नवलकोलचे लोणचे शलगमचे लोणचे Turnip Pickles

Submitted by BLACKCAT on 21 March, 2021 - 11:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नवलकोल ३

फोडणीसाठी
तेल , मोहरी , जिरे, हिन्ग, लसुण पाकळ्या , थोडे आले किसुन, हळद

मीठ , साखर, लाल तिखट , लोणच्याचा मसाला

क्रमवार पाककृती: 

नवलकोल साल काढुन घेणे
मग त्याच्या गोल अगदी बारिक चकत्या करणे, उर्लेल्या भागाच्या पातळ लांब पट्ट्या कापणे

मग हे ताटात पसरुन दिवसभर उन्हात वाळवावे
IMG-20210321-WA0040.jpg

मग तेल घेउन फोडणी करावी , मोहरी, जिरे, हिन्ग टाकुन त्यात लसणाच्या पाकळ्या व आले किस परतुन घ्यावा , मग त्यात नवलकोल तुकडे घालावे, हलवुन घ्यावे, मग त्यात हळद, तिख्ट, मीठ, साखर, मसाला घालुन मिसळुन घ्यावे.

लोणचे तयार

IMG_20210321_204710.jpg

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

चकत्या हळद घालुन वाफवुन मग वाळवुनदेखील लोणचे तयार करतात
तेल भरपुर वापरले जाते, मी कमी वापरले आहे.

माहितीचा स्रोत: 
गुगल, यु ट्युब
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोशिंबीर, भाजी, पचडी, चटणी, सांबार, सांडगे, किसून थालीपीठात/ धपाट्यात, पिठल्यात addition

लोणचे चांगलं दिसतय

उत्तरेकडे शलगम-गोश्त नावाचा पदार्थ फार सुप्रसिद्ध आहे. त्यातलं शलगम म्हणजे हेच का?
China gate चित्रपटात अमरिश पुरी नायकाला (समीर सुरी) म्हणतो - बाजार तरकारी लेने जाओ तो शकरगंदी ओर शलगम जरूर लेके आना. आज शलगम और गोश्त खाने का बडा मन कर रहा है.

हो

आपल्याकडेही ह्यात मासे घालून भाजी करतात

मस्त! खूप छान आहे कृती. माऊ , नवलकोल मुळ्यासारखे किसायचे. फोडणीला टाकुन त्यात मीठ , तिखट व किंचीत साखर टाकुन वाफ काढा. मऊ शिजले की बेसन घालुन परतुन परत एक वाफ द्या. डब्यासाठी कोरडी भाजी होईल.

अरे वा... नवीनच अन कधीही न खाल्लेली भाजी बघायला/वाचायला मिळाली. मी बाजारात बरेचदा हे नवलकोल बघितले पण त्याचं नेमकं काय करतात हे माहित नव्हतं. आज या लोणच्याच्या रेसिपीमुळे प्रतिक्रियांमधे अजुन रेसिपी वाचायला मिळाल्या. आजुबाजुचा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर बाजारात जाईन तेव्हा नक्की विकत घेईन.

आम्ही सुके बोंबिल आणि बटाटे घालून जसं कालवण करतो ना तशीच करतो नवलकोल घालून भाजी...! नवलकोल सुक्या बोंबिलमध्ये पण छान लागते आणि ओल्या करंदीत सुद्धा.. !! आम्ही सुक्या किंवा ओल्या मच्छीच्या भाजीत हिरव्या वाटणासोबत चिंचेचा कोळ घालतो.