तू मुलींना आवडत नाहीस (स्वगत)

Submitted by Parichit on 4 April, 2021 - 04:00

तू मुलींना आवडत नाहीस. कितीही कडू असली तरी हीच fact आहे. ती तुला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. तुझे वागणे चांगले आहे. तुझे बोलणे चांगले आहे. तुझे विचार चांगले आहेत. तुझा व्यक्तिमत्व चांगले आहे. तुझे सगळे चांगलेच आहे. परंतु.............

तू मुलींना आवडत नाहीस

हे कटू सत्य आहे. आणि हे तुला स्वीकारावेच लागेल. हि काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्याशी तुझ्या चांगल्या गुणांचा असण्याचा वागण्याचा काही एक संबंध नाही. सूर्य पूर्वेला उगवतो हि वस्तुस्थिती आहे व त्याबाबत आपण काहीही करू शकत नाही. तदनुसारच तू मुलींना आवडत नाहीस हि सुद्धा एक वस्तुस्थितीच आहे. त्याबाबत कोणीच काही करू शकत नाही. मुलीना कोण आवडते ते आजवर भल्याभल्यांना कळले नाही. मग तू कशाला डोकेफोड करून घेतोस? तुझ्या दृष्टीने जी मुले/पुरुष तुला बावळट, आळशी, ढेरपोटे, टकले, टाकाऊ, अजागळ, कोणतेच सदगुण नसलेले वगैरे वगैरे असे वाटतात. असेच पुरुष/मुले सुंदर स्त्रियांना/मुलीना आवडतात. त्या अशांच्यावरच भाळतात. हे ऐकायला असूया वाटत असली तरी हेच कटूसत्य आहे. सुंदर सुंदर स्त्रिया माठ पुरुषावर भाळू शकतात. तुला - सो नाईस ऑफ यू. ओके Thanks - म्हणून तुला कटवणारी लावण्यवती एखाद्या माठ टकल्या ढेरपोट्याला - यू आर माय एंजल. बी देअर फॉर मी - असे म्हणाली तर अजिबात जळू नकोस. कारण तू किती नाकारले तरी तेच सत्य आहे. मुलींची बुद्धी तशीच चालते. एखादा पुरुष तद्दन भामटा आहे याबद्दल तुझ्या मनात कोणतीही शंका नसेल. कुणालाही त्याच्या थोबडाकडे बघितल्यावरच ते कळेल इतके ते स्पष्ट असेल. ते कळण्यासाठी जास्त अक्कल चालवायचीदेखील गरज नाही. असे असूनही तू ज्या सो कॉल्ड गोड मुलीला गेली कित्येक महिने मनधरणी करून इम्प्रेस करू पाहत आहेस, त्या मुलीला नेमका तोच पुरुष काही दिवसातच आवडू लागतो. तुला टाळणारी ती, त्याला पाहताच मात्र खुश होते. त्याचे नाव घेताच आनंदून जाते. हे जळजळीत वास्तव आहे. पण ह्यावर मनातल्या मनात जळण्यापेक्षा आणि स्वत:ला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा हे सत्य जितके लवकर तू पचवशील तितके ते तुझ्यासाठीच ते चांगले राहील. मुलींच्या पायी वेळ आणि उर्जा वाया घालवू नकोस. एखादीला तू आवडायचा असलास तर तसाही काही न करता आवडून जाशील. पण त्याचवेळी ती तुला आवडेलच ह्याची ग्यारंटी नाही, हे चालायचेच. त्यात कुणी फार तात्त्विक उहापोह करण्यात अर्थ नाही. अखेर काय? तर हे असेच आहे तर मग मुलीना इम्प्रेस करायची धडपड आणि पराकाष्ठा काहून करायची? ती तू करू नकोस.

गेली हजारो का दशहजारो वर्षे झाली, समाजात ठरवून लग्ने केली जातात. ह्यामध्ये पहिल्या भेटीतच एकमेकाला पसंद करायचे असते. अवतीभवती सगळे बसलेले असताना जीवनसाठी निवडायचा असतो. आता निसर्गाचा क्रम पाहिला तर स्त्री-पुरुषाने एकमेकाला पसंद करणे हि त्या दोघांची अत्यंत खाजगी गोष्ट असते. वास्तविक अशी चारचौघात ती करायची नसते. स्त्री हि पुरुषाचे सुंदर मन पाहून त्याची निवड करते, आणि पुरुष हा स्त्रीचे शारिरीक सौंदर्य पाहून तिची निवड करतो. हा निसर्गक्रम आहे. आता ह्या दहा पंधरा मिनिटाच्या - स्थळ बघण्याच्या - कार्यक्रमात मुलाला स्त्रीचे शरीर दिसेल व तो त्यावरून तिची पसंदी करू शकेल हे मान्य आहे. पण इतक्या कमी वेळात एकही शब्द न बोलता मुलीला त्या मुलाचे मन कसे कळू येईल? ते सुंदर आहे का काटेरी आहे ह्याचा तिला कसा अंदाज येईल? पण त्याचा विचार करतो कोण इथे? पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषाने तिला बघून पसंद केले कि मामला मिटला. दोघांचे लग्न लावले जाते. आणि तिथून पुढे आयुष्यभर ती वैवाहिक बलात्काराला ती सामोरी जाते. पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्री आणि जमीन ह्या दोन म्हणजे इथे पुरुषांनी पराक्रम करून लढून वा भांडून प्राप्त करायच्या व नंतर त्यावर मालकीहक्क घेऊन यथेच्छ भोगायच्या गोष्टी असतात. वाचायला वाईट वाटेल. पण कटू असले तरी हेच सत्य आहे. सर्वाच्या मुळाशी हाच विचार आहे हे नाकारता येत नाही. कदाचित ह्याच परंपरेचे पिढ्यानपिढ्या संस्कार झाल्यामुळे अनेक स्त्रियांना जबरदस्ती करणारे पुरुष आवडतात हे वास्तव आहे. हे जरा वादग्रस्त विधान असले तरी खरे आहे. बलात्कार आणि प्रेम ह्यात अंधुक रेषा आहे. ती ज्याला कळली त्याला स्त्री प्राप्त होते. जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो. ह्यात थोडे सुद्धा अयोग्य काही झाले तर मात्र तो बळात्कारच ठरतो. हा फोर्म्युला आहे.

बर. ते जाउदे. विषयांतर नको. तर मी काय सांगत होतो कि ठरवून केलेल्या लग्नाच्या नावाखाली मुलीवर पुरुषाची जबरदस्ती लादण्याची परंपरा गेली कित्येक हजारो वर्षे सुरु आहे. इतक्या हजार वर्षांचे संस्कार असल्याने आता आता गेल्या काही दशकांत मोकळ्या होऊ घातलेल्या समाज व्यवस्थेत मुलीला आपला जोडीदार आपल्या बुद्धीने निवडता येण्याची अपेक्षा करावी तरी कशी? मुर्खासारखे निर्णय घेऊन एखाद्या भामट्याचा एंजल म्हणून प्रेमिक म्हणून स्वीकार करायचा आणि तुला फडतूस म्हणून रिजेक्ट करण्याचा प्रताप मुलीकडून होणारच. कारण हजारो वर्षाच्या मानसिक गुलामगिरीमुळे त्यांची बुद्धी अद्यापी तितकी प्रगल्भ झालेली नसते. यात त्या मुलींचा दोष तो काय? ज्यांनी अशी समाज व्यवस्था निर्माण केली त्यांना बोलावे लागेल.

पण जाऊंदे. काय करायचा आपल्याला इतिहास आणि भूगोल घेऊन? तुझ्यापुरते एक आणि एकच सत्य कायम मनाशी बाळगत जा आणि ह्या बाबतीत मुलीकडून कसलीच तर्कसंगत विचारांची किंवा निर्णयाची अपेक्षा ठेऊ नकोस. म्हणजे मानसिक त्रास होणार नाही तुला. आणि ते सत्य म्हणजे.......

तू मुलींना आवडत नाहीस! विषय संपला.

[तळटीप: मागच्या काही दिवसांत घडलेल्या काही विचित्र घटनांमूळे मनात साठून राहिलेल्या विचारांचा निचरा होण्यासाठी व्यक्त होण्याची गरज भासल्याने हे स्वगत लिहिले आहे. केवळ आणि केवळ तोच एक हेतू आहे. लिहून झाल्यावर आता बरेच हलके वाटत आहे. बाकी, मायबोलीकर त्यांना जो हवा तो प्रतिसाद द्यायला मोकळे आहेत]

-------

हा वरचा लेख लिहिण्यामागे जी चित्तरकथा आहे ती खरेतर मला लिहायची नव्हती. पण लेखावर काही प्रतिसाद पाहता हि कथा लिहिणे गरजेचे आहे असे वाटल्याने ती इथे थोडक्यात देत आहे. वरील स्वगत लिहायला मला कशामुळे भाग पडले हे वाचकांना लक्षात येईल हि अपेक्षा.

कॉलेजमध्ये असताना आमचा मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप होता. खूपच खेळीमेळीचे वातावरण होते. त्यात एका मुलीची व माझी चांगली मैत्री झाली. ती खूपच सुंदर होती असे मी म्हणणार नाही. पण खूप साधे सौंदर्य होता तिच्यात. काळेभोर बोलके डोळे. तो साधेपणा तो मला खूपच आवडायचा. नाजूक चणीची होती. गाणे छान गायची. खूप गोड वाटायची गाणे गात असताना. आम्ही सगळे एकत्र असताना तिला आम्ही गाणे गायचा आग्रह करायचो व ती गायची सुद्धा. किती छान दिवस होते. हळूहळू तिच्याविषयी माझ्या मनात सोफ्ट कोर्नर बनत गेला. रात्री दिवसा तिचा विचार मनात येत असे. पण हे मी तिला बोलून दाखवू शकत नव्हतो. फारच इनोसंट होती. त्यामुळे तिच्याविषयी मी असा विचार करणे हे तिला आवडले नसते. ग्रुपवर त्याचा परिणाम झाला असता. ग्रुप सोडून गेली असती व माझे खूप अवघड झाले असते. म्हणून मी गप्पच राहिलो. पण त्याचवेळी कुठेतरी काहीतरी भलतेच शिजत होते. कॉलेजात एक ज्युनिअर होता. टपोरी होता मावा गुटखा खायचा. शिवाय बरीच व्यसने होती. फक्त बोलण्यात चतुर होता आणि गाणे बरे गायचा. एवढीच काय ती जमेची बाजू. पण बाकी त्याच्या वर्तणुकीमुळे ग्रुप मध्येच काय वर्गात सुद्धा कुणाचेच त्याच्याविषयी चांगले मत नव्हते.

एक दिवस वाईट उगवला. ह्या मुलीला मी त्या मुलाशी बोलताना पाहिले. मला आश्चर्य वाटले. काय गुणाचा आहे हे माहित असूनही हि त्याच्याशी काय बोलत असावी? एकतर ती खूप इनोसंट होती किवा मूर्ख होती. मी विचार केला, कि असेल बाबा काही तात्पुरते कारण म्हणून बोलली असेल. असे म्हणून मी मनाचे समाधान करून घेतले व दुर्लक्ष केले. पण त्यानंतर सुद्धा ती त्याच्याशी बोलताना आढळली. विशेष गोष्ट अशी कि फार कोणी आजूबाजूला नसताना एकदा त्याच्याशी बोलत उभी होती. मला मनात फार जळजळ झाली. इतकी वर्षे आमचा ग्रुप आहे पण मला असे कधीच एकटे बोलायची संधी तिने दिली नाही. आणि हा मात्र कोण काल कॉलेजात आला आणि इथवर मजल मारली त्याने. मला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. ग्रुपमध्ये बाकीच्या मित्रांशी यावर ती नसताना विषय काढला. नाजूक गोष्ट होती. कारण सगळे मला म्हणले असते तिच्यात ह्याला इतका इंटरेस्ट का. त्यामुळे तसे न जाणवता मी विषय काढला. म्हणालो ती मला इनोसंट वाटते आणि तो मुलगा कसा आहे सगळ्यांना माहित आहे. तर आपण तिला सावध करूया. तर बाकीचे म्हणाले तिचे व्यक्तीगत आयुष्य आहे आपण तसे करणे बरोबर होणार नाही. ती ग्रुप सोडून जाईल. असे सर्वांनी बोलल्यावर माझा नाईलाज झाला. जे होईल ते बघत बसायचे ठरवले. आणि माझ्या डोळ्यासमोर ते कैकदा भेटत असत हे मी मूकपणाने पाहत राहिलो. एकदा ग्रुपमध्ये सर्वांच्यात ती असताना मी न राहवून विषय काढलाच. खेळीमेळीत तिला विचारले, काय बोलत असतो तो तुझ्याशी. तर अगदी सहज म्हणून गेली "अरे तुला माहिती का गाणे किती छान गातो. गाण्याच्या टिप्स देत असतो मला. बाकीचे काही असले तरी त्याच्याकडून गाणे घेण्यासारखे आहे. जे चांगले आहे ते घ्यायला काय हरकत आहे" मी मनातल्या मनात प्रचंड चरफडलो. त्यांनतर बरेच काही बाही झाले. त्या दोघांच्यात संवाद सुरु राहिला पण गाडी मैत्रीच्या पुढच्या थराला गेली असेल असे निदान मला जाणवले तरी नाही. किंवा तसे काह्ही घडले नसावे अशी मनाची खोटी समजूत काढत मी कॉलेजची वर्षे काढली.

आता कॉलेज सोडून बरीच वर्षे झालीत. मध्यंतरीच्या वर्षांत सगळ्यांचा संपर्क तुटला होता. पण नंतर आम्ही फेसबुक आणि व्हाट्सपवर पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो. ती नव्हती खूप वर्षे. कुठे गायब होती कुणास ठावूक. कुठूनतरी अप्रत्यक्षपणे बातमी येऊन तिचे लग्न झालेय हे सर्वाना माहिती झाले. कुणाशी झालेय हे माहित नव्हते. पण ज्याच्याशी झालेय तो "तो" नव्हता इतकी माहिती मात्र मी काढली. आणि मागच्या वर्षी कुठूनसे ती पुन्हा आमच्या संपर्कात आली. व्हाट्सपवर ग्रुप मध्ये सामील झाली. इतक्या वर्षांनी तिला पाहून सर्वधिक आनंद मला झाला होता. इतकी वर्षे कुठे गायब होतीस विचारले. तर लग्नानंतर नवरा बाळंतपण मुले संसार ह्यातून वेळच मिळाला नाही म्हणाली. तिचा नवरा बिजनेस मध्ये होता. गाण्यातले त्याला ढ कळत नव्हते हे सुद्धा तिने सांगितले. मग मला पुन्हा हुरूप चढला. गाण्याचा सराव करून मी तिला एकदा एक गाणे म्हणून पाठवले. त्यावर तिचा "छान आहे. चांगले गातोस" एवढाच रिप्लाय आला. नंतर गाणी पाठवली पण तिचा प्रतिसाद आला नाही.

आणि मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि तिची फेसबुकवर फ्रेंड लिस्ट बघितली तर तो टोणगा तिच्या लिस्टमध्ये दिसला. मला मनात शंकेची पाल चुकचुकली. जर काही वाईट घडायचे असेल तर घडतेच ह्या न्यायाने गोष्टी घडल्या. त्याच्या प्रोफाईल मध्ये जाऊन बघितले असता त्याच्या प्रत्येक पोष्टवर हिची कौतुकाची कॉमेंट. मी इतके काय काय ग्रुपवर आणि फेसबुकवर लिहायचो त्याला मात्र कधी फार तिने कॉमेंट दिल्या नाहीत. मला फार वाईट वाटले. आणि मनात नको नको त्या शंका सुद्धा आल्या. मग जरा संयमाने खेळायचे ठरवले. आणि तिच्याशी बोलणे व चाटिंग वाढवून काही महिन्यांपूर्वी तिला भेटायला म्हणून तिच्या घरी गेलो. हे सुद्धा सहजपणे घडले नाही. त्यासाठी बरीच मनधरणी व बरेच काही करावे लागले. घरी गेलो तेंव्हा एकटीच होती. तिचा नवरा युरोपात गेला होता. इतक्या वर्षात आम्ही दोघे पहिल्यांदाच असे एकट्याने भेटत होतो. इतक्या वर्षांनी तिच्याशी बोलताना मला खूपच छान वाटत होते. पण एक विचित्र वाटत होते. ती फारच फॉर्मल होऊन बोलत होती. बोलण्यातून जास्त जवळीक होणार नाही याची काळजी घेत होती. मी थोडी थट्टामस्करी करायचा प्रयत्न केला पण तिने फार प्रतिसाद दिला नाही. मी थोडा हिरमुसलो. फार बोलण्यासारखे काही नाही केवळ मी फार आग्रह केला म्हणून तिने भेटायला बोलवले असे तिने अप्रत्यक्षपणे मला जाणवून दिले. मला वाईट वाटले. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणालो दोघांसाठी थोडा-थोडा चहा करशील का आपण चहा घेता गप्पा मारू. नाईलाजाने ती तयार झाली आणि स्वयंपाकघरात गेली.

जाताना आपला मोबाईल तिथेच सोफ्यावर ठेवून गेली. माझी छाती धडधडू लागली. माझ्या काय मनात आले कुणास ठावूक. पटकन तो मोबाईल उचलला. सुदैवाने त्याला लॉक नव्हते. तिच्या व्हाट्सपवर गेलो. माझ्या हातात फार फार कमी वेळ होता. तेवढ्यात ती बाहेर आली असती तर माझे काही खरे नव्हते. त्या वेळेत झरझार स्क्रोल केले. आणि जे अपेक्षित होते तेच दिसले. त्या टोणग्याचे चाट होते. ते मी ओपन केले. आणि पुढल्या काही सेकंदात त्यांचे शेवटचे काही मेसेजेस मी भरभर नजरेखाली घातले. त्यात त्या टोणग्याने गाणी म्हणून पाठवलेली दिसत होती. त्यावर हिने पण त्याला गाणी गाऊन पाठवली होती. दोघांचे गुलुगुलू चाट होते. हार्टचे सिम्बॉल काय आणि नाचणारी बाहुली काय आणि रेनबो काय आणि काय काय. तेवढ्या काही सेकंदात माझे श्वासोच्छवास वाढले. एकमेकांच्या गाण्याचे कौतुक करायच्या नादात त्यांनी हद्द गाठली होती. "मैने प्यार तुम्ही को किया है, मैने दिल भी तुम्ही को दिया है" हे गाणे त्याने गाऊन पाठवले आणि हिने त्याला प्रतिसाद म्हणून "कसले मस्त गायलेस रे! मैने भी तुम्हे दिया है" असे म्हणून दात काढलेली स्मायली हिने पाठवली होती. त्यावर त्याने रिप्लाय पाठवला होता "ऐसे मेसेज मत कर. मेरी बिवी ने देखा तो मुझे बहुत मार पडेगी" असे काहीबाही. आणि एजून एक तिचा त्याला पाठवलेला मेसेज दिसला "यू आर माय एंजल" मी पटकन डोळे झाकले आणि मोबाईल बंद करून जागेवर आहे तसा ठेऊन दिला व डोळे मिटून बसलो. त्याशिवाय बरेच चाट होते पण ते वाचायची माझ्या हिम्मत नव्हती. हे सगळे मी केवळ काही सेकंदात उरकले. फार मोठी रिस्क मी घेतली होती. नशिबाने त्यानंतर सुद्धा एक दोन मिनिटांनी ती चहा घेऊन बाहेर आली. पण एव्हाना मला जे हवे होते ते मी काढले होते. इतक्या वर्षांचा संशय खरा ठरला होता. प्रमाणापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने सिद्ध झाला होता. कॉलेजात असताना मावा गुटका सिगारेट तंबाकू ह्यात असणारा टोणगा आता काय करतोय आणि कसा सेटल झाला याच्याशी मला काही देणेघेणे नव्हते. पण माझ्यासाठी तो अजूनही फालतूच होता. ज्याच्यावर हि भाळली होती.

हे सगळे पाहिल्यावर मग मलाच तिथे जास्तवेळ थांबण्यात इंटरेस्ट उरला नाही. मला त्या दोघांचे संबंध असण्यात काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या मनात एकच राहून राहून एकच येत होते. माझ्यासाठीसुद्धा कौतुकाचे चार शब्द काढायला तिच्या जीवावर का येत असावे? माझ्या पोस्टवर नाही, किंवा माझ्या गाण्यावर नाही, मला रिप्लाय नाही. कुठेच तिच्या आयुष्यात मला फारसे स्थान नव्हते असे दिसले. मी मात्र माझी खूप छान मैत्रीण समजून चाललो होतो. माझी मनातल्या मनात प्रचंड चरफड सुरु झाली होती. चहा पिता पिता गप्पा मारताना मी विचारलेच "काय गं. माझे गाणे किंवा मेसेजेस आवडत नाहीत का तुला? कधी तू फार रिप्लाय देत नाहीस म्हणून विचारले. डिलीट करून टाक ते सगळे माझे मेसेजेस" मी हसत हसत मनातली जळजळ ओकली. तिला काय कळायचे ते कळले असावे. त्यावर तिने एकच उत्तर दिले. म्हणाली "जरा शहाणा हो ना आता तरी. अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील". ते शब्द कान जाळत माझ्या मनात घुसले. ते शब्द आणि तो मेसेज नंतर कायम माझा पिच्छा पुरवत राहिले.

त्याला: "यू आर माय एंजल"
मला: "अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील"

नंतर मला तिच्याशी ग्रुपवरसुद्धा बोलण्यात इंटरेस्ट उरला नाही. हे सगळे झाल्यावर तिचा विषय मनातून काढायला फार त्रास झाला. अजून होतोय. त्याचाच एक भाग म्हणून वरचा लेख.

माझी हि चित्तरकथा वाचल्याबद्दल धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका गावात एक घुंगडबंदुक नावाचा मनुष्य होता. तो रात्रीचा अंगावर तोंडावर घोंगडी घेऊन फिरायचा, त्यामुळे त्याचं नाव बोलीभाषेत घुंगडबंदूक पडलं होतं.

गावात रात्रीच्या जेवणानंतर पुरूषमंडळी पान सुपारी घेऊन शिळोप्याच्या गोष्टी करत असत. तिथे हा घुंगडबंदुक जायचा. आणि त्यांना समस्या सांगायचा. एकदा म्हणाला की गावची पाटलीण माझ्याकडे बघत नाही. ती गच्चीत कपडे वाळायला येते तेव्हां मी अंगात बंडीसु न घालता व्यायाम करतो. पण ती बघत नाही.

एकदा म्हणाला की राम्या सुताराची बायको अनशी माझ्याकडे बघत नाही.

तिस-यांदा म्हणाला की पुजा-याची बायको धोंडू परीटासोबत गुलूगुलू बोलते पण माझ्याशी बोलत नाही. असंच एकदा गन्नी उसकापे मला तिच्या बैलगाडीत फिरायला नेते पण मी विषय काढू शकलो नाही मग ती माझ्याशी बोलत नाही म्हणाला.

गाववाले चक्रावून जायचे. त्यात एक जण विचारायचा की अरे बाबा पण मागच्या टायमाला तुझा प्रॉब्लेम तर असा असा होता. तो म्हणाला मागच्या प्रॉब्लेमचा या प्रॉब्लेमशी संबंध नाही. एक जण म्हणाला आरं बाबा पण तुला मटणाच्या खानावळीत बायको सहीत येऊं दिलं नाही म्हनला तवा तू मॅरीड हाईस की. मंग कशापायी लोकांच्या बायकांवर नजर टाकतुस.

तर म्हनला की ते मी मागच्या प्रॉब्लेम मधे बोललो. म्हणजे आता मॅरीड असलंच असं नाही.
मग गावक-यांनी त्याच्यावर ठेवला वॉच.
आणि तो कोन निघाला माहीत आहे का ?

ओळखा बरं..
तो / ती कुणीही.

मग गावक-यांनी त्याच्यावर ठेवला वॉच.
<<
गावक्री बरेच संन्स्कारी दिस्ताहेत.

माझ्या गावचं अस्तं तर चौकात बान्धून ओल्या धोतराच्या पिळ्याचा मार बसला असता त्याला, इतरांच्या बायकांबद्दल बोलतो म्हणून.

तुम्ही नीच, हलकट, पाजी मनुष्य आहात हे आता मान्य करून टाका. मुलींशी मैत्री करायची लायकी नाही तुमची. माझा हा पुढे दिलेला सल्ला मी जॉन स्नो ला दिला होता, तो तुम्हाला सुद्धा कमी येईल.

Let me give you some advice, bastard. Never forget what you are. The rest of the world will not. Wear it like armor, and it can never be used to hurt you.

पुढील लेखात दहा बारा मुली परिचित यांच्या प्रेमात पडल्यात आणि परिचित साळसूदपणाचा आव आणून संस्कारी मुलासारखे त्यांना लाजून त्यांच्यापासून दूर पळताहेत असं काहीतरी वाचायला मिळेल असं दिसतंय.

धागा प्रामाणिक आहे , असं गृहीत धरलं तर -
इथे स्त्री -पुरुष हा भेद मला मान्य नाही . अन्पेक्षित वागणे हे मानवी स्वभावाचे लक्षणच आहे .
समजा माझे काही मित्र आहेत . त्यातला एखादा मी त्याच्याशी चांगले वागून सुद्धा तो माझ्याशी चांगला वागत नाहीच . पण उलट तो एखाद्या स्वार्थी , फाटकन अपमानास्पद बोलणाऱ्या मित्राशी चांगला वागतो . एखाद्याच्या न माझ्या आवडीनिवडी समान आहेत , पण तो त्या विषयांवर माझ्याशी सोडून इतरांशी बोलतो . अन अशी अनेक उदाहरणे . प्रत्येकाचे- स्त्री - पुरुष- असे अनुभव असतीलच .
कोणाशी जमतं अन कोणाशी जमत नाही , हे तर तुम्ही ठरवूच शकत नाही . खूप सरळ वागणारी माणसेच थोडी असतात .

त्यानंतर - पसंद अपनी अपनी .
( जुन्या दिवसात ) आमच्या एका मित्राने जर त्याला एखादी मुलगी आवडली असं सांगितलं - तर आम्ही समजून जायचो - कि ती मुलगी दिसायला यथातथाच असणार . तो शोधून अशा मुली निवडायचा .

आजचीच एक बातमी - मला ती लिंक सापडली नाही आत्ता - यूके मध्ये एक महिला जेलर एका कैद्याच्याच प्रेमात पडली .
हे उदाहरण अजब न पुरेसं आहे .

धागा प्रामाणिक आहे , असं गृहीत धरलं तर >> त्यांचा पुढचा धागा दोस्ताना टाईप येणार आहे. मग तो ही प्रामाणिक असेल का ?
तुम्हीच तर नाही ना परिचित ? इल्लॉजिकल किती असावं त्याचे एकेक रेकॉर्ड कायम करणारा एकेक धागा येत असताना त्याचे समर्थन कोण करू शकतं ?

मी कोणावर वैयक्तिकहल्ले केले नाहीत तरी इथे काही लोक माझ्यावर मुद्दम हल्ले करत आहेत. अहो भैयासाहेब मी जे बोललो --- स्त्रियांना थोडी जबरदस्ती आवडते -- हा मी वाचलेलं सायकोलॉजिकल सिद्धांत आहे. त्यानुसार तुम्ही वाद घाला कि. पण तुम्ही वैयक्तिक का घेता? शाळेत सरांनी जीवशास्त्र मध्ये पुनरुत्पादन संस्था शिकवली तेंव्हा सरांना विचारलात का कि --- अहो सर तुमची घरच्या बायका पण असेच पुनरुत्पादन करतात का --- म्हणून विचारले का सरना? काय राव तुम्ही.

कुणी विवाहित स्त्रीवर प्रेम केले आणि तिने पण त्याच्यावर केले तर इथल्या आयडींच्या पोटात का दुखते? हि माझी मैत्रीण सुद्धा हिचे लग्न होऊन तिला बॉयफ्रेंड आहे पण तिला का कोणी बोल लावत नाही, मीच का दिसतो.

नारी मारतो काका, तुमचे उदाहरण बरोबर आहे व उदाहरणातले गावकरी पण शहाणे आहेत. त्यांना कळते तोंडावर घोंगडी घेऊन येणारा माणूस घोंगडे तेच असले तर आतला माणूस प्रत्येक धाग्यावर वेगळा असू शकतो. किंवा एकच जरी असला तरी तो त्याच्या जवळच्या नातलगांच्या किवा मित्रांच्या वगेरे समस्या घेऊन येऊ शकतो ना.

तुम्हाला समस्या खोट्या वाटल्या तर ते तुमच्यापाशी ठेवा. बाकीच्यांना जे खरोखर सल्ले देत आहेत त्यांना ओरडू ओरडू का सांगता आणि तूच तो आहे का म्हणून का विचारता? इतर धाग्यावर सोसायटीच्या वगैरे धागाकर्त्याला समाधान होत असेल तर उत्तर द्यायला हरकत नाही असे अगदी सात्विक तत्वज्ञान पाजळता कि राव. माझ्या धाग्यावर काय तुमच्या अंगात येते का. आता तुम्ही ह्या आयडीने इकडे तिकडे राजकारणाच्या धाग्यावर इत्यादी चोची मारायला सुरु केले आहे. आता कुठेतर काहीतरी पचकून आयडी उडवून घेणार. कारण तो ह्या धाग्यासाठी काढला आहे. आणि इथे राडा करून झालाय तुमचा नाही का. मागच्या टेरेस च्या धाग्यवेळी सुद्धा तुम्ही हेच केले होते. हि तुमची वृतीई.

कुणी विवाहित स्त्रीवर प्रेम केले आणि तिने पण त्याच्यावर केले तर इथल्या आयडींच्या पोटात का दुखते? हि माझी मैत्रीण सुद्धा हिचे लग्न होऊन तिला बॉयफ्रेंड आहे पण तिला का कोणी बोल लावत नाही, मीच का दिसतो.>>>>> अरे देवा !!! असे आहे होय. मग तुमचे तुम्हीच निस्तरा. आणी इथे परक्यांना विचारण्यापेक्षा तुमच्या मैत्रीणीलाच विचारा. निदान एकदाचा काय तो निकाल लागेल.

त्यांना कळते तोंडावर घोंगडी घेऊन येणारा माणूस घोंगडे तेच असले तर आतला माणूस प्रत्येक धाग्यावर वेगळा असू शकतो. किंवा एकच जरी असला तरी तो त्याच्या जवळच्या नातलगांच्या किवा मित्रांच्या वगेरे समस्या घेऊन येऊ शकतो ना.>> अरे देवा!! तुम्ही इथे जवळच्या नातलगांच्या किंवा मित्रांच्या समस्या मांडता की काय?

शाळेत सरांनी जीवशास्त्र मध्ये पुनरुत्पादन संस्था शिकवली तेंव्हा सरांना विचारलात का कि --- अहो सर तुमची घरच्या बायका पण असेच पुनरुत्पादन करतात का --- म्हणून विचारले का सरना? काय राव तुम्ही.>>> https://secureservercdn.net/104.238.69.231/m3v.e54.myftpupload.com/wp-co...

https://youtu.be/zJi_etXYupc

दहा बारा मुली परिचित यांच्या प्रेमात पडल्यात आणि परिचित साळसूदपणाचा आव आणून संस्कारी मुलासारखे त्यांना लाजून त्यांच्यापासून दूर पळताहेत असं काहीतरी वाचायला मिळेल असं दिसतंय >> हे वाचून लुनावाले ब्रह्मे यांचा मुख्यपीठ लेख आठवला.

त्यांना कळते तोंडावर घोंगडी घेऊन येणारा माणूस घोंगडे तेच असले तर आतला माणूस प्रत्येक धाग्यावर वेगळा असू शकतो. किंवा एकच जरी असला तरी तो त्याच्या जवळच्या नातलगांच्या किवा मित्रांच्या वगेरे समस्या घेऊन येऊ शकतो ना.

तुम्हाला समस्या खोट्या वाटल्या तर ते तुमच्यापाशी ठेवा. बाकीच्यांना जे खरोखर सल्ले देत आहेत त्यांना ओरडू ओरडू का सांगता आणि तूच तो आहे का म्हणून का विचारता? इतर धाग्यावर सोसायटीच्या वगैरे धागाकर्त्याला समाधान होत असेल तर उत्तर द्यायला हरकत नाही असे अगदी सात्विक तत्वज्ञान पाजळता कि राव. माझ्या धाग्यावर काय तुमच्या अंगात येते का. आता तुम्ही ह्या आयडीने इकडे तिकडे राजकारणाच्या धाग्यावर इत्यादी चोची मारायला सुरु केले आहे. आता कुठेतर काहीतरी पचकून आयडी उडवून घेणार. कारण तो ह्या धाग्यासाठी काढला आहे. आणि इथे राडा करून झालाय तुमचा नाही का. मागच्या टेरेस च्या धाग्यवेळी सुद्धा तुम्ही हेच केले होते. हि तुमची वृतीई. >>>> Lol

यांना आता मेंटल हॉस्पिटल मधे अ‍ॅडमिट करण्याची गरज आहे. बाहेरच्या जगात एकही स्त्री यांना दिसली नाही पाहीजे ही यांच्यासाठी आणि समाजासाठीही गरजेची बाब झाली आहे. हा माणूस स्त्रियांकडे काय नजरेने बघतो हे मी लिहायची गरजच नाही.

आणि आता याच्याकडून मी परवानग्या घ्यायच्यात कुठला आयडी घ्यायचा, कुठल्या धाग्यावर लिहावं. हा वेमा किंवा अ‍ॅडमिन यांचा ड्युआयडी आहे का इतका थयथयाट करायला ? Proud
ज्यांच्या मालकीची वेबसाईट आहे ते बघून घेतील.
हेच वेगळ्या शब्दात सांगितले की ज्याची बायको असेल तो बघून घेईल.
असो. मानसोपचाराची गरज असलेल्याशी चर्चा करून फायदा नाही काही.

स्त्रियांना थोडी जबरदस्ती आवडते -- हा मी वाचलेलं सायकोलॉजिकल सिद्धांत आहे.
>>> कंसेंट महत्वाचा.. तुम्हाला हेच कळत नाहीय... आता एखादा मुलगा एखाद्या मुलीला आवडला.. त्याने तिचा हात पकडला, गुलाब दिला... तिला ते चालत आहे म्हणून तुम्हीपण जाऊन हात पकडला तर त्यात चूक तुमची आहे...
एके दिवशी तुम्हाला हे कंसेंट प्रकरण समजेल..होप सो...

राजकारणाच्या धागे परिचितांना ईनाम दिलेत बहुधा. तिकडे बाखच्या धाग्यावर परिचितांचा उदय झालेले पाहिले.
असे प्रतिसाद देताना नीट दार लावून घेत जा हो. नाहीतर मागची बाजू उघडी पडते. Lol

आता एखादा मुलगा एखाद्या मुलीला आवडला.. त्याने तिचा हात पकडला, गुलाब दिला... तिला ते चालत आहे म्हणून तुम्हीपण जाऊन हात पकडला तर त्यात चूक तुमची आहे...>> नाही! नाही..!! यात परिचित यांची नाही तर त्या मुलीची चुक असेल. दुसऱ्या मुलाकडुन फुलं घेते आणि परिचित यांना नाही. असं कुठं असतं का?

छान सकारात्मक बातमी आहे मानवमामा, भांडून वेगळे होण्यापेक्षा असे लाडीगोडीत वेगळे व्हावे आणि आता त्याने आपल्या माजी पत्नीशी विबासं जमते का हा प्रयत्न करावा Happy

हा आयडी एक सातत्याने लैंगिक विचारांनी ग्रस्त असलेला रोगट आयडी आहे. प्रशासकांनी याचे विविध आयड्यांवरून झालेले लिखाण लक्षात घेऊन भविष्यात ही घाण मायबोलीवर फिरकणार नाही याची दक्षता घ्यावी.

Pages