कोविड लसीचा अनुभव

Submitted by च्रप्स on 19 March, 2021 - 22:23

मित्रांनो, तुम्ही कोविड लस घेतली का?
आमची पुढच्या आठवड्यात अपॉइंटमेंट आहे, moderna मिळेल आम्हाला.
तुमचे अनुभव कसे आहेत, साईड इफेक्ट्स जाणवतायत का काही?
इथे चर्चा करूया का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविड-१९ चा शॉट फ्लु शॉटसारखाच आहे, साइड-इफेक्टसच्या दृष्टिकोनातुन. दरवर्षी फ्लु शॉट घेत असाल तर काहि वेगळं वाटणार नाहि. आम्हि सहकुटंब-सहपरिवार वीकेंडला घेउन आलो, अपॉइंटमेंट वगैरे सोपस्कार करुन. आता जवळच्या सिविएस मधे वॉक-इन आहे... Wink

भारतात आईने घेतली. वय ६४. प्रचंड त्रास झाला. आठ दिवस झोपून होती. अंग दुखी, ताप सगळेच होते. मग तीला खुप कोरडा खोकला पण झाला. एका आठवड्याने आता ठिक आहे. वडीलांना काहीही त्रास झाला नाही. जरासा हात दुखला आणि एकदम निवांत आहे म्हणाले.

कोविशिल्ड लस घेतली. अंगदुखी कसकस थंडी वाजून येणे असा रात्री त्रास झाला. दंडाचे मसल्स पण दुखतात

दोन दिवस दंड दुखला व त्या दिवशी ५-६ तासाने जरा थकायला झाले. मोडर्ना घेतली. एक महिन्याने दुसरी होईल.

मामाकडे सगळे पॉझिटिव्ह झाल्याने मी आरोग्य सेतू वरून आईसाठी नोंदणी केली. आजपासून ४५ + असणा-या सर्वांनाच मेडीकल सर्टिफिकेट न देताही लस मिळणार आहे. २६, २७, २८ मार्च ला लस उपलब्ध होती. त्यामुळे मी नाव नोंदवलं. मेडीकल सर्टिफिकेट घेतलं. लस घेतल्यापासून तिचं संपूर्ण अंग दुखतंय, ताप आला. ज्या दंडावर लस घेतली तो हलत नव्हता २ दिवस. असा त्रास जास्त करून महिलांमधे सर्वांनाच जाणवतोय.

पण लस घेणं गरजेचं आहे. आजीला बेड मिळत नाहीये. तिला व्हेण्टीलेटर वर ठेवावं लागणार आहे. खूप धावपळ केली, हातापाया पडल्यावर दोन ठिकाणी बेड ची व्यवस्था झाली आहे. मामाने वेळेत लस घेतली असती तर आज ही पाळी नसती आली.

कोव्हिशिल्ड बद्दल पदकी सरांनी दिलेला हा पेपर
https://khub.net/documents/135939561/430986542/Early+effectiveness+of+CO...

आता मेसेजेस बघितले. खूप जणांनी आजीसाठी उपयोगी माहिती पाठवली आहे. ही कदाचित गरजवंतांना उपयोगी पडेल म्हणून इथे देतेय.

जर कोणाला कोरोना वर उपचारासाठी बेड मिळत नसेल तर हिंजवडी फेज -१ येथे विप्रोच्या कॅम्पस मध्ये ४५० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल सेंटर उभारले आहे आणि तेही पूर्णपणे मोफत आहे. तिथे ऑक्सिजन ची सोय आहे.आणि सर्व प्रकारची अत्यावश्यक औषधे मोफत आहेत.
तेथे डॉ. राजेंद्र मोहिते हे कर्तव्यावर आहेत. कोणाला आवश्यकता असेल तर डॉ. राजेंद्र मोहिते यांचेशी सम्पर्क करून अधिक माहिती घेणे .
95185 93779
90110 87560

राणभुली ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली आहे ?
माझे आई, बाबा, बहीण तिघेही तिथे ऍडमिट होते. तिघेही 3 दिवसांच्या अंतराने पोजिटीव्ह आले. बहिणीसाठी बेड नव्हता उपलब्ध होत म्हणून बाबांना डिस्चार्ज घ्यावा लागला. सोमवारी त्यांनी 15 जणांना एकदम डिस्चार्ज दिला याच कारणाने.

तिकडे सगळ्या सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत आणि एकंदर सर्व्हिस चांगली मिळतेय पण तिथे मॅन पॉवर कमी असल्याने बेड उपलब्ध असले तरी नवीन ऍडमिशन घेत नाहीयेत.

आमचा अनुभव अगदी कालचा आहे, आज काही बदललं असलं तर माहीत नाही.

रीया
माझा माहिती देण्याचा उद्देश वर लिहीलेला आहे. मी तिथे जाउन आलेले नाही. तसे काही म्हटलेले नाही. माझ्या आजीची व्यवस्था अन्य ठिकाणी झाली आहे. माहिती कुठून मिळाली हे ही दिलेले आहे. त्याच वेळी या सेंटरबद्दल समजले असते तर तिथे प्रयत्न केले असते. तुमच्या घरातल्या सर्वांना प्रवेश मिळाला तसा कदाचित मिळाला असता. कदाचित नसता मिळाला. आता जे रूग्ण आहेत त्यांना कधी तरी डिस्चार्ज मिळेलच. तयानंतर हे सेंटर चालूच राहणार असेल तर नवीन रूग्णांना त्यांच्या जागी प्रवेश देतील ना?

तरीही जर ही माहिती उद्याही उपयोगी पडणार नसेल अशी खात्री असेल तर मी काढून टाकीन. चार तासानंतर ते ही शक्य होणार नाही.

आईबाबांनी ठाण्याला कौशल्यमधे कोवॅक्सिन लस घेतली. व्यवस्था उत्तम होती आणि काही त्रास झाला नाही असे आई म्हणाली. माझे बाबा लस घ्यायला तयारच नव्हते. त्यांच्या सोसायटीत वॅक्सिनबद्दल एकंदरीतच उदासिनता आहे. बाबांची समजूत घालण्यात आठवडा गेला. आता त्यांच्या अनुभवावरुन सोसायटीतले इतर जेना वॅक्सिन घेतील अशी आशा आहे. मायबोलीकर झेलम, मंजूडी, अवल, एव्ही यांनी योग्य माहिती देवून माझे काम खूप सोपे केले त्याबद्दल खूप आभार.

मुलगा टेक्निकली मॅन्युफॅक्चरिंग प्रकारात असल्याने अटींत बसत होता मात्र त्याच्या राज्यात तारखा उपलब्ध नव्हत्या. विंटर संपल्याने रेसट्रॅकवर जाणे भाग आहे म्शेवटीकामावरच्या मित्रांच्या सल्ल्याने सव्वातासावर शेजारच्या राज्यातल्या फार्मसीत जावून लस घेतली. फार्मसीत आधी फोन करुन रेसिडेन्सी शेजारच्या राज्यातली आहे याची कल्पना दिली होती. तिथे फक्त फायझरच होती. काही त्रास नाही.

जवळचे लसीकरण केंद्र कोणते आहे ते कसे समजेल. लस घेण्यासाठी किती फी आहे आणि ती तिथेच द्यावी लागते का की ऑनलाईन भरून जाऊ शकतो. आरोग्य सेतूवर पहिले माहिती भरावी लागेल का.

चंपा,
सनव यांनी माझ्या विपूत दिलेली माहिती इथे पोस्ट करत आहे. माझ्या आईबाबांना ते सेलफोनवर ओटिपी वगैरे जमणार नव्हते. पण इतरांना ही सविस्तर माहिती उपयोगी पडेल. धन्यवाद सनव.

>>नमस्कार, तुम्ही कोविद लसीकरणाची माहिती विचारली होती. गुगल प्लेस्टोअरमध्ये आरोग्यसेतू app आहे त्यातून रजिस्टर करता येतं. तुम्हाला अमेरिकेतही हे करता येईल. त्यासाठी आईबाबा दोघांपैकी एकाचा मोबाईल नंबर लागेल ज्यावर ओटीपी येईल. (One needs to enter that OTP in the app.)पॅन कार्ड/आधार कार्ड/वोटर कार्ड असं कोणतंही एक आयडी लागेल. शक्यतो आधारकार्ड देणं चांगलं पडेल. त्याचा नंबर input करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियातील उपलब्ध फ्री आणि पेड हॉस्पिटल्सची यादी दिसेल आणि calendar मध्ये बघून ऑनलाइन स्लॉट सिलेक्ट करता येईल.>>

चंपा, लस सरकारी मोफत आहे तर खाजगी हॉस्पिटलमध्ये २५० रुपये घेतात. खाजगी वाले काही अतिरिक्त पैसे घेत असतील तर माहीत नाही.

माझ्या मम्मी पप्पाना जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सकाळी बोलवले होते , तिथे त्यांना टोकन दिले, काहीतरी खाऊन यायला सांगितले अन त्यानंतर लगेच अर्ध्या तासात लस दिली होती. लस दिल्यावर त्यांना अर्धा तास बसवून घेऊनकाही त्रास होत नाहीये याची खात्री करून घरी जाऊ देतात.

त्यांनी कुठेही ऑनलाईन नोंदणी वगैरे प्रयत्न पण केला नाही, फक्त त्या हॉस्पिटलमध्ये फोन केला तर त्यांनी सकाळी या नोंदणी ची गरज नाही सांगितले होते. इकडे यासाठी वेगळा सेक्शन बनवलाय, स्वच्छता अन इतर सोयी चांगल्या आहेत शिवाय ज्ये ना ची विशेष काळजी घेत आहेत.

काल आईला कोव्हीशिल्ड लस दिली.
त्यासंदर्भात आंतरजालावर वाचन करताना मिळालेली माहिती..
अगदीच गरज असल्याशिवाय पेनकिलर्स घेऊ नका.
त्यामुळे अँटीबाॅडीज त्यांच्या पूर्ण क्षमतेने तयार होण्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातलंच एक वाक्य... :
However if you decide to cope with post-vaccine soreness, congratulate yourself — a bit of arm pain now translates into a lot of immunity later.

अर्थात ही आंतरजालावरील वाचीव माहिती असल्याने तज्ञांकडून पडताळून घ्यावी..

काही माहितीपूर्ण लिंक्स...
https://apnews.com/article/can-i-take-painkillers-before-after-covid-19-...

https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/vaccines/expect/after.html

https://www.bustle.com/wellness/how-to-treat-fatigue-covid-vaccine-side-...

निरुदा, मी आईला लस घेतल्यानंतर होणारा त्रास न पाहवल्याने क्रोसिन दिली होती.

बाबा लस घेऊन आले त्यांना खूप ताप आला आणि weakness आहे, वय ५५वर्षे
ताप दीड दिवसात उतरला पण weakness मुळे रया गेली
. त्यांच्यासोबत शेजारचे काका सुद्धा लस घेऊन आले त्यांना काहीही त्रास झाला नाही

सरकारी कोव्हिड जंबो सेंटर चालवणार्‍या अधिकार्‍याने दिलेली माहिती . २५% जागा स्पॉट रजिस्ट्रेशन म्हणजे ऑनला इन रजि स्ट्रेशन न करता सरळ लसीकरण केंद्रात येणार्‍या लोकांसाठी राखीव आहेत.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू न शकणार्‍यांसाठी एका खासगी इस्पितळाने टोकन सिस्टम ठेवली आहे. एक दिवस टोकन घ्यायचं. दुसर्‍या दिवशी लस. टोकन घ्यायला ज्ये ना स्वतः जाण्याची गरज नाही. सोबत आधार कार्ड पुरेसे आहे.

@ रानभुली, त्रास होत असेल तर जरुर उपाययोजना करावी.
पण ज्यांना किरकोळ त्रास होत असेल आणि ते पेनकिलर्स टाळू शकले तर लस जास्त परिणामकारक ठरेल असं तज्ञ म्हणतायत.

धन्यवाद स्वाती२, VB, भरत.
लस घेतल्यानंतर जेवढा जास्त त्रास तेव्हडी प्रतिकारशक्ती जास्त वाढणार हे खोटे आहे हे मी कालच कुठेतरी वाचले. बहुतेक फेसबुकवर.

काल लस, पहिला डोस (कोविशिल्ड) मिळाली। दंड थोडा दु़खणे वगळता काही त्रास झाला नाही।
लेकालाही अमेरिकेत लस, पहिला डोस (फायझर) मिळाली। त्यालाही दंड दुखला। बाकी ओके आहे।
दोन्हीकडे व्यवस्था एकदम छान होती। सर्टिफिकेटसही लगेच मिळाली

पेन किलर घ्यायची गरज पडलीच तर असिटोमिनोफेन (Tylenol, क्रोसिन) घ्या. आयाब्युप्रोफेन नको. हात दुखत असेल तर गार टॉवेल ने शेका (रादर शेकाच्या उलट).

मी परवा रविवारी आमच्या त्यातल्या त्यात जवळच्या जंबो सेंटरवर जाऊन लस घेतली. अधिक जवळच्या दोन्ही सेंटरवर तारखा उपलब्ध नव्हत्या. इथे मात्र भरपूर जागा होत्या. मोठ्या हॉलमध्ये टेबले टाकून व्हॅक्सिनेशन सेल्स बनवले असल्याने एका वेळी अनेकांना लस देता येत होती. कुठेही रांग लावणे, थांबावे लागणे असे झाले नाही. अर्थात रविवार दुपार असल्यानेही असेल.
सव्वा तासात मी घरी परत आलो.
लस टोचताना मला बरंच दुखलं व रक्त आलं. दुसर्‍या दिवशी सकाळपासून अंग जड वाटत होतं व कणकण होती. पण दुपारनंतर म्हणजे लस घेतल्यावर जवळपास २४ तासांनी पॅरासिटॅमॉल घेतली. त्याने संध्याकाळपर्यंत फरक पडला.
लस घेतलेला दंड मात्र अजूनही खांद्यातून हात हलवताना दुखतो आहे.

कोविन वेबसाइटही निर्दोष नाही.
बाबांच्या वेळी एक दिवस अचानक त्याच दिवशीचा स्लॉट रिकामा असल्याचे दिसले.
मी लस घेऊन पाच मिनिटे झाली असतील, तोच एसेमेस आला. पण काल केव्हातरी तुमचे नियोजित लसीकरंण रद्द झाले आहे असा एसेमेस आला.
मग केंद्रीय आरोग्य खात्याचा फीडबॅकसाठी एसेमेस आला.

कोविन वेबसाइटही निर्दोष नाही.>>>होय ,सासू सासऱ्यांचा दुसरा डोस घेऊन 6दिवस झाले तरी फायनल सर्टिफिकेट निघत नाही,अजूनही त्यांच्या पोर्टल वर 2nd डोस पेंडिंग असच दाखवत आहे Sad

आदू , इथे दुसरा डोस घेतला तिथे त्यांनी तशी एंट्रीच केली नसेल कदाचित. त्यांना एकदा विचारून पहा.

काल १८+ व्यक्तींसाठी लसीकरण जाहीर केले आणि आज cowin साईटवर लॉगइन करायलाच समस्या येत आहे. ओटीपी येत नाही. अनेक प्रयत्नानंतर मध्येच येतो पण पेज उघडतं आणि लॉग आउट होतंय.

भारतीय माबोकरांनी, १ तारखेनंतर आपले अनुभव शेअर करावेत. तोपर्यंत वयाची अट शिथील झाल्याने आपल्या वयाचा अंदाज काढता येणार नाही. Rofl

Pages