Submitted by रानभुली on 2 March, 2021 - 10:42
रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन
चिंचांत हरखली चव आंबटगोडीने
भान हरखले बाई कैरीच्या गंधाने
आमराई साऊली गर्द, जणू माऊलीमाया
कसा पाड लगडला गोड कैरीने वाकाया
तिने जपले शैशवपन रानाची वाट
रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन
एक फांदी डहुळते का गं
केवड्याला बिलगतो नाग
बोरीला बोर, धुंद हा बहर
चित्तास हर्ष, आंबे मोहर
रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन
ते रान हरवले कोठे
ती वाट हरवली कोठे
ती बाभूळ आणि बोरी
का वाट दिसे अंधारी
जिथे जाईल नजर
रानाच्या वाटेला एक बाभूलबन
बोरीच्या हाका ऐकते गं मन
- रानभुली
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती छान , फोटोही झक्कास !
किती छान , फोटोही झक्कास !
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
>>>ते रान हरवले कोठे
ती वाट हरवली कोठे
ती बाभूळ आणि बोरी
का वाट दिसे अंधारी
जिथे जाईल नजर>>>> चर्र!! झाले.
छान करतेस कि कविता पण...मस्तच
छान लिहितेस कविता पण...मस्तच !
गाभुळ्या चिंचा पाहून तोंपासु
छान कविता आणि चिंचेंचा फोटो
छान कविता आणि चिंचेंचा फोटो पण एक नंबर..!!
आवडली कविता
आवडली कविता
छान
छान
अस्मिता - धन्यवाद. फोटो
अस्मिता - धन्यवाद. फोटो
सामो - मनापासून आभार
मृणाली - मनापासून आभार @ फोटो - माझ्याही
रूपाली विशे-पाटील - धन्यवाद दोन्हीसाठी
तेजो - आभार
ब्लॅककॅट - आभार
मस्त!
मस्त!
धन्यवाद , वावे.
धन्यवाद , वावे.
अप्रतिम, चंचल , नॉस्टॅल्जिक .
अप्रतिम, चंचल , नॉस्टॅल्जिक ...... वा वा
मस्तच!!!
मस्तच!!!
रानभुली छान कविता.
रानभुली छान कविता.
मी सहज वाचता वाचता 'लेक लाडकी या घरची' या गाण्याच्या कडव्यांची चाल लावून वाचली. चाल थोडी बदलली पण बऱ्यापैकी गेय झाली कविता