Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
लोरेन बोबर्ट( रुपी
लोरेन बोबर्ट( रुपी माकडीणीच्या) हातात कोलीत दिल्यावर जे होणार तेच होत आहे! ही बाई फक्त ८ मतांनी ( कशीबशी) निवडुन आली आहे पण काय तमाशा चालवलाय हीने! काय तारे तोडत आहे रोज वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर! वर फारेंडने क्लिप दिलीच आहे.
या एक्स्ट्रीम राइट विंग रिपब्लिकसनी अमेरिकेची वाट लावायचा विडाच उचलला आहे. धन्य ते लोक ज्यांनी हिला व अश्या एक्स्ट्रिम राइट माथेफिरुंना निवडुन वॉशींग्टनला पाठवले!
राज, सँक्च्युअरी सीटीज, राज्ये व म्युनिसीपालीटीज जेव्हा सुरु होत होत्या ( लेट७० ते अरली ८०ज ) तेव्हापासुन ज्या प्रिमाइस वर त्या सुरु होत होत्या त्या फॉल्टी प्रिमाइसच्या विरुद्ध मी होतो. त्यांचे असे म्हणणे होते की त्या कम्युनीटीज मधे लॅटीनो ( लिगल)इमिग्रंट्सची संख्या व त्यांनी हार्बर केल्या इल्लिगल इमिग्रंट्सची संख्या खुप होती व तश्या कम्युनीटीज मधे डिपोर्टेशन भितीपोठी क्राइम रिपोर्टींग होत नसे. म्हणुन इमिग्रेशन स्टॅटस बद्दल“ डोंट आस्क डोंट टेल“ धोरण वापरुन सँक्च्युअरीज निर्माण केल्या तर क्राइम रिपोर्टींगला लोक घाबरणार नाहीत हे ते “ सँक्च्युअरीज“ निर्माण करण्यामागचे मुळ कारण दिले गेले( अॅट लिस्ट दॅट्स द जस्टीफिकेशन गिव्हन बाय सच म्युनिसीपालीटीज, सीटीज अँड स्टेट्स फॉर क्रिएटींग सँक्च्युअरीज). त्याच बरोबर उदारमतवादी डेमॉक्रेट्स विचारसरणीनुसार अश्या इल्लिगल इमिग्रंट्सच्या लिगल स्टॅटस चा विचार न करता त्यांच्या फुड, शेल्टर व एज्युकेशन या बेसिक गरजा पुर्ण करणे हे ह्युमेन आहे असे म्हणुन तश्या सीटीज व राज्यातले डेमॉक्रेटिक पार्टीचे सरकार अश्या लोकांना आश्रय देउ लागले.
पण ती दोन कारणे जरी वरकरणी खरी वाटली तरी अजुन एक कारण म्हणजे अश्या इल्लिगल इमिग्रंट्स मुळे मिळणारे चिप लेबर व त्या अनुषंगाने मिळणारा त्या भागातील लिगल लॅटीनो पॉप्युलेशनचा डेमॉक्रेटीक पार्टीला मिळणारा पॉलिटिकल सपोर्ट हेही तितकेच खरे कारण आहे.अर्थातच कुठल्याच डाय हार्ड रिपब्लिकन पक्षाच्या माणसाला हे कसे बरे आवडेल?
हे माझे थोडक्यात सँक्चुअरीज म्युनिसिपालिटीज/ सीटीज व स्टेट्स बद्दल मत.
मॅट गेट्स म्हणतोय डेम्स नी जर
मॅट गेट्स म्हणतोय डेम्स नी जर सपोर्ट करून मॉडरेट रिपब्लिकन स्पीकर म्हणून निवडून आणला तर तो राजीनामा देईल. आता डेम्स कसली वाट पाहात आहेत?
व्हॉट्सअॅप वर "तुम्ही रोबो नाहीत हे सिद्ध करा" करता चित्रे दाखवून त्यातील सिग्नल्स, वाहने, पूल वगैरे सिलेक्ट करायला सांगतात तसे (इलेक्ट्रॉनिक) स्पीकर्सच्या चित्रांमधे मॅकार्थीचे चित्र असलेली "कॅपचा" इमेज सध्या फिरत आहे
"यातून स्पीकर्स सिलेक्ट करा"!
हो. ती कॅप्चा फार फनी आहे.
हो. ती कॅप्चा फार फनी आहे.
माईक रॉजर्स गेट्स च्या अंगावर
माईक रॉजर्स गेट्स च्या अंगावर धावून गेला तेव्हा मला माध्यमिक शाळेतले दिवस आठवले. "गां%%$ दम असला तर शाळा सुटल्यावर फत्तेसिंग मैदानावर भेट !"
कंफर्मेशन झाल्यवर पहिला लाईन
कंफर्मेशन झाल्यवर पहिला लाईन आयटेम काय तर काँग्रेशनल एथिक्स कमग्रेवर गदा आणणार. किती समयोचित प्रकार आहे !
टायरी निकल्स - अनदर पुलिस
टायरी निकल्स - अनदर पुलिस ब्रुटॅलिटि. परंतु या घटनेला फ्लॉय्ड सारखं कवरेज मिळालं नाहि; माबोवर तर अगदिच शुकशुकाट. या दुर्घटनेत सामील झालेले बहुतांशी ऑफिसर्स ब्लॅक असल्याने हि घटना कदाचित आकांडतांडव करण्याच्या क्रायटेरियात बसत नसेल. असो, ब्लॅक लाइव्ज डोंट मॅटर नोमोर.. ऑर अॅमाय मिसिंग समथिंग...
पुलिस ब्रूटॅलिटि हा अतिशय कॉम्प्लिकेटेड विषय आहे; रेसिजम पलिकडचा. पण यात रेस कार्ड हमखास आणलं जातं, आपापली पोळी शेकण्याकरता...
ब्लॅक लोकांबद्दल बायस ब्लॅक
ब्लॅक लोकांबद्दल बायस ब्लॅक पोलीस ऑफिसर्स मध्ये सुध्दा असूच शकतो. This is not a new idea.
रेस कार्ड आणले जाणार की. कारण आफ्रिकन अमेरिकन लोकांसोबत सिस्टेमिक अन्याय जास्त प्रमाणात होतात.
social psychologists and criminal justice experts say this question fundamentally misunderstands how institutional racism affects everyone, regardless of race. Racial bias isn't necessarily about how a person views himself in terms of race, but how he views others in terms of race, particularly in different roles throughout his everyday life. And systemic racism, which has been part of the US since its founding, can corrupt anyone's view of minorities in America.
https://www.vox.com/2015/5/7/8562077/police-racism-implicit-bias
टायरी निकल्स ला मारणारे
टायरी निकल्स ला मारणारे पोलिस काळे होते, तस्मात स्ट्रक्चरल रेसिझम नाही, हा फारच बाळबोध युक्तीवाद आहे. बर्याच महिला ( विशेषतः मुलगा लग्नाचा असेल तर) हुंड्याचा आग्रह धरतात, याहा अर्थ हुंडा प्रथा महिलांना जाचक नाही असा काढत येइल ?
ज्या राज्यात ओपन कॅरी करणे लीगल आहे अशा राज्यात हातात बंदूक घेऊन एखादा गोरा रस्त्यावर निघाला तर काय होईल ? कृष्णवर्णीय असेल तर ?
>>टायरी निकल्स ला मारणारे
>>टायरी निकल्स ला मारणारे पोलिस काळे होते, तस्मात स्ट्रक्चरल रेसिझम नाही, हा फारच बाळबोध युक्तीवाद आहे.<<
ज्या प्रसंगी ब्लॅक विक्टिम आणि व्हाइट पोलिस इन्वॉल्व्ड असतात तेंव्हाच पुलिस ब्रुटॅलिटि होते हाच मूळात बाळबोध युक्तिवाद आहे; हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. असो. वर लिहिल्या प्रमाणे पुलिस ब्रुटॅलिटि हा गहन विषय आहे. त्याला सरसकट रेसिझमचा रंग देणं हे साफ चूकिचं आहे...
Trump आणि DeSantis जर खरोखर
Trump आणि DeSantis जर खरोखर GOP नॉमिनेशन साठी लढले तर ती जब्बर रक्तरंजित लढाई असणार आहे. ट्रुंपने मिसाईल दागायला चालू केले आहे.

तात्या माणूसच असा वाटतो की स्वतःचे नॉमिनेशन घालवून रोन ला जिंकू देण्यापेक्षा तो GOP जाळून खाक करेल.
आज त्याने बिडेनचे जवळपास कौतुक केले, स्टेट ऑफ युनियन भाषणासाठी.

सरतशेवटी - LET THEM FIGHT

जानेवारी जॉब रिपोर्ट नुसार
जानेवारी जॉब रिपोर्ट नुसार पांडेमिक मध्ये गेलेले जॉब तर भरून निघाले आहेतच, पण ५३ वर्षातला किमान बेरोजगारी दर अमेरिकन अर्थव्यवस्थेने साधला आहे.
https://www.cnbc.com/2023/02/03/jobs-report-january-2023-.html
ही बातमी फेडरल रिजर्व वाईट
ही बातमी फेडरल रिजर्व वाईट समजुन रेट हाईक थांबवणार नाही. सगळं त्रांगडं आहे!
एकेकाळची ट्रम्पच्या गोटातील
एकेकाळची ट्रम्पच्या गोटातील निकी हेली २०२४ ची निवडणूक लढणार आहे. तात्याची प्रतिक्रिया काय आहे बघायला हवी. एकूण रिपब्लिकन प्रायमरी फील्ड इंटरेस्टिंग होणार आहे.
आत्तापर्यंत डिसॅण्टिस, माइक पेन्स, आता निकी हेली आणि खुद ट्रम्प इतके आहेत. आणखी कोणी आहे का माहीत नाही.
बाय द वे कोणाचे जागतिक शांतता, अखिल मानवजातीचे हित ई. जेनेरिक मुद्द्यांवर मेपल सिरप टाइप लिखाण असलेले पुस्तक आले का? ती एक सटल स्टेप असते भावी उमेदवारीची. सहसा टाइम मॅगेझिनच्या कव्हर वर आगामी अध्यक्षीय उमेदवाराला प्रमोट करण्याकरता केल्यासारखे ते पुस्तक्/त्याची जाहिरात येते. पूर्वी ओबामाचे "ऑडॅसिटी ऑफ होप" आले होते ते आठवते
जेवढे जास्त प्रायमरी मध्ये
जेवढे जास्त प्रायमरी मध्ये उमेदवार तितकं तात्याला चांगलंच. कारण प्रायमरीज मध्ये ही जन्ता जी काही मते खाईल ती डिसँटिसच्या पाय मधुन वजा होईल. तात्याचे सपोर्टर विश्वेश्वरासारखे आपल्या राजिवड्यावर घट्ट आहेत हो!
आपल्या राजिवड्यावर घट्ट आहेत
आपल्या राजिवड्यावर घट्ट आहेत >>
+अमित.
+अमित.
ट्रंप dems च्या दृष्टीतून चांगला उमेदवार आहे. आणि गेल्या काही इलेक्शन मध्ये त्रंपने पाठींबा दिलेले हार्डकोर मागा उमेदवार आपटले आहेत. इंडिपेंडंट लोकांचा पाठिंबा जानेवारी सिक्स मुळे बऱ्यापैकी गेला आहे.
मला वाटते RNC सुध्दा ट्रमप पेक्षा दुसरा व्यक्ती प्रिफर करेल. पण त्याच्या इगोचे सांगता येत नाही. एकतर, ट्रम्प प्रायमरी मध्ये कोणाबद्दल काय बोलेल ह्याची खात्री नाही. DESANTIS ला टोपणनाव देऊन झाले आहे, इतकेच काय ग्रूमर सुध्दा म्हणून झाले आहे.
आणि, प्रायमरी हरला तर इंडिपेंडंट म्हणून लढायची टांगती तलवार आहेच.
>>ट्रंप dems च्या दृष्टीतून
>>ट्रंप dems च्या दृष्टीतून चांगला उमेदवार आहे. आणि गेल्या काही इलेक्शन मध्ये त्रंपने पाठींबा दिलेले हार्डकोर मागा उमेदवार आपटले आहेत. इंडिपेंडंट लोकांचा पाठिंबा जानेवारी सिक्स मुळे बऱ्यापैकी गेला आहे. >> +१ हे सगळं पटतंच. पण एकदा आणि दुसर्यांदाही निसटता गोंधळ झाल्याने डिसायसिव्हली खात्री अजिबात देता येत नाही. आणि 'घडू नये ते घडले' तर पोकळ शब्दांच्या पलिकडे काहीही उरणार नाही.
सांप्रत अमेरिकेच्या
सांप्रत अमेरिकेच्या भूभागावरून एक चिनी बलून हेरगिरीच्या उपकरणासकट निवांत फेरफटका मारत होते. पश्चिमेकडून अलास्कातून आले. तरंगत तरंगत समस्त अमेरिकेचा मनसोक्त आढावा घेऊन, हवी ती माहिती घेऊन ते जेव्हा अटलांटिक समुद्रापर्यंत पोचले तेव्हा अमेरिकेच्या खंबीर नेतृत्वाने क्षेपणास्त्रे डागून ते समुद्रात पाडले.
त्यानंतर अचानक अमेरिकन प्रशासन समस्त क्षेपणास्त्रे सरसावून अवकाश न्याहाळू लागले. एक दोन दिवसात तीन चार अज्ञात, आकाशात उंचावर तरंगणाऱ्या गूढ गोलकांवर क्षेपणास्त्रे डागून त्यांना पाडून टाकले. (प्रत्येक क्षेपणास्त्र २-४ लाख डॉलर इतक्या माफक किमतीचे असते. जवळपास स्थिर असणाऱ्या त्या तरंगत्या वस्तूला नष्ट करायला काही वेळा दोन क्षेपणास्त्रे डागावी लागली.). लोक ufo वगैरे कुजबुज करू लागले.
मग प्रशासनाने घाईने हे स्पष्ट केले की त्या वस्तू काय होत्या ते माहीत नाही, अत्याधुनिक विमानातून टेहळणी करून त्यांचा निकाल लावला पण तरी फोटो बिटो काढता आले नाहीत (किंवा असले तरी तुम्हाला दाखवणार नाही!) त्या वस्तूंचे उपद्रव मूल्य नव्हते.त्या ufo वगैरे नव्हत्या मात्र तरी आम्ही त्या फार विचारपूस न करता वस्तू तात्काळ नष्ट केल्या!
आता असे उघडकीस येते आहे की इतक्या तत्परतेने नष्ट केलेल्या ह्या अज्ञात गोष्टी म्हणजे निरुपद्रवी बलून्स होती. कुणी म्हणते कार विक्रेत्याच्या दुकानात लावलेली बलून सुटली. कुणी म्हणते कुणी हौशी अमेरिकन बलूनला बारीकसा ट्रॅकर लावून हवेत सोडतात आणि वाऱ्याची दिशा असले काही त्यातून मोजतात. त्यातली काही असावीत. म्हणजे फार तर १०० डॉलर किमतीची निरुपद्रवी बलूनं लाखो डॉलर किमतीची अत्याधुनिक, अद्ययावत वगैरे क्षेपणास्त्रे डागून तत्परतेने नष्ट केली (तिथेही काही वेळा नेम चुकला!) . परंतु जेव्हा खरोखर एका परकीय देशाने टेहळणी करायला बलून पाठवली त्यांना सगळे काही न्याहाळायची पुरेपूर संधी देऊन शेवटी फार बोंबाबोंब व्ह्यायला लागली म्हणून नष्ट केले.
किती कर्तबगार आहे आपले सरकार!
उठता बसता पर्यावरणाच्या
उठता बसता पर्यावरणाच्या नावाने टाहो फोडणारे, लोकांवर जास्तीत जास्त जाचक बंधने घालायला उत्सुक असणारे सरकार जेव्हा खरोखरचे पर्यावरण संकट एका लहानशा गावावर त्यांची काडीचीही चूक नसताना येते, तेव्हा त्याकडे साफ दुर्लक्ष करते. लंगड्या सबबी सांगते असे दिसते.
ओहायो राज्यातील एका इस्ट पॅलेस्टिन नामक कुग्रामाजवळ एक मालगाडी घसरली (फेबु ३). त्यात प्रचंड प्रमाणात जहाल विषारी रसायने भरलेली होती. ५०० टन! सगळी रसायने (पावडर) त्या रेल्वे रुळाभोवती सांडली. दहा एक मालगाडीचे डबे रुळावरून घसरून अस्ताव्यस्त पसरले. हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा असल्यामुळे संबंधित खाजगी रेल्वे कंपनीने सांडलेली जीवघेणी रासायनिक पूड पेटवून द्यायचा घाट घातला. घाईघाईने त्या गावातील लोकांना घरे सोडायचे आदेश दिले आणि आग लावली. महाप्रचंड स्फोट झाला. महाघातक रसायनाचा प्रचंड काळा ढग हवेत गेला. (ही रसायने पहिल्या महायुद्धात फॉस्जिन नामक भयानक वायू बनवायला वापरत. त्याचा महायुद्धात रासायनिक अस्त्र म्हणून वापर केला गेला) त्यानंतर गावातील लोकांना घरी परतायची परवानगी दिली. पण आसपासचे झरे, नद्या ह्यातील मासे तडफडून मेले होते. लोकांना घशाचे त्रास होत होते. डोळे झोम्बणे, पाळीव कुत्री मांजरे कोंबड्या (एकाकडे कोल्हे होते. तेही) सगळे गलितगात्र होणे किंवा मरून पडणे हे चालू झाले.
ओहायोचा एक डॉक्टर फौची आहे. तो अगदी छातीठोकपणे सांगत होता की सायन्स मला सांगत आहे की इस्ट पॅलेस्टिन पूर्ण निर्धोक आहेत. रहिवाशी तक्रारी करत आहेत ते त्यांच्या मनाचे खेळ आहेत. केवळ आपल्या समलैंगिक असण्यामुळे पद मिळालेला आजवरचा सर्वात नालायक केंद्रीय वाहतूक मंत्री (अर्थात ट्रान्स्पोर्टेशन सेक्रेटरी) अद्याप इथे फिरकलेला नाही. एखाद दोन ट्वीट सोडली तर काहीही करण्यात स्वारस्य दाखवलेले नाही. त्याच्या लेखी चिंतेचे विषय हे वाहतूक क्षेत्रात पुरेसे गे, ट्रान्स, काळे लोक नाहीत. वाहतूक क्षेत्र हे वर्णद्वेषाने पछाडलेले आहे. रस्ते बांधकाम वगैरे क्षेत्रात श्वेतवर्णीय संख्येने जास्त आहेत हे आणि असे आहेत. ह्या निर्बुद्ध माणसाने असेही विधान केले की जवळपास रोज रेल्वेगाड्या रुळावरून घसरत असतात. प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही आणि जमणार नाही!
गेली अनेक वर्षे रेल्वे कंपनीने समस्त राजकारण्यांना भरघोस मलिदा चारला आहे आणि कुणी फारशी तक्रार करणार नाही ह्याची खबरदारी घेतली आहे.
ओहायोचा हा भाग बहुतांश ट्रंप समर्थक आहे. बहुतांश श्वेतवर्णी आहे. त्यामुळे अशा लोकांवर असा रासायनिक होलोकॉस्ट चा प्रसंग आला तर त्यांची तीच लायकी आहे. बरी अद्दल घडली. असा दृष्टीकोन केंद्र सरकार बाळगून असेल कदाचित.
एकंदरीत ह्या गरीब गावाला कुणी वाली नाही. जर तो भयानक विषारी वायू आपला परिणाम बाजूच्या राज्यात, पाण्याद्वारा कॅनडापर्यंत पोचला तर कदाचित कुणी दखल घेईल. रेल्वे कंपनीला फारशी नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही.
भोपाळमधे युनियन कार्बाईड जसी कुठला दंड, शिक्षा न भरता निसटली तसेच इथेही होणार.
भयानक बेपर्वा सरकारे. राज्य आणि केंद्र दोन्ही.
Trump भरमसाठ डी रेग्युलेशन
Trump भरमसाठ डी रेग्युलेशन केलेले, त्यातले एक होते फ्लेमेबल किंवा हानिकारक मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रेन्स ना ECP ब्रेक्स असावेत हा नियम काढून टाकला.
https://www.newsweek.com/donald-trump-blame-ohio-train-derailment-1781163
(आता सबस्टंस न समजून घेता "होहो इथे पण ट्रमप चीच चूक का लॉल" म्हणून हसायचे तर हसा. पण जे आहे ते आहे.)
अर्थातच सगळी चूक ट्रंपची
अर्थातच सगळी चूक ट्रंपची असणार! पण काही प्रश्न
१. ही मालगाडी घसरली आणि त्यातील भयानक रसायने सांडली ह्याला ट्रंपचा रद्द केलेला कायदा जबाबदार आहे ह्याचा काही पुरावा आहे का? मालगाडी इलेक्ट्रॉनिक ब्रेक नसल्यामुळे घसरली का? हा अपघात नक्की कसा आणि कशामुळे घडला ह्याची कारणे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा बोर्डाने (एन टी एस बी) ने दिली आहेत का?
२. सांडलेली ५०० टन जालीम विषारी रसायने तिथेच जाळून टाकावीत आणि त्या गावातील लोकांचे जीव कायमचे धोक्यात घाला हेही ट्रंपने सांगितले का?
३. ट्रंपला पाय उतार होऊन दोन वर्षे होऊन गेली आहेत. मध्यंतराच्या काळात राष्ट्रपतीपद आणि संसद सगळे सगळे दुसर्या पक्षाकडे होते, ह्या काळात वाहतूक मंत्र्याने किंवा राष्ट्रातीने हा कायदा पुन्हा पास करावा ह्या करता काय प्रयत्न केले? बाकी अनेक ट्रंपकालीन कायदे अगदी एक्जिक्युटिव ऑर्डर काढून पहिल्या काही दिवसात रद्द केले. हा का नाही रद्द केला? कुणी हात बांधले होते?
जर ते ब्रेक्स असेल असते तर
जर ते ब्रेक्स असेल असते तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती असे म्हणले आहे लेखात.
Epa ने हवेत toxic वायू हानिकारक पातळीवर नसल्याचे सांगितले आहे. मासे मरत आहेत ह्याचा थेट संबंध माणसांशी जोडता येईल का शंका आहे. दीर्घकालीन परिणाम असतील का नसतील ह्याबद्दल टिप्पणी करणे मला शक्य नाही.
बाकी तुमचे बरोबर आहे. जबाबदारी ट्रम्पची नाही. सद्य सरकारचीच आहे. माझा उद्देश deregulations for the sake of deregulation can lead to disaster हा मुद्दा मांडणे इतकाच होता.
पण घाबरू नका, शेंडेनक्षत्र.
पण घाबरू नका, शेंडेनक्षत्र. आजचीच बातमी आहे की सुप्रिम कोर्ट २०२० ची निवडणूक रद्द करून पुनः ट्रंपला आणणार!
लवकरात लवकर मार ए लागो ला जा (रशियन आहे म्हंटले की लगेच प्रवेश मिळेल). ट्रंपला इथले लिहीलेले दाखवा, तो तुम्हाला रिवेन्ज सेक्रेटरी करेल. मग तुम्ही सरळ सगळ्या डेमोक्रॅट ना मारून टाका. मग मज्जाच मजा, आपण रशियन शिकू. मी तर डा न्येट आत्ताच शिकलो.
शेंडेनक्षत्रांच्या शिडात
शेंडेनक्षत्रांच्या शिडात असंबद्ध वटवट करायला नविन जोमाने वारे भरले आहे.
नोव्हेंबरच्या निवडणुकीत त्यांच्या प्रिय ट्रंपचे बॅकींग असलेल्या सर्व उमेदवारांच्या मतदारांनी सणसणीत थोबाडीत लगावली आहे हे बघुन २-३ महिने चुडीचुप होउन तोंड लपवुन बसले होते ते. परत फुरफुरी येउन आता परत बायडन बॅशींगच्या त्यांच्या एकच मुद्द्याचे दळण दळायला परत नविन जोमाने ते आपल्या मनोरंजनाला आले आहेत!
त्यांच्या प्रिय केरी बाइला अॅरिझोनाच्या मतदारांनी केराची टोपली दाखवली याबद्दल त्यांचे काय भाष्य आहे? त्यांची निवडणुकीआधीची लिझ चेनि त्या येडपट केरीबाइच्या विजयाला हातभार लावणार अशी खात्री असलेली पोस्ट आता वाचलीत तर त्यांच्या पोस्टींग्सना किती किंमत द्यावी हे कळुन येते!
एक विनोदी करमणुक म्हणुन त्यांची पोस्ट्स वाचायची व जरा आपला फुकटचा टाइमपास झाला म्हणुन खर म्हणजे आपण मायबोलीचे उपकारच मानायला हवेत!
आणी हो! तुमची त्या पॅलेस्टाइन
आणी हो! तुमच्या त्या पॅलेस्टाइन गावातली सामान्य माणसे त्या ट्रेन अॅक्सिडंटने पुढेमागे मरु शकतील या काळजीने खरच माझा उर भरुन आला हो!
तिकडे रिपब्लिकन पार्टीच्या गन कंट्रोलबाबतच्या आडमुठ्या धोरणामुळे गन व्हायोलंसने रोज अमेरिकेत शाळेतली, कॉलेजमधली निरागस मुले/ मुली रोज मरत आहेत त्याचे तुम्हाला काहीच सोयरसुतक नाही? किती तो ढोंगीपणा व निर्लज्जपणा? श्शी!
अजिन एक! तुम्हाला रेल्वे
अजुन एक! तुम्हाला रेल्वे लॉबी सरकारला मलिदा देत आहे असे खात्रीने दिसते पण प्रचंड मोठ्या व इन्फ्ल्युएन्शिअल गन लॉबीचा रिपब्लिकन सेनेटर्स व कॉम्ग्रेसमनना चारत असलेला मलिदा मात्र तुम्हाला दिसुन येत नाही? किती तो आंधळेपणा! व किती तो भंपकपणा!
<<<एक विनोदी करमणुक म्हणुन
<<<एक विनोदी करमणुक म्हणुन त्यांची पोस्ट्स वाचायची व जरा आपला फुकटचा टाइमपास झाला म्हणुन खर म्हणजे आपण मायबोलीचे उपकारच मानायला हवेत!>>>
एकूण राजकारण हाच एक प्रचंड मोठ्या विनोदाचा विषय झाला आहे.
मुकुन्दराव शक्य असल्यास
मुकुन्दराव शक्य असल्यास सभ्यतेच्या मर्यादा संभाळून टी़का करा. शिवराळ गलिच्छ भाषा एकंदरीत चर्चेचा स्तर अकारण घसरवते. अर्थात वैयक्तिक हल्ले हेच एकमेव अस्त्र तुमच्याकडे असेल तर नाईलाज आहे. असो.
होय मध्यावधी निवडणूका वाईट आमच्यासाठी वाईट झाल्या. शोकसागरात बुडलेलो असल्यामुळे इथे आलो नाही. आपल्या प्रचंड विजयाबद्दल आपणास आनंद होत असेल तर जरूर आनंदोत्सव करा.
अर्थातच न्यू यॉर्क आणि अरिझोनात अपेक्षाभंग झाला. आणि त्यात मतदानातील गैरप्रकारांनी आपला खारीचा वाटा उचलल असेलच ह्याची खात्री आहे. पण निकाल तो निकाल.
असले भयानक नग निवडून आल्याने परिस्थिती आणखी वाईट होईल. विशेषतः बेकायदा घुसखोरी, होमलेसनेस, गुन्हेगारी नव्या जोमाने उसळी मारते आहे. कदाचित अमेरिकन २०२४ पर्यंत वैतागून बदल घडवतील अशी आशा. असो.
परंतु वाईटातून चांगले निघते ते असे की काँग्रेस चा स्पीकर निवडताना उजव्या लोकांची मनधरणी करावी लागली. आणि आता रिपब्लिकन लोक थोडाफार कणा दाखवतील अशी आशा. निदान ट्वीटरच्या उन्मत्त लोकांची चौकशी करून त्यांचे ढोंगीपण डेमोक्रॅट धार्जिणेपण उघडकीस आले हे चांगले झाले. असेच पुढे होत राहील अशी आशा. असो.
वर्तमानाकडे वळावे.
अर्थातच न्यू यॉर्क आणि
अर्थातच न्यू यॉर्क आणि अरिझोनात अपेक्षाभंग झाला. आणि त्यात मतदानातील गैरप्रकारांनी आपला खारीचा वाटा उचलल असेलच ह्याची खात्री आहे
>>>>हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है
एन टी एस बी ने आपला
एन टी एस बी ने आपला अपघाताच्या कारणांचा अधिकृत अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे अर्थातच ट्रंप आणि त्याने रद्द केलेला नियमच यामागे असणार ते उघड आहे! मग काय झोडपा ट्रंपला!
गन लॉ बद्दल रिपब्लिकन पुरेसे जागरूक नाहीत म्हणून ईस्ट पॅलेस्टाईनचे लोक, त्यांचे पाळीव प्राणी विषारी रसायनांमुळे तडफडून मेले तरी काहीच बिघडत नाही ही अगदी गंमतशीर आणि वेगळीच विचार पद्धती आहे. खूपच रोचक. ह्यात काहीही चूक नसताना रासायनिक बाँबला बळी पडणार्या गरीब ईस्ट पॅलेस्टिन रहिवासी लोकांबद्दल सहानुभूती वा कणव असणे अशी अपेक्षा करणे टू मच असणार.
(गन लॉ बद्दल रिपब्लिकन लोकांचे आक्षेप मुख्यतः असे आहेत की कायदे बंदी वगैरे कायदे पाळणार्या लोकांवर बंधने घालतात. बेकायदा बंदुकी घेणारे जास्त उन्मत्त होऊन जास्त गुन्हे करतात. पण ते असो. दोन वर्षे डेमोक्रॅटिक लोकांचे सरकार, सिनेट, काँग्रेस सगळे काही होते. मग त्यांनी गन ब्यान, गन कंट्रोल आणला का? असल्यास उत्तमच आहे. मी रिपब्लिकन आणि ट्रंप समर्थक असलो तरी बंदुकांचा खंदा समर्थक वगैरे आजिबात नाही.)
डेमोक्रॅट आणि त्याचे पाठिराखे उठता बसता पर्यावरणाचा कसा नाश होतो आहे आणि पृथ्वी १०-१२ वर्षात नष्ट कशी होणार आहे ह्याबद्दल सगळ्यांना घाबरवत असतात आणि त्याकरता पेट्रोल बंद होणार, गॅस बंद होणार वगैरे खुशखबरी देत असतात. तर खरोखर एका लहानशा गावावर असा भयानक पर्यावरणीय संकटाचा हल्ला झाला आहे तर सगळे चिडीचूप. नवे बांधकाम करत असताना तिथे एक घुबडाचे घरटे किंवा कुठलासा सॅलॅमंडर निघाला म्हणून लाखो डॉलर ओतून त्यांचे पुनर्वसन करायला लावले अशी उदाहरणे आहेत. मात्र इथे अनेक प्राणी तडफडून मेले, त्या परिसरात पक्षी फिरकेनासे झाले तरी कुणाला विशेषतः डेमोक्रॅटना काहीही सोयरसुतक नाही. धन्य आहेत!
Pages