तू मुलींना आवडत नाहीस (स्वगत)

Submitted by Parichit on 4 April, 2021 - 04:00

तू मुलींना आवडत नाहीस. कितीही कडू असली तरी हीच fact आहे. ती तुला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. तुझे वागणे चांगले आहे. तुझे बोलणे चांगले आहे. तुझे विचार चांगले आहेत. तुझा व्यक्तिमत्व चांगले आहे. तुझे सगळे चांगलेच आहे. परंतु.............

तू मुलींना आवडत नाहीस

हे कटू सत्य आहे. आणि हे तुला स्वीकारावेच लागेल. हि काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्याशी तुझ्या चांगल्या गुणांचा असण्याचा वागण्याचा काही एक संबंध नाही. सूर्य पूर्वेला उगवतो हि वस्तुस्थिती आहे व त्याबाबत आपण काहीही करू शकत नाही. तदनुसारच तू मुलींना आवडत नाहीस हि सुद्धा एक वस्तुस्थितीच आहे. त्याबाबत कोणीच काही करू शकत नाही. मुलीना कोण आवडते ते आजवर भल्याभल्यांना कळले नाही. मग तू कशाला डोकेफोड करून घेतोस? तुझ्या दृष्टीने जी मुले/पुरुष तुला बावळट, आळशी, ढेरपोटे, टकले, टाकाऊ, अजागळ, कोणतेच सदगुण नसलेले वगैरे वगैरे असे वाटतात. असेच पुरुष/मुले सुंदर स्त्रियांना/मुलीना आवडतात. त्या अशांच्यावरच भाळतात. हे ऐकायला असूया वाटत असली तरी हेच कटूसत्य आहे. सुंदर सुंदर स्त्रिया माठ पुरुषावर भाळू शकतात. तुला - सो नाईस ऑफ यू. ओके Thanks - म्हणून तुला कटवणारी लावण्यवती एखाद्या माठ टकल्या ढेरपोट्याला - यू आर माय एंजल. बी देअर फॉर मी - असे म्हणाली तर अजिबात जळू नकोस. कारण तू किती नाकारले तरी तेच सत्य आहे. मुलींची बुद्धी तशीच चालते. एखादा पुरुष तद्दन भामटा आहे याबद्दल तुझ्या मनात कोणतीही शंका नसेल. कुणालाही त्याच्या थोबडाकडे बघितल्यावरच ते कळेल इतके ते स्पष्ट असेल. ते कळण्यासाठी जास्त अक्कल चालवायचीदेखील गरज नाही. असे असूनही तू ज्या सो कॉल्ड गोड मुलीला गेली कित्येक महिने मनधरणी करून इम्प्रेस करू पाहत आहेस, त्या मुलीला नेमका तोच पुरुष काही दिवसातच आवडू लागतो. तुला टाळणारी ती, त्याला पाहताच मात्र खुश होते. त्याचे नाव घेताच आनंदून जाते. हे जळजळीत वास्तव आहे. पण ह्यावर मनातल्या मनात जळण्यापेक्षा आणि स्वत:ला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा हे सत्य जितके लवकर तू पचवशील तितके ते तुझ्यासाठीच ते चांगले राहील. मुलींच्या पायी वेळ आणि उर्जा वाया घालवू नकोस. एखादीला तू आवडायचा असलास तर तसाही काही न करता आवडून जाशील. पण त्याचवेळी ती तुला आवडेलच ह्याची ग्यारंटी नाही, हे चालायचेच. त्यात कुणी फार तात्त्विक उहापोह करण्यात अर्थ नाही. अखेर काय? तर हे असेच आहे तर मग मुलीना इम्प्रेस करायची धडपड आणि पराकाष्ठा काहून करायची? ती तू करू नकोस.

गेली हजारो का दशहजारो वर्षे झाली, समाजात ठरवून लग्ने केली जातात. ह्यामध्ये पहिल्या भेटीतच एकमेकाला पसंद करायचे असते. अवतीभवती सगळे बसलेले असताना जीवनसाठी निवडायचा असतो. आता निसर्गाचा क्रम पाहिला तर स्त्री-पुरुषाने एकमेकाला पसंद करणे हि त्या दोघांची अत्यंत खाजगी गोष्ट असते. वास्तविक अशी चारचौघात ती करायची नसते. स्त्री हि पुरुषाचे सुंदर मन पाहून त्याची निवड करते, आणि पुरुष हा स्त्रीचे शारिरीक सौंदर्य पाहून तिची निवड करतो. हा निसर्गक्रम आहे. आता ह्या दहा पंधरा मिनिटाच्या - स्थळ बघण्याच्या - कार्यक्रमात मुलाला स्त्रीचे शरीर दिसेल व तो त्यावरून तिची पसंदी करू शकेल हे मान्य आहे. पण इतक्या कमी वेळात एकही शब्द न बोलता मुलीला त्या मुलाचे मन कसे कळू येईल? ते सुंदर आहे का काटेरी आहे ह्याचा तिला कसा अंदाज येईल? पण त्याचा विचार करतो कोण इथे? पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषाने तिला बघून पसंद केले कि मामला मिटला. दोघांचे लग्न लावले जाते. आणि तिथून पुढे आयुष्यभर ती वैवाहिक बलात्काराला ती सामोरी जाते. पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्री आणि जमीन ह्या दोन म्हणजे इथे पुरुषांनी पराक्रम करून लढून वा भांडून प्राप्त करायच्या व नंतर त्यावर मालकीहक्क घेऊन यथेच्छ भोगायच्या गोष्टी असतात. वाचायला वाईट वाटेल. पण कटू असले तरी हेच सत्य आहे. सर्वाच्या मुळाशी हाच विचार आहे हे नाकारता येत नाही. कदाचित ह्याच परंपरेचे पिढ्यानपिढ्या संस्कार झाल्यामुळे अनेक स्त्रियांना जबरदस्ती करणारे पुरुष आवडतात हे वास्तव आहे. हे जरा वादग्रस्त विधान असले तरी खरे आहे. बलात्कार आणि प्रेम ह्यात अंधुक रेषा आहे. ती ज्याला कळली त्याला स्त्री प्राप्त होते. जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो. ह्यात थोडे सुद्धा अयोग्य काही झाले तर मात्र तो बळात्कारच ठरतो. हा फोर्म्युला आहे.

बर. ते जाउदे. विषयांतर नको. तर मी काय सांगत होतो कि ठरवून केलेल्या लग्नाच्या नावाखाली मुलीवर पुरुषाची जबरदस्ती लादण्याची परंपरा गेली कित्येक हजारो वर्षे सुरु आहे. इतक्या हजार वर्षांचे संस्कार असल्याने आता आता गेल्या काही दशकांत मोकळ्या होऊ घातलेल्या समाज व्यवस्थेत मुलीला आपला जोडीदार आपल्या बुद्धीने निवडता येण्याची अपेक्षा करावी तरी कशी? मुर्खासारखे निर्णय घेऊन एखाद्या भामट्याचा एंजल म्हणून प्रेमिक म्हणून स्वीकार करायचा आणि तुला फडतूस म्हणून रिजेक्ट करण्याचा प्रताप मुलीकडून होणारच. कारण हजारो वर्षाच्या मानसिक गुलामगिरीमुळे त्यांची बुद्धी अद्यापी तितकी प्रगल्भ झालेली नसते. यात त्या मुलींचा दोष तो काय? ज्यांनी अशी समाज व्यवस्था निर्माण केली त्यांना बोलावे लागेल.

पण जाऊंदे. काय करायचा आपल्याला इतिहास आणि भूगोल घेऊन? तुझ्यापुरते एक आणि एकच सत्य कायम मनाशी बाळगत जा आणि ह्या बाबतीत मुलीकडून कसलीच तर्कसंगत विचारांची किंवा निर्णयाची अपेक्षा ठेऊ नकोस. म्हणजे मानसिक त्रास होणार नाही तुला. आणि ते सत्य म्हणजे.......

तू मुलींना आवडत नाहीस! विषय संपला.

[तळटीप: मागच्या काही दिवसांत घडलेल्या काही विचित्र घटनांमूळे मनात साठून राहिलेल्या विचारांचा निचरा होण्यासाठी व्यक्त होण्याची गरज भासल्याने हे स्वगत लिहिले आहे. केवळ आणि केवळ तोच एक हेतू आहे. लिहून झाल्यावर आता बरेच हलके वाटत आहे. बाकी, मायबोलीकर त्यांना जो हवा तो प्रतिसाद द्यायला मोकळे आहेत]

-------

हा वरचा लेख लिहिण्यामागे जी चित्तरकथा आहे ती खरेतर मला लिहायची नव्हती. पण लेखावर काही प्रतिसाद पाहता हि कथा लिहिणे गरजेचे आहे असे वाटल्याने ती इथे थोडक्यात देत आहे. वरील स्वगत लिहायला मला कशामुळे भाग पडले हे वाचकांना लक्षात येईल हि अपेक्षा.

कॉलेजमध्ये असताना आमचा मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप होता. खूपच खेळीमेळीचे वातावरण होते. त्यात एका मुलीची व माझी चांगली मैत्री झाली. ती खूपच सुंदर होती असे मी म्हणणार नाही. पण खूप साधे सौंदर्य होता तिच्यात. काळेभोर बोलके डोळे. तो साधेपणा तो मला खूपच आवडायचा. नाजूक चणीची होती. गाणे छान गायची. खूप गोड वाटायची गाणे गात असताना. आम्ही सगळे एकत्र असताना तिला आम्ही गाणे गायचा आग्रह करायचो व ती गायची सुद्धा. किती छान दिवस होते. हळूहळू तिच्याविषयी माझ्या मनात सोफ्ट कोर्नर बनत गेला. रात्री दिवसा तिचा विचार मनात येत असे. पण हे मी तिला बोलून दाखवू शकत नव्हतो. फारच इनोसंट होती. त्यामुळे तिच्याविषयी मी असा विचार करणे हे तिला आवडले नसते. ग्रुपवर त्याचा परिणाम झाला असता. ग्रुप सोडून गेली असती व माझे खूप अवघड झाले असते. म्हणून मी गप्पच राहिलो. पण त्याचवेळी कुठेतरी काहीतरी भलतेच शिजत होते. कॉलेजात एक ज्युनिअर होता. टपोरी होता मावा गुटखा खायचा. शिवाय बरीच व्यसने होती. फक्त बोलण्यात चतुर होता आणि गाणे बरे गायचा. एवढीच काय ती जमेची बाजू. पण बाकी त्याच्या वर्तणुकीमुळे ग्रुप मध्येच काय वर्गात सुद्धा कुणाचेच त्याच्याविषयी चांगले मत नव्हते.

एक दिवस वाईट उगवला. ह्या मुलीला मी त्या मुलाशी बोलताना पाहिले. मला आश्चर्य वाटले. काय गुणाचा आहे हे माहित असूनही हि त्याच्याशी काय बोलत असावी? एकतर ती खूप इनोसंट होती किवा मूर्ख होती. मी विचार केला, कि असेल बाबा काही तात्पुरते कारण म्हणून बोलली असेल. असे म्हणून मी मनाचे समाधान करून घेतले व दुर्लक्ष केले. पण त्यानंतर सुद्धा ती त्याच्याशी बोलताना आढळली. विशेष गोष्ट अशी कि फार कोणी आजूबाजूला नसताना एकदा त्याच्याशी बोलत उभी होती. मला मनात फार जळजळ झाली. इतकी वर्षे आमचा ग्रुप आहे पण मला असे कधीच एकटे बोलायची संधी तिने दिली नाही. आणि हा मात्र कोण काल कॉलेजात आला आणि इथवर मजल मारली त्याने. मला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. ग्रुपमध्ये बाकीच्या मित्रांशी यावर ती नसताना विषय काढला. नाजूक गोष्ट होती. कारण सगळे मला म्हणले असते तिच्यात ह्याला इतका इंटरेस्ट का. त्यामुळे तसे न जाणवता मी विषय काढला. म्हणालो ती मला इनोसंट वाटते आणि तो मुलगा कसा आहे सगळ्यांना माहित आहे. तर आपण तिला सावध करूया. तर बाकीचे म्हणाले तिचे व्यक्तीगत आयुष्य आहे आपण तसे करणे बरोबर होणार नाही. ती ग्रुप सोडून जाईल. असे सर्वांनी बोलल्यावर माझा नाईलाज झाला. जे होईल ते बघत बसायचे ठरवले. आणि माझ्या डोळ्यासमोर ते कैकदा भेटत असत हे मी मूकपणाने पाहत राहिलो. एकदा ग्रुपमध्ये सर्वांच्यात ती असताना मी न राहवून विषय काढलाच. खेळीमेळीत तिला विचारले, काय बोलत असतो तो तुझ्याशी. तर अगदी सहज म्हणून गेली "अरे तुला माहिती का गाणे किती छान गातो. गाण्याच्या टिप्स देत असतो मला. बाकीचे काही असले तरी त्याच्याकडून गाणे घेण्यासारखे आहे. जे चांगले आहे ते घ्यायला काय हरकत आहे" मी मनातल्या मनात प्रचंड चरफडलो. त्यांनतर बरेच काही बाही झाले. त्या दोघांच्यात संवाद सुरु राहिला पण गाडी मैत्रीच्या पुढच्या थराला गेली असेल असे निदान मला जाणवले तरी नाही. किंवा तसे काह्ही घडले नसावे अशी मनाची खोटी समजूत काढत मी कॉलेजची वर्षे काढली.

आता कॉलेज सोडून बरीच वर्षे झालीत. मध्यंतरीच्या वर्षांत सगळ्यांचा संपर्क तुटला होता. पण नंतर आम्ही फेसबुक आणि व्हाट्सपवर पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो. ती नव्हती खूप वर्षे. कुठे गायब होती कुणास ठावूक. कुठूनतरी अप्रत्यक्षपणे बातमी येऊन तिचे लग्न झालेय हे सर्वाना माहिती झाले. कुणाशी झालेय हे माहित नव्हते. पण ज्याच्याशी झालेय तो "तो" नव्हता इतकी माहिती मात्र मी काढली. आणि मागच्या वर्षी कुठूनसे ती पुन्हा आमच्या संपर्कात आली. व्हाट्सपवर ग्रुप मध्ये सामील झाली. इतक्या वर्षांनी तिला पाहून सर्वधिक आनंद मला झाला होता. इतकी वर्षे कुठे गायब होतीस विचारले. तर लग्नानंतर नवरा बाळंतपण मुले संसार ह्यातून वेळच मिळाला नाही म्हणाली. तिचा नवरा बिजनेस मध्ये होता. गाण्यातले त्याला ढ कळत नव्हते हे सुद्धा तिने सांगितले. मग मला पुन्हा हुरूप चढला. गाण्याचा सराव करून मी तिला एकदा एक गाणे म्हणून पाठवले. त्यावर तिचा "छान आहे. चांगले गातोस" एवढाच रिप्लाय आला. नंतर गाणी पाठवली पण तिचा प्रतिसाद आला नाही.

आणि मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि तिची फेसबुकवर फ्रेंड लिस्ट बघितली तर तो टोणगा तिच्या लिस्टमध्ये दिसला. मला मनात शंकेची पाल चुकचुकली. जर काही वाईट घडायचे असेल तर घडतेच ह्या न्यायाने गोष्टी घडल्या. त्याच्या प्रोफाईल मध्ये जाऊन बघितले असता त्याच्या प्रत्येक पोष्टवर हिची कौतुकाची कॉमेंट. मी इतके काय काय ग्रुपवर आणि फेसबुकवर लिहायचो त्याला मात्र कधी फार तिने कॉमेंट दिल्या नाहीत. मला फार वाईट वाटले. आणि मनात नको नको त्या शंका सुद्धा आल्या. मग जरा संयमाने खेळायचे ठरवले. आणि तिच्याशी बोलणे व चाटिंग वाढवून काही महिन्यांपूर्वी तिला भेटायला म्हणून तिच्या घरी गेलो. हे सुद्धा सहजपणे घडले नाही. त्यासाठी बरीच मनधरणी व बरेच काही करावे लागले. घरी गेलो तेंव्हा एकटीच होती. तिचा नवरा युरोपात गेला होता. इतक्या वर्षात आम्ही दोघे पहिल्यांदाच असे एकट्याने भेटत होतो. इतक्या वर्षांनी तिच्याशी बोलताना मला खूपच छान वाटत होते. पण एक विचित्र वाटत होते. ती फारच फॉर्मल होऊन बोलत होती. बोलण्यातून जास्त जवळीक होणार नाही याची काळजी घेत होती. मी थोडी थट्टामस्करी करायचा प्रयत्न केला पण तिने फार प्रतिसाद दिला नाही. मी थोडा हिरमुसलो. फार बोलण्यासारखे काही नाही केवळ मी फार आग्रह केला म्हणून तिने भेटायला बोलवले असे तिने अप्रत्यक्षपणे मला जाणवून दिले. मला वाईट वाटले. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणालो दोघांसाठी थोडा-थोडा चहा करशील का आपण चहा घेता गप्पा मारू. नाईलाजाने ती तयार झाली आणि स्वयंपाकघरात गेली.

जाताना आपला मोबाईल तिथेच सोफ्यावर ठेवून गेली. माझी छाती धडधडू लागली. माझ्या काय मनात आले कुणास ठावूक. पटकन तो मोबाईल उचलला. सुदैवाने त्याला लॉक नव्हते. तिच्या व्हाट्सपवर गेलो. माझ्या हातात फार फार कमी वेळ होता. तेवढ्यात ती बाहेर आली असती तर माझे काही खरे नव्हते. त्या वेळेत झरझार स्क्रोल केले. आणि जे अपेक्षित होते तेच दिसले. त्या टोणग्याचे चाट होते. ते मी ओपन केले. आणि पुढल्या काही सेकंदात त्यांचे शेवटचे काही मेसेजेस मी भरभर नजरेखाली घातले. त्यात त्या टोणग्याने गाणी म्हणून पाठवलेली दिसत होती. त्यावर हिने पण त्याला गाणी गाऊन पाठवली होती. दोघांचे गुलुगुलू चाट होते. हार्टचे सिम्बॉल काय आणि नाचणारी बाहुली काय आणि रेनबो काय आणि काय काय. तेवढ्या काही सेकंदात माझे श्वासोच्छवास वाढले. एकमेकांच्या गाण्याचे कौतुक करायच्या नादात त्यांनी हद्द गाठली होती. "मैने प्यार तुम्ही को किया है, मैने दिल भी तुम्ही को दिया है" हे गाणे त्याने गाऊन पाठवले आणि हिने त्याला प्रतिसाद म्हणून "कसले मस्त गायलेस रे! मैने भी तुम्हे दिया है" असे म्हणून दात काढलेली स्मायली हिने पाठवली होती. त्यावर त्याने रिप्लाय पाठवला होता "ऐसे मेसेज मत कर. मेरी बिवी ने देखा तो मुझे बहुत मार पडेगी" असे काहीबाही. आणि एजून एक तिचा त्याला पाठवलेला मेसेज दिसला "यू आर माय एंजल" मी पटकन डोळे झाकले आणि मोबाईल बंद करून जागेवर आहे तसा ठेऊन दिला व डोळे मिटून बसलो. त्याशिवाय बरेच चाट होते पण ते वाचायची माझ्या हिम्मत नव्हती. हे सगळे मी केवळ काही सेकंदात उरकले. फार मोठी रिस्क मी घेतली होती. नशिबाने त्यानंतर सुद्धा एक दोन मिनिटांनी ती चहा घेऊन बाहेर आली. पण एव्हाना मला जे हवे होते ते मी काढले होते. इतक्या वर्षांचा संशय खरा ठरला होता. प्रमाणापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने सिद्ध झाला होता. कॉलेजात असताना मावा गुटका सिगारेट तंबाकू ह्यात असणारा टोणगा आता काय करतोय आणि कसा सेटल झाला याच्याशी मला काही देणेघेणे नव्हते. पण माझ्यासाठी तो अजूनही फालतूच होता. ज्याच्यावर हि भाळली होती.

हे सगळे पाहिल्यावर मग मलाच तिथे जास्तवेळ थांबण्यात इंटरेस्ट उरला नाही. मला त्या दोघांचे संबंध असण्यात काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या मनात एकच राहून राहून एकच येत होते. माझ्यासाठीसुद्धा कौतुकाचे चार शब्द काढायला तिच्या जीवावर का येत असावे? माझ्या पोस्टवर नाही, किंवा माझ्या गाण्यावर नाही, मला रिप्लाय नाही. कुठेच तिच्या आयुष्यात मला फारसे स्थान नव्हते असे दिसले. मी मात्र माझी खूप छान मैत्रीण समजून चाललो होतो. माझी मनातल्या मनात प्रचंड चरफड सुरु झाली होती. चहा पिता पिता गप्पा मारताना मी विचारलेच "काय गं. माझे गाणे किंवा मेसेजेस आवडत नाहीत का तुला? कधी तू फार रिप्लाय देत नाहीस म्हणून विचारले. डिलीट करून टाक ते सगळे माझे मेसेजेस" मी हसत हसत मनातली जळजळ ओकली. तिला काय कळायचे ते कळले असावे. त्यावर तिने एकच उत्तर दिले. म्हणाली "जरा शहाणा हो ना आता तरी. अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील". ते शब्द कान जाळत माझ्या मनात घुसले. ते शब्द आणि तो मेसेज नंतर कायम माझा पिच्छा पुरवत राहिले.

त्याला: "यू आर माय एंजल"
मला: "अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील"

नंतर मला तिच्याशी ग्रुपवरसुद्धा बोलण्यात इंटरेस्ट उरला नाही. हे सगळे झाल्यावर तिचा विषय मनातून काढायला फार त्रास झाला. अजून होतोय. त्याचाच एक भाग म्हणून वरचा लेख.

माझी हि चित्तरकथा वाचल्याबद्दल धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भैया पाटलांनी परिचितचे सर्व लिखाण पहिल्या पानावर दिसावे ल जेणेकरून त्यांच्यावर लगोलग तुटून पडता येईल या हिशोबाने त्यांचे चाहते होण्याचे ठरवले असेल तर?

मला जर एखाद्याला ट्रोल करण्यापूरता अवतार घ्यायचा असेल तर मी त्या एखाद्याचाच चाहता होईन!

सर्वप्रथम माझ्यामुळे प्रगल्भ सरांना माझ्यामुळे अप्रत्यक्षपणे जो त्रास झाला त्याबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागतो व त्यांनी अशा आयडींच्या त्रासाला कंटाळून मायबोली सोडू नये अशी विनंती करतो. मुली अशा का वागतात ते कारण विवाहसंस्थेच्या परंपरेत दडले असेल असे समजून मी जे काही धाग्यात लिहिलंय त्याच्या संदर्भात खोलात जाऊन प्रगल्भ यांनी उचित प्रतिसाद दिला होता. व तो मलाच काय इतरही काही सदस्यांनाहि आवडला होता. पण इथे काही विघ्नसंतोषी आयडी आहेत. त्यांनी विषयाला धरून असलेल्या त्या प्रतिसादावर सुद्धा प्रगल्भ यांची खिल्ली उडवली.

म्हणजे, हे स्वत: विषयाला धरून कधी बोलणार नाहीत, उलटपक्षी धागालेख्क कसा खोटा आहे हेच सांगत बसणार. आणि जे कोणी विषयानुसार बोलत आहेत त्यांना सुद्धा हे त्रास देणार. नक्की काय प्रॉब्लेम आहे यांचा? इथल्या स्त्री/मुली आयडीज कडून आम्हाला सहानुभूती मिळेल असे वाटून ह्यांना कॉम्प्लेक्स येत असेल का? (नाही म्हणजे आपली एक शंका). मला खरंच जाणून घ्यायचं आहे ह्यांना नक्की काय प्रोब्लेम आहे. हे बंडीवाले काका मला माझ्या मागच्या धाग्यावर येऊन सुद्धा मला त्रास देत होते. म्हणे मी टीपी साठी धागे काढतो. काय गरज पडली आहे मला? मी कोतबो मध्ये आजवर कोणताही धागा टीपी साठी काढलेला नाही. पण काही आयडीजना टीपी वाटत असेल तर त्यात माझा काय दोष? ह्या काकांनी त्या टेरेस च्या धाग्यावर सुद्धा मला त्रास देण्यासाठी आयडी काढला होता. पण नंतर तोच आयडी उडाला. यावरूनच लक्षात येते कि फेक आयडी घेऊन कोतबोवर येऊन गंभीर धाग्यांवर टीपी करणारे आयडी वास्तविक कोणते आहेत.

परिचित यांना त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचे काही वाटत नाही >>>>>

माझी समस्या इतर सुद्धा बऱ्याच जणांची असेल असे वाटले तरच मी इथे कोतबोवर येऊन लिहितो.
एखाद्या मित्राला खूपच भाव द्यायचा आणि दुसर्या मित्राला मात्र काहीही दोष नसताना थेट इग्नोर करायचे किंवा मूर्ख बनवायचे असे उद्योग अनेक मुली करतात, व कितीक तरुण त्यामुळे दुखावले जातात व अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. त्या समस्येवर बोलणे अयोग्य आहे का? मन सुद्धा मोकळे करायचे नाही का? आम्हाला मन नाही का? आम्ही कोत्बोवर यायचे नाही का? आचरट धागे म्हणून केलेली संभावना आणि होणाऱ्या टीकेमुळे आम्ही व्यक्त व्हायचे थांबवावे का?

जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो.
ह्यावर कोणी आक्षेप घेतला तर >>>>>

एकदा हेअर कटिंग सलून मध्ये रांगेत बसलो असता तिथे एका मासिकात "स्त्रियांना आवडते जबरदस्ती?" अशा टायटलचा लेख होता. त्यात यावर चर्चा केलेली होती. सर्वांकडून वाचल्या जाणार्या छापील मासिकातला सायकोलोजीस्ट लेखकाने लिहिलेला लेख. कुठेतरी चोरीचुपके वाचल्या जाणार्या पुस्तकात लिहिलेला नव्हे. त्याशिवाय माझ्या मागच्या काही अनुभवातून सुद्धा मला हे जाणवले आहे - ज्याविषयी मी वेगळ्या ध्ग्यात लिहिले आहे - ह्या सगळ्यावर विचार करून मी वरचे वाक्य लिहिले आहे. ह्यात आक्षेपार्ह असे काय आहे?

मला एकच कळत नाही. मायबोलीवर धाग्याच्या विषयसंदर्भात चर्चा का होत नाही. त्या लेखकाने बाकीच्या धाग्यात काय लिहिले. त्यामागची व्यक्ती कोण? त्याचे/तिचे अजून कोणते आयडी आहेत? ह्यात तुमी का जाता. धाग्याचा विषय काय आहे त्यावर धागालेखकाला उपयोगाचे काय बोलता येत असेल तर बोला नाहीतर सोडून द्या म्हणतो मी.
मी इथे कुणाला ओळखत नाही. pintee, भैया पाटील, अमरिता हे माझ्या आवडते लेखक यादीत आहेत. पैकी pintee, अमरिता ह्यांना फॉलो केल्याचे आठवते पण भैया पाटील हा आयडी त्यात कधी कसा आला मला माहित नाही. कधी त्यांच्याशी काही चर्चा पण आठवत नाही. चुकून कधीतरी क्लिक पडून ते त्या यादीत गेले असतील. पण आता इथले प्रतिसाद वाचून त्यांना यादीतून काढले असे व्हायला नको म्हणून तूर्तास मी ते नाव यादीत तसेच ठेवत आहे.

परिचितजी, धन्यवाद यावर प्रकाश टाकल्याबद्दल _/\_
अजिंक्यराव, आपण चुकलोच. सरांचा पुरुषांच्या मनातल्या खदखदीवर चर्चा करणारा एवढा चांगला धागा भरकटवला. ते म्हणताय न्हाव्याच्या दुकानात “तो रीसर्च” वाचला होता म्हणजे खरेच असणार नाहीतर इथल्या महिला( खऱ्या आयडी फक्त) गप्प नसत्या बसल्या. आपला थोडा कमी अब्यास असल्याने आपण उगीच अनाहूतपणे नको तिथे स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याच्या फ़ंदात पडलो. सरांनी अजून असे उपयोगी रीसर्च इथे मांडत जावे जेणेकरून इथल्या स्त्री-पुरुषांना (खरे आयडी फक्त) थोडी मदत होईल.

आचरट धागे म्हणून केलेली संभावना आणि होणाऱ्या टीकेमुळे आम्ही व्यक्त व्हायचे थांबवावे का?
Submitted by Parichit on 11 April, 2021 - 14:52>> नक्कीच व्यक्त व्हा. पण एकविसाव्या शतकात
पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत असतांना
तुमच्याच लेखातली काही वाक्ये आचरटच नाही तर निषेधार्ह आहेत.
<<कारण हजारो वर्षाच्या मानसिक गुलामगिरीमुळे त्यांची बुद्धी अद्यापी तितकी प्रगल्भ झालेली नसते. >> हे तुमचे विचार आहेत..
असे विचार मांडायचे आणि टीका व्हायला लागल्यावर 'आम्ही व्यक्त व्हायचे नाही का?' असा कांगावा करायचा. अवघड आहे तुमचं.

त्या समस्येवर बोलणे अयोग्य आहे का? >> हो
मन सुद्धा मोकळे करायचे नाही का? >>
नाही
आम्हाला मन नाही का? >>> असेल असं वाटत नाही.
आम्ही कोत्बोवर यायचे नाही का? >>> नाही, कारण प्रॉब्लेम खोटे असतात
आचरट धागे म्हणून केलेली संभावना आणि होणाऱ्या टीकेमुळे आम्ही व्यक्त व्हायचे थांबवावे का? >> अगदीच, प्लिजच. कारण टीका नाही आरसा आहे

Proud

नाही, कारण प्रॉब्लेम खोटे असतात
आचरट धागे म्हणून केलेली संभावना आणि होणाऱ्या टीकेमुळे आम्ही व्यक्त व्हायचे थांबवावे का? >> अगदीच, प्लिजच. कारण टीका नाही आरसा आहे
Submitted by मीरा.. on 11 April, 2021 - 06:35

>>

हो हो, पुरुषांचे सगळे प्रॉब्लेमच मुळात नकली असतात त्यामागे काहीही लॉजिक नसतं. जगातले सगळे प्रॉब्लेम्स हे केवळ बिचार्या स्त्रीच्या नशिबी वाढून ठेवलेले आहेत. म्हणून आत्ता इथून पुढं फक्त स्त्रियांनी भोकाड पसरावं, पुरुषांना मन,हृदय वैगरे नसतंच त्यामुळं त्यांना व्यक्त होण्याचा काहीही अधिकार नाही. गेला एखादा डिप्रेशनमध्ये तर जाऊदे, आपल्याला काय ? तो जगला काय, मेला काय आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपण बिंदास त्याच्यावर मनमोकळेपणाने हसावे, टर उडवावी, आपल्या करमणुकीपुढं त्याच्या मनाची, जीवाची काहीच किंमत नाही. काय बरोबर ना ?

अर्थात यात तुमची वैयक्तिक चूक काहीच नाही म्हणा, आख्ख्या समाजाचंच सोशल कंडिशनिंग असं विकृत झालंय. कदाचित म्हणूनच स्वतःचा जीव देणाऱ्यात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. हा प्रॉब्लेम फक्त भारतापुरता मर्यादित नाही, बरं का.

Globally, death by suicide occurred about 1.8 times more often among males than among females in 2008, and 1.7 times in 2015.

Many researchers have attempted to find explanations for why gender is such a significant indicator for suicide. A common explanation relies on the social constructions of hegemonic masculinity and femininity. According to literature on gender and suicide, male suicide rates are explained in terms of traditional gender roles. Male gender roles tend to emphasize greater levels of strength, independence, risk-taking behavior, economic status, and individualism. Reinforcement of this gender role often prevents males from seeking help for suicidal feelings and depression. (source - https://en.wikipedia.org/wiki/Gender_differences_in_suicide)

आज इथं परिचित यांच्या जागी एखादी कुरूप स्त्री असती आणि तिनंही दुःखाच्या आवेगात असाच लेख लिहिला असता त्यावर पण तुम्ही अशीच प्रतिक्रिया दिली असती का ? मान्य आहे परिचित यांची भाषा थोडी हार्श आणि विचित्र ill-logical आहे, कदाचित ती पूर्ण चुकीचीही असेल. पण म्हणून त्यामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू नये ?

असो, शेवटाला हा एक युकेतला व्हिडीओ मला सापडला, डिट्टो सेम विकृत मेन्टॅलिटी - https://www.youtube.com/watch?v=3tTUREalxVQ&ab_channel=f3mh8rHiDef

का माहित नाही पण मला @मीरा.. ह्या माझ्या त्या मैत्रिणीच्या बाजूने बोलत आहेत असे मला वाटते. त्यांना माझी एकच विनंती आहे कि त्यांनी जर आयुष्यात असे आपल्या कोणत्या मित्राला वागणूक दिली असेल तर........ मला फक्त त्यांनी एकच सांगावे कि या मुली असे का करतात?..... वरती मी प्रश्न विचारलाय त्याचे त्यांनी कृपया करून उतर द्यावे:...

एखाद्या मित्राला खूपच भाव द्यायचा आणि दुसर्या मित्राला मात्र त्याचा काहीही दोष नसताना थेट इग्नोर करायचे किंवा मूर्ख बनवायचे असे अनेक मुली का करतात?

ह्या प्रश्नाचे उत्तर त्या मुलींच्या बाजूने फक्त तुम्ही मला प्लीज च द्या, मी पुन्हा ह्या धाग्यावर फिरकणार नाही. तसेही तुमच्या आयडीवरून तुमची ओळख लागणार नाही कुणाला. मग जे काय भूमिका असेल तुमची ती इथे मांडायला काय हरकत आहे.

अरेरेरे परिचित या आयडीचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे बहुतेक. हे प्रभू त्यांना ते काय करत आहेत हे समजत नाही.

त्यांनी इथे येऊन चव्हाट्यावर आपली समस्या मांडली आहे, माझ्या माहितीप्रमाणे ना त्यांना मायबोलीने विनंती केली , ना कुठल्या सदस्याने धमकावून धागा काढायला लावला. हे खरे आहे असे मानून चालतो. नसेल तर परिचित यांनी तसे पुराव्यानिशी सांगावे. कोणत्या आयडीने धमकावले हे कळवावे.

म्हणजेच हा धागा त्यांनी स्वतःच्या अक्कलहुषारीने, स्वतःच्या मर्जीने व कुणाच्याही दबावाखाली न येता काढला व नशापाणी न करता आहे असे मानण्यास हरकत नसावी. ही कायदेशीर भाषा आहे. त्यामुळे आक्षेप नोंदवल्यास नाईलाज आहे. वरच्या ओळीत दिलेल्या वेगवेगळ्या स्थितींपैकी एक जरी खरी असेल तर मग या धाग्यावर कुणी उत्तर देऊ नये.

जर वर दिल्याप्रमाणेच त्यांनी निर्भय होऊन धागा काढला असेल आणि ते अंमली पदार्थाच्या नशेत नसतील तर मग इथे त्यांनीच लिहीलेल्या समस्येवर जर कुणी उत्तरे दिली तर...

मला त्रास दिला , त्रास दिला असे म्हणत साप साप म्हणून भुई का धोपटत आहेत ?

मागच्या धाग्यावर देखील त्यांना अशीच मदत केली होती व त्या अनुषंगाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आजतागायत दिलेली नाहीत. तसेच त्यांच्या मागच्या धाग्याचा व या धाग्याचा संबंध लावू नका असे म्हणत माझ्या मागच्या आयडीचा मात्र इथे उल्लेख करत आहेत.

समस्या त्यांची आहे त्यामुळे त्यांच्यावर बोलले जातेय. त्यांनीच स्वतः मांडली आहे. तर उत्तरे देणा-यांवर ते वैयक्तिक हल्ले का करत असावेत ?
अ‍ॅडमिन यांना याबाबतीत काही माहिती आहे का ? कृपया अज्ञानी सदस्यांचे अज्ञान दूर करावे ही नम्र विनंती.

तसेच परिचित हे गृहस्थ सातत्याने माझ्या बंडीचा उल्लेख करत असताना त्यांनीच मागच्या धाग्यावर त्यांना महिलांनी चपलेने मारहाण केली असा उल्लेख केलेला इतरांनी इथे का करू नये ?

स्वतःसाठी एक नियम आणि इतरांसाठी दुसरा ?
हम करे तो प्यार और आप करे तो टणत्कार !
अयसा कयसा चलेगा ?

आणि हेच लॉजिक प्रगल्भ आणि विलभ या आयडुंनाही लागतेय.
चंगुला बोलले की मंगु त्वेषाने येतो, मंगुला बोलले की चंगु धावत येतो.

ये रिश्ता क्या कहलाता है ?

एखाद्या मित्राला खूपच भाव द्यायचा आणि दुसर्या मित्राला मात्र त्याचा काहीही दोष नसताना थेट इग्नोर करायचे किंवा मूर्ख बनवायचे असे अनेक मुली का करतात? >>> या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले असताना पुन्हा पुन्हा अ, ब , क ला विचारून धाग्याचा टीआरपी वाढवायचा तुमचा प्रयत्न आहे. तुम्हाला माझे उत्तर मिळालेले आहे. त्याला तुम्ही त्रास म्हणत आहात.

तुम्हाला खरे उत्तर ऐकायचे नाही असा याचा अर्थ.
तर तुम्हाला काय उत्तर ऐकायचे आहे हे लिहा. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा आणखी एखादा ड्युभाऊ उत्तर देईल. आया प्रगल्भला रजा द्या. दमला बिचारा. सोलापूरचा एक गझलनवाज होता. त्याने एका महिलेला तिच्या परवानगीशिवाय घरी फोन केला. एकदा नाही म्हणून सांगितल्यावरही पुन्हा फोन केलेला. पुन्हा सोलापूरचा गझल तालिबान ! पुन्हा वाद !!!

ये क्या हो रहा है भई ?

अगदीच रहावले नाही म्हणून लिहितो, एखदी मुलगी तुम्हाला आवडली म्हणजे तिलाही तुम्ही आवडलेच पाहिजे हा हट्ट कशाला ? मावा खात नाही या एकमेव गुणाला भाळून मुलींनी तुमच्यावर जीव ओवाळून टाकावा असे तुम्हाला वाटते का ? एखादी मुलगी आवडली, तिला प्रोपोज केले, तिने नकार दिला, चारेक दिवस वाईट वाटून घेतले, आणी मग मूव्ह ऑन झालो असे का समजत नाही? तिने नकार देणे तुमच्या इगो वर घाला आहे असे का समजता? नसेल तिला इंटरेस्ट. आवडत असेल तिला माव्याचा वास ! ठीक आहे. तिचे ( किंवा इतर मुलींचे) अज्ञान दूर करून त्यांना सन्मागावर आणण्यासाठी आपला अवतार झाला आहे असे वाटते का?

तुम्ही विवाहित असाल असे वाटते, एखाद्या विवाहीत महिलेच्या घरी आगावूपणे जाणे, तिच्या फेसबूक वर स्टॉक करणे, तिचा मोबाईल चोरून पहाणे, असले क्रीपी उद्योग आपला नवरा करतो असे कळले तर तुमच्या पत्नीला काय वाटेल?

हे गझल तालिबान काय प्रकरण आहे ?
वैवकू नावाचे विठ्ठल भक्त ऋषी होते. अतिपरिचयात् अवज्ञा व्हावे तसे त्यांच्या बाबतीत झाले होते. आंतरजालावरचा एका स्त्री आयडीशी झालेला वाद मिटवण्यासाठी त्यांना फोन करण्याची दुर्बुद्धी झाली आणि मग त्यांचे जे वाभाडे निघाले. मायबोलीवरच्या एका सन्मानित गझलाकारनेच त्यांना त्या स्त्री आयडीचा नंबर दिला होता म्हणतात.
मायबोली गॉसिप असा नवीन धागा काढावा काय?

पण ती सिलेक्शन थेरी इथे ते लागू पडेल का? तिने नवरा म्हणून वेगळाच कोणी सिलेक्ट केलाय.

Submitted by Parichit on 10 April, 2021 - 03:32
>>

तिनं हा नवरा स्वतःच्या चॉईस ने निवडला का ? तुम्ही जी तिची स्टोरी सांगितलीत तिच्यावरून तरी तसं वाटत नाही. तिनं खरंच जर हा नवरा मनापासून निवडला असता, तर त्या प्रियकर कम गायकाशी संबंध तिनं केव्हाच तोडून टाकले असते. पण तसं तर झालेलं दिसत नाही. तिनं लग्न होण्याआधी ज्याला निवडलं तेच तिचं खरं सिलेक्शन

लेखकाचि बाजू खरी धरू न चालले तर क्षण भ र दया आली, kharch असे ज्याच्या बाबतीत घडत असेल त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असेल, पण tp म्हणून जर धागा काढ ले ला असेल तर मात्र मिळत असलेल्या शिव्या yogy ch आहेत

आणि बॉयफ्रेंड म्हणून मावा खाणारा छपरी छपडा सिलेक्ट केलाय. का? तर तो केवळ गाणं चांगलं गातो म्हणे. कसा लावणार तुम्ही इथे लाखो वर्षांचा नियम? बर तो गाणं खरंच चांगलं गात असता तरी समजू शकलो असतो. पण ह्याचा आवाज टोयलेटवर बसून कुंथल्या सारखा. तरी हिला आवडतो. अक्कलशून्य पोरींना काय आवडेल ह्याचा नियम नाही. महम्मद रफी पासून अर्जित सिंग पर्यंत सगळ्या गायकांचे आवाज ह्यांना सुमार वाटणार. आणि रेकत रेकत गाणे म्हणणारा कोणतरी गन्जाड्या छपरी छपडा मात्र "ओसम" वगैरे वाटणार. काय बोलावे?

Submitted by Parichit on 10 April, 2021 - 03:32
>>

वर तुमच्याच लेखात लिहिलंय - फक्त बोलण्यात चतुर होता आणि गाणे बरे गायचा. पण चला आत्ता तुम्ही जे लिहिलंय तेच खरं मानून चालू - 'तो सुमार गायक आहे'. I will tell you a secret, she knows that too !

पैजेवर सांगतो तिला माहिती आहे, की तिचा प्रियकर चांगला गात नाही. पण तरीही ती त्याच्यावर प्रेम करते ! याच कारणच असं का तिनं त्याला 'हा पुढे भविष्यात मोठा गायक वैगरे होईल' यासाठी निवडलाच नव्हता मुळी. Infact, she made that choice mostly unconsciously. Remember she chose the quality, not the man त्याचं चतुर बोलणं, हा खरा गुण तिच्या मनानं हेरला, अगदी अजाणतेपणीच, निसर्गानं रचनाच करून ठेवलीय ना तशी.

सामाजिक उतरंडीवर चढताना संवादकौशल्य अतिशय महत्वाचं आहे. त्यातूनच तुम्ही इतरांबरोबर समूह बनवता, त्यात जो लीडर बनून वर येतो त्याच्यामध्ये तर चांगलं संभाषण कौशल्य असणं हे इज अ मस्ट ! खरंतर एकवेळ बुद्धी सुमार असली तरी निव्वळ संभाषण कलेच्या जोरावर कित्येक लोकांनी बिझनेस, कला क्षेत्रात आपलं साम्राज्य उभं केलं. ज्यांच्याकडं हे संवाद कौशल्य जन्मजात असतं साहजिक आहे त्याची पुढे जाऊन समाजात हाय स्टेटस मिळवण्याची शक्यता अर्थात जास्त ठरते. तुमच्या स्टोरीतला प्रियकर आत्ता भले फाटका असेल, पण पुढे जाऊन तो मेहनतीनं चांगलं स्टेटस साहजिकच मिळू शकतो.

म्हणूनच निसर्गानं अशी वायरिंग स्त्रीच्या मेंदूत करून ठेवली आहे. जरा विचार करा, जर ही चॉईस खरंच इतकी बिनडोक असती, तर अशी चॉईस करणाऱ्या साऱ्या बायका कालौघात केव्हाच नामशेष झाल्या असत्या. पण त्या आहेत याचाच अर्थ असा की त्यांनी करेक्ट चॉईस निवडला म्हणून त्यांचे जीन्स आजवर शाबूत आहेत.

त्याच्या गायकीची लायकी काढताना तुम्हाला त्याच्या बोलण्यातला स्मार्टनेस का दिसला नाही? तसंच तुम्ही घाबरून प्रपोझ न करता कुढत राहिला, पण त्यानं आपलं मन तुमच्या मैत्रिणीसमोर सहज मोकळं केलं. याला हिंमत लागते. तो कोण कुठला ओळख ना पाळख पण बाकीच्यांची पर्वा न करता तुमच्या मैत्रिणीसाठी थेट कॉलेजात आला, यात तुम्हाला त्याची रिस्क टेकिंग ऍबिलिटी का दिसली नाही ? रिस्क टेकिंग आणि संभाषण कौशल्य यावर माणूस अख्ख जग जिंकू शकतो, आजूबाजूला पाहाल तर त्याची शेकड्याने उदाहरण दिसतील.

मात्र त्याच्यातले हे गुण दिसायला आधी तुम्हाला तुमच्या डोळ्यावरचा 'तद्दन गुड बॉय' छाप चष्मा काढावा लागेल. इनफॅक्ट आत्ता तुम्ही त्याच्यावर शेलक्या शब्दात टीका करताय, पण खरं तर तुमचा राग स्वतःवर आहे तो तुम्ही त्याच्यावर आणि तुमच्या मैत्रिणीवर प्रोजेक्ट करताय. तुम्हाला जर ती इतकीच आवडत होती तर त्याच्याआधी तुम्हीच तिला का प्रोपोज केलं नाही? त्यानं तुमचे हात बांधून ठेवले होते का ? स्वतःच्या कचखाऊपणाचा दोष तुम्ही मैत्रिणीला का देताय ?

इतकंच प्रेम होतं तर जरा दाखवायची होती ना हिंमत, जरा डेव्हलप करायचं होतं स्वतःच संभाषण कौशल्य. कुणी अडवलय तुम्हाला ?
आफ्टर ऑल 'रिस्क है तो इष्क है'. उगाच दुसर्यांना दोष देऊन, त्यांच्या वाईट सवयी काढून तुम्ही तुमची कमतरता झाकू शकत नाही

जाता जाता, तुम्ही लेखात जे सांगितलं डिट्टो तशीच कथा माझ्या पाहण्यात आहे. काये एकदा माझ्या मैत्रिणीबरोबर बोलता बोलता तिच्या चुलतभावाचा विषय निघाला. हे चुलतबंधू महाशय साधारणपणे तिशी पार केलेले, पण कामाच्या नावानं पुरी बोंब. बरं घरच्यांच जुनं दुकान आयत आहे फक्त गल्ल्यावर बसायचं पण त्यालाही हे तयार नाहीत. हो गाण्याची मात्र आवड खूप, रोज रियाझ करतात, पण गायनात पुढे जायची काहीच इच्छा नाही,म्हणून प्रयत्नही नाहीत. शेवटी चुलत्यांकडं जेव्हा अधून मधून फाके पडतात तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या वडलांनाच मदत करावी लागते. पण तरीही यान एक विवाहित बाई पटवली, असं जेव्हा मैत्रीण म्हणाली तेव्हा मात्र माझं कुतूहल चाळवलं. का तर हा इतका फाटका असून पोरगी पटवली यामागं नेमकं गौडबंगाल काय ?

तेव्हा मी मैत्रिणीकडून आणखी माहिती काढली, त्यात कळलं, त्या चुलत भावाचे वडील हे आधी खूप मोठं धार्मिक प्रस्थ होतं. छोटेखानी मठात ते महंत होते, पण वाणी इतकी रसाळ अन प्रभावी की पार दूरदूरच्या जिल्ह्यात त्यांचे भक्त होते, जे स्वतःहून त्यांना धान्य, कपडेलत्ते, इतकंच काय दागिनेही पाठवायचे. नंतर त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला आणि आता परिस्तिथी पोटी दुसर्यांकडे हात पसरावे लागतात.

हे ऐकल्याबरोबर डोक्यात ट्यूब पेटली. नक्कीच बापाची संभाषण कौशल्य पोरात उतरलं असणार, त्याशिवाय हा सडाफटिंग माणूस कॅसनोवा झालाच नसता. एकूण निष्कर्ष काय तर बेटा काबील बनो काबील, कामयाबी झक मारके पीछे आयेगी.

मला तुमचा प्रॉब्लेमच नक्की कळला नाही. Uhoh तुम्ही जर स्वतःला तिचे मित्र समजत असता तर जास्त अपेक्षा ठेवलीच नसती. हं, पण जर टाईमपास म्हणून तिला हलके घेत होता किंवा तिला तसे समजले असेल तर ती तुम्हाला किंमत देणारच नाही ना !

मित्र या शब्दाचा अर्थ लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. १ गट याचा अर्थ जेन्युईनली घेतो तर २ रा गट मित्र या शब्दाचा अर्थ रोमँटिकली घेतो. मला वाटते तुम्ही दुसर्‍या गटात आहात. तसे नसते तर तुम्ही त्या मुलाची आणी स्वतःची बरोबरी करुन घेतलीच नसती.

>>>आत्ता तुम्ही त्याच्यावर शेलक्या शब्दात टीका करताय, पण खरं तर तुमचा राग स्वतःवर आहे तो तुम्ही त्याच्यावर आणि तुमच्या मैत्रिणीवर प्रोजेक्ट करताय. >>>>
@@विलभ सर हे पटतंय. तुमच्या पुढच्या प्रश्नांना माझ्यकडे उत्तरे नाहीत. ती मला आवडू लागली होती व मझ्याच ग्रुपमध्ये होती. पण तिला मी तसे सांगण्या आधीच बाहेरचा एक कोणी भिक्कार लांडगा येऊन पटवून गेला.

@@vijaykulkarni
१) जी आपल्याला आवडते तिला आपण आवडत नाही हे एकवेळ सहन होऊ शकते
२) तिला आपल्यापेक्षा इतर कोणी आवडते हे सुद्धा थोड्या दिवसांनी डायजेस्ट होईल
३) पण तिला जो आवडतो त्याची आपल्यापेक्षा नक्कीच लायकी नाही तरीही तिला तो आवडतो हे खूपच वेदनाकारक
४) आणि एकेकाळी तुमची चंगली मैत्रीण असणारी ती एका फालतू माणसापायी तुम्हाला मित्र म्हणूनसुद्धा भाव देत नाही त्या वेदनेला अंत नाही

तुमच्या लेखी तुमची लायकी लाख असेल, त्या मुलीला तुम्ही नालायक वाटता त्याचे काय? दुसऱ्याचा त्यातल्या त्यात मुलीचा, त्यातल्या त्यात विवाहित मुलीचा फोन बघण्याइतपत निर्लज्ज, विक्षिप्त आहात तुम्ही, साळसूदपणाचा आव काय आणता? मुलींना थोडीफार बळजबरी आवडते? लाज वाटती का लाज ? तुमच्या आईला, बहिणीला विचारा एकदा बळजबरी आवडती का तर.. नालायकपणाचा कळस आहात तुम्ही.. त्या गेट किचन च्या धाग्यावर हिरीरीने मत नोनंदवणाऱ्या स्त्रीवादी आयड्या कुठं लपून बसल्यात? या कि इकडे जरा

तुमच्या लेखी तुमची लायकी लाख असेल, त्या मुलीला तुम्ही नालायक वाटता त्याचे काय?
<<

लेखी लाख असणं, अन सत्य परिस्थिती यातला फरक ओळखला त्या बिचार्या पोरीने. भैया पाटील, शम्भर टक्के सहमत.

Pages