व्हिसल ब्लोअर-९

Submitted by मोहिनी१२३ on 17 March, 2021 - 10:21

https://www.maayboli.com/node/77874

अखेर तो दिवस उजाडला. नेहा घरच्यांचा आशिर्वाद, शुभेच्छा,सुचना स्वीकारून ॲाफिसमध्ये पोचली.तिने लिफ्टमधे डायरेक्ट १५ व्या मजल्याचे बटन दाबले.तिला आज डेस्कवर जाण्याची आवश्यकता नव्हती.

पल्लवीने तिचे हसून स्वागत केले आणि वेटिंग रुममध्ये बसवले. मिटींग सुरू व्हायला अजून १० मिनीटे होती. वेटिंग रूम नुकतीच रिनोव्हेट केलेली दिसत होती. आकाशी-गुलाबी रंगसंगती नेत्रसुखद वाटत होती. शांत संगीत,निशिगंधा-गुलछडीचा मंद सुवास यामुळे तिच्या मनावरचे उरलेसुरले मळभ निघून गेले व अतीव शांततेने तिचे डोळे आपसूक मिटले.

तेवढ्यात तिला आल्याच्या वाफळत्या चहाचा आणि फ्रेश कुकीजचा वास आला. पल्लवी तिच्यासाठी नाजूक क्रोकरीमध्ये हे घेऊन आली होती. नेहाला हे सर्व आवडलेचं पण आपण लवकरच बळी जाणारा बकरा नाही ना असाही विचार मनात चमकून गेला.

पाच मिनिटातच तिला शिशिरने केबिनमध्ये बोलावले. शिशिर आज थोडा नर्व्हस वाटत होता.त्याने नेहाला खुणेने बसायला सांगितले आणि प्रोजेक्टर चालू केला.

पुढची १५ मि. फक्त प्रोजेक्टरचा आवाज येत होता. दोघेही बाहेरून शांत दिसत असले तरी दोघांच्याही मनात प्रचंड खळबळ माजली होती.
शिशिरकडे नेहा, अमोल आणि अजून १-२ पुरूष कर्मचार्यांच्या तक्रारी आल्या होत्या.

कल्पना ही त्या शाखेतील पहिली स्त्री कर्मचारी.स्वत:च्या कार्यक्षमतेच्या बळावर तिने स्वत:ची आणि कंपनीची खूप प्रगती करून दिली होती.अनेक पेटंटस्,ॲवॅार्डस् तिच्या नावावर होती.तिचे त्या अमेरिकन कंपनीच्या मूळ शाखेत पण बरेच नाव होते. दर महिला दिनाला तिचे कुठे ना कुठे भाषण असायचे;सत्कार व्हायचा..

नेहाला ही महिती नवीनच होती. ह्यातील बरीचशी महिती कंपनी वेबसाईटवर होती. पण आपण नवीन कंपनीत जाताना हल्ली पुरेसा होमवर्क करत नाही म्हणून तिने स्वत:ला मनातल्या मनात एक टपली मारली.

१५ मिनीटांनी प्रेझेंटेशन संपले आणि एक अस्वस्थ शांतता तिथे पसरली.
ती शांतता दोघांनाही सहन होईना आणि शिशिर एकदम म्हणाला “आता लक्षात आली का आमची गोची?” आणि त्याने जीभ चावली.
“गोची” शब्द ऐकताच नेहा पटकन् हसली.
तिने स्वत:ला सावरलं आणि तिने एक प्रश्न विचारला.
“या जागी इतकाच यशस्वी एखादा पुरूष कर्मचारी असता , नव्हे सीईओ असता आणि त्याने असं काही केलं असतं तर?”

“असं केलं असतं म्हणजे? कंपनी पॅालिसी प्रमाणे पहिल्या प्रसंगानंतर समज,दुसर्या प्रसंगानंतर पगार कपात आणि तिसर्या प्रसंगानंतर निलंबनाची कारवाई केली असती.”

“का?”

“का म्हणजे? स्त्री कर्मचार्यांना सन्मानाने, सुरक्षित वातावरणात आंनदाने काम करता यावे अशी कंपनीची पॅालिसी आहे.”

“मग पुरूष कर्मचार्यांनी काय घोडं मारलयं ?” नेहा तीक्ष्ण स्वरात उद्गारली.

“अग पण...कंपनीच्या प्रतिष्ठेचे काय?”

“जर उच्च पदावरच्या पुरूषाला अशा कारणासाठी बडतर्फ केल्याने जर कंपनीची प्रतिष्ठा कमी होत नाही ,तर कल्पनावर पॅालिसीप्रमाणे कारवाई सुरू केली तर काय अडचण आहे?.
आणि तसंही ,जर या प्रकरणात योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर मी अर्थात राजीनामा देणार आहे आणि राजीनामा देण्याचे खरे कारण ॲाफिशियल रेकॅार्डसवर आणणार आहे”

नेहा धमकीवजा स्वरात म्हणाली.
हे ऐकुन शिशिर चमकला .त्याला नेहाचे म्हणणे १०० टक्के पटत होते. एकीकडे त्याला तिचे कौतुक वाटत होते. दुसरीकडे त्याला ही कोंडी कशी फोडावी कळत नव्हतं.

शेवटी तो म्हणाला

“आज आपण इथेच थांबू. तू सध्द्याची पॅालिसी वाच .त्यात तुला काही बदल सुचवावेसे वाटले तर सांग. आपण कल्पनावर कशा प्रकारे कारवाई करू शकतो, त्या मुलांसाठी काय करू शकतो ह्याचाही विचार करून ठेव. उद्या मी या विषयातील तज्ञांनाही बोलावणार आहे. उद्या आपण सविस्तर चर्चा करू.”

असं म्हणून शिशिरने नेहाचा निरोप घेतला.

https://www.maayboli.com/node/78425

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मोहिनी१२३

माफ करा तसे लिहील्याबद्दल. गोष्ट आवडली असल्याने पुढची उत्सुकता ताणली जात आहे. त्यामुळेच असे लिहीले. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

धन्यवाद अंकु
योगी९००-माफीची काही आवश्यकता नाही हो. मला ही त्याप्रमाणे सुधारणा करता येतात.धन्यवाद.

ओके तर हा आत्तापर्यंत च्या सीरीज मधला शेवटचा भाग आहे तर...

१) तुम्ही प्रत्येक भाग संपला की त्याची लिंक आधीच्या भागाच्या शेवटी कॉमेंट्स मध्ये टाकता यासाठी तोंड भरून कौतुक Happy
२) MNC मधील कॉर्पोरेट सीरीज असल्याने अधूनमधून थोडे थोडे इंग्रजी संवाद सुद्धा असावेत असे राहून राहून वाटते आहे.

तुम्ही तुमच्या Daily Working Shift मधून VeL काढून लिहिताय याबद्दल खूप खूप धन्यवाद!

(त.टी. :- उशिरा भाग टाकले / उशिरा आले, थोडेसेच आहेत मोठे मोठे घ्या असे माझे काहीही म्हणणे नाही! तुमच्या सवाडीने लिहिताय तुमच्याच सवडीने टाकत रहा... FormaT कसाही असला तरी डेटा महत्वाचा नै का Proud आणि हो ज्या अर्थी व्हिसल ब्लोवर्स शिर्षक आहे त्या अर्थी मला वाटले Database चोरी वगैरे चे प्रकरण असेल काय Wink "पण हे ही नसे थोडके" -> इति ग्रेस

शेवटचा कुठेय , क्रमशः आहे .
बऱ्याच दिवसांनी भाग आला त्यामुळं मागचे 2,3 परत वाचले . छान आहे. पु भा प्र.

धन्यवाद प्रगल्भ, वर्णिता,@गौरी.
प्रतिसादांमुळे मला पुढच्या भागाला दिशा मिळते.
त्यामुळे सर्वांना खूप खूप धन्यवाद.