Submitted by च्रप्स on 19 March, 2021 - 22:23
मित्रांनो, तुम्ही कोविड लस घेतली का?
आमची पुढच्या आठवड्यात अपॉइंटमेंट आहे, moderna मिळेल आम्हाला.
तुमचे अनुभव कसे आहेत, साईड इफेक्ट्स जाणवतायत का काही?
इथे चर्चा करूया का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@मानव मामा cowin साईट ला हा
@मानव मामा cowin साईट ला हा प्रोब्लेम कायम येतोय.
इथे नाव-गाव लपवतात ते ठीक आहे
इथे नाव-गाव लपवतात ते ठीक आहे पण वय लपवण्यासारखे काय आहे ? कोणत्या आयडीचे वय किती असा काहीतरी धागाबी होता इथे. वय जाणून घ्यायचे किंवा लपवायचे ऑब्सेशन आहे का इथे आधीपासून ?
पाफा ओके. गेले चार दिवस
पाफा ओके. गेले चार दिवस आधीच्या तारखेचे लसीकरण रद्द झाल्याने मी रोज लॉग इन करून पहातोय कुठे लस उपलब्ध आहे का ते. गेले चार दिवस ही समस्या आली नाही.
आज शेवटी झाले लॉगिन आणि आईबाबांसाठी परत उद्याची स्लॉट मिळाली आहे. आता बघावे मिळते लस की रद्द होते परत.
इतके दिवस लस आपल्यासाठी नाही
इतके दिवस लस आपल्यासाठी नाही म्हणून काही वाटत नव्हते. आता घ्यावी की न घ्यावी असा प्रश्न पडलाय. आईला खूप त्रास झाला होता.
लस घ्यायला हवीच. लहानपणी
लस घ्यायला हवीच. लहानपणी देवीच्या लस घेतल्यावर, डीटीपी घेतल्यावर ताप यायचा तसे,
जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्यावर व्हायरस ची शक्ती कमी होणे अवलंबून असेल.
आदु, सेम प्रॉब्लेम माझ्या
आदु, सेम प्रॉब्लेम माझ्या मम्मी पप्पांचा झालाय. पहिल्या डोस वेळी एक लिंक आली होती यावेळी तसे नाही झाले
जनरल अनुभव, कोव्हॅक्सीन ची
जनरल अनुभव, कोव्हॅक्सीन ची तापाची आणि तत्पश्र्चात अशक्तपणाची तिव्रता कमी आहे. कोवीशील्ड ने सणकून (योकूच्या कढई सारखा
) ताप आणि अशक्तपणा येतो. १.५ दिवस अंथरूण पक्के.
पाफा मला अजिबात त्रास नाही
पाफा मला अजिबात त्रास नाही झाला कोविशिल्डचा
सेम विथ माझ्या बहिणी मेहुणे
रानभुली जरूर घ्या लस। काही त्रास होणार नाही। शिवाय हे गरजेचे कर्तव्य आहे
कोव्हीशिल्ड ने सर्वाना येतोच
कोव्हीशिल्ड ने सर्वाना येतोच का? (म्हणजे तितक्याच तीव्रतेने येतो का?)
माझा आणि अवल चा प्रतिसाद एकाच वेळी आला. मी नंतर पाहिला.
@अनु, प्रतिकारशक्ती वर
@अनु, प्रतिकारशक्ती वर अवलंबून आहे
कोव्हीशिल्ड ने मम्मी ला
कोव्हीशिल्ड ने मम्मी ला गेल्या वेळी ताप आला होता, आता नाही आला.
आम्ही दोघांनी मागच्या
आम्ही दोघांनी मागच्या शनिवारी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. किंचीत ताप आला. थोडा अशक्तपणा जाणवला. फार काही त्रास झाला नाही.
पाथ फाइंडर >>कोवीशील्ड ने
पाथ फाइंडर >>कोवीशील्ड ने सणकून (योकूच्या कढई सारखा Wink ) ताप आणि अशक्तपणा येतो. १.५ दिवस अंथरूण पक्के.>>>
माझ्या बाबतीत दोन्ही वेळा काहीही म्हणजे काही ही झाले नाही....
का माहित नाही
बायकोलाही काहीही त्रास झाला नाही
माझ्या नवऱ्याने १५
माझ्या नवऱ्याने १५ दिवसांपूर्वी covishild घेतली..काही म्हणजे काही त्रास झाला नाही अगदी हात सुद्धा दुखला ,सुजला नाही...लस टोचली का पाणी कुणास ठाऊक..हा हा:)
केया
केया
पाणी टोचलं असतं तर प्रचंड दुखलं असतं
मला वाटतं की लसीबद्दल असे जोक्स होऊ नयेत __/\__
बरं..जशी तुमची इच्छा
बरं..जशी तुमची इच्छा
पाथफाईंडर, माझ्या बाबांना
पाथफाईंडर, माझ्या बाबांना कोव्हिशील्डनंतर काहीही त्रास झाला नाही. मलाही कोव्हिशील्ड मिळाली. मी वर लिहिलंय. मला काल त्रास झाला, पण अंथरुण धरण्याइतका नाही. आज दंड मध्येमध्ये दुखण्यापलीकडे काही नाही.
मला स्वतःला अनुभव नाही.
मला स्वतःला अनुभव नाही.
वाट पहातो महाराष्ट्रदिनाची. नंतर मी लिहीन.
1 May चे registration अजून
1 May चे registration अजून ओपन झालं नाहीये..
आईचे २ डोस को व्हॅक्सीन चे
आईचे २ डोस को व्हॅक्सीन चे झाले. तिला अजिबात दुखले नाही.
भावाचा पहिला कोव्हिशिल्ड झाला, त्याला हात दुखला.
एका नातेवाईकांचा कोव्हिशिल्ड चा झाला, त्यांना १.५ दिवस हात बराच दुखून ताप आला. विश्रांती नंतर ठीक झाले.
१ मे नंतर कळेलच. त्रास ऑर नो त्रास, घेणार तर आहेच.
कोव्हिशील्डच्या पहिल्या
कोव्हिशील्डच्या पहिल्या शॉटनंतर काहीही त्रास न झाल्याने, मी संध्याकाळी वॉकला गेले. ४५ मिनिटे फिरले,ते कदाचित भारी पडले असावे.रात्री १५ मिनिटासाठी ताप आला.दुसर्या दिवशी कानापासून खांद्यापर्यंत नसा घट्ट झालेल्या.आईला मात्र काहीही त्रास झाला नाही हे सुदैव!
दुसर्या शॉट्सनंतर, मला आणि आईला काहीही त्रास झाला नाही किंवा तापही आला नाही.यावेळी फिरणे जाणीवपूर्वक टाळले.
मी आईला घेऊन आज सकाळी पावणे
मी आईला घेऊन आज सकाळी पावणे दहाला जवळच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये गेले कारण लस फक्त तिथेच उपलब्ध होती. २८६ नंबर मिळाला. सत्तरावा चालू होता. रांगेत बसलेली बाई म्हणाली की एका तासात साठ होतात. दोन अडीच तास लागतील असे वाटले आणि मी घरी आले. आईचा नंबर दुपारी साडे चारला लागला आणि साडे पाचला ती घरी आली. लस देणारा एकच होता, मध्ये सगळे जेवायला गेले, टाईमपास करत काम चालू होते, लस घायला आलेले बहुतेक सगळे ज्येना होते जे इतका वेळ बसून वैतागले. बरेच लोक नंबर घेऊन घरी गेले होते. आईने मध्ये फोन केला तेव्हा मी सांगितले घरी निघून ये आपण परत जाऊ उद्या पण ती नाही आली. बातम्या बघून ती घाबरली आहे आणि एकदाची घेऊन टाकू असे तिला वाटले. पाण्याची बाटली आणि बिस्कीट पुडा तिने विकत घेतला. लस कदाचित खूप दिवसांनी आली असेल पण ज्येनाचे ईतके हाल बघून वाईट वाटले.
कुठले केंद्र?
कुठले केंद्र?
मुंबई भाभा हॉस्पिटल.
मुंबई भाभा हॉस्पिटल.
काही म्हणजे काही त्रास झाला
काही म्हणजे काही त्रास झाला नाही अगदी हात सुद्धा दुखला ,सुजला नाही...
>> लस टोंचणाऱ्या च्या स्किल वर असते असे मला वाटते...
कालच आजची अपॉइंटमेंट मिळाली
कालच आजची अपॉइंटमेंट मिळाली आणि ती रद्दही झाली नाही म्हणुन आज सकाळीच आई बाबांना घेऊन गेलो.
तर केंद्राची दारे बंद त्यावर "लस उपलब्ध नाहीत" आणि खाली आजची तारीख अशी सूचना चिटकवलेली आणि दोन पहारेकरी लोकांना "नाहीये लस्, कधी येईल माहीत नाही, सोमवारी येऊन बघा" असे सांगून सांगून जेरीस येत होते.
मग आता आलोच आहे बाहेर तर इतर काही केंद्रातही डोकावून आलो, तीच परिस्थिती होती.
एकंदर सॉफ्टवेअर आणि प्रत्यक्ष
एकंदर सॉफ्टवेअर आणि प्रत्यक्ष ठिकाणची परिस्थिती यात नीट सिंक नाही.
लस टोंचणाऱ्या च्या स्किल वर
लस टोंचणाऱ्या च्या स्किल वर असते असे मला वाटते... >> लस टोचणाऱ्या/रीला स्किल नाही म्हणुन ताप येईल, दोन दिवस पूर्ण अंग दुखेल, पूर्ण हात दुखेल? एरव्ही कुठल्याही iM इंजेक्शनने होते का असे कधी? फार तर घेताना जास्त दुखेल आणि तास दोन तास जरा दुखेल तिथे नीट न दिल्यास.
ही लसीची रिऍक्शन आहे प्रत्येकाची वेगवेगळी.
मला फायजर ची मिळाली. पहिल्या
मला फायजर ची मिळाली. पहिल्या डोस नंतर गपचूप घरी येऊन डोलो आणि पेन किलर घेतली आणि गुडूप झोपले. 3 द8वास भयंकर हात दुखला
पहिल्या डोस नंतर बऱ्याच लोकांना अजिबात त्रास झाला नव्हता पण दुसऱ्या डोस नंतर सगळयांनाच त्रास झाला.
मी पहिल्या डोस नंतर 3 दिवस हात धरून बसलेले , दुसऱ्या नंतर 6 दिवस बसेन बहुदा.
पण लस घेणारच. घ्यायलाच हवी.
लसीचे साईडइफेकट्स कोरोनाच्या त्रासा पेक्षा 1000% कमी असणार.
पेन किलर घेतली आणि गुडूप
पेन किलर घेतली आणि गुडूप झोपले. 3 द8वास भयंकर हात दुखला>> शक्यतो लस घेतल्यावर डॉक्टरला विचारल्याशिवाय पेन किलर घेऊ नये.
दुसर्या डोस नंतर विचारा आधीच.
Pages