे राहायची." आम्ही सगळे एकाच घरात गुण्यागोविंदाने राहायचो! मुलांना छान शिक्षण दिले. त्यांच्या शिक्षणासाठी लागेल तेवढा पैसा मी लावला नंतर ते दोघेही आपआपल्या व्यवसायात व्यस्त झाले आणि मग त्यांची लग्न लावून दिली. मोठा 'विकास' कलेक्टर असल्या कारणामुळे त्याला नगरात सरकारी कॉर्टर मिळाले. तो बायकोला घेऊन निघून गेला आणि धाकटा 'कल्याण' त्याची पण बदली बंगळूरला झाली आणि तो तिथेच विसावला. कल्याणीचे आजारपण वाढत होते.कॅन्सर थर्ड स्टेजला गेला होता आणि एके दिवशी 'ती' मला या जीवन प्रवासात एकटा सोडून चालली गेली. सर्व काही काळाचा महिमा! काळाचा महिमा हा काही औरच असतो. काळ म्हणजे काय? एक सारथीच नाही का! मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेताचे आसूड मारीत केव्हा केव्हा किती गतीने पिटाळतो हे घोडे!" "क्षणातच मी या संसारात पोरका झालो." हे उद्गार काढताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
आनंदने पुन्हा प्रश्न केला, "मग तुम्ही 'विकास' किंवा कल्याणकडे का नाही गेले राहायला?" या माझ्या प्रश्नाने ते स्तब्ध झाले. कदाचित मी त्यांच्या जुन्या कटु स्मृतींना हात घातला होता. क्षणभर त्यांनी डोळ्यांच्या पापण्या मिटल्या आणि नेत्रात जमा झालेले आसवांचे थेंब त्यांच्या पांढरीशुभ्र दाढीवर घरंगळले. कल्याणीच्या अंत्ययात्रेला आली होती दोघे! मग सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मी आपला निर्णय त्यांना सांगितला की, "आता माझं वय झालेलं आहे आणि माझी काळजी घेणारं आपलं म्हणून येथे कोणीही नाही तर मी तुमच्या दोघांपैकी कोणा एकाकडे शेवटचा श्वास घेईल." माझ्या निर्णयावर ते खूश होतील असं मला वाटलं! दोघांमध्ये वाद होतील की बाबा माझ्याकडे राहायला हवेत, नाही बाबा माझ्याकडे राहतील! रात्रभर त्यांनी काही निर्णय दिला नाही मी या आनंदी विचारातच निद्राधीन झालो. सकाळी उठल्यानंतर मी, 'विकास' आणि 'कल्याण' दोघांनाही बोलावलं आणि विचारलं, "काय रे बाळांनो काय निर्णय घेतलात तुम्ही!" पण ते दोघेही काही बोलायला तयारच नव्हते. थोरली सून 'साधना' समोर आली आणि म्हणाली बाबा आमचं ठरलं आहे की तुम्ही सहा महिने आमच्याकडे आणि सहा महिने भावोजींकडे राहायचे. तिच्या या बोलण्याने मला धक्काच बसला. मी धीरगंभीर होऊन विचारलं, "असं का?" "तुमच्यापैकी कुणी एक माझी जबाबदारी नाही घेऊ शकत का? तर धाकटी सून 'मालिनी' म्हणाली, "एकानेच का म्हणून जबाबदारी घ्यायची? बाबा तर तुम्ही दोघांचेही आहात ना! मग खर्च पण दोघेही वाटून घेणार!" "अरे पण पोरी दोघेही माझ्या काळजाचे तुकडे आहेत. तळहाताच्या फोडासारखं जपलं आहे मी त्यांना! कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. आली वेळ तेव्हा कर्ज काढून या मुलांचे शिक्षण केले आणि आता तुम्ही माझ्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च वाटून घेतात. धिक्कार असो तुमचा!"
"अरे एक वेळ उपाशी राहून मी तुम्हाला दोन वेळचं अन्न खाऊ घातलं आहे. असली औलाद असण्यापेक्षा मी बेऔलादच समजेल स्वतःला!" 'विकास' म्हणाला, बाबा तुम्ही जसं समजत आहात तसं काही नाही!" "मग कसं आहे? ते तरी सांग!" 'कल्याण' पुढे होऊन म्हणाला 'बाबा' तुम्हाला आमच्याकडे सहा-सहा महिने राहणे पसंत नसेल तर मग... बोलतांनी तो थोडा कचरला, मी जोरात ओरडलो "मग काय पुढे बोल!" 'विकास' म्हणाला,
"तुम्ही वृद्धाश्रमात राहावं!" हे त्याचे शब्द ऐकताच कोणीतरी कानात तप्त शिशरस ओतावा असं जाणवलं! सौदामिनी कडाडून अंगावर आदळावी आणि वादळी वाऱ्याच्या चाबकाने अंग सोलून काढावे असा अंर्तभास सखोल मनाला झाला. "वृद्धाश्रम" या एकाच शब्दाने त्यांनी माझ्या नात्याची सांगता केली होती.
मी क्रुद्ध नजरेने त्यांच्याकडे बघितले. माझे डोळे लालबुंदं झाले होते. नाकपुड्या फुगल्या होत्या. श्वासांची गती तीव्र झाली होती. अंग थरथरत होते मी सरळ त्यांना म्हटले, "चालते व्हा माझ्या दारातून आणि पुन्हा कधी आपले काळे तोंड मला दाखवू नका."
काही दिवस माझे मन थाऱ्यावर नव्हते. मग एके दिवशी गिरणीतील माझा मित्र 'प्रकाश' मला भेटला. मी माझी कहाणी त्याला सांगितली तर तो म्हणाला, "असं एक नंदनवन आहे जिथे तुला जिव्हाळ्याची, जीवाभावाची नाती भेटतील. ते तुला कधीच एकटं नाही भासू देणार! प्रकाशच्या मदतीने मी 'आसरा' मध्ये आलो आणि इथेच रममाण झालो. माणसाच्या दैवाचा समुद्र कधी कधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो हेच खरं!"
त्यांची ही काळजाला चटका लावून जाणारी हकीगत जाणून मी शांत चित्ताने त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून बाहेर पडलो. "सूर्य जसा उगवतो तसा तो मावळतो अस्ताचलाला गेलेल्या सूर्याचं मावळणं जसं विलोभनीय असतं तसं माणसाचं मावळणनही विलोभनीय झालं पाहिजे. आपण सर्वच आयुष्यभर आत्मनंदाच्या शोधात असतो. नवीन पालवी आल्यानंतर जुनी पानं गळून पडणारच पण आपण आपल्या मानवी सौहार्दाचा कल्पवृक्ष असाच बहरत ठेवायचा. कितीतरी वेळ मी वर असलेल्या नीरभ्र आकाशाकडे बघत राहिलो आणि एक विचार माझ्या मनाला शिवून गेला. जीवनाचा सार उलगडणारा!
"किती क्षणांचं हे जीवन असतं,
उपकार भूतकाळातलं भविष्यात नसतं!
मग जगावं तरी कोणासाठी;
कारण कोणीच कोणाच नसतं!!"
(प्रिय मायबोलीकरांनो आपल्याही आयुष्यात उतारवयात आलेल्या अशा वृद्धांचे काही प्रसंग आपण बघितले किंवा अनुभवले असतील तर कृपया प्रतिसाद रूपाने त्यांची येथे नोंद करावी ही नम्र विनंती.)
देवकी आपल्या आठवणींना उजाळा
देवकी आपल्या आठवणींना उजाळा मिळाला हाच माझ्यासाठी आहेर आहे!
धन्यवाद प्रतिसादासाठी!
जिद्दु तसं काहीही नाही!
जिद्दु तसं काहीही नाही! मायबोलीकरांच्या सुचना,त्यांना पडलेले प्रश्नं माझ्या लिखाणामध्ये सुधार करण्याची एक सुवर्णसंधी असते आणि त्या संधीला मी विन्मुख कसा होणार! सर्व या सदरात बिनधास्त बोलतात हेच माझ्यासाठी खूप मोलाचे आहे!
'सस्मित' आपला प्रतिसाद खूप
'सस्मित' आपला प्रतिसाद खूप गोड आहे.! धन्यवाद!
आवरा !
आवरा !
एवढं अलंकारीक झेपत नाही. >>> +1
हेमंतजी आपण या विषयावर
हेमंतजी आपण या विषयावर चिंतन्मातक विवेचन करत आहात त्यासाठी आपला आभारी आहे.
नायओ चंद्रमा मी आपली छोटी
नायओ चंद्रमा मी आपली छोटी गम्मत केली. मला मूड असला आणि संधी दिसली की मेमे टाकायला/बनवायला आवडते. तुम्ही चांगले लिहिता-लिहत रहा.
वीरू आपल्या कल्पक
वीरू आपल्या कल्पक बुद्धीमत्तेला पडलेला प्रश्न साहजिक आहे.>> इतकं कौतुक नका हो करु. मी पण गंमत केली.
तुमची अलंकारीक भाषा वाचायला मजा येते. लिहित रहा.
हाडळीचा आशिक आपला प्रतिसाद
हाडळीचा आशिक आपला प्रतिसाद म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारं लोंचं!
Pages