कोविड लसीचा अनुभव

Submitted by च्रप्स on 19 March, 2021 - 22:23

मित्रांनो, तुम्ही कोविड लस घेतली का?
आमची पुढच्या आठवड्यात अपॉइंटमेंट आहे, moderna मिळेल आम्हाला.
तुमचे अनुभव कसे आहेत, साईड इफेक्ट्स जाणवतायत का काही?
इथे चर्चा करूया का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या दोन्ही मावश्यानी लस घेतली कोव्हीशिल्डची . भरतनी लिहिले तसे आधी cowin साईटचा प्रॉब्लेम येत होता. ओटीपी येतच नव्हता. मागील शुक्रवारी वेबसाईट ठीकठाक झाली. आम्हाला शनिवारी oppointment मिळाली. केंद्रांवर शक्य तितके सहकार्य कर्मचारी करत होते. , त्यानांही मर्यादा आहेत. पण आपल्याकडील जनतेला अजूनही कोरोनाचे गांभीर्य कळले नसावे. गर्दी करणे, रांग मोडणे , मास्क कसाही घालणे, सोशल distancing न पाळणे वगैरे चालू होते.

लस घेतल्यावर दुसऱ्या दिवशी दोन्ही मावश्याना अंगदुखी आणि जरासा ताप आला. केंद्रावरील डॉक्टरांनी अश्या वेळी क्रोसीन घ्या असे सांगितले होते . मग अर्धी गोळी दिली. संध्याकाळपर्यत बर्या झाल्या.

इथल्या जनतेला एक सूचना आहे : लस घ्यायला जाताना कृपया डबल मास्कचा वापर करा. आम्ही घातलेला. लोकांना अजूनही गांभीर्य समजलेले नाही. लस घेतल्यावरही कोरोना झाला अश्या केसेस आहेत त्याच मूळ या बेजबाबदारपणे वागण्यात आहे.

काल मी, आई (७३ वर्षे) आणि नवरा असे तिघेही एकदम जाऊन कोविशील्ड दुसरा डोस घेतला. लस बरेच दिवस उपलब्ध नसल्याने जास्त गर्दी होती पण दुपारपर्यंत घरी आलो. या खेपेस काही त्रास झाला नाही. मी घरी आल्यावर लॉगिन करून काम सुरू केलं ते रात्री 8 पर्यंत चालू होतं. मागील अनुभवामुळे एक पॅरासीटमॉल खाऊन वेळेत झोपले. ताप अंगदुखी काही नाही, हात किंचित दुखतोय पण ओके

मी गेल्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये ओपीडी नंबर काढायला सकाळी गेलो होतो. रस्त्यावर मॉर्निंग वॉक वाल्यांची गर्दी. निम्म्याहून अधिक मास्क शिवाय. शिवाय घोळक्यात गप्पा मारत. यात विशिष्ट भाषक लोकांचं प्रमाण अधिक. हे लोक लसीकरण, ओपीडी व्हिजिटसाठीही सहकुटुंब सहपरिवार आप्तेष्ट मित्रमंडळींसह जातात.
दिवसभर अॅंब्युलन्सचे सायरन ऐकू येत असत. या आठवड्यात बरेच कमी झालेत.

लस कदाचित खूप दिवसांनी आली असेल पण ज्येनाचे ईतके हाल बघून वाईट वाटले.>>>>> चंपा, तुमचा अनुभव वाचून खरंच वाईट वाटले.कदाचित आता गर्दी जास्त असेल म्हणूनही एवढावेळ लागला असावा.
आम्ही दोघींनी, ८ मार्चला पहिला डोस घेतला.पालिकेच्या मां हॉस्पिटलमधे बरीच गर्दी होती,पण व्यवस्था ठीक होती.आमचाच नंबर १५२ वगैरे होता. विशिष्ट भाषिक मंडळी मधे घुसायचा प्रयत्न करत होतीच. आम्ही होतो त्या वेळेत जवळजवळ २५०-३००लोक लसवंत झाले असावेत. इंजेक्शन देणारीचा हात एवढा हलका होता की कधी दिले हे कळलेही नाही.त्यानंतर अर्धा तास थांबायचा वेळ धरूनही फक्त दीड तास लागला.हॉस्पिटल स्टाफची कमाल वाटली.थंड डोक्याने आणि हसतमुखाने सर्व चालू होते.

दुसर्‍यावेळी बीआरसी हॉस्पिटलमधे फक्त पाऊण तास लागला.

जाई यांच्या म्हणण्याशी पूर्णतः सहमत, जनतेला अजूनही गांभीर्य नाही>>>+१.

विशिष्ट भाषिक मंडळींचा अनुभव आम्हलाही आला. प्रामुख्याने ही लोकं घोळका करून उभे राहणे, सोशल डिस्टन्सइंगला हरताळ फासणे ह्यात आघाडीवर होती.

पण लसीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांच कौतुक आहे. एवढ्या मोठ्या जनतेला शांतपणे तोंड देत काम निपटून नेणे हे ग्रेट वर्क

माझे मम्मी पप्पा दुसरा डोस घ्यायला गेले होते तेव्हा तिथे एक बाई तिचा दुसरा डोस घ्यायला आली होती तिचा शेवटचा नंबर होता त्यानंतर त्यांनी लोकांना परत पाठवले तर ही बाई एकच मिनिटात थोडी चौकशी करून येते बोलून आत गेली ते लस घेऊन बाहेर, झाले यानंतर लोक चिडले, security वाल्यांना खूप कठीण गेले सगळे शांत करायला.

मी परवा आणि Mr. काल Moderna चा दुसरा डोस CVS मध्ये घेतला
मला अतिशय विकनेस आला दुपारी 3.45 घेतली. रात्री 9 ला झोपताना खूप rest लेस वाटत होतं.पहाटे पाचला प्रचंड थंडी पोट विचित्र दुखत होते उलटी सारखे वाटत होते.अन्न कडे बघायची इच्छा नव्हती मग 2 पर्यंत ताप दिवसभर झोपेत पण दुपारी 4 नंतर हळूहळू बरे वाटले
Mr दिवसभर झोपतात आहे पण माझ्यासारखा त्रास झाला नाही लस
दिली तो हात पण एक दिवस बराच दुखतो
Tylnol paracetoml काहीही घेतलं नाही फक्त झोप पाणी आणि फळ
भारतत् माझ्या 86 वर्ष आईने भावाबरोबर पायी चालत जाऊन लस घेतली तिला काहीही झाले नाही कसं वाटत विचारायला फोन केला तर match बघत होती

यात विशिष्ट भाषक लोकांचं प्रमाण अधिक. >>> अच्छा हे माझं एकटीचं निरीक्षण नाहीए तर. मला वाटलं prejudice मुळे फक्त मलाच असं वाटतं आणि हे घोळके फक्त माझ्याच डोक्यात जातात. जिथे तिथे नियम तोडणे या लोकांना फार आवडतं. मी डॉग वॉकला जाते तेव्हा बायकांचा एक आणि पुरुषांचा एक असे भले मोठे 2 जथे टेकडीवर फिरायला आलेले असतात. वर जोरजोरात गप्पा मारून बाकी फिरायला येणाऱ्यांची शांती भंग करतात.

टोकन देतात पण किती वाजता नंबर येईल ते कोणीच सांगू शकत नाही. पायी चालत जाण्याइतक्या अंतरावर घर नाही. कोणाला फोन करून कळवा म्हणून सांगितलं तर कोण असा फोन करेल आणि परत विश्वास कोणावर ठेवणार. सकाळी पटापट नंबर पुढे गेले पण नंतर गती कमी होत गेली.

हो. बाबांच्या लसीकरणाच्या वेळी इथल्या हॉस्पिटलमध्ये यावरून काही जण वाद घालत होते की इतकी गर्दी का? तुम्ही टाइम स्लॉट द्या. तेव्हा फक्त सकाळ , दुपार असेच दिले होते.
माझ्या वेळी तीन ते सहा असा स्लॉट निवडता आला.

मोठ्या शहरांपेक्षा ग्रामीण भागात लसीकरण निवांत आहे. म्हणजे काही काळापर्यंत तरी होते. घरच्यांनी एकदा कोवॅक्सिन घ्यायची ठरवल्यावर आमच्या गावातच लसीकरण असल्याने ज्या दिवशी कोवॅक्सिन येईल तेव्हा तिथल्या डॉक्तरांना कळवायला सांगितले होते. दुपारी जरा निवांत असल्याने अर्ध्या तासात आईवडील दोघेही लस घेऊन घरी. रजिस्ट्रेशन करून फार कमी लोक जातात लसीकरणाला इकडे.
मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घ्यायचे ठरवले होते पण काही दिवस फोन-नेट बंद करून वाईला गेल्तो श्रमपरिहाराला. दहा तारखेला येऊन पाहतो तर सगळा बाजार उठलेला दिसला सगळीकडे आणि लोकडाऊन पण लागलं. आता स्पुटनिक येतेच आहे तर तीच घेऊन टाकतो.

मी आणि बायकोने फायझर घेतली, 3 दिवस अंतराने... मी गेलो लस घ्यायला तर टेक्निशियन नव्हती, फार्मासिस्ट ने स्वतः दिली.. कधी इंजेक्शन दिले मला कळलेही नाही... इतके स्मूथ होते...
हात दुखला थोडासा पण साधारण चार पाच तासानंतर...

बायकोला तर तेव्हढाही त्रास झाला नाही.. आम्ही मुद्दाम तोच फार्मसिस्ट पाहिजे म्हणून त्याच्याकडून लस घेतली...

आम्ही कोणीही पेन किलर घेतली नाही...
हात move करत होतो मात्र.. ब्लड कर्क्युलेशन वाहते ठेवण्यास... मेबी त्याने फायदा झाला असावा...

दुसऱ्या दिवशी तर काहीच जाणवले नाही...
मी तर दुसऱ्या दिवशी जिम मध्ये देखील गेलो आणि 180 पाउंड डेडलिफ्ट देखील मारला...

माझा ही फायझरचा दुसरा डोस गेल्या गुरुवारी झाला. यावेळी रात्रभर हात दुखला आणि दुसर्‍या दिवशीही दिवसभर दुखत होता. खूप दिवसांनी बायसेप्स, ट्रायसेप्स केले की दुखते तसे दुखत होते. जसे काही १० पौंडची डबेल्स उचलली होती. त्या आधी रविवारी नवर्‍याने दुसरा डोस घेतला त्याला काही त्रास झाला नाही. मुलाचा काल फायझरचा दुसरा डोस झाला. त्याला म्हणे आज नेहमीपेक्षा जरा जास्त थकवा वाटतोय म्हणजे ठीकच असावा.

आमचे मॉडर्नाचे दोन्ही शॉट्स झाले. दोघांचेही दोन्ही एकाच दिवशी. पहिल्यानंतर जरा हात दुखणं, जड वाटणं वगैरे झालं दोन दिवस पण पेनकिलर घेतली नाही. दुसर्‍या शॉटनंतर दुसर्‍या दिवशी तापासारखं वाटणं, अंग दुखणं वगैरे वाटलं दोन दिवस तेव्हा टायलेनॉल घेतली दोन दिवस. मला इंजक्शन घेतलं त्या जागी जरा खाज आणि लालपणा वाटला आणि नंतर गेला.

शक्यतो लस घेतल्यावर डॉक्टरला विचारल्याशिवाय पेन किलर घेऊ नये.
दुसर्या डोस नंतर विचारा आधीच.
>>>

मी डॉक्टरांना विचारल्या शिवाय काहीच करत नाही. थँक्स!

वेब - चुकीचा निर्णय.. तीन चार दिवस अंतर ठेवणे बरे पडते सेकंड लस मध्ये... एकमेकांची काळजी घेण्यासाठी...
>>>>

Do not judge please. कधी स्लॉट मिळत नाहीत, कधी इंजेकशन ची भीती वाटते म्हणून , कधी बायकोला गाडी येत नाही आणि नवऱ्याला परत सुट्टी मिळणार नसते म्हणून अशा असंख्य करणारे लास एकाच दिवशी घ्यायला लागू शकते.
मी आणि नवऱ्याने एकाच दिवशी घेतली, मला त्रास झाला, त्याला ढिम्म फरक पडला नाही.

वेब - चुकीचा निर्णय.. तीन चार दिवस अंतर ठेवणे बरे पडते सेकंड लस मध्ये... एकमेकांची काळजी घेण्यासाठी...
अगदी बरोबर चांगलाच पश्चताप होतो आहे
इंडियन किचन प्रमाणे दुसऱ्या दिवशीच मी आपली किचन मध्ये तो मात्र फुल्ल विश्रांती घेतो आहे
माझी मुलगी म्हणते मी इंडियन मुलाशी लग्न करणार नाही जस तुम्ही आईला किचन मधून बाहेर पडू देत नाही
आणि अगदी खरं बोलते ती अस मला अनुभवावरून वाटत
बरेच मतभेद होऊ शकतात या वाक्यावर असो

मी ऑनलाईन नोंदणी केली तेव्हाही फोरनून आणि आफ्टरनून हे दोनच पर्याय होते. फोरनूनची संध्याकाळ झाली तर ज्यानी आफ्टरनून निवडली आहे त्यांना रात्र झाली असेल. त्यादिवशी चारशे नंबर होते एकूण.

मी आणि माझ्या नवऱ्याने पहिली लस ५ दिवसाच्या अंतराने घेतली. आधी मी १७ एप्रिल ला आणि आज त्यानी..
मला काहीच त्रास झाला नाही. त्याचा मात्र हात दुखतोय आणि इंजेक्शन दिलं तिथे थोडी सूज आहे..

एक सजेशन
भारत आणी इतर देश यातील लेखकांनी तत्सम उल्लेख केल्यास कळायला बरे जाईल

सासुबाईचा दूसरा डोस झाला कोवाक्सिनचा पण सर्टिफिकेट आल नाही. पहिल्या डोस नंतर लगेच मेसेज आला होता आणि cowin वर पण सर्टिफिकेट दिसत होता. पहिला डोस सरकारी मधे आणि दूसरा प्राइवेट मधे घेतला. असा अनुभव कुणाला आलाय का?
हॉस्पिटल मधे चौकशी केली तर त्याच्या कड़े तर vaccinate अस दिसतय पण सर्टिफिकेट त्यांना पन नाही दिसत. हॉस्पिटल वाले लोग लेटर हेड वर लिहून द्यायला तयार आहेत तर तस घ्याव का?

हो, हॉस्पिटलवाल्यांकडून लेटर हेड आणि सही शिक्क्यानिशी लिहून घ्या. कुणास ठाऊक वेबसाईटवर केव्हा मिळेल /मिळेल की नाही. आणि नंतर मिळालंच तरी हरकत नाहीच.

वेब - चुकीचा निर्णय.. तीन चार दिवस अंतर ठेवणे बरे पडते सेकंड लस मध्ये... एकमेकांची काळजी घेण्यासाठी...
अगदी बरोबर चांगलाच पश्चताप होतो आहे
इंडियन किचन प्रमाणे दुसऱ्या दिवशीच मी आपली किचन मध्ये तो मात्र फुल्ल विश्रांती घेतो आहे
>> हाहा.. एक्साकटली...

Do not judge please. कधी स्लॉट मिळत नाहीत, कधी इंजेकशन ची भीती वाटते म्हणून , कधी बायकोला गाडी येत नाही आणि नवऱ्याला परत सुट्टी मिळणार नसते म्हणून अशा असंख्य करणारे लास एकाच दिवशी घ्यायला लागू शकते.
>>>माझा प्रतिसाद वेब याना होता.. वेगवेगळ्या दिवशी लस घेणे आणि दोघांनी एकत्र जाणे बेटर नाही का... एक जण लस घेईल आणि दुसरा सपोर्ट ला..
घरी येऊन एखाद्याला त्रास झाला, ताप वगैरे आला तर दुसरा तरी नॉर्मल असेल.. दोघांना एकत्र लस घेऊन एकत्र रिअकॅशन आली तर ??.. घरात लहान मूल असेल तर त्याचे कोण बघणार?
लस घेऊन काही जणांना डिझी पण फील झाले आहे.. दोघे लस घेऊन ड्राईव्ह करून येणे धोकादायक नाही का..

सो मी जे लिहिले आहे त्याच्या मागे हे आणि बरीच कारणे आहेत...

सहमत आहे च्रप्स.
मी आमच्याकडे असेच प्लान केले. पाच जण मिळुन तीन वेगवेगळ्या दिवशी घेतली, दोन दिवसांच्या फरकाने.
अशा प्लॅनिंगची गैरसोय ही एकाच वेळी रिऍक्शन येऊन येणाऱ्या गैरसोयी पेक्षा नक्कीच बरीच कमी असेल.

इकडे कोणीतरी सर्टिफिकेट बद्दल विचारले होते, तर माझ्या मम्मी पप्पांचे पण सर्टिफिकेट यावेळी दिले नव्हते, लिंकवरून कसे डाउनलोड करू कळत नव्हते कारण एक आयडी लागतो तो कोणता कळत नव्हता म्हणून वॉर रूमला फोन लावला तर कळले की जिथे लस घेतलीये तिकडे जाऊनच घ्यावे लागेल सर्टिफिकेट. ऑनलाईन सोय बंद केली आहे.

Pages