१४ फेब्रुवारी...(कोवीड अनुभव)

Submitted by 'सिद्धि' on 14 March, 2021 - 03:14

१४ फेब्रुवारी...
Valentine च यंदाच गीफ्ट, ते म्हणजे माझा कोरोना टेस्टचा आलेला रिपोर्ट.
detected म्हणजेच Positive ! Sad Sad Sad

बघता क्षणी मला घाम फुटला होता. एवढी काळजी घेतली तरीही?  कसं काय?  का?  काही समजेना. काय करावे सुचेना.नवरा सुदधा कोवीड positive.  एवढं कमी काय तर एक-एक करत घरातील इतर संगळ्यांचा रिपोर्ट positive आला.  सासू-सासरे, नवरा सगळे admit झाले. माझ्यासाठी तो पर्याय राहिला नाही. पाच महिन्यांच माझं छोटंसं पिल्लू... ते पण फक्त दुधावर अवलंबून, त्याला कुठेही ठेवता येत नव्हते. माझ्याशिवाय कुणाकडे ही जास्त वेळ राहत नाही. फॅमिली डॉक्टरांना विचारुन पाहिले. 'लहान मुलांची प्रतिकार शक्ती मोठयांपेक्षा चांगली असते, त्यामूळे तुम्ही बाळाला तुमच्या जवळ ठेवू शकता.  फक्त योग्य ती काळजी घ्या. मास्क लावा, समोर खोकू नका, sanitizer वापरा, वारंवार हात धुत जा...कोरोनाचा काही त्रास होणार नाही.' असा सल्ला मिळाला आणि त्यामुळे जीवात-जीव आला.

बाळाला घेऊन होम क्वारंटाइन राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. रिपोर्ट पाहिला तेव्हा एका क्षणी डोळ्यासमोर अंधारी आली होती. पण हार पत्करली नाही. आधी नेटवरती घरगुती उपचार शोधले. एक लिस्ट तयार केली. विज्ञान तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार कितीही पुढे गेले, तरीही आपल्या आयुर्वेदाला कशाचीही तोड नाही. आयुर्वेदिक काढा, लिंबू-तुलसी रस, आद्रक, गवती चाहा, ओली हळद हे सारे सारे उपाय सापडले. बिग बास्केट ने घरी सुद्धा पोहोचविले. कोरोना म्हटलं की शेजारी-पाजारी, नातेवाईक सगळेच सोयीस्कररीत्या पण अप्रत्यक्षपणे वाळित टाकतात. दाखवायला वरवरची आपुलकी बाकी वेळेला कोणी नाही. यामुळे सगळं काही स्वतःच ऑनलाइन मागवलं होत आणि सुरुवात केली.
रुग्णालयात घरचे सगळे ट्रिटमेंट घेत होतेच आणि मी घरुन. माझ्या छोट्याशा पिल्लूला फक्त दुधा पुरतेच जवळ घ्यायचे. नाहीतर ते आपलं टुकू टुकू वाट बघून रडून एकटंच झोपायच. त्याला रडताना बघून आपल्या आणि इतरांच्या निष्काळजीपणाची सारखी आठवण व्हायची. दारातूनच नुसती माझी झलक जरी दिसली, तरी हुंकारे देऊन हात पसरणार ते माझं पिल्लू बघून डोळे सारखे भरायचे.  ती वेळ आणि ती परिस्थिती खरंच शब्दात नाही सांगता येणार. 

एक आठवडा असाच ढकलला. मग शेवटी एकदा माझी आई आली, तिला माझी अवस्था पाहवेना. खरच एक आईच आईची अवस्था समजू शकते. तिचे उपकार मी या जन्मीच काय, सात वेळा जन्म घेतला तरीही फेडू शकत नाही. तिच्याकडे बाळाला सोपवल्यानंतर मला हायसे वाटले. मग मात्र मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले... तिथेच सार खाणं-पाणी चालू होत. इकडे मी आणि होस्पीटल मध्ये घरचे बाकीचे अशी टांगती तलवार डोक्यावर होती. त्यातून पण सगळ्यांना माझीच जरा जास्त काळजी, कारण रुग्णालयात मिळाणारी ट्रिटमेंट म्हणजे सलाईन, इंजेक्शन यातले काही मला घरी मिळत नव्हते. पण काहीही झालं तरी सगळ्यांनी यातून बरं व्हायचं आहे. बास्स! दुसरा कसलाही विचार मनात येऊ दिला नाही.

नवव्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मी जिंकले. सुदैवाने मला शुगर, ब्लड प्रेशर नाही किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याने, फक्त घरगुती उपाय केले. त्याबरोबरच'पॉझिटिव्ह एनर्जी, विल पॉवर' आणि celine 500, raricap या दोन गोळ्या याच्या जोरावर पळवल त्या कोरोनाला. जवळपास एक महिना गेला या सगळ्यामध्ये, तो जो काही काळ होता, जणू काही आमच्यासाठी काळच थांबला होता, अस सारख वाटायच. आता हळुहळू सार काही पुर्ववत होत आहे. घरचे बाकीचे सगळे ही बरे होऊन घरी आले आहेत.

थोडक्यात हेल्दी खा आणि हेल्दी रहा. आरोग्य जपा. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला खुप कणखर बनवते. मनात सतत सकारात्मक विचार करत राहिल तर पन्नास टक्के आजार तिथेच गायब होतो. सगळा रोगप्रतिकारशक्ती चा खेळ आहे बाकी काही नाही.

मी घरी करत असलेले काही साधेसोपे उपाय -
*रोज सकाळी उपाशीपोटी एक कप गरम काढा.
(लवंग ४, काळीमिरी ४, एक काडी दालचिनी, एक टिस्पून ओवा, एक टिस्पून ओली हळद, आर्दक एक इंच, तुळस पाने ८-१०, लिंबा एवढा गुळ यामध्ये चार पेले पाणी घ्यावे, ते दोन पेले होईपर्यंत आटवून तयार केलेला काढा. )

*रोज २-४ उकडलेली अंडी.

*सफरचंद, संत्री दोन्ही रोज एक-एक. उपलब्ध असल्यास किवी, ड्रॅगन फ्रुट सुद्धा खावे.

*पाणी गरम करून त्यात थोडी हळद घालून पिण्यास घ्यावे. गरम दूध मध्ये देखील हळद घालून ते पिण्यास घ्यावे.

*सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण वेळेवर आणि भरपूर करावे. शक्यतो खाण्यामध्ये जास्त अंतर ठेवू नये. हिरव्या भाज्या-मोडाचे कडधान्य ई चा समावेश करावा.

*जेवनात तेलचा वापर अगदी कमी करावा.

*थंड पाण्याचा वापर टाळावा.

*रोज मीठ व कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

*सकाळी आणि संध्याकाळी कपूर आणि निलगिरी तेल टाकून वाफ घ्यावी.

(एखाद्याला कोरोना पेशन्टला याचा फायदा व्हावा या एकमेव हेतूने, फक्त एक अनुभव म्हणून मी हे इथे शेअर करत आहे.डॉक्टरचा सल्ला देखील जरुर घ्या.)
सिद्धि चव्हाण
https://siddhic.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण जगात reinfection झालेल्या लोकांची संख्या दहा च्या आत आहे.
तुम्हाला कुठे सापडले reinfection वाले.who ला माहिती ध्या

किशोर, निलेश, hemant धन्यवाद!

Hemant - WHO ला माहिती देण्यासाठी कुठे जावे लागते. कोणती लिंक वगैरे ‌ की त्यांच्या संकेतस्थळावर?

पुण्याला माझा मावस भाऊ दोन वेळा सापडला आहे.
खरं तर खरंच reinfection होत आहेत की रिपोर्ट मध्ये काही झोलझपाटा केला जातोय हे समजायला हवे.

एकदा कोरोनातुन बरे झाले की, आपल्या शरिरामध्ये antibodies तयार झालेले असतात. मग परत positive रिपोर्ट कसा काय येतो. काही विशिष्ट काळा नंतर परत कोरोना होऊ शकतो का? ही माहिती मी सुद्धा शोधते आहे.

मलेरिया चे उदाहरण घेतले तरी हे लक्षात येईल एकदा मलेरिया होवून बरा झाल्या नंतर काही महिन्यात परत झाला तर त्याचे स्वरूप खूप गंभीर असते.
औषध सुद्धा काम करत नाहीत.मग हेच सूत्र वापरलं तर एकदा corona होवून गेल्या नंतर परत झाला तर लक्षण पहिल्या पेक्षा गंभीर असायला हवीत.पण तसे होत नाही.तुमच्या मावस भावाला परत corona झाला तेव्हा त्या आजाराची लक्षण पहिल्या पेशा जास्त गंभीर होती का?
तुमचे उत्तर नाही असेच असेल.

Reinfection सारख्या गंभीर विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांनीच बोललेलं बरं. कुमारजींच्या कोविड वरच्या धाग्यात बरीच उपयुक्त माहिती मिळेल.

अभिनंदन..

मालेगाव काढ्यामुळे लोकांना मूळव्याधी झाल्याचं ऐकलं होतं

सिद्धी सलाम तुम्हाला, तुमच्या सकारात्मकतेला। तुमचा हे अनुभवलेखन इतरांनाही उपयोगी होईल।
तुम्हाला आणि कुटुंबियांना शुभेच्छा

सिद्धी सलाम तुम्हाला, तुमच्या सकारात्मकतेला। तुमचा हे अनुभवलेखन इतरांनाही उपयोगी होईल।
तुम्हाला आणि कुटुंबियांना शुभेच्छा > अनुमोदन.

कधी कधी खूप काळजी घेऊनही आपल्या कंट्रोल मध्ये नसलेल्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो. त्यामुळे आपण बाळाप्रती निष्काळजी आहोत वगैरे मन खाणारी भावना मनातून काढून टाका.
पण नेमके कशामुळे ईन्फेक्शन झाले असावे त्याचा विचार मात्र जरूर करा आणि ते कारण निवारण्याचा प्रयत्न सुद्धा जेणेकरून त्या कारणामुळे पुन्हा परिस्थिती ऊद्भवणार नाही.

सिद्धी सलाम तुम्हाला, तुमच्या सकारात्मकतेला। तुमचा हे अनुभवलेखन इतरांनाही उपयोगी होईल।
तुम्हाला आणि कुटुंबियांना शुभेच्छा >> +1

आई ग्ग!!! बाळ रडायचं Sad Sad टेरिबल वाटलं ऐकून. खूप धीराच्या आहात तुम्ही.
आता खूप लाड करा तिचे.

कोरोनातून बरे झालात सगळे ही चांगली बातमी .बिचारया छोट्या बाळाला सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागला याचे वाईट वाटले.
तुम्ही मॉमप्रेसोवर लिहिता का? हा लेख तिकडे वाचल्याचे आठवते.

सिद्धी कोरोनो च्या त्रासातून मुक्त झाल्याबद्दल अभिनंदन. इतक्या छोट्या बाळाबरोबर तुम्ही जसे दिवस काढले ते कौतुकास्पद आहे. मी पण सध्या कोरोना तुन जात आहे. होम quarantine आहे, पूर्ण फॅमिली पॉसिटीव्ह माझं छोटा ५ वर्षाचा पण आणि ७० वर्षांचे आई बाबा पण. dr च्या सल्ल्याने औषधं चालू आहेत. द डायमर ठीक आहे. आणि गरम पाणी वाफारा पण चालू आहे. सध्या बारीक ताप असतो ९९. ५ च्या आसपास रोज. आमच्या dr ने सांगितले कि मुलांना काही त्रास होत नाही पण मुलांना आजी आजोबा ह्यांच्या बरोबर नका ठेवत जाऊ कारण लहान मुलांना जरी त्रास नाही झाला तरी त्यांच्यामुळे इतर जणांना संसर्ग होऊ शकतो.

अजून एक प्रश्न साधारण किती दिवसांनी बरं वाटायला वाटतं ?

धन्यवाद!

Hemant - होय बरोबर जाआसत काही लक्षण नसताना ही रिपोर्ट positive होता.

अश्विनी - नक्कीच काळजी घेईन.

सियोना- होय. मॉमप्रेसोवर लिहीते मी.

योगेश वाचुन खुप वाईट वाटले. तुमच लहान मुलं सुध्दा positive आहे. आणि सर्व कुटुंब, म्हणजे ही गोष्ट उशीरा लक्षात आल्यामुळे सगळ्यांना याची लागणं झाली असणार.
असो काळजी घ्या. लवकरच सगळे बरे व्हाल.
आपली वि.पु. चेक करा.
कोणतीही माहिती हवी असल्यास डॉक्टर कुमार यांच्या https://www.maayboli.com/node/77437?page=8 या धाग्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

योगेश वाचुन खुप वाईट वाटले. तुमच लहान मुलं सुध्दा positive आहे. आणि सर्व कुटुंब, म्हणजे ही गोष्ट उशीरा लक्षात आल्यामुळे सगळ्यांना याची लागणं झाली असणार.
असो काळजी घ्या. लवकरच सगळे बरे व्हाल.>>>>> +१.

धन्यवाद सगळ्यांचे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छने सगळे नीट होईल ह्याची खात्री आहे. सगळ्यांच्या पॉसिटीव्ह रेस्पॉन्सेस मुळे छान वाटले . रिद्धीजी मी तुम्हाला विपू वर रिप्लाय केलाय.
कुमार डॉक्टरांशी बोलून खूप छान वाटले.
सगळ्यांनी काळजी घ्या.

Pages