Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. ते बहुतेक अल्गो ट्रेंडिंग असावे.

त्याला बहुतेक डायनॅमिक आयर्न कंडोर म्हणतात.
त्यात 3 कॉल विकतात , 3 कॉल घेतात
3 पुट विकतात , 3 पुट घेतात

पण त्याला मार्जिन फार लागते , 3 लाख तरी लागेल , आणि सतत समोर बसावे लागेल, ज्याचा डेल्टा बदलेल , तो square off करून अजून काहीतरी त्याच्याबदली करायचे असते, म्हणजे मार्केट वर किंवा खाली जाईल तसे एकेक लेग बदलत जातात

5,6% प्रॉफिट मिळू शकते म्हणे

ब्यांक निफ्टी 35300 किंवा 35500 शॉर्ट करणार होतो , पण वेळ मिळाला नाही , सकाळी 50,60 होते , आता गडगडलेत

मी २०१९ ला स्ट्रँगल्स विकले दोन महिने.
फार फॉलोअप लागते. डेल्टा बॅलन्स करत बसावे लागते.
आयर्न कंडोर केला होता एकदा, त्यावेळी नेमकी बरीच उलथापालथ झाली, सारखा हा लेग बदला, तो लेग बदला.

मग ठरवले पुट्स नको, त्या पेक्षा फक्त कॉल्स विकायचे. वरचा अर्धा आयर्न कंडोर करायचा. यात खालची मोठी मूव्ह मिळाली की प्रॉफिट बूक करता येते. वरची एवढी मोठी मूव्ह क्वचित येते, त्यावेळी सरळ लॉस बूक करून बाहेर पडायचे, स्थिरावला की नव्या पॉझिशन्स घ्यायच्या असे ठरवलेय.
------
रिलायन्सचे 2500 चे मी तीन कॉल्स विकले होते. आज मार्जिन खूप वाढले, 2 लाखच्या वर गेले. मग त्यात प्रॉफिट बूक करून , 2400 चे दोन विकले.

रिलायन्स कॉल सेल ला भयंकर मार्जिन वाढले आहे आज.
एका कॉल ला 1.73 लाख. माझे दोन कॉल्सचे 3.46 लाख.
मार्जिन अव्हेलेबल निगेटिव्ह मध्ये गेलेय खूप.
मार्जिन पेनॉल्टी लागणार. 1%.

एक पोझिशन काढुन टाकली. मार्जिन + मध्ये आणण्यास.

मलापण लागले आहे

पण अक्सिस मध्ये नाही लागले

पेनालटी कधी लागते ?
मला इ मेल आज आला आहे , तसाही आज 3 वाजता ते square off होईलच
मग पेनालटी लागणार नाही ना ?

IMG_20210624_103313.jpg

ऑप्शन्स स्टॉक सारखे ऑटो स्क्वेअर ऑफ होत नाहीत.
आऊट ऑफ द मनी ऑप्शन 0.05 ला तसाच पडून रहातो EOD ला. मग रात्री जेव्हा सेटलमेंट होते तेव्हा त्याची किंमत शून्य लावतात, ब्रोकरेज लागत नाही. मध्यरात्री केव्हातरी मार्जिन मोकळे होते.

तो पर्यंत शॉर्ट मार्जिन रिपोर्ट होते का माहीत नाही.

मार्जिन मध्ये खूप फरक असेल (किती टक्के? माहीत नाही) तर ब्रोकर ती लिमिट पोचली की स्क्वेअर ऑफ करेल. आणि त्याचे रिपोर्टिंग होतेच व पेनॉल्टी लागतेच.
खरं तर १% पेनॉल्टी लागायला काही हरकत नाही (१% मार्जिन जितकी कमी पडली त्यावर. जर मार्जिन १लाख किंवा १०% पेक्षा खाली कमी पडली तर 0.५%). पण आता त्या ट्रेड मध्ये उरलेय फक्त 350 रुपये तेवढ्यासाठी कशाला उठाठेव.

या आधीही मला एक दोनदा मेसेज आले होते , पण दुसऱ्या दिवशी परत मार्जिन प्लस आले होते, म्हणून काही गरज पडली नव्हती

आज मी 3.20 ला square off करेन

ओके. कशाला स्क्वेअर ऑफ करता मग.
उगाच ब्रोकरेज लागेल. आणि स्क्वेअर ऑफ करताना ०.१ / ०.०५ ला होत, त्याचे 25/12.5 रिलायन्सला. एकूण ७५-१०० रुपये विनाकारण जातात.
लॉट साईझ मोठा असलेल्या स्टॉकला तर अजून.
तुम्हाला स्क्वेअर ऑफ करून लगेच आजच दुसऱ्या पॉझिशन्स घ्यायचा असेल तर गोष्ट वेगळी.

हे ऑटो स्क्वेअर ऑफ नाहीय. आपला कॉल वर्थलेस मरतोय.
झिरोदाही तो स्क्वेअर ऑफ करत नाही.
इन द मनी असेल तर गोष्ट वेगळी, तिथे फिजिकल सेटलमेंटचे नियम लागू होतात.

माझे रिलायन्स 2 लॉट शॉर्ट आहेत
एक अक्सिस मध्ये आहे , तिथे तर मार्जिन प्लस दाखवत आहे

झिरोदात मात्र मार्जिन फ़ंड शॉर्ट दाखवत आहे

78000 होते , पैकी 72 हजार युज दाखवत आहे, उरलेले तसेच आहे, म्हणून शॉर्ट पोझिशन कव्हर नाही केली , उद्या मरेल तेंव्हा बघू

Screenshot_2021-06-24-15-29-14-056_com.axis_.login_.png

झिरोदातली शॉर्ट पोझिशन 5 पैशाला बाय केली, लगेच पूर्ण मार्जिन प्लस झाले, बाय पोझिशनही पाच पैसे झाली , ती मात्र कव्हर केली नाही, तशीच ठेवली , उद्या बघू.
IMG_20210624_151439.jpg

दोन्हीत मिळून 2800 प्रॉफिट झाले. गेल्या आठवड्यात रिलायन्समध्ये 1000 मिळाले होते,
ह्या महिन्यात मोठे कॅलेंडर स्प्रेड निफ्टीत जमले नाही.

मला वाटते , झिरोदाकडे मोठे करोडपती कस्टमर भरपूर असावेत , ब्रोकरच्या लिमिटचा मोठा पार्ट त्यांना देता यावा म्हणून रिटेल इन्व्हेस्टरची नाकाबंदी होत असेल , कारण जर हा एस्चेंजचा रुल असता तर सगळ्या ब्रोकरकडे असे व्हायला हवे होते,

ब्रोकर लोक कस्टमर किती बडा आहे , ह्यावरदेखील त्याचे मार्जिन थोडेफार वर खाली करू शकतात,

असो, पण झिरोदाचा एकूण अनुभव मात्र चांगला आहे

म्हणजे झिरोदा मध्ये जास्त मार्जिन लागतेय.
मी शेअरखान मध्येही चेक केले आज सेल करायला किती मार्जिन लागेल ते. तिथेही 74000 दाखवत होते. आणि झिरोदा 1.7 लाख!

पण निफ्टीला मात्र शेअरखान आणि झिरोदा सारखी मार्जिन दाखवत होते आजच्या एक्सपायरीला, 1.3 लाख
मग कन्फर्म करायला मी आजच्या एक्सपायरीचा निफ्टचा 15900 कॉल विकला अडीच वाजता. 1.3 लाखच मार्जिन लागली.
मग रिलायन्सलाच मार्जिन जास्त का? आणि तीही १२५% पेक्षा जास्त!
-------
माझे जून महिन्यात १०८०० निघाले, २ लाख कॅपिटल वर.

Uptox चा अनुभव आहे का कोणाला?
तिथेही ऑप्शन्सला २०₹ per Order ब्रोकरेज आहे.
पण झिरोदा सारखी निफ्टी / बँकनिफ्टीत ऑप्शन्स विकत घ्यायला रेंज ब्लॉक होते का, असे शेवटच्या दुपटीपेक्षा जास्त मार्जिन लागते का वगैरे बघायला हवे.

ओके, धन्यवाद.
रेंज ब्लॉक न होणे हा महत्वाचा मुद्दा हे.
शेवटल्या दिवशी OTM ऑप्शनला दुपटी पेक्षा जास्त मार्जिन जे झिरोदा लावत आहे, मला वाटते ते बरोबर नाही, ITM ला लागते, तसे शेअरखान पॉप अप येतात OTM ऑप्शन असला की, तो ITM गेला तर १००% (१२०%) मार्जिन लागेल म्हणुन.

एकदा NSE / AANI चा याबाबत नियम चेक करून Zerodha ला मेल पाठवेन.

अन्यथा Uptox किंवा Axis Direct मध्ये a/c उघडावे म्हणतो.

ब्लॅककॅट Axis चा इतर अनुभव कसा आहे? Zerodha प्रमाणे ऑप्शन्सला मार्केट ऑर्डर देता येते का? (शेअरखान मध्ये ऑप्शनसाठी फक्त लिमिट ऑर्डर आहे, एन्ट्री, एक्झिट दोन्हीला.)

अक्सिस
ब्रोकरेज कमी आहे
मार्जिनचा इश्यू नाही

पण ग्राफ नाहीत, स्लो आहे

कालचा/ची(?) काँट्रॅक्ट नोट आला/ली झीरोदाचा/ची
सोडून दिलेल्या ऑप्शन्सना ब्रोकरेज लागले नाही आणि ऑप्शनची शून्य व्हॅल्यू दाखवून पूर्ण प्रीमियम क्रेडीट केलाय.

पण ग्राफ नाहीत, स्लो आहे>>>
ग्राफ नसेल तर चालेल ते नाहीतरी मी शेअरखान मध्ये पहातो.

पण साईट स्लो असेल तर कठीण आहे. F&O मध्ये दणकून नुकसान होऊ शकते.

Slow म्हणजे तशी स्लो नाही
पण झिरोडात एक क्लिकवर ग्राफ बाय सेल मार्केट देपथ ओपन पोझिशन ऑर्डर बुक , प्रॉफिट लॉस इ इ सगळे मिळते

तसे इथे नाही , क्लिक क्लिक क्लिक करत मागे पुढे जावे लागते

आज पूट स्प्रेड केला होता

1 जुलै 32500 पुट 17 ला बाय केला आणि 8 जुलैचा 48 ला सेल केला

दुपारी 250 रु प्रॉफिट मध्ये काढला , फक्त 20000 मार्जिन लागले
असे 5 ,10 लॉट घेऊन इंट्रा डे करता येईल का?

अक्सिस मध्ये बहुतेक ब्रोकरेज कमी आहे

Screenshot_2021-06-25-13-35-02-489_com.axis_.login_.png

Axis option brokerage - Rs 10 per lot
झिरोदात 20 आहे

अक्सिस चा स्विफ्ट म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे , त्यात सगळे झिरोदासारखे दिसते म्हणे
तो मोबाईलवर मला तरी दिसला नाही
घरी बघायचे पीसीवर तर एक दिवस सुट्टी काढून बघावे लागेल , मी एकदोनदा बघितला होता, अगदी ब्रोकर टर्मिनलसारखाच आहे.

पण झिरोदात 20 per order आहे.
एका ऑर्डर मध्ये मी चार लॉट्स घेतोय आता तरी 20₹.
निफ्टीचा लॉट 50 झाला की 6 लॉट्स घ्यावे लागतील हे एका ऑर्डर मध्ये घेतले तरी 20₹. ऍक्सिसचे सहा लॉटचे ६०₹ होतील.
सध्या ठीक आहे पुढे कॅपिटल वाढवून पंधरा वीस लॉट्स घेतो म्हटले तर चांगला फरक पडेल.

मी आज तो ट्रेड आधी झिरोदाच बघितला होता , पण तिथे रेंज ब्लॉक होती
म्हणून इकडे केले
रेंज ब्लॉक असेल तर कमी ब्रोकरेजचा फायदा नाही

Pages