तू मुलींना आवडत नाहीस (स्वगत)

Submitted by Parichit on 4 April, 2021 - 04:00

तू मुलींना आवडत नाहीस. कितीही कडू असली तरी हीच fact आहे. ती तुला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. तुझे वागणे चांगले आहे. तुझे बोलणे चांगले आहे. तुझे विचार चांगले आहेत. तुझा व्यक्तिमत्व चांगले आहे. तुझे सगळे चांगलेच आहे. परंतु.............

तू मुलींना आवडत नाहीस

हे कटू सत्य आहे. आणि हे तुला स्वीकारावेच लागेल. हि काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्याशी तुझ्या चांगल्या गुणांचा असण्याचा वागण्याचा काही एक संबंध नाही. सूर्य पूर्वेला उगवतो हि वस्तुस्थिती आहे व त्याबाबत आपण काहीही करू शकत नाही. तदनुसारच तू मुलींना आवडत नाहीस हि सुद्धा एक वस्तुस्थितीच आहे. त्याबाबत कोणीच काही करू शकत नाही. मुलीना कोण आवडते ते आजवर भल्याभल्यांना कळले नाही. मग तू कशाला डोकेफोड करून घेतोस? तुझ्या दृष्टीने जी मुले/पुरुष तुला बावळट, आळशी, ढेरपोटे, टकले, टाकाऊ, अजागळ, कोणतेच सदगुण नसलेले वगैरे वगैरे असे वाटतात. असेच पुरुष/मुले सुंदर स्त्रियांना/मुलीना आवडतात. त्या अशांच्यावरच भाळतात. हे ऐकायला असूया वाटत असली तरी हेच कटूसत्य आहे. सुंदर सुंदर स्त्रिया माठ पुरुषावर भाळू शकतात. तुला - सो नाईस ऑफ यू. ओके Thanks - म्हणून तुला कटवणारी लावण्यवती एखाद्या माठ टकल्या ढेरपोट्याला - यू आर माय एंजल. बी देअर फॉर मी - असे म्हणाली तर अजिबात जळू नकोस. कारण तू किती नाकारले तरी तेच सत्य आहे. मुलींची बुद्धी तशीच चालते. एखादा पुरुष तद्दन भामटा आहे याबद्दल तुझ्या मनात कोणतीही शंका नसेल. कुणालाही त्याच्या थोबडाकडे बघितल्यावरच ते कळेल इतके ते स्पष्ट असेल. ते कळण्यासाठी जास्त अक्कल चालवायचीदेखील गरज नाही. असे असूनही तू ज्या सो कॉल्ड गोड मुलीला गेली कित्येक महिने मनधरणी करून इम्प्रेस करू पाहत आहेस, त्या मुलीला नेमका तोच पुरुष काही दिवसातच आवडू लागतो. तुला टाळणारी ती, त्याला पाहताच मात्र खुश होते. त्याचे नाव घेताच आनंदून जाते. हे जळजळीत वास्तव आहे. पण ह्यावर मनातल्या मनात जळण्यापेक्षा आणि स्वत:ला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा हे सत्य जितके लवकर तू पचवशील तितके ते तुझ्यासाठीच ते चांगले राहील. मुलींच्या पायी वेळ आणि उर्जा वाया घालवू नकोस. एखादीला तू आवडायचा असलास तर तसाही काही न करता आवडून जाशील. पण त्याचवेळी ती तुला आवडेलच ह्याची ग्यारंटी नाही, हे चालायचेच. त्यात कुणी फार तात्त्विक उहापोह करण्यात अर्थ नाही. अखेर काय? तर हे असेच आहे तर मग मुलीना इम्प्रेस करायची धडपड आणि पराकाष्ठा काहून करायची? ती तू करू नकोस.

गेली हजारो का दशहजारो वर्षे झाली, समाजात ठरवून लग्ने केली जातात. ह्यामध्ये पहिल्या भेटीतच एकमेकाला पसंद करायचे असते. अवतीभवती सगळे बसलेले असताना जीवनसाठी निवडायचा असतो. आता निसर्गाचा क्रम पाहिला तर स्त्री-पुरुषाने एकमेकाला पसंद करणे हि त्या दोघांची अत्यंत खाजगी गोष्ट असते. वास्तविक अशी चारचौघात ती करायची नसते. स्त्री हि पुरुषाचे सुंदर मन पाहून त्याची निवड करते, आणि पुरुष हा स्त्रीचे शारिरीक सौंदर्य पाहून तिची निवड करतो. हा निसर्गक्रम आहे. आता ह्या दहा पंधरा मिनिटाच्या - स्थळ बघण्याच्या - कार्यक्रमात मुलाला स्त्रीचे शरीर दिसेल व तो त्यावरून तिची पसंदी करू शकेल हे मान्य आहे. पण इतक्या कमी वेळात एकही शब्द न बोलता मुलीला त्या मुलाचे मन कसे कळू येईल? ते सुंदर आहे का काटेरी आहे ह्याचा तिला कसा अंदाज येईल? पण त्याचा विचार करतो कोण इथे? पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषाने तिला बघून पसंद केले कि मामला मिटला. दोघांचे लग्न लावले जाते. आणि तिथून पुढे आयुष्यभर ती वैवाहिक बलात्काराला ती सामोरी जाते. पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्री आणि जमीन ह्या दोन म्हणजे इथे पुरुषांनी पराक्रम करून लढून वा भांडून प्राप्त करायच्या व नंतर त्यावर मालकीहक्क घेऊन यथेच्छ भोगायच्या गोष्टी असतात. वाचायला वाईट वाटेल. पण कटू असले तरी हेच सत्य आहे. सर्वाच्या मुळाशी हाच विचार आहे हे नाकारता येत नाही. कदाचित ह्याच परंपरेचे पिढ्यानपिढ्या संस्कार झाल्यामुळे अनेक स्त्रियांना जबरदस्ती करणारे पुरुष आवडतात हे वास्तव आहे. हे जरा वादग्रस्त विधान असले तरी खरे आहे. बलात्कार आणि प्रेम ह्यात अंधुक रेषा आहे. ती ज्याला कळली त्याला स्त्री प्राप्त होते. जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो. ह्यात थोडे सुद्धा अयोग्य काही झाले तर मात्र तो बळात्कारच ठरतो. हा फोर्म्युला आहे.

बर. ते जाउदे. विषयांतर नको. तर मी काय सांगत होतो कि ठरवून केलेल्या लग्नाच्या नावाखाली मुलीवर पुरुषाची जबरदस्ती लादण्याची परंपरा गेली कित्येक हजारो वर्षे सुरु आहे. इतक्या हजार वर्षांचे संस्कार असल्याने आता आता गेल्या काही दशकांत मोकळ्या होऊ घातलेल्या समाज व्यवस्थेत मुलीला आपला जोडीदार आपल्या बुद्धीने निवडता येण्याची अपेक्षा करावी तरी कशी? मुर्खासारखे निर्णय घेऊन एखाद्या भामट्याचा एंजल म्हणून प्रेमिक म्हणून स्वीकार करायचा आणि तुला फडतूस म्हणून रिजेक्ट करण्याचा प्रताप मुलीकडून होणारच. कारण हजारो वर्षाच्या मानसिक गुलामगिरीमुळे त्यांची बुद्धी अद्यापी तितकी प्रगल्भ झालेली नसते. यात त्या मुलींचा दोष तो काय? ज्यांनी अशी समाज व्यवस्था निर्माण केली त्यांना बोलावे लागेल.

पण जाऊंदे. काय करायचा आपल्याला इतिहास आणि भूगोल घेऊन? तुझ्यापुरते एक आणि एकच सत्य कायम मनाशी बाळगत जा आणि ह्या बाबतीत मुलीकडून कसलीच तर्कसंगत विचारांची किंवा निर्णयाची अपेक्षा ठेऊ नकोस. म्हणजे मानसिक त्रास होणार नाही तुला. आणि ते सत्य म्हणजे.......

तू मुलींना आवडत नाहीस! विषय संपला.

[तळटीप: मागच्या काही दिवसांत घडलेल्या काही विचित्र घटनांमूळे मनात साठून राहिलेल्या विचारांचा निचरा होण्यासाठी व्यक्त होण्याची गरज भासल्याने हे स्वगत लिहिले आहे. केवळ आणि केवळ तोच एक हेतू आहे. लिहून झाल्यावर आता बरेच हलके वाटत आहे. बाकी, मायबोलीकर त्यांना जो हवा तो प्रतिसाद द्यायला मोकळे आहेत]

-------

हा वरचा लेख लिहिण्यामागे जी चित्तरकथा आहे ती खरेतर मला लिहायची नव्हती. पण लेखावर काही प्रतिसाद पाहता हि कथा लिहिणे गरजेचे आहे असे वाटल्याने ती इथे थोडक्यात देत आहे. वरील स्वगत लिहायला मला कशामुळे भाग पडले हे वाचकांना लक्षात येईल हि अपेक्षा.

कॉलेजमध्ये असताना आमचा मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप होता. खूपच खेळीमेळीचे वातावरण होते. त्यात एका मुलीची व माझी चांगली मैत्री झाली. ती खूपच सुंदर होती असे मी म्हणणार नाही. पण खूप साधे सौंदर्य होता तिच्यात. काळेभोर बोलके डोळे. तो साधेपणा तो मला खूपच आवडायचा. नाजूक चणीची होती. गाणे छान गायची. खूप गोड वाटायची गाणे गात असताना. आम्ही सगळे एकत्र असताना तिला आम्ही गाणे गायचा आग्रह करायचो व ती गायची सुद्धा. किती छान दिवस होते. हळूहळू तिच्याविषयी माझ्या मनात सोफ्ट कोर्नर बनत गेला. रात्री दिवसा तिचा विचार मनात येत असे. पण हे मी तिला बोलून दाखवू शकत नव्हतो. फारच इनोसंट होती. त्यामुळे तिच्याविषयी मी असा विचार करणे हे तिला आवडले नसते. ग्रुपवर त्याचा परिणाम झाला असता. ग्रुप सोडून गेली असती व माझे खूप अवघड झाले असते. म्हणून मी गप्पच राहिलो. पण त्याचवेळी कुठेतरी काहीतरी भलतेच शिजत होते. कॉलेजात एक ज्युनिअर होता. टपोरी होता मावा गुटखा खायचा. शिवाय बरीच व्यसने होती. फक्त बोलण्यात चतुर होता आणि गाणे बरे गायचा. एवढीच काय ती जमेची बाजू. पण बाकी त्याच्या वर्तणुकीमुळे ग्रुप मध्येच काय वर्गात सुद्धा कुणाचेच त्याच्याविषयी चांगले मत नव्हते.

एक दिवस वाईट उगवला. ह्या मुलीला मी त्या मुलाशी बोलताना पाहिले. मला आश्चर्य वाटले. काय गुणाचा आहे हे माहित असूनही हि त्याच्याशी काय बोलत असावी? एकतर ती खूप इनोसंट होती किवा मूर्ख होती. मी विचार केला, कि असेल बाबा काही तात्पुरते कारण म्हणून बोलली असेल. असे म्हणून मी मनाचे समाधान करून घेतले व दुर्लक्ष केले. पण त्यानंतर सुद्धा ती त्याच्याशी बोलताना आढळली. विशेष गोष्ट अशी कि फार कोणी आजूबाजूला नसताना एकदा त्याच्याशी बोलत उभी होती. मला मनात फार जळजळ झाली. इतकी वर्षे आमचा ग्रुप आहे पण मला असे कधीच एकटे बोलायची संधी तिने दिली नाही. आणि हा मात्र कोण काल कॉलेजात आला आणि इथवर मजल मारली त्याने. मला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. ग्रुपमध्ये बाकीच्या मित्रांशी यावर ती नसताना विषय काढला. नाजूक गोष्ट होती. कारण सगळे मला म्हणले असते तिच्यात ह्याला इतका इंटरेस्ट का. त्यामुळे तसे न जाणवता मी विषय काढला. म्हणालो ती मला इनोसंट वाटते आणि तो मुलगा कसा आहे सगळ्यांना माहित आहे. तर आपण तिला सावध करूया. तर बाकीचे म्हणाले तिचे व्यक्तीगत आयुष्य आहे आपण तसे करणे बरोबर होणार नाही. ती ग्रुप सोडून जाईल. असे सर्वांनी बोलल्यावर माझा नाईलाज झाला. जे होईल ते बघत बसायचे ठरवले. आणि माझ्या डोळ्यासमोर ते कैकदा भेटत असत हे मी मूकपणाने पाहत राहिलो. एकदा ग्रुपमध्ये सर्वांच्यात ती असताना मी न राहवून विषय काढलाच. खेळीमेळीत तिला विचारले, काय बोलत असतो तो तुझ्याशी. तर अगदी सहज म्हणून गेली "अरे तुला माहिती का गाणे किती छान गातो. गाण्याच्या टिप्स देत असतो मला. बाकीचे काही असले तरी त्याच्याकडून गाणे घेण्यासारखे आहे. जे चांगले आहे ते घ्यायला काय हरकत आहे" मी मनातल्या मनात प्रचंड चरफडलो. त्यांनतर बरेच काही बाही झाले. त्या दोघांच्यात संवाद सुरु राहिला पण गाडी मैत्रीच्या पुढच्या थराला गेली असेल असे निदान मला जाणवले तरी नाही. किंवा तसे काह्ही घडले नसावे अशी मनाची खोटी समजूत काढत मी कॉलेजची वर्षे काढली.

आता कॉलेज सोडून बरीच वर्षे झालीत. मध्यंतरीच्या वर्षांत सगळ्यांचा संपर्क तुटला होता. पण नंतर आम्ही फेसबुक आणि व्हाट्सपवर पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो. ती नव्हती खूप वर्षे. कुठे गायब होती कुणास ठावूक. कुठूनतरी अप्रत्यक्षपणे बातमी येऊन तिचे लग्न झालेय हे सर्वाना माहिती झाले. कुणाशी झालेय हे माहित नव्हते. पण ज्याच्याशी झालेय तो "तो" नव्हता इतकी माहिती मात्र मी काढली. आणि मागच्या वर्षी कुठूनसे ती पुन्हा आमच्या संपर्कात आली. व्हाट्सपवर ग्रुप मध्ये सामील झाली. इतक्या वर्षांनी तिला पाहून सर्वधिक आनंद मला झाला होता. इतकी वर्षे कुठे गायब होतीस विचारले. तर लग्नानंतर नवरा बाळंतपण मुले संसार ह्यातून वेळच मिळाला नाही म्हणाली. तिचा नवरा बिजनेस मध्ये होता. गाण्यातले त्याला ढ कळत नव्हते हे सुद्धा तिने सांगितले. मग मला पुन्हा हुरूप चढला. गाण्याचा सराव करून मी तिला एकदा एक गाणे म्हणून पाठवले. त्यावर तिचा "छान आहे. चांगले गातोस" एवढाच रिप्लाय आला. नंतर गाणी पाठवली पण तिचा प्रतिसाद आला नाही.

आणि मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि तिची फेसबुकवर फ्रेंड लिस्ट बघितली तर तो टोणगा तिच्या लिस्टमध्ये दिसला. मला मनात शंकेची पाल चुकचुकली. जर काही वाईट घडायचे असेल तर घडतेच ह्या न्यायाने गोष्टी घडल्या. त्याच्या प्रोफाईल मध्ये जाऊन बघितले असता त्याच्या प्रत्येक पोष्टवर हिची कौतुकाची कॉमेंट. मी इतके काय काय ग्रुपवर आणि फेसबुकवर लिहायचो त्याला मात्र कधी फार तिने कॉमेंट दिल्या नाहीत. मला फार वाईट वाटले. आणि मनात नको नको त्या शंका सुद्धा आल्या. मग जरा संयमाने खेळायचे ठरवले. आणि तिच्याशी बोलणे व चाटिंग वाढवून काही महिन्यांपूर्वी तिला भेटायला म्हणून तिच्या घरी गेलो. हे सुद्धा सहजपणे घडले नाही. त्यासाठी बरीच मनधरणी व बरेच काही करावे लागले. घरी गेलो तेंव्हा एकटीच होती. तिचा नवरा युरोपात गेला होता. इतक्या वर्षात आम्ही दोघे पहिल्यांदाच असे एकट्याने भेटत होतो. इतक्या वर्षांनी तिच्याशी बोलताना मला खूपच छान वाटत होते. पण एक विचित्र वाटत होते. ती फारच फॉर्मल होऊन बोलत होती. बोलण्यातून जास्त जवळीक होणार नाही याची काळजी घेत होती. मी थोडी थट्टामस्करी करायचा प्रयत्न केला पण तिने फार प्रतिसाद दिला नाही. मी थोडा हिरमुसलो. फार बोलण्यासारखे काही नाही केवळ मी फार आग्रह केला म्हणून तिने भेटायला बोलवले असे तिने अप्रत्यक्षपणे मला जाणवून दिले. मला वाईट वाटले. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणालो दोघांसाठी थोडा-थोडा चहा करशील का आपण चहा घेता गप्पा मारू. नाईलाजाने ती तयार झाली आणि स्वयंपाकघरात गेली.

जाताना आपला मोबाईल तिथेच सोफ्यावर ठेवून गेली. माझी छाती धडधडू लागली. माझ्या काय मनात आले कुणास ठावूक. पटकन तो मोबाईल उचलला. सुदैवाने त्याला लॉक नव्हते. तिच्या व्हाट्सपवर गेलो. माझ्या हातात फार फार कमी वेळ होता. तेवढ्यात ती बाहेर आली असती तर माझे काही खरे नव्हते. त्या वेळेत झरझार स्क्रोल केले. आणि जे अपेक्षित होते तेच दिसले. त्या टोणग्याचे चाट होते. ते मी ओपन केले. आणि पुढल्या काही सेकंदात त्यांचे शेवटचे काही मेसेजेस मी भरभर नजरेखाली घातले. त्यात त्या टोणग्याने गाणी म्हणून पाठवलेली दिसत होती. त्यावर हिने पण त्याला गाणी गाऊन पाठवली होती. दोघांचे गुलुगुलू चाट होते. हार्टचे सिम्बॉल काय आणि नाचणारी बाहुली काय आणि रेनबो काय आणि काय काय. तेवढ्या काही सेकंदात माझे श्वासोच्छवास वाढले. एकमेकांच्या गाण्याचे कौतुक करायच्या नादात त्यांनी हद्द गाठली होती. "मैने प्यार तुम्ही को किया है, मैने दिल भी तुम्ही को दिया है" हे गाणे त्याने गाऊन पाठवले आणि हिने त्याला प्रतिसाद म्हणून "कसले मस्त गायलेस रे! मैने भी तुम्हे दिया है" असे म्हणून दात काढलेली स्मायली हिने पाठवली होती. त्यावर त्याने रिप्लाय पाठवला होता "ऐसे मेसेज मत कर. मेरी बिवी ने देखा तो मुझे बहुत मार पडेगी" असे काहीबाही. आणि एजून एक तिचा त्याला पाठवलेला मेसेज दिसला "यू आर माय एंजल" मी पटकन डोळे झाकले आणि मोबाईल बंद करून जागेवर आहे तसा ठेऊन दिला व डोळे मिटून बसलो. त्याशिवाय बरेच चाट होते पण ते वाचायची माझ्या हिम्मत नव्हती. हे सगळे मी केवळ काही सेकंदात उरकले. फार मोठी रिस्क मी घेतली होती. नशिबाने त्यानंतर सुद्धा एक दोन मिनिटांनी ती चहा घेऊन बाहेर आली. पण एव्हाना मला जे हवे होते ते मी काढले होते. इतक्या वर्षांचा संशय खरा ठरला होता. प्रमाणापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने सिद्ध झाला होता. कॉलेजात असताना मावा गुटका सिगारेट तंबाकू ह्यात असणारा टोणगा आता काय करतोय आणि कसा सेटल झाला याच्याशी मला काही देणेघेणे नव्हते. पण माझ्यासाठी तो अजूनही फालतूच होता. ज्याच्यावर हि भाळली होती.

हे सगळे पाहिल्यावर मग मलाच तिथे जास्तवेळ थांबण्यात इंटरेस्ट उरला नाही. मला त्या दोघांचे संबंध असण्यात काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या मनात एकच राहून राहून एकच येत होते. माझ्यासाठीसुद्धा कौतुकाचे चार शब्द काढायला तिच्या जीवावर का येत असावे? माझ्या पोस्टवर नाही, किंवा माझ्या गाण्यावर नाही, मला रिप्लाय नाही. कुठेच तिच्या आयुष्यात मला फारसे स्थान नव्हते असे दिसले. मी मात्र माझी खूप छान मैत्रीण समजून चाललो होतो. माझी मनातल्या मनात प्रचंड चरफड सुरु झाली होती. चहा पिता पिता गप्पा मारताना मी विचारलेच "काय गं. माझे गाणे किंवा मेसेजेस आवडत नाहीत का तुला? कधी तू फार रिप्लाय देत नाहीस म्हणून विचारले. डिलीट करून टाक ते सगळे माझे मेसेजेस" मी हसत हसत मनातली जळजळ ओकली. तिला काय कळायचे ते कळले असावे. त्यावर तिने एकच उत्तर दिले. म्हणाली "जरा शहाणा हो ना आता तरी. अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील". ते शब्द कान जाळत माझ्या मनात घुसले. ते शब्द आणि तो मेसेज नंतर कायम माझा पिच्छा पुरवत राहिले.

त्याला: "यू आर माय एंजल"
मला: "अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील"

नंतर मला तिच्याशी ग्रुपवरसुद्धा बोलण्यात इंटरेस्ट उरला नाही. हे सगळे झाल्यावर तिचा विषय मनातून काढायला फार त्रास झाला. अजून होतोय. त्याचाच एक भाग म्हणून वरचा लेख.

माझी हि चित्तरकथा वाचल्याबद्दल धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी_अनु हाच मुद्दा पकडावा आणि उपस्थित करावा अशी परिचीत यांची इच्छा असावी.
आता यावर ते काय उत्तर देतात बघावे.

थोडक्यात, सेक्स हा माबोवरील हॉटसेलिंग मुद्दा आहे. येत्या काळात यावर आणखी नवनवीन धागे पडतील. परिचितांनी वाचकांची नस अचुक पकडलेली आहे.

टीपी धागा.
आता सारखं प्रतिसाद वाचायला यावं लागेल.
अनु आणि मानव मामांना वर्क फ्रॉम होम आही वाटतं.:-)

मुली खरंच मुलाना यु आर माय येंजल असं म्हणतात? Uhoh
हा घ्या येंजल
IMG_20210406_105544_1.jpg

माझं गेल्या जानेवारी २०२० पासूनच वर्क फ्रॉम होम सुरू आहे.
२०२० जानेवारीत बाबांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि पूर्ण हिप जॉईंट रिप्लेस केला, त्यात कॉम्प्लिकेशन्स तेव्हा सगळं ठीक होऊन मार्च दुसरा आठवडा उजाडला मी ऑफीसला जाऊ लागे पर्यन्त.
आठवडाभर जात नाही तोच लॉकडाऊन सुरु झाला.
आताही महित्यातून तीन चार वेळाच जावे लागते ऑफिसला.
मार्चेण्डला चार दिवस जास्त जावे लागले. एप्रिलमध्ये अजून गेलो नाही, येत्या शुक्रवार शनिवार जायचे आहे.

जर मला इष्काचे-प्रेमाचे खोटे भाव डोळ्यात आणता येत नसतील तर मी नैसर्गिक आसक्तीचे भाव डोळ्यात आणणेच पसंद करेन. मला वाईट वाटणार नाही.>>
ज्याला तुम्ही नैसर्गिक आसक्तीचे भाव डोळ्यात आणणे म्हणता त्यालाच समोरची व्यक्ती वखवखलेली नजर समजत असावी आणि त्यातुनच तुमचा पत्ता कट होत असावा, असा निष्कर्ष काढता येईल.

लेख वाचला, feeling bad for you... बाहेर पडा लवकर... दुसरीकडे दार ठोठवा.
https://www.youtube.com/watch?v=ucUgl3Xa1jg --> I hope you would like this. आपल्याकडे Romance पण classical असतो आणि unromantic/hate वगैरे पण classical स्टाईल मध्ये असतं Proud

बाकी एक Friendly suggestion,

मुलीन्ना Smart मुले आवडतात फक्त, #No_Offence मी काही तुमच्यावर टीका करत नाहीये!
In case smart means, it could be anything in the form of knowledge, humour, professionalism, meninism, smart chat/talk, your whole appearance केव्हा केव्हा attitude सुद्धा! काही ठिकाणी wild मुलं सुद्धा आवडत असतील ज्याबद्दल तुम्ही लिहीलेले आहे... & most important thing is मुलांच्या मधला INNOCENCE !!!
All the best Happy

त.टी. :- तुम्ही जिच्यावर प्रेम केले असे म्हणता आहात, तिला मला वरीलपैकी एकाही प्रकारात बसवता येणार नाही कारण तुम्ही तिच्या त्या माव्या, तंबाखू गुटखा वाल्याचे वर्णन च पार टोकाचे केलेले आहे Happy (कदाचित आपण त्याला रांगडा, माचो या कैटेगरी मध्ये बसवुया त्याला) पण आपलं In_general निरीक्षण आणि वाचन यातून बोललो आहे.

कदाचित तिला पण मावा गुटखा खायला आवडत असेल. दोघे मिळून खात असतील. तुम्ही बडीशेपच्या पुढे जात नसाल.तुम्ही एकदा तिच्यासमोर मुद्दाम खिशातून गुटख्याचे पाकीट पाडायला हवे होते. मग सगळं व्यवस्थित झालं असतं.

बोकलत + "एकदा तिच्यासमोर मुद्दाम खिशातून गुटख्याचे पाकीट पाडायला हवे होते." + आणि तिच्याच पायात पचकन थुंकायला हवे होते मग व्यवस्थित झाल असतं Lol

Submitted by Parichit on 6 April, 2021 - 00:46 >>> या कमेंण्टनंतर हा हसताखेळता धागा नाही राहिला माझ्यासाठी. अत्यंत अपमानास्पद भाषा आणि विकृत विचारसरणी इतकेच म्हणेन.

>>>>बॉयफ्रेंड म्हणून थोडा बॅड बॉय आणि नवरा म्हणून थोडा गूड बॉय अश्या अपेक्षा असतात.
दोन्ही एकातच सापडले तर पोरी त्याच्याशीच लग्न करतात.
मुलांच्या बाबत गर्लफ्रेंड म्हणून चिकणी हवी आणि बायको म्हणून जेवण बनवता येणारी हवी.

फरक एकच आहे की गुड बॉय आणि बॅड बॉय या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह बाबी आहेत. म्हणजे एकाच वेळी दोन्ही रुपे शक्य नाहीत.
याउलट चिकणी + सुग्रण हे कॉम्बिनेशन अगदी सर्रास सापडू शकते.

>>>>मुलीना जाळ्यात ओढून

अनु इथे सर्व नाही तरी बर्‍याच मुली अतिशय भोळ्या असतात असतत. बिच्चार्‍या असतात. जाळ्यात फसतात - असे काहीसे गृहीतक वाटते. मला वाटतं स्वतःचे इन्टरेस्टस स्वतः सेफगार्ड करण्याइतका स्मार्टनेस हवाच. भले कोणी जाळे पसरलेले असो. आपल्याला विवेक हवा. आणि तेच यांना म्हणजे लेखकाला खटकते आहे असे दिसते. जर मुलींनी भाव नाही दिला तर त्यामागे त्या मुलींचे काही सेफ्टी मेकॅनिझम असेलच की.

मला यस बॉस मधला शाहरुख आणि आदित्य पंचोली आठवला.
पण जोवर जुही चावला ला पटत नाही तोवर काही करता येत नाही Happy
परिचित यांना आपली जुही चावला लवकरच मिळो.

लेखकाने ही अपमानास्पद विशेषणे जाणूनबुजून उकसवण्यासाठी वापरली आहेत असे मला जाणवतेय. त्यामुळे कुणी तणतणत आलं की यांचा हेतू सुफळ संपूर्ण होणार. बोलणी खाऊन मजा घेणारी जी निर्ढावलेली जमात असते तिचे प्रतिनिधी आहेत हे महाशय ! ( माझी ही कमेण्ट पण त्यांना सुखावून जाईल कदाचित).

@@अजिंक्यराव पाटील: नाहीई ओ मी ते नव्हे. ते कोण ब्रह्मे मला माहिती पण नाहीत. मी कोण आहे ते अंदाज करत बसू नका. तुमच्या परीच्यातलीच एक व्यक्ती समजा. म्हणूनच हा आयडी.

@@रश्मी: नाही हो मला नाही वाटत मी कोणत्या मुलीला आवडत असेल. आताची माजी मनस्थिती तर अशीच आहे.

@@mi_anu मला एखाद्या मुलीसोबत पाहून मी सेक्ससाठी तिच्यासोबत प्रेमाचा दिखावा करतोय असे कोणास वाटले तर त्याच्या बुद्धीची कीव करावी लागेल. कारण माझे व्यक्तिमत्व तसे नाही. मी इनोसंट शरीफ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणारा भामटा असतो तर हा धागा निघालाच नसता.

@@वीरु हेच तर दुखणे आहे ना. भामट्यांच्या नजरेमागची वासना दिसत नाही. आमचे मन साफ असल्याने कदाचित मनातले नैसर्गिक भाव नजरेत दिसत असतील चेहऱ्यावर. आपल्याला लपवणे फसवणे जमत नाही.

@@प्रगल्भ तुमचे innocence चे निरीक्षण बरोबर आहे. एक अशी केस घडलेली बघितली आहे ज्यामध्ये रोज सकाळी पेपर टाकणाऱ्या मुलाने आपल्या innocence च्या बळावर गर्भश्रीमंत घरातली मुलगी पटवली होती. तो तिला म्हणायचा आम्ही गरीब आमची लायकी नाही तुमच्यासोबत बोलण्याची. असे innocence चे शस्त्र वापरून त्या मुलीला येडी केली ह्याने. अन ती गेली कि एक दिवस ह्याच्या संगे पळून. तिचे पुढचे आयुष्य कसे गेले ते सांगण्यासारखे नाही. पण तरीही इथले काही थोरथोर विचारजंत म्हणतील -- श्रीमंता सोबत लग्न झाले असते तर सुखी झाली असती कशावरून? -- हो तो सुद्धा मुद्दा असू शकेल. पण मी त्या गरीब मुलाच्या ठिकाणी असतो तर innocence चा गैरवापर करून सुखाने राहत असलेल्या मुलीला फसवून प्रेमाच्या नावाखाली तिच्या आयुष्याची राखरांगोळी कदापि केली नसती हा माझा मुद्दा आहे.

@@रानभुली मी त्या मानसिक अवस्थेला पोहोचलो आहे जिथे मला कुणी उचकवू शकत नाही. मी धागा व्यक्त व्हायला काढत असतो. मजा घ्याला नाही. तुम्हो तुमच्या बोलण्यावरून आयडीमागची व्यक्ती वयाच्या एका ठराविक टप्प्यातली आहे बहुतेक. मी वर एका प्रतिक्रियेत जे कडवे सत्य आहे ते बोलून दाखवलेले ते तुम्हाला झोंबलेले आहे. पण ह्यात तुमचा दोष नाही तुमच्या वयाचा दोष आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्या थेयरीचे प्रुफ देत बसणार नाही. अगदी जवळच्या ओळखीतल्या एका मुलीला --- असेच प्रेम वगैरे फडतूस नौटंकी करून --- एका भामट्याने पटवले होते. मी तिला सावध करायला गेलो होतो. तर प्रकरण माझ्यावरच उलटे शेकले. तेंव्हापासून मी धडा घेतलाय तुमच्यासारख्या मुलीना कधीच काही सांगायच्या फंदात पडायचे नाही. कुठेतरी परदेशात मस्त सेटल व्हायच्या लायकीची ती मुलगी. पण आज तिच्या लग्नाला आज इतकी वर्षे झाली तरी फरफट सुरुच आहे. जैसे ज्याचे कर्म म्हणून सोडून द्यायचे अन काय! पण तुम्ही तिच्यासारख्या असाल असेही मला म्हणायचे नाही. जाउंद्या मला तुम्हाला काहीच सांगायचे नाही.

अहो असं नका हो करू. बिननावाच्या, बिनचेह-याच्या, बिनाओळखीच्या आयडीने सांगावं म्हणून भारतातल्या तमाम मुली देव पाण्यात सोडून बसलेल्या आहेत. त्यांना कुणी नाही सल्ले देणारे. तुम्हीच अशी पाठ फिरवली तर त्यांना कोण सांगणार ? तुमच्यासारखी भली माणसं स्वत:ची मुलगी, पत्नी, बहीण यांना सल्ले द्यायचे सोडून वेळात वेळ काढून मुलींना वाचवायची मोहीम हाती घेत आहात हे काय कमी आहे ?
( आयडी मागची व्यक्ती कोण हे आलंय लक्षात Happy )

परिचित... एक सिरीयस सल्ला... तुमचे वय मला पंचवीस ते तीस मधील वाटत आहे.. त्यामुळे हा सल्ला...जो आमिर खान ने इष्क चित्रपटात दिला होता-
इंसान को तीन चीज के पीछे कभी भी नहीं भागना चाहिए बस ट्रेन और लडकी...

याला इम्प्लिमेंट करा...सुखी रहाल...

परिचित,
अक्षर ओळखीचे वाटत आहे.

बलात्कार आणि प्रेम ह्यात अंधुक रेषा आहे. ती ज्याला कळली त्याला स्त्री प्राप्त होते. जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो. ह्यात थोडे सुद्धा अयोग्य काही झाले तर मात्र तो बळात्कारच ठरतो. हा फोर्म्युला आहे.

>>
परिचित, तुमचं निरीक्षण बरोबर असलं तरी 'हे सगळं जबरदस्तीच्या लग्नामुळं होतं' हा निष्कर्ष जो तुम्ही काढला तो चुकीचा आहे. आत्ताच्या आधुनिक मानवाची (homo sapien) उत्पत्ती जवळजवळ २ लाख वर्षांपूर्वी झाली असे पुरावे आढळतात. त्याउलट लग्न संस्थेची सुरुवातच जेव्हा एकत्र समाजरचना aka civilisation उदयाला आली, जे साधारणपणे फार फार तर आजपासून १०,००० वर्षांपूर्वी घडलं. मानवी उत्क्रांतीसाठी हा कालखंड अगदीच मामुली आहे, त्यात जोडीदार निवडण्यासाठी काय मापदंड असावेत याची कल्पना जेनेटिकली इव्हॉल्व्ह व्हावी हे शक्यच नाही.
असा इव्होल्यूशनरी सिलेक्टिव्ह ऍडव्हान्टेज निर्माण व्हायला लाखो वर्ष जावी लागतात.

स्त्रियांच्या अशा विशिष्ट निवडीपाठे खूप महत्वाचं कारण आहे. मुळात शारीरिक संबंधात स्त्रीला पुरुषापेक्षा बरीच जास्त जोखीम उचलावी लागते -

Men and women differ, however, in the domain of obligatory
parental investment (Trivers, 1972). To produce a single child, women
over evolutionary history have had to incur a 9-month investment of
intemal fertilization, placentation, and gestation, as well as subsequent
investments of lactation. Men, in contrast, can produce a child without
these heavy costs—in principle, by a single act of sex. Because the
minimum obligatory parental investments of the sexes have recurrently
differed, the benefits to the high-investing sex (women) of being
highly discriminating
, and the costs of being indiscriminate, are higher
for women. Thus, women were predicted to be more discriminating
across a wide array of personality characteristics.
[*]

म्हणून स्त्री नेहमी जोडीदार निवडताना जास्त सजग असते. माणूस अगदी आदिमानवाच्या काळापासून सामाजिक प्राणी म्हणूनच विकसित झालाय, अन जिथं समाज तिथं सामाजिक उतरंड/ हायरार्की आलीच. या सामाजिक हायरार्कीत पुरुष जितका वर, तितकेच जास्ती रिसोर्सेस त्याच्याकडं, पर्यायानं त्याचं मूल जगण्याची शक्यता जास्त. म्हणजेच इथं हाय स्टेटस असणाऱ्या किंवा ते कमावण्याची क्षमता असणाऱ्या पुरुष निवडण्यात स्त्रीला रादर तिच्या वारसाला जेनेटिक ऍडव्हान्टेज आपोआपच मिळतो.

Furthermore, in species that show some male parental investment,
such as ours, and where male variance in resources that can be in
vested is sufficiently high, women could select men in part based on
their ability and willingness to invest resources in themselves and their
offspring. Because men's resources are often closely connected with
position in dominance hierarchies, women were predicted to place
greater value on personality characteristics that lead to social ascendance
and resource acquisition.
[*]

ही शेवटची ओळ नीट वाचा बरंका. इथं पुरुषाकडे संपत्ती आहे का नाही हे महत्वाचं नाही तर त्याच्याकडे भविष्यात सामाजिक उतरंडीवर चढण्याची क्षमता आहे का नाही इतकंच महत्वाचं आहे. चांगलं संवादकौशल्य, बुद्धिमत्ता, जोखीम घेण्याची तयारी हे गुण अगदी अश्मयुगापासून पुरुषांना हाय स्टेटस देत आलेले आहेत. आजपण त्यात फार फरक पडलेला नाही. बाकी त्यानं गुटखा खाल्ला काय अन तंबाकू मळला काय यान फारसा फरक पडत नाही.

बाकी इथं पोरांचा इनोसंस, नॉलेज वैगरे वैगरे एकेकाची कविकल्पनेतली लेबलं ही तर काहीही सांख्यिकी आधार नसलेली थोतांड आहेत, ते त्या त्या बॅड (?) बॉयच्या निवडीमागचं खरं कारण मुळीच नाही.

खाली मी रेफेरेंन्स दिलाय तो एकदा नक्की डोळ्याखालून घाला, म्हणजे स्त्रियांच्या अशा वरकरणी नॉन्सेन्स वाटणाऱ्या निवडीमागचा कार्यकारणभाव लक्षात येईल.

[*] https://www.researchgate.net/publication/227714816_Personality_and_Mate_...

परिचित... एक सिरीयस सल्ला... तुमचे वय मला पंचवीस ते तीस मधील वाटत आहे.. त्यामुळे हा सल्ला...जो आमिर खान ने इष्क चित्रपटात दिला होता-
इंसान को तीन चीज के पीछे कभी भी नहीं भागना चाहिए बस ट्रेन और लडकी...

>>
याचाच दुसरा अर्थ असा पुरुषांनी आधी आपलं स्टेटस वाढवायच्या मागं लागावं मग पोरींच्या. ज्यांच्यामध्ये ते जन्मजात असतं त्यांनी बिंदास किशन कन्हैया बनावं, त्याच्याजवळ काही फार संपत्ती, स्टेटस नसल तरी चालते. बाकीच्यांनी आधी मेहनत करावी मग वासूगिरी.

मुळात लाखो वर्षांपासून जोडीदार निवडीचे एकाधिकार स्त्रियांकडे राखीव आहेत, निसर्गानं रचनाच तशी करून ठेवलीय.अगदी जबरदस्तीच लग्नसुद्धा यात जास्त फेरफार करू शकत नाही.
शारीरिक संबंधात स्त्रियाच जास्ती जोखीम उचलत असल्यानं त्या आपले पत्ते नेहमी राखून ठेवतात. that's why majority of women never propose. त्यांच्याकडं बऱ्याच चॉईसेस पडलेल्या असतात, त्यातला हाय स्टेटस असणारा किंवा तिथवर जाऊ शकण्याची क्षमता असणारा जोडीदार त्या निवडतात.

याउलट रचना पुरुषाबाबतीत आहे.
because of low risk, men tend to maximize their gene continuation by mating with as many mates as possible
because of high risk, women maximize their gene continuation by mating with select few with high survival chances

म्हणूनच जनरली प्रपोजल पुरुषांकडून येत आणि स्त्रिया त्या सगळ्या प्रपोजल मधून आपली चॉईस निवडतात. पोरींच्या माग लागणं हे काही अंशी पुरुषात इन बिल्ट आहे, त्याला पर्याय नाही.

चांगला झोपलो होतो. हाका मारल्या कुणीतरी..
केव्हढा गलका ? काय झालंय ?
परिचित गाढवा काढलास का धागा पुन्हा माझ्यावर.
आता बंडी घालून आलोय, सज्जात पण नाही.
हो आहे मी गुटखाबाज, आहे गांजेडा, ढेरपोट्या पण आहे. पण लेडीकिलर आहे !
माझा काय दोष ?
बस लेका कुढत असाच.

विलभ बाबू , वेळ गेली तुमची.
दुकान भाड्याने देऊन महाराष्ट्रभर मराठी माणूस धंद्यात मागे का या विषयावर व्याखान द्यायचा धंदा दिसतोय. Wink

नवरा तिचा.
तुमच्या भाषेतील टोणग्या तिचा (म्हणजे ते दोघे बोलतात.)
तिने कोणाला लाईक करावे अन कोणाला नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न.
It's her choice Proud Proud Proud Proud
जस इथे येऊन, फुकट आहे म्हणून काहीही धागे काढायची तुमची चॉईस.अगदी तसच.
तुम्ही कोण लागून गेलात तिच्याकडे जाऊन तिच्याच मोबाईल मधले पर्सनल चाटींग वाचायला?

बाकी प्रतिसादांवरून एवढ समजल की तुम्ही धागा टिपी म्हणून काढलात.
_/\_

Pages