कोविड लसीचा अनुभव

Submitted by च्रप्स on 19 March, 2021 - 22:23

मित्रांनो, तुम्ही कोविड लस घेतली का?
आमची पुढच्या आठवड्यात अपॉइंटमेंट आहे, moderna मिळेल आम्हाला.
तुमचे अनुभव कसे आहेत, साईड इफेक्ट्स जाणवतायत का काही?
इथे चर्चा करूया का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी घेतली आहे ,फायजरची ... पहिली... काहीही त्रास झाला नाही. दुसऱ्या वेळेस होईल/न होईल , त्याची काही काळजी वाटत नाही. कोरोनापेक्षा लसीचे दुष्परिणाम झालेले चालतील. ही लस शोधणाऱ्या व माझ्यापर्यंत पोचवणाऱ्या सगळ्या व्यक्तींची मी ऋणी आहे.

काही दिवसांपूर्वी कोव्हिड सद्यपरिस्थिती आणि लसीकरण यावरील एक वेबिनार अटेंड केला. छान माहितीपूर्ण होता.
त्यात शेवटी आभारप्रदर्शन व्यक्ती शेवटी म्हणाली "and thanks to COVID virus without which we wouldn't have been here."

आई, बाबा, बहीण, मी, माझी पत्नी यांनी कोव्हीशील्ड लस घेतली.
मला लस घेतलेल्या दिवसभर काहीही झाले नाही. पण मध्यरात्रीनंतर हुडहुडीभरून ताप आला. ताप १०० च्या वर गेला नाही. पण दिवसातुन तीन वेळा पॅरासिटामॉल घेऊनही कमीही झाला नाही. अंगदुखी बऱ्यापैकी होती. त्यानंतरच्या रात्री झोपलो आणि सकाळी उठलो तेव्हा ताप, अंगदुखीचा मागमूसही नव्हता.

मी वगळता इतर कुणालाही कसलाही त्रास झाला नाही.

तीन दिवसांपूर्वी नवऱ्याला कोव्हॅक्सिन मिळाली। रात्री किंचित ताप आला। पण बाकी ओके आहे। त्याची ॲंजिओप्लास्टी झाली आहे ५ वर्षांपूर्वी। ६० पूर्ण म्हणून लस मिळाली।
-पुणे

मी ही घेतली दहा दिवसांपूर्वी कोविशिल्ड (सिरम ची )लस. मी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये घेतली. उत्तम व्यवस्था होती. लगेच on line certificate ही मिळालं.

मला विशेष त्रास झाला नाही. त्या दिवशी संध्याकाळपासून ताप आल्यासारख आतून वाटत होतं पण ताप नव्हता. दुसऱ्या दिवशी विकनेस वाटत होता ,पाय दुखत होते वैगेरे.पण रोजच काम करू शकले. मग दुपारी जेवल्यावर त्यांनी दिलेली गोळी घेतली आणि दोन तीन तासात खूप बरं वाटलं.

5 मार्चला मम्मी पप्पांनी लस घेतली तेव्हा त्यांना कोव्हीशिल्ड ची लस मिळाली, पप्पांना काही त्रास झाला नाही पण मम्माला मध्यरात्रीननंतर थंडीताप आला होता अंगदुखी पण होती, दुसऱ्या दिवशी संध्याकाळ नंतर ठीक वाटले, काही त्रास झाला नाही

9 मार्च ला साबांं ना सिरम इन्स्टिट्यूट च्या लशीचा पहिला डोस मिळाला
घराजवळच लसीकरण केंद्र आहे तिथे walk in पद्धतीने दुपारनंतर च्या टप्प्यात रोज 100 डोस देतात
गर्दी बरीच होती त्या मुळे टोकन पद्धतीने तासभर बसून मग नंबर लागला,अर्थात प्रत्यक्ष वेळ 1 min पण लागत नाही
नंतर ही 15-20 min बसून रहायला सांगितले
तापासाठी 2 गोळ्या फ्री दिल्या, ताप आला तरच घ्या असे सांगितले
28 दिवसांनी ह्याच केंद्रावर दुसरा डोस घ्यायला बोलावले आहे
मी सोबत गेले होते ,पण एकेकटे लोकं ही भरपूर होती. आधार कार्ड आणि त्याला जोडलेला ph नंबर इतकंच लागतं
बैठक व्यवस्था, फॅन,स्वच्छता वगैरे चांगली सोय होती.
त्यांना अगदी थोडी अंगदुखी दुसऱ्या दिवशी जाणवली बाकी कोणताही त्रास झाला नाही

आता सगळीकडे कोवॅक्सिनची देत आहेत अन कोव्हीशिल्ड चा साठा ज्यांना पहिला डोस कोव्हीशिल्ड चा दिलाय त्यांच्या दुसऱ्या डोस साठी शिल्लक ठेवलाय असे इकडच्या एक सरकारी डॉक्टरांनी सांगितले.

सध्या कोव्हीशिल्ड च्या तुटवड्याच्या बातम्या येत आहेत म्हणून ज्यांनी त्याचा पहिला डोस घेतलाय अश्या बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता की जर साठा संपला तर दुसऱ्या डोस चे काय? मी तसे दुसऱ्या लसीकरणाच्या धाग्यावर विचारले पण होते पण उत्तर मिळाले नाही म्हणून हे इकडे लिहतेय

लाॅकडाऊन १.० पासून नाशिक जिल्ह्याच्या एका आदिवासीबहुल तालुक्यातील खेड्यात स्थलांतरित आहे. १० मार्चला ३ कि.मी. अंतरावरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जाऊन लस घेतली. पूर्वनोंदणी न करता जाणार असल्याने जाताना आधार व पॅन कार्डांचे फोटो मोबाईलमध्ये घेऊन गेलो होतो. PHC ला साजेशी अवस्धा इमारतीची होती. पाणी, पंखे, खुर्च्या यांची कमतरता असूनही कर्मचारी मन लावून काम करत होते. 3-4 रजिस्टर्समध्ये आधार पॅन ची नोंदणी, रक्तदाब, शरीर तापमान, आॅक्सीपल्स रीडिंगची नोंद वगैरे सर्व कामे हाती केली जात होती. लस देऊन झालेल्या जनतेला तासभर थांबवून पुन्हा एकदा सर्व रीडिंग घेत होते व क्रोसीनच्या चार गोळ्यांची पट्टी प्रत्येकाच्या हातात देऊन "दुसरा डोस घ्यायला विसरू नका, लस हे औषध नाही तेव्हा मास्क, सॅनिटायझर, साबण यांचा वापर करतच राहा, गर्दी टाळा" हे आवर्जून सांगत होते. काही उत्साही लोक्स लाॅबीमध्ये ठेवलेल्या एका सुशोभित चौकटीमागे ( जिच्यावर ठळक अक्षरात "मी लस घेतली आहे. लस पूर्णपणे सुरक्षितआहे" रंगविलेले होते) जाऊन जितं मया अविर्भावात फोटो काढून घेत होते.

PHC ला पोचल्यापासून २ तासात लसवंत होऊन निघालो. दुतर्फा मिर्ची व सूर्यफुलांची शेते असलेल्या पायवाटेने परतत असतानाच पुढील sms आला:

प्रिय xxxxxxxxxx,
अभिनंदन!
आपल्याला कोव्हीड-19 लसीचा 1st डोस PHC xxxxxx येथे XX-03-2021 रोजी XXX PM वाजता व्हॅक्सीनेटर xxxxx (मोबा.क्र. xxxxxx) द्वारे यशस्वीरीत्या देण्यात आलेला आहे. आपण आपले प्रोव्हीजनल प्रमाणपत्र https://xxxx येथून डाऊनलोड करू शकता. लसीकरणापश्चात काही चौकशी असल्यास, आमच्या हेल्प लाईनशी 1075 वर संपर्क साधा - CoWIN.

मला कोणताही लक्षणीय त्रास झाला नाही. आता १८ दिवसांनी रिचार्जसाठी जायचंय

मी आणि आईने ८ मार्चला लस (कोव्हीशिल्ड) घेतली. संध्याकाळी ४५ मिनिटे फिरायला गेले.बहुदा ती माझी चूक झाली.रात्री १५ मिनिटे ताप आला (९८.५ ). दुसर्‍या दिवशी एकाच बाजूने मान ते खांद्यापर्यंत दुखत होते.मला स्पाँडिलॉसिसचा त्रासही आहे.त्यामुळेही दुखत असेल कदाचित.बाकी कसलाच त्रास नाही.
आईला तर अजिबात कुठलाही त्रास झाला नाही.

माझ्या आईने(वय ७४) ८ मार्चला कोल्हापूर मध्ये लस घेतली. कुठली ते तिने विचारलं नाही. रात्री जिजाजींनी तिला कंपल्सरी क्रोसिन दिली(ते डॉ आहेत). बाकी काही त्रास नाही. दुसऱ्या दिवशी सारखी झोप येत होती.

इथे पुण्यात त्याच दिवशी साबा-साबु दोघांनी घेतली (दोघं वय ७०-७१). त्रास झाला दुसर्या दिवशी. साबांचा हात दुखला दोन दिवस, पण साबुंना अगदीच मरगळ आली. किंचित ताप, खूप थकवा आणि ओव्हरऑल अस्वस्थपणा असं झालं. मग क्रोसिन आणि अॅंटासिड दोन दिवस घेऊन बरं वाटलं.

माझे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत,कोविशील्ड चे दिले आहेत,दोन्ही वेळेस काहीही त्रास झाला नाही,
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे फोटो मात्र दोन्ही वेळेस काढले,
दुसऱ्या वेळी नाही पण पहिली लस घेतली तेव्हा लसीबद्दल बऱ्याच चुकीच्या समजुती होत्या आजूबाजूला ,म्हणून आवर्जून status पण ठेवला होता,खूप लोकांनी विचारपूस सुद्धा केली,
दुसरावेळी तितकेसे अप्रूप नव्हते म्हणून म्हणून फॉर्मलिटी म्हणून फोटो काढले Lol

मी,आई आणि माझा नवरा अशा तिघांनी 2 आठवड्यापूर्वी लस घेतली- कोव्हीशिल्ड. आई सिनियर सिटीझन, नवरा डॉक्टर आणि मी उच्च रक्तदाब पेशंट. झोपताना गोळी घेतली. आई आणि नवऱ्याला थोडा हात दुखणं सोडून इतर काही त्रास झाला नाही. मला कणकण, अंगदुखीमुळे रात्री जाग आली, नंतर झोप लागली नाही, त्यामुळे BP वाढलं. दुसरा दिवस खूपच झोप येत होती, तिसऱ्या दिवसानंतर त्रास कमी झाला.

VB, माझ्या वडिलांना आजच कोव्हिशील्डचा पहिला डोस दिला आहे.

आदु, दुसरा डोस २८ दिवसांनी द्यायचा आहे ना? तुमचे दोन्ही डोस कसे काय पूर्ण झाले ? पहिला डोस कधी दिला होता?

भरत>>18 Feb ला पहिला डोस घेतला होता,19मार्च ला दुसरा झाला.

माझ्या बाबांनी व साबा आणि साबुनी पण2 3 दिवसांपूर्वी च घेतला पहिला डोस,काहीच त्रास झाला नाही तिघांनाही.

ओह! तुम्ही फ्रंटलाइन वर्कर आहात का? >>आरोग्य यंत्रणे मध्ये नाही पण सरकारी नोकरीत आहे आणि फिल्ड वर्क आहे म्हणून फोन करून करून बोलावून दिले बहुतेक Lol

खरंतर पहिल्या डोस च्या वेळी मी आजिबात तयार नव्हते डोस घेण्यासाठी,म्हणून शाताब्दी मधून फोन आल्यानंतर सुद्धा 1 आठवडा घालवला बघू बघू करत,पण त्यांनी 2 3 वेळा फोन केला,आणि थोडी भीती सुद्धा कमी झाली होती म्हणून घेतली,

Happy
Screenshot_2021-03-20-19-45-30-272_com.android.chrome_0.jpg
आता लसीकरण केंद्रांवर गर्दी होईल.
आजच on the spot registration वाले भरपूर होते. मला अगदी अनपेक्षितपणे online date मिळाली. तीही आजची आजच.

नवर्‍याला शेजारच्या गावात उद्याची वेळ मिळालेय वॅक्सिनेशनसाठी. त्या सेंटरला फक्त फायझरचीच वॅक्सिन आहे असे वेळ देतानाच सांगितले. त्याच सेंटरला माझ्यासाठी गुरुवारची वेळ घेतली.

भरत, मग कदाचित आमच्या इथे जे सरकारी इस्पितळ आहे तीकडे असे करत असावेत कारण मी तिकडेच विचारपूस केली होती अन ते बोलले की नव्याने जे येतायेत त्यांना कोवाक्सिन देताहेत अन कोव्हीशिल्ड जुन्यांसाठी राखून ठेवली आहे नवीन स्टॉक येई पर्यंत

मी कोव्हीशील्ड घेतले आहे.... आणि तुटवडा आहे म्हणताहेत....... पुढील तारीख २ एप्रिल आहे....... कोव्हीशील्ड संपल्याची स्थिती चालूच राहिली तर काय करायचे?
पहिल्या शॉट नंतर काहीही त्रास झाला नाही

सायनोफार्म १ला दोस डोस २१ जानेवारी आणी २रा डोस ११ फेब ला घेतला ईथे दुबई ला- सगळं व्यवस्थित आहे.

गेल्या रविवारी नवर्‍याला फायझरची लस मिळाली. काही त्रास झाला नाही. त्यानंतर मला गुरुवारी फायझरचीच लस मिळाली. त्या दिवशी नेमके दिवसभर पाऊस, मग रात्री विंड अ‍ॅडवायझरी (ताशी ५०+ मैल) असे होवून झोप लागलीच नाही. शुक्रवारी सकाळी पाय थोडे वळत होते पण दुपारी बरे वाटले. ४० पाउंडवाल्या मातीच्या गोणी हलवणे वगैरे बागेची कामे करायला काही अडचण आली नाही. आता दुसरा डोस एप्रिलमधे मिळेल.

जॉन्सन आणि जॉन्सन चा अनुभव आहे कोणाला?>>> माझ्या लेकीनं घेतली. एक दिवस थोडं गळून गेल्यासारखं वाटलं. बाकी काही त्रास नाही.

आम्हाला आजची date दिली आहे मला मुळात injection ची भीती वाटते आणि ही तर त्यातल्या त्यात covid..पण बाबा काही ऐकत नाहिये सो जाऊन घेऊन येते आता..हा धागा वाचून थोडा धीर आलाय

Pages